Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates : अंधेरीचा राजा गणपती विसर्जन वेळी बोट पलटली

Satish Daud

Indapur News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूरात रास्ता रोको

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहे.जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ पुण्याच्या इंदापूर शहरात जुन्या पुणे सोलापूर मार्गावर बस स्थानकासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी एक मराठा लाख मराठा तुमच आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी इंदापूर पोलिसांच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Andheri News: अंधेरीचा राजा गणपती विसर्जन वेळी बोट पलटली,

अंधेरी राजाच्या विसर्जनाला गालबोट

अंधेरीचा राजा गणपती विसर्जन वेळी बोट पलटली

बोटं पलटल्याने अनेकजण समुद्रात पडले

काही गणेश भक्त किनाऱ्याकडे पोहत सुखरूप आले

ज्यांना पोहता येत नव्हते अशा कार्यकर्त्यांना कोळी बांधवांच्या लहान बोटीने सुखरू बाहेर काढले

Ahmednagar Accident: कंटेनर आणि दुचाकीचा अपघात; १ जण ठार, एक जखमी

कोपरगाव शहरातील पुणतांबा फाट्याजवळ एका कंटरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील दोघांपैकी एकाचा जागीच मृत्यु झाला.. तर दुसरा इसम गंभीर जखमी झाला आहे.. अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी इसमास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय.. नगर मनमाड महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे..

Navi Mumbai News: नवी मुंबईत सकल मराठा समाजाचे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण

नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातर्फे आत्मक्लेश आणि अन्नत्याग उपोषण करण्यात येतंय. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतंय. नवी मुंबईत सगसोयरे अधिसूचनेचे आश्वासन देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत सरकारने तात्काळ मराठ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा उपोषणकर्त्यांनी केलेय.

उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक...

सकल मराठा समाजाच्या वतीने अहमदनगर जिल्हा बंदची हाक..

मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून बंदची हाक...

अहमदनगर शहरात सुरू आहे गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण...

सगे सोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणी करा, हैदराबाद गॅझेट लागू करा, सातारा गॅझेट लागू करा, बॉम्बे गव्हर्मेंट गॅझेट लागू करा, मराठा बांधवांवर दाखल झालेले म्हणून मागे घ्या अशा विविध मागण्यांसाठी उपोषण आणि बंदचे आयोजन...

सोलापूरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी अजित पवारांचा ताफा अडवला

- चाकण औद्योगिक क्षेत्रातील मर्सिडीज बेंझ कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

महाराष्ट्राच्या परिस्थितीवर चर्चा झाली. येथछे भाजप हरणार आहे. उद्धव ठाकरे सरकार बनवतील असा विश्वास आहे. हरियाणा बरोबर महाराष्ट्राचा इलेक्शन होणार होतं, मात्र दिल्ली घाबरली की महाराष्ट्रात आपण हरणार म्हणून निवडणुका एकत्र घेतल्या नाहीत. निवडणुका उशिरा झाल्या तरी एकत्र लढा एका विरोधात एक उमेदवार द्या. तडजोड करून लढा. यांच्या प्रचारात तसेच विजय मिरवणुकीत देखील मी येणार. माझं पूर्ण समर्थन आहे. भाजपचा महाराष्ट्रासह देशात सफाया होणार आहे. उद्धव ठाकरे यांची भूमिका सगळ्यात महत्त्वाची असणार
सत्यपाल मलिक

बीड - अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

बीडच्या अहमदपूर - अहमदनगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला आहे. ही दुर्दैवी घटना बीडच्या लिंबागणेश येथे घडली आहे..विजय प्रल्हाद विघ्ने वय 35 रा .वाघिरा ता.पाटोदा जि.बीड असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आलाय..

जोगेश्वरी विधानसभेवर भाजपचा दावा

अनेक वर्ष जोगेश्वरी विधानसभेत वायकर आमदार म्हणून निवडून आलेत

आता वायकर खासदार झाल्याने हि जागा रिक्त आहे

आता भाजपने या जागेवर दावा दाखवला केला असून माजी नगरसेविका उज्जवला मोडक इच्छूक आहेत

वायकर आणि मोडक जुने विरोधक आहेत तरीही लोकसभेत भाजपने वायकराना निवडून येण्यासाठी मदत केलीय

माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक यांनी कार्यकर्त्यासह नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर दाखल,   दोन्ही नेत्यांमध्ये इंडिया आघाडी तसेच इतर राजकीय विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती.

पुण्यात अपघात

पुण्याच्या राजगड तालुक्यातील वेल्हे ते चेलाडी रस्त्यावर मार्गासनी येथे साईड पट्ट्या न भरल्यामुळे, समोरून आलेल्या वाहनाला साईड देत असताना डंपर पलटी झाल्याची घटना

चालकाने प्रसंगवधान दाखवून उडी मारल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित हानी

रस्त्याला वळणे जास्त आहेत आणि वळणावर झाडे झुडपे वेली वाढलेल्या आहेत त्यातच साईड पट्ट्याही भरलेल्या नाहीत.. या सर्व गोष्टीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांची नाराजी..

सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरावास्थेकडे लक्ष घालून, रस्त्याचं कामं लवकरात लवकर करावं, नागरिकांची मागणी..

रस्तारोको केल्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

छत्रपती संभाजी नगर ब्रेक..

छत्रपती संभाजी नगर मध्ये सकल मराठा समाजाने रस्ता रोको केल्याप्रकरणी आता पोलिसांनी मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे..

केंब्रिज चौकात मागील एक तासापासून हे आंदोलन सुरू होतं

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

पुण्यात २६ सप्टेंबरपासून सिव्हील कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरु होणार

अंडरग्राउंड मेट्रोचे काम पूर्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार लोककर्पण सोहळा

यावेळी स्वारगेट कात्रज भुयारी मार्गाचे भूमिपूजन होणार

कसबा पेठ,मंडई,स्वारगेट तीन मेट्रो स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील एस पी महाविद्यालयाच्या मैदानावर सभा ही होणार आहे.

Ahmedngar News : नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन; वाहनांच्या लांबच लांब रांगा

साकळाई उपसा जलसिंचन योजना जनआंदोलन समितीच्या वतीने नगर-दौंड मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी वाहनचालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. सध्या पोलिसांकडून आंदोलकांना हटवण्यात येत आहे.

Kolhapur News : कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्याला करवीर पोलिसांनी केली अटक

कायदेशीरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून फिरणाऱ्या एकाला बाचणी येथून करवीर पोलिसांनी अटक केलीय. ऋत्विक उर्फ सनी रामचंद्र जाधव असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत राऊंड जप्त केलंय. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या पथकाने बाचणी येथे ही कारवाई केली आहे.

Jalna News : मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज जालना जिल्हा बंदची हाक

मनोज जरांगे पाटील १७ सप्टेंबरपासून उपोषणाला सुरु आहे जरांगे यांची प्रकृती खालवत चालल्याने राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला असून आज मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडावं अशी समाजाची मागणी आहे.या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून जालना बंदची हाक देण्यात आली आहे.जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सावरकर चौक आणि भाजी मार्केट मध्ये सध्या कडकडीत बंद असल्याचं पाहायला मिळात आहे.

Amravati News : अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; अनेकांना चावा, नागरिक भयभीत

अमरावती शहरात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढल्याने नागरिक व लहान बालकांमध्ये चिंता वाढली आहे, शहरात गल्लोगल्लीत भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे, एप्रिल ते जुलै या महिन्यात 6 हजार 348 मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे, तर धक्कादायक म्हणजे दररोज 70 लोकांना भटकी कुत्रे चावा घेत आहे शहरात गल्लीत जिकडे तिकडं भटकी कुत्रे फिरतांना दिसत आहे. त्यामुळे घराबाहेर पडतांना भिती वाटत आहे. त्यामुळे अमरावती महानगरपालिकाने तात्काळ यावर उपाय योजना कराव्या ही मागणी केली जात आहे.

Parbhani News : सकल मराठा समाजाकडून परभणी जिल्हा बंदची हाक

मराठा समाजालाओबीसी संवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. याबाबत सकल मराठा समाजाच्यादोन गटाकडून परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले. या बंदमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले असून सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस, मराठा समाज आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून दिवसेंदिवस त्यांची तब्बेत खालावत चालली आहे, त्यांच उपोषण तात्काळ संपाव या दृष्टीने सरकारने पावलं उचलावीत या मागणीसाठी पुण्यावरून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत, आज त्यांच शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट अपेक्षित आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: तो खूप कठीण काळातून गेला...; चेन्नई टेस्ट जिंकल्यानंतर रोहितने कोणाला दिलं विजयाचं श्रेय?

Pune News: 'पुन्हा आशीर्वाद हवेत...', भाजप नेत्याची थेट मतदारांना साद, महायुतीत रंगणार नवा वाद; प्रकरण काय?

Pune News : जुलूसमध्ये झेंडा फडकवताना तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील घटनेचा थरारक VIDEO समोर

Parenting Tips : पाहुण्यांसमोर तुम्हीही मुलांना ओरडता? थांबा अन्यथा पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही

R Ashwin Record: अश्विन अण्णा रॉक्स! कसोटीत १४७ वर्षांत कोणालाच न जमलेल्या रेकॉर्डवर कोरलं नाव

SCROLL FOR NEXT