Mumbai Maharashtra Rain Alert  SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Latest Alert : मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांसाठी पुढील ३-४ तास महत्वाचे; हवामान खात्याचा अंदाज काय?

Mumbai Maharashtra Rain Alert Today: मुंबई, ठाणे, रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांतील काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती आहे.

Nandkumar Joshi

Mumbai Maharashtra Rain Alert :

मुंबई, ठाणे, रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यांतील काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती आहे. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. पावसानं धुमाकूळ घातला असतानाच, पुढील ३ ते ४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पुण्यासह अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामानाचा अंदाज

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, साताऱ्यातील घाट परिसर, कोल्हापूरचा काही भाग, हिंगोली, यवतमाळ, परभणी आणि लगतच्या भागांत पुढील तीन ते चार तासांत पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Rain Alert)

अमरावतीत ९ तासांपासून कोसळधार, गावात घुसले पुराचे पाणी

अमरावतीच्या अनेक भागांत ९ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विरुळ रोघे गावात पुराचे पाणी शिरले आहे. विरूळ गावातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. ग्रामपंचायत परिसर जलमय झाला आहे. गावातील मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. (Amravati Rain)

Vasai Virar Rain: वसई-विरारमध्ये सखल भाग पाण्यात

वसई-विरारमध्ये आज रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क, गालानगर, तुळज रोड, एसटी डेपो निळेगाव या भागात गुडघाभर पाणी साचले आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा एकदा वसई-विरारमध्ये पूर होण्याची शक्यता आहे. नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात गुडघाभर पाणी साचले असून गेल्या अनेक दिवसांपासून लोकांची या पाण्यातून सुटका होत नाहीये. या परिसरातील खड्ड्यांमध्ये माती भराव केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. (Weather Alert)

नांदेड जिल्ह्यात संततधार

नांदेड जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. कुठे मध्यम स्वरूपाचा, तर कुठे मुसळधार पाऊस कोसळत आहे. मागील सहा दिवसांत सरासरी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. जिल्ह्यातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laxman Hake: 'जरांगेंच्या बैठका सरकार पुरस्कृत, आमदाराने दिले १० ते १५ लाख'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

Shirdi News: शिर्डी ट्रस्टचे कोट्यवधी उत्पन्न, तरीही लाडू प्रसाद महाग, साईभक्तांचा संताप|VIDEO

Heavy Rain : मुसळधार पावसाचा हाहाकार; राज्यात २२ लाख एकर शेतीचे नुकसान, कृषी मंत्री भरणे यांची माहिती

Raigad Fort History: रायगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Shweta Tiwari: मुंबईत कुठे राहते श्वेता तिवारी? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT