Maharashtra Rain Updates Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Updates: राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा

Rain Updates In Maharashtra: शनिवारी सकाळपासूनच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलास मिळाला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठे बदल होत आहे. कुठे कडक ऊन तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच शनिवारी सकाळपासूनच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलास मिळाला आहे. Latest Marathi News)

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उत्तर भारतातील बहुतांश भागात पुढील दोन तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. तसंच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार, शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या.

नाशिकमध्ये आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी (Rain Update) लावली. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आज झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तर वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि जोरदार तशी 30 ते 40 च्या वेगाने वारे वाहणार असल्याचा अंदाज मान्सून विभागाने वर्तविला आहे.

शनिवारी सकाळपासूनच नभ दाटून आले असून नाशिकमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली असून शेतात काढून ठेवलेल्या पिकांवर आवरण घालण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ दिसून आली.

दरम्यान, नाशिक सोबतच धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने (Monsoon Update) हजेरी लावली. धुळे शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावताच भले मोठे झाड उन्‍मळून पडले. या खाली उभ्‍या असलेल्‍या कारवर झाड पडल्‍याने गाडीचे नुकसान झाले आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दुसरीकडे नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सातपुडा परिसरात असलेल्या धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने अनेक घरांचे पत्रे उडाले असून आदिवासी कुटुंबातील घरांचे मोठे नुकसान झालं आहे.

गुजरात राज्यमध्ये अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे नंदूरबार जिल्ह्यात वादळी वारे आणि हलका पाऊस पुढील काही तासात पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि जोरदार वादळ वारा सुरू झाला आहे.

दरम्यान, हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशाची राजधानी दिल्लीत रविवारची सुरुवात पावसाने झाली. यादरम्यान जोरदार वारेही वाहत होते. दिल्ली-एनसीआरच्या काही भागात आकाश ढगाळ होते आणि थंड वारे वाहत होते.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT