ऐन निवडणुकीच्या काळात मुंबई पोलीस दलातील 245 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
सलग आठ वर्षापेक्षा अधिक काळ मुंबईत सेवा केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बदल्या
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता
यापूर्वी देखील निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या
111 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने मुंबईत अवघे 11 पोलीस निरीक्षक मुंबई बाहेरून आले
मुंबई पोलीस दलात पोलीस निरीक्षकाची मंजूर पदे १०३२
मात्र 31 जुलै पर्यंत कार्यरत 881
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता 245 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे निवडणुकीच्या कामावर होणार परिणाम
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत आता नवीन पोलीस इन्स्पेक्टर येण्यास तयार नाहीत
सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू असल्याने या बदल्या केल्यामुळे नवीन पोलीस निरीक्षक यांना प्रक्रिया समजून घेण्यासच निवडणुकीचा काळ देखील संपून जाईल
अक्कलकुवा अक्राणी मतदार संघातील 7 अर्ज बाद
हेमलता पाडवी काँग्रेसचे दोन अर्ज बाद
किरसिंग वसावे यांचा शिवसेनेचा आणि अपक्ष अर्ज बाद
सुप्रिया गावित यांचा भाजपाचा उमेदवारी अर्ज बाद
हिना गावित यांचा भाजपाचा उमेदवारी अर्ज बाद
रतन पाडवी पार्टी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्ज बाद
शंकर पाडवी यांच्या शिवसेनेच्या अर्ज उमेदवारी बाद....
मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि उमेदवार यशवंत माने यांनी घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट
मोहोळमध्ये उमेदवारी अर्ज भरल्या नंतर आज अंतरवली सराटीत जाऊन घेतली भेट
मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने ऐन वेळी सिद्धी कदम हिची उमेदवारी बदलत राजू खरे यांना दिली होती उमेदवारी
मोहोळ मतदारसंघात आता यशवंत माने विरुद्ध राजू खरे अशी थेट होणार लढत
मनसेने एकूण 135 उमेदवार यंदा विधानसभा निवडणुकीत उतरवलेले आहेत
मनसेने विधानसभा निवडणुकीत स्वभावाचा नारा दिल्यानंतर 225 ते 250 मतदार संघाची तयारी करत आहोत असे सांगितले होते
मात्र प्रत्यक्षात 135 विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेने आपले उमेदवार उतरवले आहेत
त्यामुळे 135 पैकी किती विधानसभेत मनसेला यश येतं हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार बापू पठारे यांच्या नावाचा सेम असणाऱ्या माणसाने उमेदवारी अर्ज भरला
बापू पठारे असा हा श्रीगोंदाचा व्यक्ती आहे
बापू पठारे यांच्या नावाचा सेम माणूस कोणी उभा केला असा प्रश्न पाटरेंसमोर
आज अर्जाची छाननी सुरू आहे
छाननी दरम्यान हा प्रकार उघड
सेम नावाचा बापू पठारे व्यक्ती हा श्रीगोंदाचा आहे.
आगामी विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्ष काही जागांवर माघार घेण्याच्या तयारीत
नाशिक, भायखळा अन्य काही जागांवर काँग्रेस पक्ष माघार घेणार
आज बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेणार
4 तारखेला अर्ज मागे घेण्याच्या तयारीत काँग्रेस पक्ष आहे
अनिल गोटे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट
अंतरवाली सराटी दोघांमध्ये चर्चा
अनिल गोटे यांनी दुसऱ्यांदा घेतली मनोज जरांगे यांची भेट..
अनिल गोटे धुळे शहर मतदार संघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत...
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली अंतरवाली सराटीत उपचार सुरू...
मनोज जारंगे पाटील यांचे तब्येत बिघडल्याने सलाईन लावण्यात येत आहे...
मनोज जारांगे यांना काल रात्रीपासून ताप आलेली आहे...
जरांगे यांना ताप जनरल इन्फेक्शन आणि थोडी अशक्तपणा जाणवत आहे.
त्यामुळे आज सकाळी त्यांना लावण्यात आली आणि रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आल आहे.
उल्हासनगरच्या गजानन मार्केट परिसरात कपड्याच्या दुकानाला भीषण आग
उल्हासनगर आणि कल्याण अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
दुकानातील लाखो रुपयांचा माल जळून खाक
जवळच फटाका मार्केटही असल्यानं भीती
काँग्रेसमधून बंडखोरी करून पर्वतीतून उमेदवारी करणारे आबा बागुल काँग्रेस भवनपासूनच प्रचाराची सुरुवात करणार
पुणे काँग्रेस भवनमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला हार घालून करणार प्रचाराची सुरुवात
आबा बागुल कॉग्रेसकडून होते इच्छुक
मी काँग्रेसचा उमेदवार असल्याचं आबा बागुल यांचं म्हणणं
राज्यातील २८८ जागांसाठी एकूण ७९९५ उमेदवार रिंगणात
निवडणूक आयोगाला एकूण १०,९०५ अर्ज प्राप्त
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
३० ऑक्टोबरला होणार अर्जांची पडताळणी
तर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार
राष्ट्रवादीच्या ६ जागांवर मित्रपक्षांचे उमेदवारी अर्ज
राष्ट्रवादीच्या जागा असलेल्या सिंदखेडराजा, पुरंदर हवेली, खडकवासला, श्रीरामपूर, नेवासा आणि आष्टी या जागांवर मित्रपक्षांच्या उमेदवारांचेही अर्ज
यातील काही ठिकाणी भाजपा तर काही ठिकाणी सेनेच्या उमेदवारांनी भरले अर्ज
येत्या ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने तेव्हाच सुटणार तिढा
सुहास कांदे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल
सुहास कांदे यांनी मराठा समाजाचे नेते शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक विनोद शेलार यांना शिवीगाळ
शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
विनोद शेलार, शेखर पगार याली काल रात्री विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे
यंदा अयोध्येत २५ लाख दिव्यांचा दीपोत्सव
अयोध्येतील दीपोत्सवाची भव्य तयारी सुरू
अयोध्येत रामलल्ला विराजमान झाल्यानंतर हा पहिलाच दिपोत्सव
गेल्या वर्षी २१ लाख दिव्यांचं दिप प्रज्वलन करण्यात आलं होतं… मात्र, या वर्षी २५ लाख दिव्यांचा दिपोत्सव असणार आहे
अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी सकाळी आला धमकीचा मेसेज
२ कोटी रुपयांची केली मागणी
पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खानला जिवे मारण्याचा उल्लेख
वरळी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात ३५४ (२), ३०८(४) कलमांतर्गत गुन्हा दाखल
पालघर साधू हत्याकांडावर भाजपचा नवा व्हिडिओ
भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महा विकास आघाडीला पुन्हा डिवचले
हिंदू द्वेष्टे म्हणत ठाकरे गटाला टोला
सचिन वाजेसम पात्रामधून अनिल देशमुख व उद्धव ठाकरेंवर साधला निशाना
विधानसभा निवडणुकीत भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यात आज महत्वाची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती
नाराज आणि बंडखोरी केलेल्या नेत्यांची समजूत काढण्याबाबत तिघांमध्ये विचार विनीमय होणार
नाराज उमेदवारांची समजूत तीनही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काढली जाणार असल्याची सूत्रांची माहिती
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकिय निवासस्थानी ही बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती
फेअर प्ले बेटिंग ॲप प्रकरणात ईडीकडून छापे
मुंबई आणि गुजरातमधील आठ ठिकाणी ईडी चे छापे
मुंबईसह गुजरातमधील कच्छ येथे छापे
कारवाईत तब्बल चार कोटींची मालमत्ता जप्त
कारवाईत रोख रक्कम, बँकेतील पुंजी व चांदी अशी चार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
याप्रकरणात आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्तेची किंमत ११७ कोटींवर
राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांना आळा घालण्याचे निवडणूक आयोगाचे महासंचालकांना निर्देश
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वाढलेल्या राजकीयदृष्ट्या प्रेरित गुन्ह्यांबद्दल निवडणूक आयोगाने व्यक्त केली तीव्र चिंता
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना दिले
निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण गढूळ करणाऱ्यांची गय करु नका
निवडणूक आयोगाचे पोलीस महासंचालकांना निर्देश
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.