Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी आज येणार

Priya More

Maharashtra News Live Updates: डॉ. ज्योती मेटे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाने आमदार संदीप क्षीरसागर यांचा पत्ता कट होणार ?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी प्रवेश केलाय. त्यांच्या या प्रवेशाने आता बीड विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झालाय.. या ठिकाणी विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचे उमेदवारी धोक्यात आली असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मराठा कार्ड खेळणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.. या पार्श्वभूमीवर शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली असून ज्योती मेटे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.. शिवसंग्रामकडून होत असलेल्या या मागणीमुळे आता बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..

आमची यादी आज जाहीर होणार आहे, दुसरी यादी 26 तारखेला जाहीर होणार
संजय शिरसाट

Marathi Breaking Live Marathi Headlines : अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 6 मतदार संघ काँग्रेस लढण्यावर ठाम

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व धामणगाव रेल्वे मतदार संघावरून मविआ रस्सीखेच...

अमरावती जिल्ह्यातील 8 पैकी 6 मतदार संघ काँग्रेस लढण्यावर ठाम ...

धामणगाव रेल्वेत काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व ठाकरे गटाचे अभिजित ढेपे यांच्यात रस्सीखेच

धामणगाव रेल्वे व दर्यापूर मतदार संघात पेच अद्यापही कायम

तिवसा,अचलपूर, अमरावती शहर,धामणगाव रेल्वे व दर्यापूर या मतदारसंघावर काँग्रेस ठाम

काँग्रेस 6,उबाठा 1 व शरद पवार गट 1 अश्या जागा ठरण्याची शक्यता....

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा खासदार विजयी झाल्याने सर्वाधिक जागा काँग्रेस लढणार

छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना ठाकरे गटात घेऊन नांदगावमध्ये उमेदवारी द्या शरद पवार गटाचा उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव

Maharashtra News Live Updates: नागपूर पहिला उमेदवारी अर्ज घेतला

विद्यमान भाजपचे आमदार विकास कुंभारे हे आहेत. पण अद्याप मध्य नागपूरची उमेदवारी पहिल्या यादीत घोषित झाली नाही. आज अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव यांनी पहिलाच अर्ज विकत घेत उमेदवारी अर्ज घेतला आहे.

मध्य नागपूर निर्वाचन क्षेत्रातून भाजप अपक्षकडून कागदपत्र तयार करण्याचे निर्देश दिले आहे. अर्ज घेतल्या शिवाय अर्ज केला नाही, हलबा समाजातून येत असून समाजाचा एक मुखाने हलबा समाजाला उमेदवारी द्यावी अशी मागणी आहे. 28 वर्षांपासून पक्षात कार्यकर्ता असून नवीन चेहरा देण्याची मागणी आहे. मी इच्छुक आहे. हा दबाव तंत्र नाही, उमेदवारी देण्याची मागणी केल्याच भास्कर पराते यानी सांगितलं.

Maharashtra News Live Updates:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाच्या वादावर कोर्टातून मोठी अपडेट

सर्वोच्च न्यायालय राष्ट्रवादी सुनावणी अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिन्ह आणि नावाचा वाद

प्रकरण वादसूचित नसल्याने त्याचा उल्लेख वकिलांनी केला आणि सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली

न्यायाधीश म्हणाले की आम्ही सुनावणीची तारीख देऊ

अजित पवारांचे घड्याळ चिन्ह तात्पुरते विधानसभा निवडणुकीसाठी काढून घ्यावे अशी विनंती शरद पवारांच्या पक्षाने केली आहे

त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

प्रकरणाचा उल्लेख करत असताना शरद पवारांच्या वकिलांनी अजित पवारांना नवे चिन्ह दिले जावे अशी मागणी केली

अजित पवारांनी अजून त्यांचं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलेलं नाही, हे नमूद केलं

त्यावर आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरले आहेत, अस अजित पवारांच्या वतीने सांगण्यात आलं

आज सायंकाळी पर्यंत कोर्ट सुनावणीची नवी तारीख देईल.

Maharashtra News Live Updates: वडगाव शेरी मतदारसंघावर भाजपचा दावा

- वडगांव शेरी मतदारसंघावर भाजपचा दावा

- माजी आमदार जगदीश मुळीक यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

- पोर्षे अपघात प्रकरणावरून विद्यमान आमदार सुनील टिंगरे वादाच्या भोवऱ्यात

- टिंगरे यांना उमेदवारी नको, महायुतीतील कार्यकर्त्यांची मागणी

Maharashtra News Live Updates:  विजया रहाटकर यांनी स्वीकारला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार

नवी मुंबई शहरावर अन्याय होत असेल तर मला निर्णय घ्यावा लागेल. मागील काही वर्षांपासून कार्यकर्त्यांसोबत अपमानस्पद वागणूक. नवी मुंबईच्या विकासासाठी मी माझा वैयक्तिक निर्णय घेणार आहे.
संदीप नाईक

मनसेचे उमेदवार विधानसभा निवडणूक २०२४

१. बाळा नांदगावकर - शिवडी

२. दिलीप बाबू धोत्रे - पंढरपूर

3. संतोष नागरगोजे- लातूर ग्रामीण

4. बंडू कुटे - हिंगोली

5. संदीप रोडे- चंद्रपूर

6. सचिन भोयर- राजुरा गाव

7. राजू उंबरकर- वणी विधानसभा

8. अविनाश जाधव- ठाणे

9. राजू पाटील - कल्याण ग्रामीण

Ahmednagar News: तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू अहमदनगर दौऱ्यावर

तिसऱ्या आघाडीचे नेते बच्चू कडू अहमदनगर दौऱ्यावर

परिवर्तन महाशक्तीकडून अहिल्यानगर जिल्ह्यातून कोणाला मिळणार उमेदवारी

अनेक पक्षातील मातब्बर उमेदवार बच्चू कडू यांच्या भेटीला येणार असल्याची सूत्रांकडून माहिती

बच्चू कडू महाविकास आघाडी का महायुतीला देणार धक्का थोड्याच वेळात कळणार

अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा येथे घेणार इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी

 Mumbai News:  अजित पवार गटाचे नेते नाना काटे तुतारी फुकण्याच्या तयारीत

अजित पवार गटाचे बंडखोर नेते नाना काटे थोड्याच वेळात मुंबई येथील वाय बी सेंटरमध्ये घेणार शरद पवारांची भेट

नाना काटे तुतारी फुकण्याच्या तयारीत

चिंचवड विधानसभा निवडणूक शरद पवार गटातून लढवण्यासाठी नाना काटे इच्छुक

Mumbai News:  आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

पहिल्या यादीत नाव न आल्याने केचे यांच्या उमेदवारी बाबत साशंकता

आर्वीतून भाजप सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता

Pune News: पुणे कंन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

पुणे कंन्टोनमेंटमधून सुनिल कांबळे यांना वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली

पुण्यातील भाजपचे डॉ. भरत वैरागे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

वैरागे पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक

भरत वैरागे पुणे कंन्टोनमेंट मतदारसंघातून इच्छुक

पहिल्या यादीत पुणे कंन्टोनमेंट मतदारसंघातील विद्यामान आमदार सुनिल कांबळे यांनी काल फडणवीस यांची भेट घेतली होती

Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशिया दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशिया दौऱ्यावर

ब्रिक्स परिषदेला उपस्थित रहाण्यासाठी नरेंद्र मोदी रशियात

भारत हा ब्रिक्स समूहाचा सदस्य

रशिया, चिन व भारताच्या दृष्टिने दौरा महत्वाचा

Mumbai News:  बाबा सिद्दिकींच्या हत्येत वापरण्यात आलेले पिस्तूल पाकिस्तानची, पोलिसांचा संशय

राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत वापरण्यात आलेली पिस्तूल पाकिस्तानातून तस्करी केल्याचा पोलिसांना संशय

पाकिस्तानातून राजस्थान सीमेवरून पिस्तूल देशात आल्याचा पोलिसांना संशय

आत्ता पर्यंत तीन पिस्तूल आणि २८ काडतुस पोलिसांनी केली जप्त

तर बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघा मारेकऱ्यांसह एकूण १० जणांना आत्ता पर्यंत अटक

Ratnagiri News: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, काँग्रेसची आज महत्वाची बैठक

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये धुसफूस

जिल्हा कार्यालयात काँग्रेसची आज महत्वाची बैठक

काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा मिळत नसल्याने काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज

राजापूर मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात काँग्रेस निर्णायक भूमिका घेण्याची शक्यता

काँग्रेस वेगळी भूमिका घेण्याची शक्यता

बैठकीनंतर जिल्हाध्यक्ष आणि राजापूरमधून इच्छूक असलेले अविनाश लाड भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

राजापूरमध्ये सांगली पॅटर्न होण्याची शक्यता

राजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राजन साळवी यांची उमेदवारी जवळपास निश्चित त्यामुळे काँग्रेस आक्रमक

Chinchwad News: चिंचवड विधानसभेच्या जागेवरून आज शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता

चिंचवड विधानसभेच्या जागेवरून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबईमध्ये आज सुप्रिया सुळे जयंत पाटील हे शरद पवार यांची चिंचवड विधानसभेच्या जागेवर होणार बैठक

चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार नाना काटे यांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी घोषित करायची

का शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांना पक्ष प्रवेश देऊन चिंचवड विधानसभेचे उमेदवारी घोषित करायची यावर होणार चर्चा

Mumbai News: विधीसंंघर्ष मुलाने दुसऱ्या मुलावर केले अनैसर्गिक अत्याचार, डोंगरी बालसुधारगृहातील घटना

डोंगरी बालसुधारगृहात विधीसंंघर्ष मुलाने बराकमधील दुसऱ्या मुलावर केले अनैसर्गिक अत्याचार

बळीत अल्पवयीन मुलगा नैसर्गिक विधीसाठी गेला असता घडला प्रकार

आरोपी मुलाने तरुणाच्या तोंडात गोळ्यांच पाकिट आणि पांढऱ्या रंगाची पावडर कोंबून केले अनैसर्गिक अत्याचार

डोंगरी पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याच्या ४, ८, १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल

Nandurbar News: राजेंद्र गावित यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले राजेंद्र गावित यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

राजेंद्र गावित यांनी दिली होती काँग्रेसची मुलाखत मात्र ऐन वेळेस सेना नेत्यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण

भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये येण्याच दिले होते संकेत

मात्र आता सेना नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने नेमकी कोणाची घेणार उमेदवारी?

Nanded News: नांदेड भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेड भूकंपाच्या धक्क्याने हादरले

नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव, मनाठा गावांना बसला भूकंपाचा सौम्य धक्का

3 पूर्णाक 8 रिस्टर स्केल भूकंपाची नोंद

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Delhi News: २०२६ला बदलणार महाराष्ट्रातील या ५ विधानसभा मतदारसंघाची नावे

२०२६ ला बदलणार महाराष्ट्रातील या ६ विधानसभा मतदारसंघाची नावे

राज्यातील ३ लोकसभा मतदारसंघांचीही नावे बदलणार

डिलिमिटेशन अर्थात मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार

मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) असतो

औरंगाबाद जिल्ह्यातील ९ पैकी ३ नावात होणार बदल

औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व मतदारसंघाचे नाव बदलणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Job: पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी; महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत सुरु आहे भरती; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: नाराज, बंडखोर अन् इच्छुकांची 'सागर' बंगल्यावर भरती, महायुतीच्या नेत्यांची फडणवीसांकडे धाव; मुंबईत काय घडतंय?

Anushakti Nagar : पवार-ठाकरेंकडून मतदारसंघाची आदलाबदल, मुंबईच्या बदल्यात पश्चिम महाराष्टातील मतदारसंघ सोडणार!

Breast Cancer: ब्रेस्ट कॅन्सरचं निदान होण्यासाठी 'ही' एक टेस्ट वाचवेल तुमचा जीव; कमी वेळेत होतं अचूक निदान

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातून दोन वाघिणी पाठवणार ओडिशाच्या जंगलात; सिमलीपल व्याघ्र प्रकल्पात सोडणार

SCROLL FOR NEXT