Women Mayors Saam Tv
महाराष्ट्र

Municipal Corporations: राज्यातील १५ महापालिकांमध्ये महिलाराज, कोणत्या महापालिकांमध्ये असतील महिला महापौर?

Women Mayors 15 Municipal Corporations : महाराष्ट्रात महापौर आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह १५ महानगरपालिकांमध्ये महिला महापौर असणार आहेत.

Bharat Jadhav

  • राज्यातील 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये महिलाराज

  • मुंबई, पुणे, नागपूरसह प्रमुख शहरांत महिला महापौर

  • 9 महापालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण

मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्यामध्ये महापौरपदाचं आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. मुंबई, पुणे, नागपूर या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचं जाहीर झाले आहे. 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळणार आहे.

मुंबई, नागपूर, पुणे, नवी मुंबईसह 9 महापालिकांमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी महापौर पदाचं आरक्षण जाहीर झाले आहे. पंधरा महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव आहे. त्या 15 पैकी अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला २ महापालिकांमध्ये महापौर असतील. अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी लातूर आणि जालना या महापालिकांसाठी महापौरपदाचे आरक्षण असेल.

राज्यातील 8 महापालिकांमध्ये ओबीसी प्रवर्गाचे महापौर होतील. त्यापैकी चार महापौर ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. अकोला, चंद्रपूर, अहिल्यानगर आणि जळगाव येथे ओबीसी प्रवर्गातील महिलांना महापौर होतील. तर 17 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महापौर होतील. यातील 9 महापालिकांमध्ये महिलांना महापौर पदावर संधी मिळेल. मालेगाव, पुणे, धुळे, मुंबई , नांदेड-वाघाळा,नवी मुंबई, नागपूर, मिरा भाईंदर नाशिक महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातील महिला महापौरपदावर बसतील.

अनसुचित जाती प्रवर्गातील महिला आरक्षण

जालना, लातूर

ओबीसी महिला

अहिल्यानगर, अकोला, जळगाव, चंद्रपूर

सर्वसाधारण महिला प्रवर्ग आरक्षण

पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव, मिरा भाईंदर, नागपूर, नाशिक

महिलाराज कोणकोणत्या महापालिकांमध्ये असणार?

छत्रपती संभाजीनगर: सर्वसाधारण

नवी मुंबई: सर्वसाधारण (महिला)

वसई- विरार: सर्वसाधारण

कल्याण- डोंबिवली: अनुसूचित जमाती

कोल्हापूर: ओबीसी

नागपूर: सर्वसाधारण (महिला)

बृहन्मुंबई: सर्वसाधारण (महिला)

सोलापूर: सर्वसाधारण

अमरावती: सर्वसाधारण

अकोला: ओबीसी (महिला)

नाशिक: सर्वसाधारण (महिला)

पिंपरी- चिंचवड: सर्वसाधारण

पुणे: सर्वसाधारण (महिला)

उल्हासनगर: ओबीसी

ठाणे: अनुसूचित जाती

चंद्रपूर: ओबीसी (महिला)

परभणी: सर्वसाधारण

लातूर: अनुसूचित जाती (महिला )

भिवंडी- निजामपूर: सर्वसाधारण

मालेगाव: सर्वसाधारण (महिला)

पनवेल: ओबीसी

मीरा- भाईंदर: सर्वसाधारण (महिला)

नांदेड- वाघाळा: सर्वसाधारण (महिला)

सांगली- मिरज- कुपवाड: सर्वसाधारण

जळगाव: ओबीसी (महिला)

अहिल्यानगर: ओबीसी (महिला)

धुळे: सर्वसाधारण (महिला)

जालना: अनसूचित जाती (महिला)

इचलकरंजी: ओबीसी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT