Maharashtra MLC election result 2026 latest updates saam tv
महाराष्ट्र

MLC Election Result: महायुती की मविआ, का बंडखोर उमेदवार? पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कोण मारणार बाजी?

Maharashtra Legislative Council Results: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी की अन्य उमेदवार बाजी मारणार? जाणून घ्या प्रमुख उमेदवार आणि मतमोजणीचे अपडेट्स.

Bharat Jadhav
  • महायुती, महाविकास आघाडी किंवा अन्य उमेदवारांपैकी कोण बाजी मारणार

  • पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडे, जयंत आसगावकर आणि सचिन सानप यांच्यात प्रमुख लढत

  • अंतिम निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे अधिकृत घोषणेनंतरच निश्चित होतील.

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले होते. ही मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलीय. दरम्यान यात सर्वाधिक चर्चेत असलेली लढत पुण्यातील आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर, शिंदेसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्यामध्ये तर पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत झाली. राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कोण मैदान मारणार हे काही वेळात कळणार आहे.

दरम्यान जागावाटपावरून झालेल्या मोठ्या रस्सीखेचानंतर आता अनेकांना निकालाची उत्सुकता लागलीय. महायुती आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने निकालाबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झालीय. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार रिंगणात उतरलेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

विजयाचा गुलाल कोण उधळणार ?

विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर साम टीव्हीने एक्झिट पोल जाहीर केला होता. या पोलमध्ये धक्कादायक निकाल लागेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. महायुती आणि महाविकास आघाडी विजय मिळवण्यासाठी पूर्ण ताकद लावलीय. दुसरीकडे मित्रपक्षांमधील नाराजी आणि बंडखोरीमुळे निवडणूक चुरशी ठरलीय.

पुणे पदवीधर

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात मुख्य लढत आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये डॉ. स्मिता जाधव या बाजी मारू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुणे शिक्षक

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांच्या विजयाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. महायुतीचे कौस्तुभ गावडे आणि महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर रिंगणात आहेत.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि दिलीप घुगे यांच्यात तिरंगी लढत झाली. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचे दिसतंय.

अमरावती

काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे या बाजी मारतील असा अंदाज आहे. त्याच्या विरुद्धात महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक मैदानात आहेत.

नागपूर

भाजपकडून सुधाकर कोहळे, काँग्रेसकडून विद्यमान आमदार अभिजित वंजारी, तर अपक्ष म्हणून नितेश कराळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे हे आघाडीवर असतील असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देवाच्या आणि हिंदूंच्या नावाने मते मागून महायुतीने सत्ता मिळवली - प्रकाश आंबेडकर

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी, कुणाचा होणार विजय आज होणार स्पष्ट

Tulsi leaves benefits: या 4 लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाल्लं पाहिजे तुळशीचं पान!

Tuesday Horoscope : कामाचा ताण असेल, ६ राशींच्या व्यक्तींना मिळेल मोठं गिफ्ट; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Firing In Hotel: हॉटेलमध्ये घुसून बेछुट गोळीबार; 4 जणांचा मृत्यू, शहरात खळबळ

SCROLL FOR NEXT