Maharashtra government led by Devendra Fadnavis has cancelled the 5% Muslim educational reservation introduced 12 years ago saam tv
महाराष्ट्र

Muslim Reservation: मुस्लीम समाजाला मोठा धक्का; मुस्लीम आरक्षण फडणवीसांकडून रद्द

Muslim Education Reservation: 12 वर्षांपूर्वी मुस्लीम समाजाला लागू करण्यात आलेलं शैक्षणिक आरक्षण फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आलयं. मात्र हे आरक्षण का रद्द करण्यात आलं. मुस्लीम समाजातील नेत्यांनी नेमका काय आरोप केलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

  • 12 वर्षांपूर्वी लागू केलेले 5% मुस्लीम शैक्षणिक आरक्षण रद्द

  • फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

  • मुस्लीम समाजातून नाराजीची प्रतिक्रिया

राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी देण्यात आलेले 5 टक्के आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. एकीकडे उच्च न्यायालयाने नोकरीतील आरक्षणाला नकार दिला असला तरी शिक्षणातील आरक्षणाबाबत सकारात्मकता दर्शवली होती.अशातच मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय मुस्लीम समाजासाठी मोठा धक्का मानला जातोय.

मुस्लीम समाजाचं 5% आरक्षण रद्द

जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक

23 डिसेंबर 2014 चा आघाडी सरकारचा निर्णय रद्द

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लागू होतं आरक्षण

मुस्लीम आरक्षणाचा शासन निर्णय 12 वर्षांनी रद्द

या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडालीय... जे विद्यार्थी या आरक्षणाच्या आशेवर होते किंवा ज्यांनी यापूर्वी प्रमाणपत्रं काढली होती, त्यांच्यासमोर आता तांत्रिक पेच निर्माण झालाय. मात्र हे आरक्षण नेमकं का रद्द करण्यात आलं पाहूयात.

मुस्लीम आरक्षण रद्द का?

मुस्लीम समाजाला 5% आरक्षण देणाऱ्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर झालं नव्हतं

हायकोर्टाकडून 14 नोव्हेंबर 2014 रोजी अध्यादेशातील काही तरतुदींना अंतरिम स्थगिती

कोर्टाच्या स्थगितीमुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू झालं नाही

आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे आघाडी सरकारचा निर्णय वादात

आरक्षणानुसार आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरु राहणार

दरम्यान महायुती सरकारच्या या निर्णयामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचे काम सरकार करतयं, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय.. तर या सरकारकडून अपेक्षा नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केलीय.

दरम्यान महायुती सरकारच्या या निर्णयामुळे आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना पुन्हा अंधारात ढकलण्याचे काम सरकार करतयं, असा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय.. तर या सरकारकडून अपेक्षा नाहीत, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT