Satish Chavan NCP candidate Marathwada Graduates Constituency 2026 
महाराष्ट्र

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

Maharashtra MLC Polls: मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. विधान परिषद निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Bharat Jadhav

  • मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी

  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांची उमेदवारी जाहीर

  • सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक

सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी आपला उमेदवार जाहीर केलाय. राष्ट्रवादीने सतीश चव्हाण यांना पुन्हा उमेदवारी दिलीय. सतीश चव्हाण उद्याच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. २७ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.

महायुतीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला देण्यात आलीय. याच जागेवर पक्षाकडून सतीश चव्हाण यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केलाय.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काय म्हणाले सतीश चव्हाण?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तीनवेळा मी निवडून आलोय. आताही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा मला उमेदवारी दिली त्यामुळे मी आनंदी आहे. पदवीधरांचे प्रश्न मी मोठ्या नेटाने मांडेल. महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिलीय.याबद्दल महायुतीच्या नेत्यांचे मी आभार मानतो. त्यांचा विश्वास सार्थ ठरवेन, अशी ग्वाही देतो, असं सतीश चव्हाण म्हणालेत.

कोण आहेत सतीश चव्हाण?

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करणारे आमदार

त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले

२००८, २०१४ आणि २०२० दणदणीत विजय मिळवून हॅटट्रिक साधली

गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ त्यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळामध्ये कार्यकारी सदस्य

शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवतात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीवरून राजकारण रंगलं, जागावाटपावरून महायुतीत रस्सीखेच

ज्ञानेश कुमारांना मोठा धक्का, 20 वर्षे जुन्या प्रकरणात गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

आर्यवीर सेहवागकडे संघाची धुरा; DDCAने पहिल्यांदा सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी

आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT