Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates : माढ्यात मोठी घडामोड! बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतण्याचे बंड

Namdeo Kumbhar

Madha Election News: माढ्यात मोठी घडामोड!  बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचे बंड

माढ्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात पुतणे धनराज शिंदे यांचे बंड....

धनराज शिंदे आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणुक लढवणार ....

घरातूनच आमदार शिंदे यांना मोठा विरोध....

आमदार शिंदे यांच्या अडचणी वाढणार ..

मानेगाव येथे धनराज शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा....

मेळाव्यात निवडणूक लढवण्याची धनराज शिंदे यांची मोठी घोषणा....

आमदार बबनराव शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून फसवणूक केल्याचा आरोप...

शरद पवार पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी

Satara Accident News: सज्जनगड- ठोसेघर रस्त्यावर अपघात; चारचाकी गाडी दरीत कोसळली

सज्जनगड ठोसेघर रस्त्यावर चार चाकी गाडी गेली दरीत

गाडीमध्ये 4 जण असल्याची प्राथमिक माहिती

एका महिलेस स्थानिकांनी रेस्क्यू करून काढले बाहेर

इतर जखमींना दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू...

छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स घटनास्थळी दाखल..

Nanded News: रेल्वे स्थानक ते बस स्थानक रस्त्याची चाळण,जीवघेणे खड्डे पडल्याने एसटी चालक चालक, प्रवाशांना त्रास

नांदेड शहरातील रेल्वे स्थानकाकडून मुख्य बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचत असल्यामुळे अनेक वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही, दुचाकी स्वरांचे छोटे-मोठे अपघात देखील याठिकाणी नेहमीच घडत आहेत. प्रवाशांनाही याच खड्ड्यातून मार्ग काढावा लागतोय. गेल्या वर्षभरापासून हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे. हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी सातत्याने मागणी होत असली तरी प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.

Parbhani News: दोन दुचाकींचा अपघात, एकाचा जागीच मृत्यू

भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकी स्वारांची धडक झाल्याची घटना परभणीच्या गंगाखेड शहरातील होळकर चौक परिसरात घडली ,या घटनेत दुधविक्रेते जनार्धन शेप(वय 45.)यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर अपघातस्थळारुन दुसरा दुचाकीस्वार दुचाकी सोडून फरार झाला आहे,, सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे, इतर जखमींना पुढील उपचारासाठी रूग्णालय हलवण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar: काँग्रेसचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची निवडणूक लढण्याची घोषणा

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना संभाजीनगर जिल्ह्यात विद्यमान भाजप आमदाराच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंड करण्यात आलंय. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदरसंघात महायुतीत पहिलं बंड स्पष्ट झाले आहे. गंगापूर विधानसभेचे भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे सतीश चव्हाण हे अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. सतीश चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघातून अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे.

Latur News: आमदार धीरज देशमुख शेतकऱ्यांच्या बांधावर, अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेती पिकांची पाहणी

लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात मागील तीन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ नुकसान झाल आहे... विशेषता काढणीला आलेल्या पिकाचे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार आहे... जिल्ह्यातल्या मुरुड, रेनापुर ,औसा, उजनी यासह इतर भागात उभी पिक पाण्यात आहे... दरम्यान बाधित शेती पिकांची पाहणी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात केली आहे..

Kolhapur News: कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचा मोर्चा

१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबोडतोब रद्द करावा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी शिक्षकांचा धडक मोर्चा

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा

कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्था चालक संघ, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नेतृत्वाखाली हा महामोर्चा

या महामोर्चात ४६ शिक्षण क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या

शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा, शैक्षणिक कामे रद्द करा, शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, शिक्षण क्षेत्र उध्वस्त करू नका,राष्ट्रपती की संतान हो या चपरासी का बेटा सबको शिक्षा एक समान!,शिक्षणावरील बजेट वाढविलेच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला.

राजकोट परिसरात 100 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी निर्माण करणार - केसरकर

मालवण राजकोट येथील किल्ला परिसरात ऊर्जा हिंदुत्वाची प्रकल्पांतर्गत सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी निर्माण करण्याचा आपला मानस आहे असं दीपक केसरकर यांनी सांगितले. या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पात म्युझियम, फिश एक्वेरियम, पार्किंग सुविधा, सुसज्य रस्ता, जेटी यांचा समावेश आहे त्यामुळे या प्रकल्पाची माहिती आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात देण्यात आली.

नवरात्र उत्सवामध्ये मंदिर चतुःशृंगी मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहणार

नवरात्र उत्सवामध्ये मंदिर चतुःशृंगी मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे राहणार

३ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर ट्रस्ट ची माहिती

दसऱ्याला हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर होणार पुष्पवृष्टी

मंदिराच्या जिर्णोध्दाराचे काम सुरू झाले असुन साधारणपणे 40 टक्के बांधकाम पुर्णत्वास आले आहे. उर्वरित बांधकाम व परिसराचे सुशोभिकरण पुढील 6 ते 8 महिन्यात पुर्ण करणार, संस्थेने दिली माहिती

मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पुर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येणार

नविन सभामंडप पुर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला असुन सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार

Mumbai News:  गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची महिलेकडून तोडफोड करण्याचा प्रयत्न

मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक

अज्ञात महिलेकडून मंत्रालयाच्या कार्यालयाची तोडफोड

सचिव गेटमधून महिलेने विनापास मंत्रालयात केला प्रवेश

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न

Mumbai News:  आगामी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या, सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगाकडे मागणी 

आगामी विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या.

सत्ताधारी पक्ष अजितदादा गट आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे मागणी.

ज्येष्ठ नागरिकची मर्यादा 85 वरून 80 करावी अशी मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Mumbai News: भाजपच्या महिला मोर्चासोबत भाजप केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादवांची बैठक

भाजपच्या महिला मोर्चासोबत भाजप केंद्रीय प्रभारी भूपेंद्र यादवांची बैठक.

महिला मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भूपेंद्र यादव घेत आहेत आढावा.

राज्यातील महिला मतदारांची मते कशाप्रकारे मिळवता येतील, यावर खलबते.

भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित.

Akshay Shinde: अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी यासाठी पालकांची हायकोर्टात धाव

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून अक्षय शिंदेच्या पालकांची मुंबई उच्च न्यायालयात धाव.

अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज.

अक्षयच्या मृतदेहाची अवहेलना होत असल्याचा पालकांचा आरोप.

अंबरनाथ पालिकेने दफन विधीसाठीचा अर्ज स्वीकारण्यास दिला होता नकार .

अंबरनाथमध्ये अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे विरोध.

Pune News: महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पुणे पोलिस आयुक्तांची चर्चा सुरू

महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पुणे पोलीस आयुक्तांची चर्चा सुरू.

आंदोलन मागे घेण्याची पुणे पोलीस आयुक्तांकडून विनंती.

मेट्रोच्या उद्घाटनाची नवीन तारीख जाहीर झाल्यामुळे आंदोलन मागे घ्यावे.

कुणीही कायदा हातात घेऊ नये.

पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फोनवरून संवाद.

मात्र माविआ नेते आंदोलन करण्यावर ठाम.

11 वाजता करणार आहे आंदोलन.

Maharashtra Political News: शिंदेगटाचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका

शिंदेगटाचे आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात हायकोर्टात याचिका.

मतदारसंघात वाटप केलेल्या 50 हजार प्रेशर कुकर खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप.

600 रूपयांचे प्रेशर कुकर 2 हजार 498 रूपयांना खरेदी करत 12 कोटी 50 हजारंचा खर्च दाखवल्याचा याचिकेतून आरोप.

सामाजिक कार्यकर्ता निखिल कांबळे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित.

आमदार दिलीप लांडे आणि पालिका एल वॉर्डाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी.

फौजदारी जनहित याचिकेतून घोटाळ्याच्या न्यायालयीन चौकशीची मागणी.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रा काढणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रा काढणार

" संवाद शिवसेनेचा संकल्प महाविजयचा " या टॅगलाईन अंतर्गत शिवसेनेचा महा विजय संवाद

या यात्रेच्यामाध्यमातून युवा सेनेचे पदाधिकारी युवा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तरूणांशी संवाद साधणार

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार युवासेनेचे कार्यद्धयक्ष पूर्वेश सरनाईक याच्या नेतृत्वात युवकांशी संवाद...

शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली लाडक्या बहिणींशी साधणार संवाद...

सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना सोशल आवाज अंतर्गत जनतेशी संवाद...

२७ सप्टेबरपासून या यात्रेला सुरूवात होणार असून मुंबई शहर व उपनगर पहिल्या टप्यात ही यात्रा होणार आहे

तर १३ आॅक्टोंबर पासून १६ आॅक्टोंबरपर्यंत मराठवाड्यात युवासेनेतर्फे ही यात्रा काढली जाणार असून २० आॅक्टोंबर ते २२ आॅक्टोंबर दरम्यान कोकणमध्ये यात्रा केली जाणार आहे

महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात जाऊन शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रसार आणि प्रचार केला जाणार

विदर्भ, मराठवाड्यानंतर अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई

अमित शाह स्वतः घेणार मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा

अमित शहा मुंबईत कार्यकर्त्यांशी संवादही साधणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर

पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार

हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार

ज्यांची कामगिरी समाधान कारक नाही त्या आमदारांचे वाढणार टेंशन

लेबनॉन मधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याच्या सुचना

लेबनॉन मधील भारतीयांना तात्काळ देश सोडण्याच्या सुचना

लेबनॉन मधील भारतीय दूतावासाकडून दिल्या गेल्या सुचना

इस्राएलकडून पुढच्या काही दिवसात लेबनॉनवर मोठा हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे

त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दुतावासाचा निर्णय

मागच्या काही दिवसांपासून इस्राईल हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक नागरिकांचा जीव गेलाय

छत्रपती संभाजीनगर :  शेतकऱ्यांना द्यावी लागेल 234 कोटी रुपयांची भरपाई; अतिवृष्टीच्या मदतीकडे शेतकऱ्यांचं लागलं लक्ष 

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 429 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांसह फळ पिकांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आता पूर्ण झाले असून 2 लाख 57 हजार 305 बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आता 234 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. हा नुकसानीचा अहवाल नुकताच जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून त्यानंतर मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांचा प्राप्त अहवाल एकत्रित करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर होईल त्यामुळे आता ही अतिवृष्टीची मदत केव्हा मिळणार त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलय.

Sangli News : कामगारांच्या आंदोलनाकडे लक्ष द्या ,अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु- मनसेचा इशारा 

कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी कामगार मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे,सांगलीच्या कुपवाड एमआयडीसी येथे टोटो टोया स्पिनींग कंपनीच्या कामगारांचे गेल्या 18 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

कंपनीकडून कामगारांचे थकीत देणे आणि कायदेशीर वेतन दिले जात नसल्याचा आरोप करत 35 कर्मचाऱ्यांकडून कुटुंबासह कंपनी समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मात्र या आंदोलनाकडे कामगार मंत्री आणि उद्योग खात्याकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आला असून लवकरात लवकर कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही, तर उद्योग विभागा विरोधात मनसे स्टाईलने खळ-खटयाक आंदोलन करू असा इशारा मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिला आहे.

'ऑक्सिजन बर्डपार्क'चे लोकार्पण शनिवारी

  • केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या 'ऑक्सिजन बर्डपार्क'चे लोकार्पण शनिवारी

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार ऑक्सिजनबर्ड पार्कचे उदघाटन...

  • नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर जामठा नजीक 20 एकरात 14 कोटी रुपये खर्चून हा पार्क निर्माण करण्यात आला आहे.

  • केवळ ऑक्सिजन देणारा परिसर नाही, तर पक्ष्यांच्या विविध प्रजातीसाठी हा परिसर आश्रयस्थान ठरणार आहे.

  • 8 हजार 104 प्रकारच्या वनस्पतीसह आंबा, पेरू, जांभूळ, चिंच,अंजीर अशा विशिष्ट प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

  • उद्यानात फूड कोर्ट, जॉगिंग, सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, मुलांसाठी विशेष क्रीडाक्षेत्र यासह इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

mumbai university election : सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

२०२४ ची मुंबई विद्यापिठाची सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.प्रथमच पोलीस बंदोबस्तात सीसीटिव्हीच्या निगराणीमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masai Pathar Tourism : फुलांची चादर घेऊन सजलं कोल्हापुरातील मसाई पठार; नजारा पाहून डोळे दिपतील

Chh.Sambhajinagar News : जागावाटपाआधीच महायुतीत मोठं बंड; राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने !

Traveling Tips: पहिल्यांदा विमान प्रवास करणार आहात? मग 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Bigg Boss Marathi: "त्याने जे केलं ते चुकीचं..." निक्कीच्या आईच्या 'त्या' वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया

R Ashwin Record: 1 विकेट घेताच अश्विन बनला एशियाचा किंग! मोठ्या रेकॉर्डमध्ये दिग्गजाला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT