Shruti Vilas Kadam
लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म असतात, तर मध ओठांना ओलावा देतो. झोपण्यापूर्वी थोडं लिंबाचा रस आणि मध मिसळून ओठांवर लावा.
साखर आणि मध मिसळून हलक्या हाताने ओठांवर स्क्रब केल्यास मृत त्वचा निघून जाते आणि ओठ गुलाबी दिसू लागतात.
तुप किंवा नारळ तेल नियमित लावल्यास ओठांना पोषण मिळते आणि काळेपणा हळूहळू कमी होतो.
गुलाबपाकळ्या दुधात भिजवून त्याची पेस्ट तयार करा व ओठांवर लावा. यामुळे ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग येतो.
बीटामध्ये नैसर्गिक रंगद्रव्य असतात. बीटाचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा रंग सुधारतो.
सूर्यप्रकाशामुळे ओठ काळे पडतात. त्यामुळे बाहेर जाताना SPF असलेला लिप बाम वापरणे गरजेचे आहे.
धूम्रपान आणि तंबाखूमुळे ओठांचा रंग काळा होतो. हे सवयी टाळल्यास ओठ नैसर्गिकरीत्या गुलाबी राहतात.