Sharad Pawar-Dilip Walse Patil
Sharad Pawar-Dilip Walse Patil Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'गैरसमजाबद्दल दिलगिरी, विधानावर ठाम...' वळसे पाटलांच्या टीकेचे अजित पवार गटाकडून समर्थन

Rashmi Puranik

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP) दोन गट पडल्यानंतर एकमेकांवर जोरदार हल्ले प्रतिहल्ले होत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात निदर्शनेही करण्यात आली, ज्यानंतर आता अजित पवार गटाकडून याबद्दल अधिकृत स्पष्टिकरण देण्यात आले आहे.

अजित पवार गटाने स्पष्ट केली भूमिका...

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या टीकेवरुन राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे.  एका कार्यक्रमात बोलताना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी "शरद पवार (Sharad Pawar) हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही.. अशी टीका केली होती.

यावरुन वाद झाल्यानंतर आता अजित पवार गटाने ट्वीट करत याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "नामदार श्री. दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. आदरणीय शरद पवार साहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठींबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे," असे यामध्ये म्हणले आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केली होती टीका...

दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांच्या टीकेवरुन जितेंद्र आव्हाडांनी संताप व्यक्त केला होता. "दिलीप वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार,साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस. प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे.. असे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs LSG, IPL 2024: राहुल- पुरनची तुफान फटकेबाजी! मुंबईला जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: बाळासाहेबांनी पडत्या काळात मदत केली, ते उपकार तुम्ही विसरला; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

Maharashtra Politics 2024 : प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का? इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

Benifits of Curry leaves: सकाळी उठल्यावर कढीपत्याचे पाणी प्या; आरोग्याला होतील अनेक फायदे

Raj Thackeray Demands: मुंबई-गोवा महामार्ग, रेल्वे अन् बरंच काही; भरसभेत राज ठाकरेंच्या PM मोदींकडे या महत्त्वाच्या मागण्या

SCROLL FOR NEXT