Dhananjay Munde X (Twitter)
महाराष्ट्र

Dhananjay Munde: मुंडेंच्या राजीनाम्याची कहाणी! अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Santosh Deshmukh Dhananjay Munde resignation: धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात साधारण दोन तास बैठक झाली होती.

Bhagyashree Kamble

गेले ९० दिवस मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा मारेकरी कोण? त्यांच्या हत्याराला अटक झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात येत होती. ३ मार्चला सरपंचांना मारहाण करतानाचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली होती.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडेंना ३ मार्चलाच राजीनामा देण्यास सांगितले होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली होती. पण मुंडेंनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

मुंडेंच्या राजीनाम्याच्या निर्णयाबाबत सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात साधारण दोन तास बैठक झाली होती. या बैठकीत धनंजय मुंडेंसह सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते. या बैठकीत मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा झाली.

ही बैठक सोमवारी रात्री देवगिरी बंगल्यावर ८:५० वाजता सुरू झाली. ही बैठक १० वाजता संपली असल्याची माहिती आहे. दीड तासात मुंडेच्या राजीनाम्याबाबत चर्चा झाली. यात बैठकीतच राजीनामाबाबतचा निर्णय घेण्यात आला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अनेक धागे दोरे सापडत आहेत. हळूहळू अनेक बाबी समोर येत आहेत. हत्या प्रकरणात मुख्य सुत्रधार म्हणून वाल्मिक कराडचं नाव पुढे आलंय. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचं त्यांनी सुरूवातीला सांगितलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या चर्चा होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मीठमुंबरी-बागवाडी जेटीवरील बोटिंग प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Shraddha Dubey: मॉडेलिंगच्या नावाखाली काळा धंदा! ब्लॉगरच्या फ्लॅटवर छापा पडताच समोर आला धक्कादायक प्रकार

Congress Protest Live Update : मोदी सरकार ज्ञानेश कुमारांना वाचवत आहे - राहुल गांधी

ज्ञानेश कुमारांना सोडणार नाही! सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार; राहुल गांधींचा सर्वात मोठा निर्णय

Mobile Use In Toilet: टॉयलेटमध्ये मोबाईल वापरल्याने होऊ शकतो मूळव्याध, आजपासून सोडी ती वाईट सवय

SCROLL FOR NEXT