Maharashtra SEC reviewing the possibility of holding municipal elections before ZP polls after the Supreme Court’s 50% reservation cap order. Saam Tv
महाराष्ट्र

झेडपीच्या आधी महापालिका निवडणूक? निवडणूक आयोगाची चाचपणी सुरू

Municipal Corporation Polls: स्थानिक स्वराज्य निवडणुकीत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट सुप्रीम कोर्टाने घातली आहे. त्यामुळे दोन टप्प्यात निवडणुका घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. केवळ दोन मनपांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्याने महापालिका निवडणूक आधी होण्याची चिन्हे आहेत.

Girish Nikam

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मोकळा केला. मात्र 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याची अट घातली आहे. राज्यातील केवळ दोनच महापालिकांनी 50 टक्के राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे महापालिकांची निवडणूक आधी घेणे सोपे जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

राज्यात नागपूर आणि चंद्रपूर या दोनच महापालिकांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्यात दुरुस्ती करून ही मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आणणे सोपे आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी त्याबाबत अधिक मोठी कार्यवाही करावी लागणार आहे. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा पार केलेल्या 17 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचे प्रमाण कमी करूनच निवडणुका घेण्यावर निवडणूक आयोग विचार करीत आहे. आरक्षणाचे प्रमाण कमी केल्यावर पुन्हा सोडत काढावी लागेल. याला बराच कालावधी लागण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा प्रश्न नसलेल्या 15 जिल्हा परिषदांमध्ये आधी निवडणुका होऊ शकतात. कोणत्या जिल्हा परीषदेच्या निवडणुका अडचणीत आल्या आहेत.नंदूरबार, पालघर, गडचिरोली, धुळे, नाशिक, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा, बुलढाणा

आरक्षणाचे प्रमाण कमी करूनच निवडणुका घेतल्या जाणार असल्यानं 17 जिल्हा परिषदा 84 पंचायत समित्या आणि दोन महापालिकांमधील ओबीसी आरक्षण कमी होईल. तुलनेने दोनच महापालिकांमधील आरक्षणाच्या मर्यादा 50 टक्क्यांच्या आत आणणं शक्य असल्यानं महापालिका निवडणुकींचा बार जिल्हा परिषद निवडणुकीआधी उडण्याची शक्यता अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

Amruta Deshmukh: साडीत उंदीर,घाणेरडं वॉशरुम; पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या दयनीय अवस्थेवर मराठी अभिनेत्री संतापली

Braid Hairstyle: फंक्शन किंवा लग्नाला साधा अंबाडा बांधण्यापेक्षा ट्राय करा हे ५ सुंदर वेणीचे प्रकार

Rasmalai Recipe : मकर संक्रांत स्पेशल रसमलाई, घरीच १० मिनिटांत मिठाई तयार

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

SCROLL FOR NEXT