Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates : सोन्याचे भाव जसे वाढतात, तसे भविष्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढणार - छगन भुजबळ

Maharashtra Marathi News Live Updates : आज बुधवार दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुका, मविआ सभा, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्बने उडवून टाकू, धमकीचा मेल

पिंपरी चिंचवड शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजता दरम्यान ईमेल द्वारे डी वाय पाटील हॉस्पिटलला बॉम्ब ने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे..

आज आनंदाची गोष्ट आहे की,महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात आज जतमधून होत आहे. महाराष्ट्रातील एक नंबर मतदार संघाऐवजी सगळ्यात शेवटचं 288 क्रमांक मतदारसंघातून केली आहे. जतमधून गोपीचंद पडळकरांना आशीर्वाद द्या, राज्यात 1 नंबरचा विकास करू. दुष्काळचे राजकारण केले गेले,पाणी सोडले तर साखर कारखान्याला ऊस तोड मजूर मिळणार नाही,म्हणून पाणी दिले नाही.
देवेंद्र फडणवीस
महायुतीने मला उमेदवारी दिलीय. उमेदवाराचा आमदार करणं तुमच्या हातात आहे. पर्यटन मंत्री असताना राज्यातील महत्वाची मंदिरे, धार्मिक स्थळ धार्मिक पर्यटन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला. धार्मिक पर्यटन स्थळ विकसित केलं. काम खूप झाली आहेत.
छगन भुजबळ

Maharashtra News Live Updates : नागपूरमध्ये संविधान सन्मान संमेलनाला सुरुवात

लोणावळा भाजपकडून महायुती चा धर्म पाळत अधिकृत उमेदवाराला पाठिंबा 

राज्यात सर्वत्र महायुती म्हणून सर्वजण काम करत असतानाच मावळ विधानसभा मतदारसंघात मात्र महायुती मध्ये फूट पडली आहे. भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे देत बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर मात्र मावळमध्ये महायुतीत फूट पडली असल्याचे चित्र दिसले. परंतु आता लोणावळयातील भाजपाच्या आजी माजी नगरसेवकांनी महायुतीचा धर्म पाळण्याचा निर्णय घेतला असून महायुती चे अधिकृत उमेदवार सुनील शेळके यांना लोणावळा भाजपने जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता मावळमध्ये खुद्द भाजपमध्येच दोन गट तयार झाल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मावळमध्ये प्रत्येक पक्षात उभी फूट पडत दोन गट तयार झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता मावळचा गड कोण राखणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे...

Maharashtra News Live Updates : राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड

अकोल्यातल्या अकोट शहरात राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट फैजान मिर्झा यांच्या वाहनाचे काचा फोडण्यात आलेय. काही अज्ञातांकडून वाहनाची तोडफोड झाल्याच समजते. काल रात्रीच्या सुमारास अज्ञात लोकांनी मिर्झा यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्यात. दरम्यान या प्रकरणात अकोट शहर पोलीस अधिक तपास करतात. मिर्झा यांच्या वाहनाचे काचा कुणी फोडल्या? आणि कोणत्या कारणांमुळे? याचा तपास पोलीस करतायत.

Maharashtra News Live Updates : राहुल गांधी नागपूरमध्ये दाखल

संविधान सन्मान संमेलनाच्या साठी राहुल गांधी चे नागपूर विमानतळावर आगमन झाले आहे. थोड्याच वेळात दीक्षाभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे दर्शन घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. रेशीमबाग मधील सुरेश भट सभागृहात संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहेत.

Maharashtra News Live Updates : मोहन प्रकाश यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भाच्या वरिष्ठ निरीक्षक नियुक्ती

देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर आरोप करताना उल्लेख केलेली लाल पुस्तक नागपुरातही झळकली. आज राहुल गांधी नागपूर आत संविधान सन्मान संमेलनाला संबोधित करणार आहेत. त्या अनुषंगाने शहरात विविध ठिकाणी मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले असून त्यामध्ये राहुल गांधींच्या हातात संविधान दाखवण्यात आले असून ते लाल रंगाच्या पुस्तकाच्या स्वरूपात आहे. 

Maharashtra News Live Updates : जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असते - बानगुडे पाटील

नितीन बानगुडे पाटील यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन जाहिरात बाजी केली. जर जाहिरातीवर खर्च केला नसता तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळाले असते. अशी टीका केली ते मिरजेत महाविकास आघाडी च्या बैठकीत बोलत होते. तानाजी सातपुते शिवसेनेचे उमेदवार नसून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. आणि निवडणुकीच्या आधी सर्व सामन्याचा आमदार असल्याचे ही जाहीर केले.

Maharashtra News Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन व्यावसायिकावर आयटीची छापेमारी

छत्रपती संभाजीनगर शहरातील सुराणा आणि संचेती या दोन मोठ्या बांधकाम व्यवसायिकावर आयकर विभागाने धाडी टाकले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको, पानदरिबा आणि वैजापूर शहरांमध्ये आयकर विभागाच्या वतीने तपासणी सुरू आहे. आज पहाटेपासूनच वेगळ्या टीम सध्या काम करीत आहेत.

Maharashtra News Live Updates : जरांगे पाटलांना यादी दिली होती - राजरत्न आंबेडकर

यादी दिली नाही म्हणून आम्ही निवडणूक लढू शकत नाही हे जरांगे पाटील यांचं कारण चुकीचं असल्याच राजरत्न आंबेडकर यांनी सांगितलंय. दलित आणि मुस्लिम संघटनांनी आधीच आपली यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली होती असेही राजरत्न आंबेडकर पुढे म्हणाले, निवडणूक लढायची नाही या जरांगे पाटील यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र मराठा आणि मुस्लिम संघटनांनी यादी दिली नाही म्हणून निवडणूक लढू शकलो नाही हे जरांगे पाटील यांनी दिलेल्या कारणामुळे समाजामध्ये गैरसमज पसरू शकतो. त्यामुळे आम्ही दलित आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवारांची यादी जरांगे पाटील यांच्याकडे दिली हे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच यापुढेही जे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत त्यांचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितलंय. आपण मराठा समाजाच्या पाठीशी कायम उभे राहणार असल्याचेही राजरत्न आंबेडकर यांनी म्हंटलय. अनेक उमेदवार आपल्या जमिनी विकून नोकऱ्या सोडून निवडणुकीला उभे आहेत अशा उमेदवारांना आम्ही बळ देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्रात भाजपकडून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहेत. ज्याने कल्याण पूर्व भकास केलं, पोलीस स्टेशन रक्तरंजित केलं. कल्याण पूर्वेत शिवसेना संपवण्याचा डाव टाकला. त्यांनाच भाजपने उमेदवारी दिली, जनतेच्या वतीने निवडणूक लढवतोय, जनतेने मला चेहरा केलाय.
बंडखोर, महेश गायकवाड

BJP : भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची पक्षातून हकालपट्टी

भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत ते बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.. मात्र पक्षाने माघार घ्यायला सांगूनही मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजपने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.. भाजपकडे असलेकी नेवसा विधानसभेची जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेली असून याठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आल्याने बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी केली आहे

यशवंत सेनेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा..

धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या यशवंत सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी महायुतीच्या पाठिंब्याची घोषणा केली. मागील दीड वर्षापासून धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण मिळावे यासाठी यशवंत सेनेने अनेक आंदोलन केली आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे आज लातूर दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज लातूर दौऱ्यावर आहेत, लातूर जिल्ह्यातील औसा, अहमदपूर आणि लातूर ग्रामीण, या तीन मतदारसंघातील मनसे उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी ते आज जाहिर सभा घेणार आहेत.

शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

रद पवार उद्यापासून विदर्भ दौऱ्यावर

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागात शरद पवारांच्या सभा

शरद पवार यांच्या पाठोपाठ जयंत पाटील सुद्धा राज्यातील बहुतांश मतदारसंघात घेणार सभा

जयंत पाटील यांच्या राज्यात ५५ पेक्षा जास्त सभा

१३ तारखेनंतर शरद पवार पुण्यात घेणार सभा

बारामती मध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ १८ तारखेला विराट सभा

बारामती १८ तारखेला होणार शरद पवारांची भव्य सभा

शिवरायांचा स्वाभिमान फडणवीस आणि शिंदेंनी सूरतला गहाण ठेवलाय - संजय राऊतांचा हल्लाबोल

Maharashtra Marathi News Live Updates :  महायुतीच्या प्रचारासाठी अमित शहा उद्या आणि परवा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर

Maharashtra Marathi News Live Updates :  शरद पवारांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला फायदा होईल. शरद पवार राजकारणातील महामेरू आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

Maharashtra Marathi News Live Updates :  उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अमरावती दौऱ्यावर

शिवसेना ठाकरे गटाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधान केल्याने केली कारवाई...

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, मारेगाव तालुकाप्रमुख संजय आवारी, वणी तालुकाप्रमुख प्रसाद ठाकरे यांची देखील हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती

Maharashtra News Live Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची 'हाफ सेंन्चुरी' करणार

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभांची करणार 'हाफ सेंन्चुरी'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील १२ दिवसात ४८ सभा घेणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : पोलिसांकडून ४ लाखाची रक्कम जप्त; आडत्यांकडून खरेदी विक्री बंद, शेतकऱ्यांचा महामार्गावर चक्का जाम

IPL 2025 Auction: केएल राहुल ते रिषभ पंत.. या खेळाडूंना लय डिमांड; बेस प्राईज 2 कोटी, पाहा संपूर्ण यादी

Dark Circle: डोळ्यांखालील डार्क सर्कल घालवायचे तर 'या' घरगुती टिप्स फॅालो करा

Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची अख्ख्या महाराष्ट्राला साद; एकदा सत्ता हातात देऊन बघा!

Bengaluru Accident: बेंगळुरूच्या रस्त्यावर थरार, आलिशान कारनं तरुणीला उडवले

SCROLL FOR NEXT