सलमान खानला वारंवार धमक्या येत असून, आता बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानला देखील धमकी मिळाली आहे.
या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धमकीचा कॉल रायपूरवरून करण्यात आल्याचे स्पष्ट
मुंबई पोलिसांचे पथक रायपूरमध्ये दाखल
मुंबईत शिंदे गटाला ऐन निवडणुकीत मोठा धक्का
वरळीमधील शिंदे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात मातोश्रीवर ठाकरे गटात करणार प्रवेश
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
चार दिवसांपूर्वी वरळीमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला होता.
पिंपरी चिंचवड गावात 35 लाख 11 हजार 200 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
पॅट्रोलिंग दरम्यान एका चारचाकी वाहनातून पैसे घेऊन जात असताना पोलिसांनी केली कारवाई
जप्त केलेली रोकड कोणाची आणि कुठे घेऊन जात होते याचा तपास सुरू
सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील कोणताही नेता असो, वरिष्ठ नेत्याबद्दल अपमानास्पद बोलणे योग्य नाही. टीका मर्यादेत केली पाहिजे अशी टीका कोणीही कुणाकडे करू नये. त्याबाबत सदाभाऊ खोत यांनी माफी मागितली होती, असे शिरसाट म्हणाले.
पुण्यातील आबा बागुल, कमल व्यवहारे आणि मनिष आनंद या बंडखोर नेत्यांना सहा वर्षांसाठी निलंबित
राज्यातील कॉंग्रेसच्या इतर बंडखोरांवर देखील कारवाई
मनीष आनंद, कमल व्यवहारे यांनी दिला काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा
काँग्रेसमधून बंड केलेले अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्यावर काँग्रेसने केली कारवाई
आबा बागुल पर्वती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत
कमल व्यवहारे काँग्रेसचा राजीनामा देत कसबामधून निवडणूक लढवणार आहेत
मनीष आनंद हे सुद्धा काँग्रेसचा राजीनामा देत शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत
नागपूर : एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची अनास्था काल पाहयला मिळाली. माझा आरोप खरा ठरला. लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाहीत, तर त्यांच्यासोबत अर्बन नक्षल आहेत, सोबत जे फुटीरतावादी आहेत, त्यांना एक प्रकारचा इशारा (संकेत) देण्याकरता, त्यांची मदत घेण्याकरता हे नाटक आणि नौटंकी करत आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
संविधानाचा रोज ते अवमान करत आहेत. आजपर्यंत काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला. संविधानाचा अवमान केला. आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही, असेही ते म्हणाले. फडणवीस नागपुरात बोलत होते.
नाशिक शहरातील तब्बल २० गुन्हेगार तडीपार
आणखी ४५ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव
आत्तापर्यंत ९८ गुन्हेगारांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर कारवाई
निवडणुकीदरम्यान शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
Sadabhau Khot : शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शरद पवार गट आक्रमक झाला आहे. सदाभाऊ खोत यांचा कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे. बारामतीतील तीन हत्ती चौकात कार्यकर्त्यांनी निषेध केला.
सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यात आंदोलन
शरद पवार यांच्या विषयी सदाभाऊ खोत यांनी काल भाषणात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
पुण्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून आंदोलन
सदाभाऊ खोत यांच्या फोटो वर मारली "फुली"
पुणेरी स्टाईल ने फोटो फ्लेक्स वर आधी "श्री" लिहून "सदाभाऊ खोत मुर्दाबाद" असा मजकूर
नाशिकमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा
नाशिकच्या तपोवन परिसरातील मोदी मैदानावर पंतप्रधान मोदींची दुपारी सभा पार पडणार
मोदींच्या या सभेची सध्या मोदी मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे
तब्बल १ लाख व्यक्ती बसू शकतील इतक्या भव्य मंडप सभास्थळी उभारला जातोय
सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महाविकास आघाडीला मोठा धक्का
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शेखर गोरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झाली भेट
भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत शेखर गोरे यांना आगामी काळामध्ये विधान परिषदेवर घेणार असल्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला शब्द सूत्रांची खात्रीशीर माहिती
जम्मू काश्मीर - जम्मू काश्मीर विधानसभेत आज परत कलम ३७० वरुन राडा
खासदार इंजिनीयर रशीद यांचे भाऊ आणि आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 वर बॅनर प्रदर्शित केलं
यानंतर विधानसभेत गोंधळ झाला
विरोधी पक्ष नेते सुनील शर्मा यांनी यावर आक्षेप घेतला
शरद पवार नागपूर विमानतळावरून हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे दाखल झाले आहे..
अनिल देशमुख, आणि रमेश बंग यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत आहे...
याच हॉटेलमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा उपस्थित आहे..
नाना पाटोले शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पार पडणार धुळ्यात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची प्रशासनातर्फे जय्यत तयारी सुरू..
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन देखील सज्ज...
सभेदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राहणारा तैनात...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी...
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.