MAHARASHTRA MONSOON UPDATE: WHEN WILL RAINS RETURN? MONSOON LIKELY TO BECOME ACTIVE FROM JUNE 22 saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra Rain Update: दीर्घकाळच्या ओढनंतर राज्यात २२-२३ जूनपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. जूनच्या अखेरीस दक्षिण कोकण, मुंबई आणि राज्याच्या अंतर्गत भागांत पावसाचे प्रमाण हळूहळू वाढू शकते.

Bharat Jadhav

  • २२ ते २३ जूनपासून दक्षिण कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

  • राज्यातील बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान मॉडेल्सने वर्तवली आहे.

  • पावसाच्या विलंबामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

राज्यात यावर्षी पावसानं चांगलीच ओढ दिल्यानं शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही आपण उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्याच दरम्यान मान्सूनबाबत एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. येत्या आठवड्यात साधारणपणे २२-२३ तारखेपासून, दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या लगतच्या भागात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर हळूहळू वाढून २४ ते २६ जूनदरम्यान तो उत्तर कोकण आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचू शकतो. हवामानाच्या मॉडेल्सनुसार, आगामी दिवसात राज्यातील बहुतांश भागात पाऊस पडण्याची शक्यता असून जूनच्या अखेरीपर्यंत पाऊस कोसळणार आहे.

मुंबईत मान्सूनचे आगमन कधी होणार?

मागील २०१९ व २०२३ अशा एल-निनोच्या गत दोन वर्षात मुंबईत मान्सूनचे १४ दिवस उशिराने आगमन झाले. यावर्षीही एल-निनोचे वर्ष आहे आणि अद्याप मुंबईत मान्सून पोहोचला नाही. २०२६ च्या एल-निनो वर्षात सुद्धा मान्सूनचे गुरुवार दिनांक २५ जूनला मुंबईत आगमनाची शक्यता आहे, याबाबत होसाळीकर यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.

मान्सून २५ जून ते बुधवार दिनांक १ जुलै दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता आहे. मुंबईतील दिवसाच्या दमट व रात्रीच्या उकाड्यापासुन मुंबईकरांना दिलासा कधीपासून मिळू शकतो. आज शनिवार दिनांक २० जून पासूनच वातावरण बदलण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईकरांना दिवसाच्या दमटपणा व रात्रीच्या उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळू शकतो, असे वाटते.

उर्वरित महाराष्ट्रात मान्सून कधी

मुंबईतील मान्सूनच्या आगमनानंतर म्हणजे जुनच्या शेवटच्या आठवड्यात खान्देश, नाशिक अहमदनगर, पुणे सातारा कोल्हापूर व पश्चिम मराठवाड्यातील जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. पूर्व मराठवाडा व विदर्भात मात्र जुलै पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात मान्सून च्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red And Black Ants : पावसाळ्यात लाल- काळ्या मुंग्या वारंवार निघताय? या टीप्स वापरून मुंग्याना घरातून पळवा

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये एकनाथ शिंदेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू

उद्योगांच्या स्थलांतराच्या इशाऱ्यानंतर एकनाथ शिंदेंची रॅपिड अ‍ॅक्शन! आधुनिक पद्धतीने चाकणचे खड्डे बुजवायला सुरूवात

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT