मोरीवली एमआयडीसी भागातील कंपनीला लागली आग
आगीमुळे कंपनीत मोठमोठे स्फोट
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
स्वारगेट चौकात चुकीच्या बाजूने वाहन चालून वाहतूकीस केला अडथळा
सामाजिक कार्यकर्ते अक्षय ढमाले आणि सहकाऱ्यांनी पोलिसांना सांगून कारवाई करावयास सांगितले
पुणे वाहतूक पोलिसांनी अभिजीत बीचुकले यांच्या गाडीवर ठोठावला दंड
अभिजीत बिचुकले यांनी वाहतूक पोलिसांसह समवेत कार्यकर्त्यांशी घातली हुज्जत
मोरीवली एमआयडीसी भागातील कंपनीला लागली आग
आगीमुळे कंपनीत मोठमोठे स्फोट
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून परळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कटलेने निवडणुकीदरम्यान आपल्याला दहा लाख रुपये दिले होते असा खळबळ देण्यात दावा केला होता
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास नक्कीच महाराष्ट्राचा फायदा होऊ शकेल. मराठी मतं एकत्रित राहण्यासाठी या दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र जसं उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणे बाबतची काही मत व्यक्त केलीत यावर राज ठाकरेंनी सुद्धा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. असे मत माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.
नागपूरच्या हैदराबाद हाऊस येथे जनता दरबाराचे आयोजन..
दुपारी बारा ते दीड वाजे दरम्यान मुख्यमंत्री नागरिकांचे निवेदन स्वीकारतील
अडीअडचणी असणाऱ्या नागरिकांना जनता दरबारात येण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाचे आवाहन
धुळे शहरात प्रथमच खान्देशकॉन परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात धुळे जिल्ह्यासह नंदुरबार, जळगाव त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून जवळपास दीडशेहून अधिक बालरोग तज्ञ या परिषदेमध्ये सहभागी झाल्याचे बघायला मिळाले आहे.
कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत कराड येथे प्रवेश झाला. यावेळी उंडाळकर गटाने जोरदार शकतीप्रदर्शन केले.
डॉ सुश्रुत घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरण
अलंकार पोलिसांनी केला गुन्हा दाखल
बीडच्या माजलगाव येथील भाजपा लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांची माजलगाव येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला माजलगाव न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून देशभरात आंदोलन करण्यात येत आहेत. आज मुंबई युथ काँग्रेस अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत युथ काँग्रेस कडून ईडी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी ईडी कार्यालयाला टाळे ठोकले.
भांडुपमध्ये तरुणाचा हैदोस पाहायला मिळाला.
तलवार घेऊन रस्त्यावर फिरू लागला
बेस्ट बस अडवून बस आणि रिक्षाची तोडफोड
रस्त्यावरील नागरिकांना देखील तलवारी दाखवू लागला
सदर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा साई दरबारी पोहोचले आहेत. शिर्डी विमानतळाचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचे खासदार चढ्ढा यांनी सांगितले.
राज ठाकरेंकडून काही रिप्लाय आला तर तो नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाहीसंजय राऊत
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले आम्हाला आनंदचकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप जाधव
या शिक्षक मेळाव्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,खा.अनिल बोडे,आ.संजय कुटे,आ.प्रताप अडसड,आ.राजेश वानखडे, आ.प्रवीण तायडे,आ.केवळराम काळे,आ.उमेश यावलकर, आ.केवळराम काळे,माजी खासदार नवनीत राणा उपस्थित...
पश्चिम विदर्भातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित......
भरत गोगावले हे सोलापुरातील शिवसेना भवनात कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना त्यांच्या समोरच झाली बाचाबाची
शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे आणि शिवसेनेचे जेष्ठ पदाधिकारी मनोज शेजवाल यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली शाब्दिक चकमक
दरम्यान,या राड्यामुळे सोलापुरातील शिवसेना शिंदे गटातील पडलेली फुट दिसून आली आहे.
राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरे यांनी होकार दिला आहे. पण एक अट ठेवली आहे. त्याचवेळी भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे महायुतीमधून बाहेर गेले होते. त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं. ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं, महाराष्ट्र संस्कृतीला अशी अभद्र युती मान्य नव्हती. उद्धव ठाकरेंचे जे सरकार आलं होतं, ते अनैसर्गिक होतं. नैसर्गिक सरकार हे भाजप-सेना युतीचे होते. आता तसेच सरकार आले आहे. तेव्हाही आपलं बहुमत होतं. भाजप आणि सेना एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं. झालं नाही. आता तो काळ गेला आहे.
अफगाणिस्तान भूकंपाने हादरला. रिक्टर स्केलवर याची तीव्रता ५.८ इतकी नोंदवली गेली. या भूकंपाचे हादरे भारतात जम्मू -काश्मीरच्या काही भागांत जाणवले.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संदिप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'समोरच्याची इच्छा आहे की नाही?' हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत या गोष्टीला अर्थ नाही. आम्हाला सर्वांना वाटतं की, महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत. मात्र, हे जसं आम्हाला वाटतं, तसं समोरच्यांना वाटतं की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे'.
'राज ठाकरे यांना भाजप पक्ष कसा आहे हे समजलंय.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांना निर्णय घ्यायचा आहे.
स्थानिक स्वराज संस्था निवडणुका एकत्र घ्यायच्या आहेत का? हा मोठा प्रश्न आहे.
आम्ही त्यांच्यासोबत आहोत, पण याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल', अतुल लोंढे म्हणालेत.
हिंदी सक्तीविरोधात घाटकोपरमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन
मराठमोळ्या वेशभूषेतील अनोख्या आंदोलनाने लक्ष वेधले
वारकरी आणि लेझीम पथकाचा आंदोलनात सहभाग
तांडा वस्तीचा निधी विरोधकांना वाटप केल्याचा हदगावचे शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर याचा आरोप.
आमदार कदम यांनी थेट अतुल सावेना पत्र लिहून नांदेड दौऱ्यावर आल्यानंतर असंख्य कार्यकर्त्यांसह निषेध व्यक्त करण्याचा दिला इशारा.
अनेक पत्र व्यवहार करूनही विरोधकांना निधी दिल्याचा मंत्री अतुल सावे यांच्यावर आमदार बाबुराव कदम यांचा आरोप
तर भाजपाचे मुखेडचे आमदार तुषार राठोड यांनी थेट देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहून अतुल सावे यांची केली तक्रार.
श्रीवर्धन येथील वेळास समुद्रात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन भावांचा समावेश होता. परिसरात बचावकार्य सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच वेळा समुद्र किनारी एकच गर्दी जमली.
शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे गहिनीनाथ गडाचा 93 वा नारळी सप्ताह होत आहे आणि या सप्ताह निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मंत्री पंकजा मुंडे भाजपा आमदार सुरेश धस भाजपा आमदार नमिता मुंद्रा दाखल
कुडाळ येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणात आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याच्या सह पाच आरोपी ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यानंतर काल रात्री उशिरा गौरव वराडकर राहणार सातार्डा याला पोलिसांनी ताब्यात घेतल असून गौरव वराडकर याची कसून चौकशी सुरू आहे. यामुळे या प्रकरणात आता पर्यंत सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. संशयित मयत सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर याच्या मृतदेहाची सातार्डा स्मशानभूमीत विल्हेवाट लावण्यात या संशयीताचा हात असल्याच्या कारणावरून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
पहिल्या कव्हर फोटोवर असणारं काँग्रेसचं चिन्ह, नव्याने अपडेट केलेल्या कव्हर फोटोवरून गायब
याधीच्या कव्हर फोटोवर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि त्याच्यापुढं संग्राम थोपटे यांचं नाव आणि फोटो होता.... मात्र नव्याने अपडेट करण्यात आलेल्या कव्हर फोटोवर फक्त संग्राम थोपटे यांचं नाव आणि फोटो आहे..
काल रात्री त्यांच्याकडून हा फोटो कव्हर फोटो अपडेट करण्यात आलाय, त्यामुळं त्यांनी यातून काँग्रेसला राम राम ठोकल्याचे संकेत दिलेत.... अधिकृत भूमिका ते रविवारी जाहीर करणारं आहेत..
एकीकडे संग्राम थोपटे हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी चर्चा गेल्या 2 दिवसापासून रंगत असतानाचं, त्यांनी आपला फेसबुक प्रोफाइलचा कव्हर फोटो बदल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलंय....
मात्र यावरून गेली चार दशकं काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी दिल्याचे निश्चित झालंय..
- बार्शी शहरातील मारुती रोड परिसरातील एका वाईन शॉपी मधील सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..
- वाईन शॉपीचे मालक शंकरराव कोकाटे यांच्या डोक्यात फोडण्यात आली दारूची वाटली, कोकाटे यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी..
- धाराशिव जिल्ह्यातील अमन नूर मोहम्मद शेख असं बाटली फोडणाऱ्याचं नाव..
- अमन शेख यांनी एक बिअरची बाटली विकत घेतल्यानंतर त्याच ठिकाणी उभारून पीत असल्यामुळे कामगारांनी त्याला केला होता विरोध..
- मालक कोकाटे यांनी शेख यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता कोकाटे यांच्या डोक्यात बिअरची बाटली बाटली फोडून जखमी केले..
- मालक शंकरराव कोकाटे यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल..
- याप्रकरणी बार्शी शहर पोलीस तपास करत आहे..
कल्याण जवळील मोहने आंबिवली परिसरात चोरट्यांची दहशत वाढल्याने दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे .
मोहने पाटील नगर परिसरातील काव्य मोबाईल या दुकानात काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटा दुकानाचे शटर तोडून दुकानात घुसला व त्या दुकानातील तीन मोबाईल व 25 हजार रुपये घेऊन पसार झाला.
हा चोरटा दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे . याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान
या आधी देखील याच परिसरातील काही दुकानांमध्ये चोरी झाली होती त्यामुळे या चोरट्यांना अटक करण्याची मागणी दुकानदारांकडून केली जातेय.
खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे
वृक्षप्रेमी मधून संतापाची लाट.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहासाठी येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिपॅड साठी प्रशासनाने तोडली लहान मोठी 16 झाडे.. वृक्षप्रेमी मधून संताप.
प्रशासनाने स्वतःचा त्रास वाचवण्यासाठी दिला झाडांचा बळी... तर शेतकऱ्यांसह वन विभागाची परवानगी घेतली होती का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव गटातील तब्बल 21 गावांना सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय..
वडगावपान हद्दीत असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने परिसरातील 21 गावे त्रासली आहेत..
एक वर्षापूर्वी हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अद्यापही काम अपूर्ण असल्याने 21 गावातील लोकांना गेल्या वर्षभरापासून पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी लागणारे पाणी अक्षरशः विकत घेण्याची वेळ आली आहे..
ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी प्रचंड हाल होत असल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे..
महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाने कामाला गती देवून लवकरात लवकर काम मार्गी लावावे अन्यथा तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय..
काल मध्यरात्रीच्या सुमारास घटना घडली असल्याचे प्राथमिक माहिती
सिग्नलच्या वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही रेल्वे वाहतूकिवर परीनाम
सिग्नलच्या तुटलेल्या वायर दुरुस्तीचे काम सुरू
सकाळी साडेआठच्या सुमारास खडवलीहून सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरळीत केल्याची रेल्वेची माहिती
खडवली कडे जाणारी वाहतूक अद्यापही विस्कळीतच
सिग्नलच्या वायर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू
वाशिम जिल्ह्यातील मेडशी विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या सुकांडा, राजुरा, सुदी, अनसिंग या गावातील शेती पंपाची विज दोन दिवसांपासून बंद आहे.
त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून वाढवलेली मूग, भुईमूग व इतर पिकं सिंचना अभावी सुकन्याच्या मार्गावर आहेत.
मात्र महावितरण कडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय.
वीजपुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून गांभीर्याने दखल घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर शरद पवारांची घेतली भेट
भेट घेत MPSC विद्यार्थ्यांनी मानले शरद पवारांचे आभार
एमपीएससीच्या मुद्द्यांवरून जे विद्यार्थी आंदोलनात बसले होते त्यांनी शरद पवारांची भेट घेत दिलं होतं निवेदन
त्यानंतर शरद पवारांनी एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांना फोन लावून विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्याची केली होती विनंती
मागणी मान्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मानले शरद पवारांचे आभार
- कोराडीतील ई-बस डेपोची मनपा आयुक्तांनी केली पाहणी, मुदतीच्या आत कामे पूर्ण करण्याचे दिले निर्देश
- यातील ७५ बसचे संचालन कोराडी बस डेपोतून करण्यात येणार आहे. ई-बस डेपोसाठी प्रस्तावित मीटर रुम, ट्रान्सफर रुम आणि आणि चार्जिंग स्टेशनची पाहणी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली.
- केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयमार्फत पंतप्रधान ई- बस सेवा योजना देशाअंतर्गत राबविण्यात येत आहे.
- या योजनेअंतर्गत नागपूर शहराकरिता १५० ई-बसेस प्राप्त होणार आहेत.
- यापैकी ७५ बसेस कोराडी डेपो व उर्वरित ७५ बसेस खापरी डेपो येथील वाहन तळावरुन संचालित करण्यात येणार आहे
या आठवड्यातही सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचे चित्र आहे.. सुट्ट्यांच्या काळात धार्मिक पर्यटनाला अनेक जण महत्व देत असून शिर्डीत गर्दीचा ओघ कायम आहे.. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी आणि त्यालाच जोडून शनिवार, रविवारची सुट्टी असल्याने साई भक्तांची मांदियाळी शिर्डीत पाहायला मिळत आहे..
भोर विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजप वाटेवर आहेत,कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी भेटीगाठी बैठका सुरू
भोर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधत आहेत.
मतदार संघातील राजगड सह इतर ठिकाणी भेटीगाठी बैठक घेत आहेत.
आज मुळशी तालुक्यातील काही गावात बैठका घेणार तर उद्या भोर तालुक्यात मेळावा घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
दरम्यान संग्राम थोपटे उद्या संध्याकाळी काँग्रेसच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊ शकतात,आणि 21 किंवा 22 एप्रिलला त्याचा भाजप प्रवेश होणार आहे.
त्या पार्श्वभूमीवर संग्राम थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या राजगड तालुक्यात या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.
संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशाने पुणे जिल्ह्यातील अनेक राजकीय गणित बदलणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तांत्रिक बिघाडामुळे विज पुरवठा खंडीत
० मध्यरात्री 1 वाजल्या पासून खंडित झालेला विज पुरवठा संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार
विज पुरवठा सुरळीत होण्यासाठी 17 तासांचा कालावधी लागणार
० महाड शहर, विन्हेरे, वहूर, नाते, राजेवाडी, को कोळोसे फिडचा विज पुरवठा खंडीत
० विज पुरवठा करणाऱ्या 22 KV ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड लाईनमध्ये एका मागुन एक तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती
० ग्राहकांनी सहकार्य करावे अशी विज वितरण कंपनीची विनंती
चंद्रपूर ब्रह्मपुरी, - पहिली ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून शालेय पोषण आहार योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण दिले जाते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील शाळांना तांदळाचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे योजनेचे तीनतेरा वाजले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी सतत सक्षम अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. मात्र, अद्याप तांदळाचा पुरवठा झाला नाही. परिणामी विद्यार्थी आणि पालकांत असंतोष खदखदत आहे.
- मंत्री नितेश राणे यांना कोंबड्याचे चित्र दाखवणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
- मंत्री नितेश राणे यांना सार्वजनिक ठिकाणी कोंबड्याचे चित्र दाखवत अश्लील भाषा वापरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल
शिरपूर जैन - जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरपूर जैन येथील २०२६ साठी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. शिरपूर सारख्या मोठ्या गावाची धुरा पुन्हा एकदा अनुसूचित जमातीच्या महिलेच्या वाट्याला जाण्यास असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेकांचा स्वप्नभंग झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या समितीने पाठविलेल्या अहवालाबाबत पोलिसांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. याबाबत पोलिसांनी रुग्णालयाला पत्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या समितीची बैठक आज होणार असून, अहवाल पोलिसांना सादर केला जाणार आहे.
अलिबाग रेवस मार्गावर अपघातानंतर झालेल्या राड्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी 150 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी अलिबाग रेवस रस्त्यावर मानी फाटा येथे कारने दिलेल्या धडकेत मोटार सायकल वरून चाललेले विश्वास पाटील आणि कल्पना पाटील या दाम्पत्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला. दोन तास वाहतूक रोखून धरली तसेच अपघातग्रस्त कारची तोडफोड देखील केली होती. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.
यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील वागदा येथे सुमारे 50 वर्षानंतर आगळ्यावेगळ्या पद्धतीने विवाह पार पडलाय.बंजारा समाजातील सुरज राठोड आणि मेनका चव्हाण यांनी पारंपारिक चालीरीतीनुसार विवाह केला.मंडव पूजन अग्नीपरिक्रमा पारंपारिक वेशभूषा ढोल वाद्यांच्या गजरात पार पडलेला सोळावा हा समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला व जुने पारंपरिक घागरा आणि गजरा परिधान केला तर वराने गोर पगडी व अंगरखा घातला हा विवाह सोहळा निसर्ग पूजन, संत सेवालाल महाराज यांचे पूजन व आशीर्वाद घेऊन करण्यात आला.
धाराशिव तालुक्यातील तेर येथील वारकरी संप्रदायातील थोर संत गोरोबा काकांच्या 708 व्या वार्षिक संजीवन समाधी सोहळा 23 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा होणार आहे.या निमित्त तेर नगरीत तेरणा नदीच्या काठावर वैष्णवांचा मेळा भरणार आहे. 23 एप्रिल रोजी राज्यभरातुन विविध साधु संत व महंताच्या वारकरी दिंड्या तेरमध्ये दाखल होणार आहेत पुढील ३० तारखेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत.
अज्ञात व्यक्तीने नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्यात आला असून, घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने आग घरातही आग लागली यावेळी राजगुरुनगर पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाड्या दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले असून, आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आलय गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही.अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतलीय
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर मायक्रो सरफेसिंगची कामे करण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे.यासाठी निविदा काढून ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. शहरातील ५० किलोमीटर रस्त्यांवर म्हणजे साधारण तीन लाख ८० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर पावसाळा सुरू होण्यापूर्वी मायक्रो सरफेसिंगची कामे पूर्ण करण्याचे नियोजन पथ विभागाने केले आहे.
शिवचरित्रातून रामदास व दादोजी कोंडदेव हटावो,संभाजी ब्रिगेड एक अभ्यास,मराठा क्रांती मोर्चा आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले असून सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर ३ हजारांहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. ९ व १० मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड या ठिकाणी हे संमेलन संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार करणार आहेत.
महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल गेल्या दोन वर्षात 21 हजार 280 रुपयांवर गेला आहे. विविध उपक्रमांमुळे पुणे परिमंडळाच्या महसुलात दोन वर्षात पाच हजार 137 कोटी 55 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. अचूक देयके, वीज व वाणिज्य हानीत घट व चार लाख 34 हजार नव्या जोडण्यांमुळे पुणे परिमंडळाच्या महसुलात हि वाढ झाली आहे.
'पीएमपी'च्या १२३ नवीन बस सेवा संंचलनातून बंद
पीएमपीएमएल ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या असून, बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. पीएमपीने आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढत नव्याने आधुनिक बस घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १२३ सीएनजी बस घेण्यात आल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.