Maharashtra Weather Updates IMD Rain Alert Latest News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain News: सुट्टी संपली, राज्यात वरुणराजा पुन्हा बरसणार! कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; ५ जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'

Maharashtra Weather Update: राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Rain Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेला पाऊस पुन्हा परतणार आहे. राज्यातील विविध भागांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच राज्यातील पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Heavy Rain)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार आहे. त्यामुळे आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या सुचनेनुसार, गोंदिया (Gondia) , भंडारा (Bhandara), चंद्रपूर, नागपूर (Nagpur) आणि गडचिरोली या पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सुरूवातीला हवामान खात्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. मात्र बदलत्या हवामानानुसार ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. येत्या २५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात पाऊस पुर्णपणे सक्रिय होईल.. असे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यंदा राज्यात अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. राज्यातील अनेक भागांत पाऊसाच्या सरी कोसळला असला तरी अद्याप काही भाग लहानलेलाच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने बळीराजा चिंतेत आहे. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामही धोक्यात आहे. आगामी काळात पाऊस न पडल्यास अनेक भागांमध्ये पाणी टंचाईचीही शक्यता वर्तवली जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT