Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: परीक्षेपूर्वी युट्यूबवरून फुटली 'पॅट'ची नववीची प्रश्नपत्रिका, पुणे पोलिसात तक्रार दाखल

Maharashtra Breaking Live Marathi Headlines Updates 7 April 2025: आज सोमवार दिनांक ७ एप्रिल २०२५ महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट, नागपूर, पुणे-मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी, बीड संतोष देशमुख हत्याकांड अपडेट, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

परीक्षेपूर्वी युट्यूबवरून फुटली 'पॅट'ची नववीची प्रश्नपत्रिका, पुणे पोलिसात तक्रार दाखल

एससीईआरटी च्या ‘पायाभूत चाचणी परीक्षा-दोन’ ची प्रश्नपत्रिका युट्यूब वरून फुटली आहे. संबंधित युट्युब चॅनल आणि युट्युब चालकाविरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

येवला शहर पोलिसांकडून भांड्याच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिकच्या येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका होलसेल भांड्याच्या दुकानात तांब्या पितळाची तब्बल 23 लाख रुपयांची भांडी चोरीला गेल्याची घटना समोर आली होती.. यासंदर्भात शहर पोलीससात गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी कसून तपास करत आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील असल्याची माहिती समोर आली.

यानंतर पोलिसांनी धाराशिव येथे एक पथक पाठवून संशयित आरोपी रामचंद्र शिवाजी पवार या याची कसून तपासणी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली दरम्यान चोरीचा माल खरेदी करणाऱ्या दोघा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळीतील इतर फरार आरोपींचा शोध शहर पोलीस घेत आहे.

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील गुरुदत्त इमारतीमधील चौथ्या मजल्यावरील घराला आग

ठाण्यातील तलावपाळी परिसरातील गुरुदत्त इमारती मधील चौथ्या मजल्यावर राहणारे अभिजीत आपटे यांच्या घरातील देव्हारा ला अचानक आग लागली होती. या घटनेत देव्हारा पूर्णपणे जळून खाक झाला सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाहिये. स्थानिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने सदरची आग आटोक्यात आणली आहे.

beed : कराड धमकी प्रकरण : मिरा गिते यांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट

तुम्ही आणि आम्ही आतमध्ये असल्यामुळे वाचलात, बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखांपेक्षा वाईट हाल केले असते, अशी धमकी सुदर्शन घुलेने महादेव गितेला जेलमध्ये दिल्याची मिरा गीते यांनी दिली. या प्रकरणी मिरा गिते यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेतली.

Raigad : रायगडमध्ये मंडप डेकोरेटरच्या गोदामाला आग

रायगड ब्रेकिंग :

० मंडप डेकोरेटरच्या गोदामाला लागली आग

० आगीत मंडप डेकोरेशनच साहित्य जळून खाक

० सुमारे 50 लाख रूपयांचे नुकसान

० महाड तालुक्यातील गोंडाळे गाव हद्दीतील घटना

० प्रविण सातपुते यांच्या मालकीच्या श्री गणेश मंडप डेकोरेशन या फर्मच होत साहित्य

० आगीच कारण अस्पष्ट मात्र ओव्हरहेड विजेच्या तारांमुळे स्पार्किंग झाल्याने आग लागली असल्याचे सातपुते यांच म्हणने

Pimpri chinchwad :  पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग 

पिंपरी चिंचवडच्या कुंजबन सोसायटीतील ९ व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग लागली. मामुर्डी परिसरातील घटना. घटनास्थळी 2 अग्निशामक गाड्या पोहोचल्या

आगीमुळे नागरिकांमध्ये चिंता

फ्लॅटमध्ये रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

परभणीत गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त, लाखोंचा मुद्देमाल केला जप्त

परभणीतील पाथरी येथे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक जप्त केला आहे. या कारवाईत १५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा ५ लाख रुपयांचा ट्रक तसेच एक मोबाईल असा एकूण २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तुळजाभवानी मंदीर पाडुन पुन्हा नव्याने बांधण्याचा पुरातत्व विभाग व मंदीर संस्थानने घातलेला घाट त्वरीत थांबवावा

भोपे पुजारी मंडळाची मंदीर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्याकडे मागणी

तुळजाभवानी मातेच्या भक्तांना सोयु सुविधा मिळाल्या पाहीजेत विकास झाला पाहीजे माञ प्राचीन ठेवा नष्ट झाला नाही पाहीजे

कर्नाटक येथून नेपाळ कडे जाणाऱ्या लक्झरी बसला तापमानामुळे लागली आग

इंजिन गरम होऊन डिझेलचा पाईप लिकेज झाला आणि त्यानंतर आग लागली

इंजिन मधून धूर निघतात बसच्या चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले

जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला.

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून, जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंशापर्यंत पोहचला आहे

Maharashtra News Live Updates : पुण्याच्या कात्रज घाटात आयशर टेम्पोला आग

पुण्याच्या कात्रज घाटात आयशर टेम्पोला भीषण आग लागली. या आगीमध्ये टेम्पो पूर्ण जळून खाक झाला. कात्रज वरून खेड शिवापूरच्या दिशेने चालला टेम्पो होता. पाईपचा पेट्रोल लीग झाल्याने टेम्पोला लागली आग. टेम्पोमध्ये कुठलाही साहित्य नव्हतं.

मुरबाड आणि शहापूरमध्ये पारा 43 अंशांवर,  उन्हाच्या काहिलीने नागरिक हैराण

बदलापुरात पाऱ्यानं पुन्हा एकदा चाळीशी ओलांडलीय. दुपारच्या सुमारास बदलापुरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर मुरबाड आणि शहापुरात पारा 43 अंशावर पोहोचलाय. वाढत्या तापमानाचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

गेल्या काही दिवसांपासून बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड तसेच शहापूर पट्ट्यात उष्णतेची लाट पाहायला मिळतीय. तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी ओलांडली असून बदलापुरात पारा 42 अंशांवर पोहोचलाय, तर दुसरीकडे मुरबाड आणि शहापूर मध्ये 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. उन्हाच्या काहिलीमुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. पुढील दोन दिवस तापमान आणखी वाढेल असा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असा सल्ला प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात येतोय.

अमरावती शहर व बडनेरा शहरात कृत्रिम पाणीटंचाई

अमरावती शहरात दिवसाआड तर बडनेरा शहरात तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो, तर अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो तर काही ठिकाणी आठ आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही त्यामुळे आज आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकाऱ्यासमवेत नागरिकांना सोबत घेऊन आढावा बैठक घेतली, मुबलक पाणी असून सुद्धा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही.. त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन करा तर जे पाणीपुरवठा अधिकारी कर्मचारी पाणी योग्य प्रकारे सोडत नसेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, जे लोक पाणी चोरी करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशा सूचना रवी राणा यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या,पाणी सोडण्याच नियोजन व्यवस्थित करा कारण अमरावती बडनेरा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात मुबलक पाणीसाठा आहे, मात्र याचं नियोजन योग्य प्रकारे करत नाही अधिकारी पाणी सोडण्याच्या नियोजनाकडे व्यवस्थित बघत नाही पाणी सोडण्याचा बंद करण्याचा टाईम टेबल नाही त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी पाणी समस्या बाबत दिरंगाई केली तर कुणाला सोडणार नाही असा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला

जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचला

गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून जळगावकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असून, जळगाव जिल्ह्याच्या तापमानाचा पारा ४२ अंशापर्यंत पोहचला आहे

त्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच वाढला असून सकाळी नऊ वाजेपासून रात्री उशिरापर्यंत तापमान जाणवत आहे.

उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेय मठ्ठा याचा आधार घेत असून दुपारच्या वेळी उन्हात फिरणं टाळत आहे..

नागरिक दुपारी घराबाहेर पडत नसल्यामुळे रस्त्यांवर सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळत असून अघोषित संचार बंदी सदृश्य चित्र पाहायला मिळत आहेत..

दरम्यान, आगामी दोन दिवस तापमानात अजून वाढ होणार असून तापमानाचा पारा..43 अंशावर जाईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

सध्यस्थितीत जळगाव जिल्ह्यात राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे उष्ण वारे वाहत आहेत. त्यातच हवामान कोरडे असल्याने उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत.

वातावरणातील बाष्पाचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्यात उष्ण लहरींमुळे तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे.

विदर्भातील तापमान येत्या दोन तीन दिवसांत ४४ अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता

- “सामान्य तापामानापेक्षा सध्या विदर्भात तीन अंश सेल्सिअसपर्यंत जास्त तापमान”

- “उद्या आणि परवा विदर्भातील अकोला, यवतमाळ, नागपूरात उष्णतेच्या लाटेचा इशारा”

- पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता

- अकोल्यात सर्वाधिक ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

- उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढलं

- तापमानात वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा सुपूर्द

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉ घैसास यांनी रुग्णालाय प्रशासनाकडे राजीनामा दिला

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर उच्च न्यायालयाचा सरकारला दणका

संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले

अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला बॉन लेन येथे महानगर गॅस पाइपलाइन फुटली

रस्त्याचे खोदकाम सुरू असताना महानगर गॅस पाईपलाईन फुटली

मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू

अंधेरी पश्चिमेकडील सात बंगला बॉन बॉन लेन परिसरात रस्त्याचे खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने गॅस पाईप लाईन फुटली

कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे गॅस पाईपलाईन फुटल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप

महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत गॅस पुरवठा केला खंडित

सात बंगला परिसरातील बॉन बॉन लेन परिसरातील रहिवाशांचा गॅस पुरवठा बंद केल्यामुळे रहिवाशांच्या अडचण

संध्याकाळ पर्यंत माफी मागा अन्यथा उद्या तीव्र आंदोलन,संभाजी ब्रिगेडचा इशारा 

रामनवमीच्या दिवशी देवळी येथील राम मंदिराच्या गर्भगृहात माजी खासदार रामदास तडस यांना जानव व सोहळ न घातल्यामुळे प्रवेश नाकारल्या गेला होता. या प्रकरणाची आजही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडने उडी घेत मंदिर ट्रस्टी यांनी माजी खासदार यांची माफी मागावी अन्यथा उद्या ट्रस्ट विरोधात तीव्र आंदोलन केल जाईल अशी भूमिका घेतली आहे. संभाजी ब्रिगेडचे तुषार उमाळे यांनी हा इशारा दिलाय.

Beed News: बीडच्या पालीजवळील आनंदग्रामच्या डोंगरावर आग

बीडच्या पालीजवळील आनंदग्रामच्या डोंगरावर आग

42 एकर मधील झाडेझुडपे जळून खाक

अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात

Mahad News: चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळीचा तवंग, आंबेडकरी अनुयायी संतप्त

- चवदार तळ्याच्या पाण्यावर रंगीबेरंगी शेवाळीचा तवंग

- चवदार तळ्याचे विदृपीकरण होत असल्याने आंबेडकरी अनुयायी आणि महाडकरांकडून व्यक्त होत आहे संताप

- शेवाळीवर ट्रिटमेंट सुरु असून काही दिवसात चवदार तळ्याचे पाणी पूर्ववत होईल - नगर पालिका

Solapur News: सोलापुरातील कुचननगर भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, नागरिक संतप्त 

सोलापूर -

सोलापुरातील कुचननगर भागामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच सामोरं आलं आहे.

मैलामिश्रित आणि आळ्यायुक्त पाण्यामुळे सोलापुरातील नागरिक संतापल्याच चित्र दिसून येत आहे.

सोलापुरातील अनेक भागात अवेळी आणि कमी दाबाने होतोय पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात पाच दिवसाआड पाणी पुरवठा होतोय

तर पाणी साठवून ठेवल्यास डेंग्यू, म

Pune News:  दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे - सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे -

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे

मी आता प्रेस झाली.की भिसे कुटुंबियांना भेटणार आहे

पोलिसाचा का अस सुरू आहे काही कळत नाही, बीड परभणी पुणे अस का होत आहे,सारखा पोलिसावर का सगळा आरोप.का होत आहेत,सुळेचा प्रश्न

Pune News: वाळूने भरलेला ट्रक चेंबरमुळे खड्यात अडकला, पुण्यातील जे. एम रोडवरील घटना

पुणे -

पुण्यातील जे. एम रोड परिसरात वाळूने भरलेला ट्रक चेंबरमुळे खड्यात अडकला

कोथरूड च्या दिशेने चालला होता ट्रक

ट्रक खड्यात अडकल्यामुळे त्या परिसरात वाहतूक कोंडी

ट्रकचं मागच चाक पूर्ण चेंबर मध्ये अडकलं.त्यामुळे अडकलेलं चाक चेंबरमधून बाहेर काढण्यासाठी नागरिकांचे प्रयत्न सुरू

इंद्रजीत सावंत यांची प्रशांत कोरटकरला अब्रुनुकसानीची नोटीस

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची प्रशांत कोरटकरला

अब्रूनुकसानी संदर्भात दिली नोटीस

इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांच्या मार्फत कळंबा कारागृहातील तुरुंग अधिकारी अविनाश भोईर यांच्यामार्फत दिली नोटीस

जामीन अर्ज दाखल करत असतानाच इंद्रजीत सावंत यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याचा उल्लेख प्रशांत पुरस्कर यांनी केला होता

या पार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत यांनी आपली बदनामी झाल्यामुळे प्रशांत कोरटकरला पाठवली नोटीस

मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन केले जाईल.
सुप्रिया सुळे

काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना उच्च न्यायालयाने हटवले

- नाशिक जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे होते काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष

- दैनंदिन पूजा आणि प्रसादासाठी येणाऱ्या खर्चाला अध्यक्षांनी दिला होता नकार

- पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

- नाशिकच्या काळाराम मंदिरातील पूजा आणि प्रसादासाठी पैसे मिळत नसल्याने पुजाऱ्याने चक्क उच्च न्यायालयाचे ठोठावले होते दार

- याची गंभीर दखल घेत न्यायालयाने दिले मंदिर संस्थानच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश

- विश्वस्त मंडळातील ११ पैकी ८ सदस्यांनी पुजाऱ्यांना पूजेचे पैसे देण्यास सहमती दर्शवली होती

- मात्र ते अध्यक्षांनी ग्राह्य धरले नाही तसेच न्यायालयानेही या मुद्द्यावर एकत्र बसून तोडगा काढण्याचे आदेश दिले होते.

- या आदेशाचेही अध्यक्षांनी पालन केले नाही. त्यामुळे अध्यक्षाने या पदावर काम करणे योग्य नाही. त्यांच्या जागी या पदावर अन्य सक्षम न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे आदेश खंडपीठाने जिल्हा प्रधान न्यायाधीशांना दिले.

Maharashtra News Live Updates : चिपळूणात सुपरमार्केटमध्ये चोरी

चिपळूण शहरातील भर बाजारपेठमधील एक सुपर मार्केट अज्ञात चोरट्यांनी फोडून पोलिसांची झोप उडविली आहे. बाजारपेठेतील शहर पोलिस चौकीच्या लगतच असलेल्या या सुपर मार्केटमध्ये चोरट्यांनी चोरी करून सुपर मार्केटमधील किंमती खाद्यपदार्थांसह गल्ल्यातील रोख रक्कमेवर डल्ला मारला. सुपर मार्केटमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हे दोन अज्ञात चोरटे चोरी करताना टिपले गेले आहेत. हे सुपर मार्केट चिपळूण शहर पोलिस चौकीला लागूनच असून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत वर्दळ असते. सुपर मार्केटबरोबरच शहरातील सर्वात जुनी केशव आप्पाजी ओक यांची पेढीदेखील चोरट्यांनी फोडली. मात्र, यामध्ये चोरट्यांच्या हाती रोख रक्कम लागली नाही. परंतु सुपर मार्केटमधील खाद्यपदार्थ व गल्ल्यातील काही रोख रक्कमेवर डल्ला मारून चोरटे पसार झाले. त्यामुळे चिपळुणात एक मोठी पेढी व रस्त्यानजिकचे सुपर मार्केट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलं आहे.

शेतीपंपाच्या दिवसा वीजपुरवठा द्यावा या मागणीसाठी युवा सेनेचे आंदोलन

वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारा विरोधात माळशिरस तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.

शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी आणि खराब झालेल्या वीजेच्या तारा त्वरीत बदलाव्या या मागणीसाठी आज माळशिरस तालुक्यातील संगम येथे युवा सेनेच्या वतीने महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

जिल्हा अध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आणि युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

शेतीसाठी दिवसभरात किमान आठ तास वीज पुरवठा करावा अन्यथा महावितरण कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांबद्दल गरळ ओकणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बॅनरला शेनमारत केले जेवढे मारून आंदोलन

कृषिमंत्र्यांच्या बेताल वक्तव्यामुळे सध्या राज्यात विविध ठिकाणी विरोधात आंदोलन चालू आहे यामध्ये बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कृषिमंत्र्यांच्या फोटोला शेण फासून पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बद्दल वक्तव्य विरोधात घोषणाबाजी करण्यात आले आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ ठाकरे गटात आंदोलन

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जालन्यात ठाकरे गट आक्रमक झाला असून सरकारने कृषिमंत्र्याचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यावरून केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात ठाकरे गटाने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या फोटोला जोडो मारून निषेध आंदोलन केले.

जालना शहरातील गांधी चमन येथे कृषी मंत्री कोकाटे यांच्या बॅनर वरील फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलंय.

दरम्यान शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय.

पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतली आढावा बैठक

राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत जिल्हा आढावा बैठक ला सुरुवात जिल्ह्यातील अनेक विकास काम थांबले आहेत तर काही कामांना निधी नाही आहे.

विशेषता शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे त्यासाठी या आढावा बैठकीत नंदुरबार शहरासोबतच तालुक्यातील इतर शहरांमध्ये देखील सीसीटीव्ही लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

त्यासोबत या आढावा बैठक विकासाचे कामांचे निर्णय घेतले जाणार आहेत. त्यासोबत पोलिसांनी महसूल विभागातील अनेक योजनांच्या शुभारंभ पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थित करण्यात आला, राज्य सरकारच्या महत्वकांशी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे आदेश देखील माणिकराव कोकाटे यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 19 जून रोजी आळंदी येथून पंढरपूरसाठी प्रस्थान

महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळा असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झाली आहे.

आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून रोजी तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 18 जून रोजी पंढरपूरला होणार आहे.

१७ मुक्काम करत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जाऊन पोहोचणार आहे. ६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढीचा सोहळा रंगणार आहे.

आषाढीची तयारी चैत्र वारी पासून केली जाते प्रस्थानाच्या तारखांची निश्चिती होते.

याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वासकर फडाचे प्रमुख राणा महाराज वासकर यांनी माहिती दिली.

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आळेफाट्यात रास्ता रोको आंदोलन

पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी होत असलेल्या जमीन संपादनाला विरोध करत आज आळेफाटा चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं.

महामार्गाच्या विकासाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत, बागायती जमीन वाचवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बागायती जमीन उद्ध्वस्त न करता महामार्ग जिरायत भागातून वळवण्यात यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

या आंदोलनामुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला असून प्रशासनाचीही धांदल उडाली आहे.

पुण्यात वारजे माळवाडी, बराटे मैदान येथे पञ्याचे शेड असणाऱ्या कारखाना व गोडाऊनमध्ये आग

अग्निशमन दलाकडून 7 वाहने दाखल.

आग विझवण्याचे काम सुरु

म्हसळ्यातील 14 वर्षीय मुलाच्या मृत्यु प्रकरणी कारवाईचे संकेत

० माणगाव उपजिल्ह प्रशासनाने चौकशीसाठी अहवाला वरिष्ठांकडे पाठवला

० माणगाव उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या डॉ. सावंत आणि डॉ. राव यांनी रुग्ण चांगला आहे अस समजून घरी पाठवल्याची माहिती

० त्या रात्रीच्या घडल्या प्रकाराबाबत वरीष्ठांना माहिती पाठवण्यात आली

० माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे इंचार्ज डॉ. महेश मेहता यांनी दिली माहिती

बीड शहरातील मोमीनपुरा भागातील मोहम्मदीया कॉलनीत विद्युत तार तुटल्याने टेम्पोला भीषण आग

बीड शहरातील मोमीनपुरा भागातील मोहम्मदिया कॉलोनी मिल्लत नगर रोड अबू हनीफा चौकात विद्युत तार तुटल्याने थेट टेम्पोला आग लागली राग भिजवण्यासाठी अग्निशामक दराकडून प्रयत्न करण्यात आले आहेत एक तासानंतर अग्निशामक दलाला यश आले आहे.

यवतमाळात पारा 42.4 अंशावर,  नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आव्हान

यवतमाळ जिल्ह्यात दोन ते तीन दिवस ढगाळी वातावरणासह काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यानंतर तापमानाचा पारा थेट 42.4 सेल्सिअस अंशावर पोहोचला सूर्य जणू आग ओकत आहे की काय असा भास झाला असून यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाळा जाणवायला सुरुवात झाला. त्यातच मार्च महिना लागतात उष्णताचा झळा बसू लागला मात्र काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केला आहे.

भिसे कुटुंबीयांचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पत्र

डॉ. घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा कुटुंबीयांचा पत्रातून आरोप

घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची पत्रातून मागणी

मंगेशकर रुग्णालयाने अंतर्गत समितीचा चौकशी अहवाल जाणून बुजून माध्यमांसमोर आणत आमची आणि मृत महिलेची बदनामी केल्याचा देखील पत्रातून आरोप

यासह रुग्णालयाने खाजगी बाब अहवालातून जगजाहीर करत आमची बदनामी केल्याप्रकरणी रुग्णालयावर कारवाई करण्याची देखील मागणी

कुटुंबीयांच्या भेटीत रूपाली चाकणकर यांनी स्वीकारलं पत्र

Amaravati: अमरावतीत यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद

अमरावती जिल्ह्याच कालच तापमान 42.6 अंशावर

सकाळपासूनच अमरावती जिल्हासह शहरात उन्हाचे चटके

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अमरावती जिल्ह्याचा पारा 42 डिग्रीवर

9 व 10 एप्रिल रोजी अमरावती जिल्हात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

IPL 2025: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

यवतमाळ शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आयपीएल क्रिकेट स्पर्धावर सट्टा लावला जात असून एलसीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर लोहारा एमआयडीसी परिसरात पोलिसांनी शोध घेत त्यांना एका घरात दोघांकडून क्रिकेट मॅच वर सट्टा लावला जात असल्याचे आढळून आले खातरजमा करून गोकुळ हेरिटेज लोहारा येथे पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी रंगेहात दोघेजण हाती लागले. साहिल शेख, मुबारक शेख आणि अभिजीत रमाकांत तांबेकर दोघेही राहणार यवतमाळ असे आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यात

मेट्रो महानगरपालिका येथे घेणार कामांचा आढावा

खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाच्या आढावा घेत आहेत.

सुप्रिया सुळे घेत आहेत मेट्रो ऑफिसमध्ये मेट्रो कामाचा आढावा

मेट्रोच्या प्रकल्पातील अडथळे आणि उपाययोजना यांची मेट्रो अधिकारी देणार माहिती

दुपारी एक वाजता सुप्रिया सुळे घेणार पत्रकार परिषद

Nandurbar: पालकमंत्र्यांनी अचानक केली जिल्हा रुग्णालयाची पाहणी

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट देत याठिकाणच्या आरोग्य व्यवस्थेचे आढावा घेतला आहे.

नंदुरबार जिल्हा दौऱयावर असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आपला ताफा जिल्हा रुग्णालयात वळवल्याने यंत्रणेची धावपळ बघायला मिळाली.

माणिकराव कोकाटे यांनी अपघात कक्ष, पुरुष जनरल कक्ष यांना भेट देत याठिकाणच्या सोई सुविधांबाबत रुग्णांशी संवाध साधला.

यावेळी मंत्री कोकाटे यांनी जिल्ह्यातील ढेपाळलेल्या 108 रुग्णवाहीकांबाबत थेट आरोग्यमंत्र्यांना फोन लावून नव्या रुग्णावाहीकांची मागणी केली.

तर जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱांची रिक्त पदे देखील तातडीने भरण्याची मागणी देखील मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आरोग्यमंत्र्याकडे केली.

सतेज पाटील यांच्या पुण्यातील बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांची नाराजी?

संघटना वाढवण्यासाठी जे पोषक वातावरण पाहिजे. ते काँग्रेस भवनला नाहीये, काँग्रेसच्या संगीता तिवारी यांचा सूर

काँग्रेस चे पुणे जिल्ह्याचे निरीक्षक सतेज पाटील आज घेणार काँग्रेस भवन मध्ये बैठक

निरीक्षक म्हणून नियुक्ती केल्यानंतर सतेज पाटील यांची पहिलीच बैठक

बैठकीला शहर काँग्रेस चे सर्व नेते उपस्थित राहणार असून, सतेज पाटील घेणार आढावा

बैठकीपूर्वीच मात्र आता संगिता तिवारी यांनी "जुनी लोकं, जुने कार्यकर्ते घरी बसलेले आहेत. वेगळेच नवीन चेहरे आणि त्या चेहऱ्यांचे नातेवाईक एवढेच काँग्रेस भवनला दिसतात. पण तक्रार कुणाला करायची" असं मत व्यक्त केलंय

सामान्य कार्यकर्त्याची अशी अवस्था होत असेल की गेले कित्येक वर्ष काम करायचं आणि नंतर कोणीतरी नवखा माणूस तिथं आपला बाप बनून येत असेल तर ते सहन होत नाही त्यापेक्षा मग घरी बसलेले बरं असे कार्यकर्त्यांचे मत असल्याचं संगीता तिवारी यांनी म्हटलं आहे

Nashik News : नाशिक हादरलं, नवऱ्याकडून बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

- नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनांबे गावची धक्कादायक घटना

- नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न

- मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिले

- घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी

- घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी

- घटनेमागील कारण अस्पष्ट, पुढील तपास सुरू

भोंदू बाबा कडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; महिलेसह तिघांना अटक; जादूटोणा करत केलं कृत्य

कोल्हापूर एका अल्पवयीन मुलीवर जादूटोणाकडून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोडोली पोलिसांनी करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील भोंदू मांत्रिक तसेच त्याला साथ देणारी एक महिला आणि वाहन चालकाला पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली आहे. हातकणंगले तालुक्यातील संबंधित अल्पवयीन मुलीस नोकरी लागावी आणि तिच्या कुटुंबीयांना अर्थसहाय्याचे आमिष दाखवून हा अघोरी प्रकार केल्याचं समोर आला आहे. याप्रकरणी भोंदू बाबा राजू उर्फ राजाराम भिकाजी तावडे, एजंट सुप्रिया हिम्मत पवार आणि वाहन चालक मनोज अशोक सावंत अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत न्यायालयाने या तिघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ह्यूमन राईट संस्थेच्या मदतीने आरोपीविरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Maharashtra News Live Updates : कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी जामीन फेटाळल्याने 1 एप्रिल पासून प्रशांत कोरटकर कळंबा कारागृहात आहे. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांच्यासमोर जामीन अर्जावर युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती. या प्रकरणी प्रशांत कोरटकरवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिने म्हणजेच 25 एप्रिलला कोरटकरला पोलिसांनी तेलंगणा मधून पकडून आणले. त्याची 5 दिवसांची पोलीस कुठली संपल्यानंतर त्याच्या वकिलाने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यां समोर ठेवलेला जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तो कळंबा कारागृहात आहे.

पुण्यातील गर्भवती महिलेचा मृत्यू प्रकरण

पुणे पोलिसांनी तपासले दीनानाथ रुग्णालयातील सी सी टिव्ही

पुणे पोलिस लिहिणार ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र

दीनानाथ रुग्णालय येथे घडलेल्या प्रकरणाची चौकशी करून पोलिसांना अहवाल सादर करावा असे पत्र लिहिण्यात येणार

रुग्णालयाने रुग्णाच्या कुटुंबीय यांच्याकडून अनामत रक्कम ठेवण्याची मागणी केली होती का

५.३० तास रुग्ण दीनानाथ रुग्णालयात दिसून आले मात्र त्यांच्यावर उपचार करण्यात आले नसल्याचे प्रथमदर्शनी माहिती पोलिसांना प्राप्त

थेट रुग्णालयावर कारवाई करता येत नसल्याने पोलिसांचं ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांना पत्र

Maharashtra News Live Updates : लातूर आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना पुढील उपचारासाठी एअर लिफ्टने मुंबईला हलवण्यात येणार

लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री, डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. तर त्यांच्यावर लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. मात्र आज पुढील उपचारासाठी एअरलिफ्टने मुंबईला हलवण्यात येणार आहे... तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन पोलिसांची पथक नेमले असल्याचे देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे..

चैनीसाठी दुचाकी सोडणाऱ्या तिघांनाटक

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने चैनीसाठी दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य तोडीचा छडा लावला आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून दहा गुन्हे उघडकीस आणले आहेत. यामध्ये 15 मोटरसायकली असा एकूण आठ लाख रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय शेलार, विनायक गवळी, चंद्रदीप गाडेकर अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. कागल एसटी डेपो परिसरात सापळा रचून या तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार ठरला हॉट ठरला

छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार ठरला हॉट ठरला. यावर्षी 40.2 अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या

उन्हाळ्यातील हे रेकॉर्डब्रेक तापमान आहे. आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील रेकॉर्डब्रेक तापमान काल नोंदविले गेले. 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली. 23.3 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. शहर आणि परिसरात काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

सिंधुरत्न योजनेतील वस्तूंच वाटप शेतक-यांना वाटप

सिंधुरत्न योजनेतील लाभार्थी शेतक-यांना काल शेतीउपयोगी वस्तूंच वाटप गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं.आंब्यावरील फलमाशीपासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे तसेच शेतीपिकांचे वन्य व भटके प्राणी यांपासून संरक्षणसाठी प्रतिबंधक औषध वाटप राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं.. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अंतर्गत खेड तालुक्यातील एकूण 50 लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत 2 कोटी 52 लाख रुपयांच अनुदान वाटपही करण्यात आलं. 28 लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत विविध शेती औजारासाठी 9 लक्ष 56 हजार अनुदान , 564 लाभार्थ्यांना गाय/म्हैस दुधाळ गट, साठी निवडपत्रे देण्यात आली.. मतदारसंघातील कृषी व कृषी निगडीत क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वकष विकास आराखडा सर्व शासकीय विभागाच्या समन्वयाने तयार करण्याच्या सूचना यावेळी कार्यशाळा तसेच खरीप हंगाम 2025 पूर्वतयारी आढावा बैठकीदरम्यान राज्यमंत्री योगेश कदम मंत्री यांनी दिल्या

- अवैध सावकार नाशिक पोलिसांच्या रडारवर

- अवैध सावकारांकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांशी संपर्क साधून दाखल होणार गुन्हे

- अवैध सावकारांकडून कर्जदारांना त्रास होत असल्यास तक्रार देण्याचं पोलिसांचं आवाहन

- शहरातील अवैध सावकारीविरोधात पोलिसांकडून कारवाईचा बडगा

- शनिवारी शहरातील १३ अवैध सावकारांवर छापेमारी करत पोलिसांनी दाखल केलेत ८ गुन्हे

- ४० लाखांहून अधिक रक्कम, कोट्यावधी किमतींच्या मालमत्तांचे करारनामे, कोरे चेक आणि अन्य कागदपत्र पोलिसांनी केली जप्त

- शहरातील अवैध सावकारांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी कर्जदारांनी संपर्क करण्याचं पोलिसांचं आवाहन

पंढरपुरात चंद्रभागा नदी पात्रात घाणीचे साम्राज्य

चैत्री एकादशीच्या सोहळ्याच्या निमित्ताने पंढरपुरातील चंद्रभागा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले असले तरी सोडलेले पाणी अस्वच्छ आणि घाण झाले आहे. यामुळे भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.उद्या चैत्री यात्रेचा सोहळा साजरा होत आहे. या निमित्ताने राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत. येथे आलेले भाविक चंद्रभागा स्नान करतात. मागील अनेक दिवसांपासून नदी आणि पात्रात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले आहे. त्यामुळे अस्वच्छ झाले आहे. पाणी स्वच्छ करणारी सेबर टेक्नॉलॉजी यंत्राणा ही मागील तीन महिन्यांपासून ठप्प झाली आहे. कोट्यावधी रूपयांचा शासनाचा खर्च पाण्यात गेला आहे.

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयप्रकरणी चौकशी समिती वादात?

पुण्यातील मनसे चे राम बोरकर यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र

गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या वैद्यकीय समिती मध्ये असणाऱ्या सदस्यांच्या विरोधात आक्षेप

मनसे चे बोरकर यांचा चौकशी समिती चे डॉ राधाकृष्ण पवार यांच्यावर गंभीर आक्षेप

राधाकृष्ण पवार यांना चौकशी समितीचे अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी

डॉक्टर पवार यांच्या शासकीय कामकाजातील अनियमितता व गैरव्यवहाराबाबत अनेक तक्रारी असून त्या विरोधात विधानसभेत आरोप करण्यात आले आहेत असे पत्रात नमूद

या विषयावर लक्षवेधी घेऊन चर्चा करण्यात आली मात्र त्यावर गांभीर्याने कारवाई झाली नाही असं असताना वादग्रस्त अधिकाऱ्याकडे गंभीर प्रकरणाची चौकशी संपूर्ण कितपत योग्य, बोरकर यांचा सवाल

Maharashtra News Live Updates : पक्षात जातीचे सेल उघडणे ही मोठी चूकच, बावनकुळेंनी तसे करू नये - गडकरी

Nashik : नाशिकमध्ये उन्हाचा पारा चांगलाच तापला

- १० वर्षात पहिल्यांदाच एप्रिलच्या सुरुवातीलाच नाशिकचा पारा चाळीशीपार

- रविवारी नाशिकमध्ये ४०.२ इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद

- सकाळी ८.३० वाजता १८.७ अंश सेल्सिअस असणारे तापमान दुपारी ४.३० वाजता ४०.२ अंशांवर

- सकाळनंतर दिवसभरात तापमानात २१.५ अंशांची वाढ

- पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढताच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी....

राज्यातील 24 जिल्हे व 103 तालुके हे अतिवृष्टीमुळे बाधीत झाले असून पिकांचे आणि खासरुन कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळए पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱयांना दिले आहे. याबाबतची आठ दिवसात संपुर्ण राज्याची नुकसानीचे आकडेवारी कळेल. मात्र मुख्यमंत्री आणि राज्यातील दोन्ही मंत्र्यांशी तातडीने चर्चा करुन शेतकऱयांना काहीना काही मदतीबाबत चर्चा करणार असल्याची माहीती राज्याचे कृषीमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. आज त्यांनी नंदुरबार तालुक्यातील नुकसानग्रस्त ठाणेपाडा शिवारातील कांदाशेतीची पाहणी केली आहे. यावेळी वायागेलेल्या कांदा पिकाबाबत त्यांनी शेतकऱयांशी चर्चा करुन त्याबाबत काय कार्यवाही करता येईल यांची चर्चा देखील केली. इतकच काय तर नंदुरबार जिल्ह्या दौऱयांवर येणाऱया केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे देखील केंद्राकडून मदत मागण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल अशी माहीती कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.

वडमाळ आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

रायगडच्या पेण तालुक्यातील वडमाळ आदिवासी वाडीला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच रस्ता मिळाला आहे. दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या या वाडीतील नागरिकांचे रस्त्या अभावी हाल होत होते. आजारी व्यक्तीला डॉक्टर कडे नेणे देखील मुश्किल होत होते. या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आंदोलने, पाठपुरावा केला त्यानंतर आता रस्ता तयार करण्यात आला आहे त्यामुळे ग्रामस्थांची वर्षानुवर्षे सुरू असलेली पायीपिट थांबली आहे. रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आदिवासी वाडी ग्रामस्थ एकत्र आले आसून त्यांनी पुजा करीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला.

गेल्या वर्षात पुणे शहरात एकूण ८६२ जणांच्या आत्महत्या

एकूण दाखल झालेल्या आत्महत्या मध्ये सर्वाधिक ५८३ आत्महत्या पुरुषांच्या

पुणे पोलिसांच्या रेकॉर्ड मधून धक्कादायक माहिती समोर

बदलेली जीवनशैली, प्रेमभंग, करिअर, शिक्षणातील स्पर्धा, नोकरीतील ताण तणाव आत्महत्येची काही प्रमुख कारणे

औद्योगिक वसाहत, कामगार वस्ती मध्ये आत्महत्येचे प्रमाण अधिक

शहरात खाजगी सावकारांच्या छळाला बळी पडून आत्महत्या केलेल्यांची संख्या सुद्धा मोठी

कोणत्या वर्षात किती आत्महत्या

२०२१: ३५४ स्त्री, ६२८ पुरुष

२०२२: २४२ स्त्री, ७५४ पुरुष

२०२३: १९६ स्त्री, ७३२ पुरुष

२०२४: २०६ स्त्री, ५८३ पुरुष

राज्य महिला आयोगाची आज पुण्यात बैठक

बैठकीत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर करणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा

सकाळी ११ वाजता पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी

या बैठकीत पुणे शहरातील महिला सुरक्षितता,दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रसूती संबंधी राज्य शासनाची समिती अहवाल सादर करणार

११.५० वाजता रूपाली चाकणकर माध्यमांशी संवाद साधणार

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा,भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे वर्चस्व

धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर निकाल जाहीर झाला असुन जिल्हा मजूर फेडरेशन वर महायुतीचा झेंडा फडकला.मजूर फेडरेशनवर सुरुवातीपासूनच भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील गटाचे वर्चस्व राहिले आहे.जिल्हा मजूर फेडरेशनचे १३ पैकी १२ उमेदवार महायुतीचे निवडून आले.आ.पाटील यांच्या गटाच्या चार जागा सुरुवातीला बिनविरोध निवडून आल्या होत्या.उर्वरित ९ जागासाठी निवडणूक झाली होती त्यात लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने केवळ १ मताने जिंकली व आ.राणा पाटील यांच्या पॅनलच्या ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या दरम्यान निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तर आमदार राणा पाटील यांची नवनियुक्त सदस्यांचा यावेळी सत्कार केला.

पुणे विमानतळावरून प्रवाशी संख्या एक कोटीच्या पुढे

पुणे विमानतळावरून प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ

गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून १ कोटी ५ लाख प्रवाशांनी केला प्रवास

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या १०.६६ टक्क्यांनी वाढली

गतवर्षी डिसेंबर २०२४ हा महिना पुणे विमानतळावरून सर्वाधिक प्रवासी वाहतुकीचा ठरला आहे

डिसेंबर महिन्यात ९ लाख ५४ हजार प्रवाशांनी पुणे विमानतळाचा वापर केला त्यामध्ये ९ लाख २० हजार देशांतर्गत आणि ३३ हजार ३३७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता

देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर.....

देशाचे कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री, ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नंदुरबार कृषि विज्ञान केंद् आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र द्वारे सिलेज आधारित परिसर विकास कार्यक्रम अंतर्गत उभारण्यात आलेल्या 'कृषक ज्ञान विज्ञान मंडपम्' किसान ज्ञान संवर्धन केंद्र यासोबतच 'महिलांसाठी तंत्रज्ञान पार्क' या वास्तूंचा लोकार्पण सोहळासाठी कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान नंदुरबार येणार आहेत यावेळी ते शेतकरी मेळावाला देखील संबोधित करण्यात आहेत.. देशाचे कृषिमंत्री हे नंदुरबार च्या शेतकऱ्यांना कोणतं गिफ्ट देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

उल्हासनगरात इमारतीचा सज्जा घरावर कोसळला

उल्हासनगरमध्ये इमारतीचा सज्जा शेजारील घरावर कोसळून दोन मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. यानंतर या इमारतीबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार जखमी मुलींच्या आईने केली आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ३ मधील महाराजा हॉल परिसरात पार्वती ही धोकादायक इमारत आहे. या इमारतीचा मागील बाजूचा सज्जा घरावर कोसळला. ही इमारत धोकादायक असून बाजूला अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळं।महापालिकेने पावसाळ्यापूर्वी धोकादायक झालेली इमारत पाडावी, अशी मागणी आता रहिवाशांकडून केली जातेय.

अंबरनाथमध्ये नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला प्रकरण , तीन हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या

अंबरनाथ पालिकेतील भाजपाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या बी केबीन रोडवरील कार्यालयावर शनिवारी रात्री तोंडाला रुमाल बांधून आलेल्या १० ते १२ हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला चढवला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली असून आत्तापर्यंत ३ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हे सर्व हल्लेखोर अंबरनाथचेच असून त्यांच्या इतर साथीदारांच्या मागावर सध्या शिवाजीनगर पोलीस आहेत. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

केंद्र सरकारकडून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या 'एनएमएमएस' परीक्षेत मास कॉपी..?

धाराशिव मधील लोहारा येथील वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉफी झाल्याचा आरोप

लोहारा येथील एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या 271पैकी 115 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक,अनेक विद्यार्थ्यांना समसमान गुण

तर जिल्हाभरातील इतर 12 परीक्षा केंद्रावरील 6264 विद्यार्थ्यांपैकी 90 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून मास कॉफी झाल्याचा आरोप

परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी, तसेच चौकशी करून ज्यांच्या सहकार्याने कॉपी झाली त्यावर कारवाईचीही मागणी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला पत्र

Byte:बाळकृष्ण तांबारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ

कर्जतमधील साकारली येथे 30 फूट उंच श्रीरामाच्या भव्य मूर्तीचे शानदार लोकार्पण

राम नवमीच्या मुहूर्तावर आज रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे 30 फुट उंच भव्य आशा श्री रामाच्या मुर्तीचे लोकार्पण करण्यात आले. फटाकांची आतिषबाजी, भगव्या पताका, रामनामाचा जयघोष आणि शंखध्वनीने संपूर्ण गणेश घाट परिसर राममय झाला होता. कर्जत तालुक्यातील सावरोली येथील गणेश घाटावर या श्री रामाची मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून हि मुर्ती साकारण्यात आली आहे. या मुर्तीच्या लोकापर्णा पुर्वी सकाळ शास्त्रोक्त पुजा, होम हवन, अभिषेक करण्यात आला. व शास्त्रोक्त होम-हवनाने मंगल प्रारंभ झाला. सायंकाळी आमदार महेंद्र थोरवे आणि मान्यवरांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. आ. महेंद्र थारवे यांच्या सोबत माजी आमदार सुरेश लाड, महामंडलेश्वर श्रीमहंत चंद्रदेवदासजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

Maharashtra News Live Updates : पावसाचे संकेत देणारा बहावा बहरला, यंदा पाऊस लवकर पडणार ?

निसर्गाचा शॉवर इंडीकेटर म्हणून ओळखला जाणारा बहावा यंदा भरपूर फुलला आहे. रस्‍त्‍याच्‍या कडेला बहावाच्‍या झाडाला गर्द पिवळया फुलांचे घोष लोंबताना दिसताहेत. पिवळ्या धमक फुलांनी बहरलेला बहावा रणरणत्‍या उन्‍हात मनाला आणि डोळयाला आनंद देतो आहे. बहावा फुलल्यानंतर साधारण ४५ दिवसांनी पाऊस पडतो असा समज आहे. दरवर्षी एप्रिलच्‍या मध्‍यानंतर फुलणारा बहावा यंदा मार्च अखेरीसच फुललाय. त्‍यामुळे यावर्षी पाउस लवकर पडेल, असे जाणकार सांगतात. सध्या रायगडमध्ये रस्त्यालगत किंवा जंगलभात बहावाच्या झाडावर लोंबणारे फुलांचे पिवळे झुंबर मन मोहवून टाकत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT