Ward reshuffle begins: Maharashtra gears up for civic elections as Pune, Nagpur and other cities witness delimitation—Mumbai excluded. 
महाराष्ट्र

Local Body Elections : मुंबई, पुणे मनपाची निवडणूक आणखी लांबणीवर, समोर आली महत्त्वाची अपडेट

Maharashtra municipal elections postponed till post-Diwali : मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता दिवाळीनंतर होणार आहेत. प्रभाग रचनेचा कालावधी वाढवल्यामुळे ऑक्टोबरमधील निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

Namdeo Kumbhar

Mumbai Pune Local Body Elections : सत्ताधारी आणि विरोधकांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी केली जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्यात निवडणुकीचे पडघम वाजयाला सुरूवात झाली. महानगर पालिकेच्या प्रभाग रचनेचे सरकारकडून आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळे दिवाळीच्या आधी निवडणुका होतील, असा अंदाज बांधला जात होता. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे अन् पुण्यासारख्या मनपा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार नाहीत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतरच होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ऑक्टोबरनंतर म्हणजेच दिवाळीनंतर होणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. निवडणुकीसंदर्भातील शासकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेच्या कालमर्यादेला प्रशासनाकडून वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका आणखी पुढे जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यात ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत होता. त्यात सोमवारी नगरविकास विभागाने प्रभाग रचनेच्या वेळापत्रकात सुधारणा करत, अहवाल सादरीकरणासाठीची मुदत वाढवली. प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याचे प्रारुप जाहीर करणे, त्यावरील हरकती, आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होईल. त्यानंतर या हरकती, सूचनांवर सुनावणी पार पडणार आहे. त्यानंतरच प्रभाग रचनेच्या अंतिम मंजुरीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यामुळे निवडणुकाही दोन ते तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर अथवा डिसेंबर यादरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील.

नगरविकास विभागाच्या नव्या आदेशानुसार, आता ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिका प्रभाग रचना अहवाल सादर करता येणार आहे. तर ड वर्गातील महापालिकेचा अहवाल १३ ऑक्टोबरपर्यंत सादर करता येईल. नगर परिषद व नगरपंचायतीसाठी ३० सप्टेंबर अशी मुदत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Free chicken distribution in pune : ओळखपत्र दाखवा अन् चिकन मोफत न्या; जोडप्याने वाटलं 5000 किलो चिकन मोफत, VIDEO

Monday Horoscope : वरिष्ठांच्या नजरेत प्रतिमा उंचावेल, विष्णू उपासना फायदेशीर ठरणार; 'या' राशींच्या लोकांना प्रेमात लाभ होणार

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंची युती कधी होणार? उद्धव ठाकरेंचा युतीबाबत नवा दावा?

Marathi Language Controversy: मुंबईत पुन्हा मराठी-हिंदी वाद उफाळला; परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार, VIDEO

Couple Romance Viral video : आता याला काय म्हणावं? गर्लफ्रेंडने डोके मांडीवर ठेवले अन्...; उडत्या विमानात कपलचा रोमान्स, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT