महाराष्ट्र

Maharashtra Weather: आला रे आला पाऊस आला! राज्यात पुढील ८ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update : १५ दिवसांच्या विलंबानंतर अखेर पुण्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रात पुढील आठवडाभर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Bharat Jadhav

अल-निनोचे अडथळे पार करत मान्सून अखेर सोमवारी सकाळी पुणे शहरात दाखल झाला. यंदा तो नियोजित तारखेपेक्षा तब्बल १५ दिवस उशिरा आला आहे. दरम्यान आता मान्सूनचा वेग पाहता आगामी ४८ तासांत तो मुंबईत पोहचेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच राज्यात पुढील आठ दिवस मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या १५ दिवसांपासून मान्सून बारामती, हरणाई, सोलापूर भागात थबकलेला होता. मात्र, रविवारी हवेचे दाब अनुकूल होताच मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्याच्‍या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. सोमवारी सकाळीच मान्सून पुण्यात दाखल झाला. तसेच, मुंबईत आगामी ४८ तासांत तो धडकणार असल्याचा अंदाज दिला. त्यामुळे आता राज्यात तो जोरदार मुसंडी मारणार आहे. मात्र, जूनची सरासरी भरून काढण्यास जुलै उजाडणार आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.

पुढील ४८ तासांमध्ये मान्सून मुंबईत पोहचेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. २६ जूननंतर महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात मॉन्सून पोहचेल आणि त्याचा प्रभाव पाडेल अशी शक्यता आहे. यंदा राज्यात पाऊस सरासरीपेक्षा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा कृषी विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन हवामान विभागाने वर्तवला आहे.

जालना शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी

जालना शहरासह आसपासच्या परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.मागच्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलय.

जालना शहरात दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर अचानक वादळी वारे सुरू झाले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली.गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने नागरिकांसह शेतकरीही चिंतेत होते.मात्र या पावसामुळे खरीप हंगामाच्या तयारीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : देवीच्या कृपेने पैसा वाढवण्याची मोठी संधी मिळेल, ६ राशींनी राहा सावध; वाचा रविवारचे राशीभविष्य

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

SCROLL FOR NEXT