Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates : नागपूर पोलिस आयुक्तांकडून चिटणीस पार्क परिसराची पाहणी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 21 March 2025: आज शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, संतोष देशमुख हत्याकांड अपडेट, विकास बनसोडे हत्या प्रकरण, हवामान अपडेट, आदित्य ठाकरे, दिशा सालियन प्रकरण, नागपूर हिंसाचाराचे अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Dhanshri Shintre

Nagpur News : नागपूर पोलिस आयुक्तांकडून चिटणीस पार्क परिसराची पाहणी

- नागपूर पोलिस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांची नागपूर हिंसाचार भागातील चिटणीस पार्क परिसरात पाहणी केली....

- आता पर्यंत 13 FIR दाखल, शंभरावर आरोपींना अटक.

- अधिकांश जणांना आज न्यायालयात हजर करणार.

- संचारबंदी संदर्भात रिव्हीव्ह घेऊन निर्णय घेतला..आज या संदर्भात आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे

- आज आज रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारची नमाज ही शांततेत पार पडली... आज पुन्हा आढावा घेत आहे

Nagpur News : नागपूर हिंसाचार प्रकरण : मुख्य आरोपी न्यायालयीन कोठडीत

नागपूर हिंसाचार प्रकरणांमध्ये गटाचा आणि या घटनेचा मास्टरमाईंड असल्याच बोलला जात असलेला फहीम खान कोर्टात हजर केल्यानंतर त्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील उपचारानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले होते. जेव्हा गरज पडेल त्याला पोलीस कस्टडी मिळेल अशा पद्धतीची अटही ठेवण्यात आलेली आहे.

पुण्यातील बाणेर भागात ड्रेनेज लाईनमधील पाणी नागरिकांच्या घरात

नागरिकांनी ४ महिन्यांपासून केलेल्या तक्रारीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष

वारंवार ड्रेनेज तुंबून मैलापाणी घरात येत असल्याने त्याची दुर्गंधी परिसरामध्ये पसरली आहे.

४८ तासात दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा सुहास निम्हण यांनी दिला

पुण्यात पुन्हा वाहनांची तोडफोड, धायरी परिसरात ३ ते ४ जणांकडून गाड्यांची तोडफोड

हातात हत्यार घेत आरोपींनी फोडल्या गाड्या

दुपारी झालेल्या भांडणाचा राग काढत रात्री येऊन आरोपींनी सामान्य नागरिकांच्या फोडल्या गाड्या

पोलिसांकडून दोन आरोपींना अटक

वाद झाला एकासोबत गाड्या मात्र फोडल्या सर्वसामान्य नागरिकांच्या

धायरेश्वर मंदिरासमोर गाड्यांची तोडफोड करत हातात नाचवले कोयते

सतीश भोसले उर्फ खोक्या याला चकलांबा पोलिसांनी घेतलं ताब्यात

बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता

शिरूर येथील ढाकणे पिता पुत्राला मारहाण केल्याप्रकरणी खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी झाली होती

धाराशिवमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आंदोलन

दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंच्या विरोधात निषेध आंदोलन

काँग्रसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्या पुणे दौऱ्यावर

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिल्हा शाखांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या तसेच पक्षाच्या आजीमाजी लोकप्रतिनिधींच्या ते काँग्रेसभवनमध्ये बैठका घेणार आहेत.

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच पुणे दौरा असून त्यामुळेच त्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.

पुण्यात रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं गांधीगिरी स्टाईल आंदोलन

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांना रांगोळी काढत मनसे कडून हटके आंदोलन

खड्ड्यांना मनसेने वाहिली फुले

पुणे महानगरपालिका प्रशासनाचे विरोधात मनसेच आंदोलन

महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मनसेचा गांधीगिरी स्टाईलने आंदोलन

पोलिस मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू; न्यायालयीन चौकशीत धक्कादायक निष्कर्ष

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूबाबत न्यायालयीन कोठडी दरम्यान झालेल्या चौकशीचा अहवाल समोर आला आहे. सोमनाथ यांचा मृत्यू पोलिस मारहाणीतच झाल्याचा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठेवला आहे, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अंबाजोगाईतील तरूणाला मारहाण प्रकरणी; तिघांना अटक

बीडच्या अंबाजोगाईतील दस्तगीरवाडी येथे एका तरूणाला मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. यातील आरोपी अल्पवयीन आहेत.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत. म्हणून अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीर वाडी येथे कृष्णा साळे या तरूणास तिघांनी मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता.

कार्यकर्त्याचा खून, गुलाबराव पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात घेतली नातेवाईकांची सांत्वनपर भेट

जळगाव जवळील कासनवाडा गावाचे माजी उपसरपंच तथा शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते युवराज कोळी यांचा आज सकाळी धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून करण्यात आला होता. खून झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय गाठत युवराज कोळी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्यासंदर्भात पोलिसांना सूचना केल्या.

Pune Weather: पुणे जिल्ह्यात उष्णतेचा पारा चाळीशीपार

वातावरणात कडाक्याच्या उन्हामुळे लाही लाही होतेय उसाच्या गु-हाळात नागरिक उसाचा अस्वाद घेत आहे

सध्या मोठ्या प्रमाणात लग्न सराई सुरु असुन नागरिकांचा उन्हातुन प्रवास होतोय

या धावपळीच्या प्रवासात उन्हाचा वाढलेल्या तापमानाचा पारा या प्रवाशांसह लहान मुलांना जाणवत असुन या उन्हाच्या त्रासाला कंटाळलेले नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उसाच्या गुहाळात पहायला मिळत असुन थंडगार रस पिऊन आपली तहानभुक भागवत आहेत, सर्वत्र असणा-या उन्हामुळे झाडाच्या सावलीचाही सहारा घेत आहेत

Pune News: पुण्यात मारामारीच्या गुन्ह्याचा तब्बल 48 वर्षांनी निकाल

70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना न्यायालयाने दिली शिक्षा

पिंपरी गावात भांडणे झाली होती. त्यात दोघांनी एकाला मारहाण केली होती.ते साल होते १९७७,पोलिसांनी पिंपरी पोलीस ठाण्यात किरकोळ मारहाण करुन जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर हा गुन्हा तसाच पडून राहिला होता.

तब्बल ४८ वर्षानंतर आता या खटल्याचा निकाल लागला आहे. त्यावेळी आरोपी असलेले दोघे जण आता ७० वर्षाचे आहेत.हे पाहून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.

४८ वर्षानंतर निकाल लागलेला हा पुण्यातील पहिला खटला असावा.

दिलीप नंदलाल शर्मा आणि किशोर नंदलाल शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना ३ दिवस साधी कैद व ४ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पिंपरी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास करण्यात येऊन याचा खटला तब्बल १२ वर्षांनी Rcc १३०/१९८९ मध्ये दाखल झाला होता.

या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. परंतु,आरोपी न्यायालयात हजर रहात नव्हते. त्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.

यापूर्वी या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली होती. परंतु,आरोपी खटल्याच्या तारखांना हजर रहात नसल्याने न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते.

पिंपरी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दोन्ही आरोपींना शिक्षा सुनावली.

Pune News: हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करणाय्रा आरोपींची धिंड

पुण्याच्या हवेली तालुक्यातील वाडे बोल्हाई परिसरात हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करणाय्रा आरोपींची लोणीकंद पोलिसांनी अटक करत धिंड काढलीय,

दोन गटात वाद झाल्याने आरोपींनी हवेत गोळीबार केली होता, पोलिसांनी आरोपींकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली ०१ फोर व्हिलर कार, ०३ दुचाकी, हवेत गोळीबार करण्यासाठी वापरलेले ०१ पिस्टल, ०१ जिवंत काडतूस असा एकूण ५ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

अशाप्रकारे कुणी सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशाराच पोलिसांनी दिलाय.

कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रहारचे माजी सभापती मंगेश देशमुख व त्यांच्या नातेवाईकावर जीवघेणा हल्ला

पशु संवर्धन विभागामार्फत अनुदानावर मिळणाऱ्या म्हशी शेतकऱ्यांना मिळवुन देण्यासाठी मंगेश देशमुख गेले होते बडनेरा बाजार समितीत..

बडनेरा मधील काही लोकांनी समूहाने येऊन मारहाण केल्याची देशमुख यांची माहिती..

मंगेश देशमुख यांच्यावर सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू...

औरंगजेब कबर वादप्रकरणी जिल्हा बंदी असताना जिल्ह्यात आल्याने बाळराजे आवारे पाटील यांना पोलिसांची नोटीस

पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही जिल्ह्यात आल्यानं नोटीस

औरंगजेब कबर वादप्रकरणी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात चार जणांना जिल्हा बंदी करण्यात आलीय

पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना अडवून जिल्हा बंदीचे आदेश असल्याचे पत्र दिले असता पत्र घेण्यास आधी दर्शवला नकार

औरंगजेब कबर प्रकरणी जिल्हा बंदीचा प्रशासनाचा आदेश असताना देखील आदेश धुडकावून पदाधिकारी जिल्ह्याच्या हद्दीत

जिल्हा बंदी असलेले बाळराजे आवारे पाटील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात

Nandurbar: रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या काढणीला सुरुवात

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढले होते जवळपास 3 हजार पेक्षा अधिक क्षेत्रावर हरभरा पिकाची लागवड करण्यात आली होती.

हरभऱ्याचा काढणीला सुरवात झाली असून.हरभरा कापणी साठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.

ऊस तोडणी साठी मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर झाले असून रब्बी हंगामातील पिकांच्या काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे.

यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात विक्रमी अशी हरभरा पिकाची लागवड करण्यात आली आहे . विक्रम उत्पादन मिळणार असले तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईची मोठी समस्या निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात अगोदर पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील गहू हरभरा काढणीला गती आली आहे

Satish Bhosale: सतीश भोसले याला चकलांबा पोलीस घेणार ताब्यात

सतीश भोसले उर्फ खोक्या हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला आज चकलांबा पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे..

सतीश भोसले उर्फ खोक्या याने अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात तसेच घरात गांजा प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

यातील ढाकणे पिता पुत्राच्या मारहाण प्रकरणात सहा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर काल न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती

यानंतर आता चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हे अंतर्गत चकलांबा पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकतात..

सतीश भोसले हा एका व्यक्तीला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी व्हायरल झाला होता

या प्रकरणात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून याच होण्याच्या तपासासाठी त्याला चकलांबा पोलीस ताब्यात घेऊ शकतात..

अटकेची कार्यवाही पूर्ण होतात त्याला न्यायालयात देखील हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे..

Solapur: सोलापुरात आयटीआय विद्यार्थिनींसाठी बांधण्यात आलेल्या वस्तीगृहात सापडले आक्षेपर्ह साहित्य

सोलापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधण्यात आलेल्या वस्तीगृहातील धक्कादायक प्रकार आला समोर

2011 साली सुरु झाले होते वस्तीगृहाचे बांधकाम मात्र अद्यापही पूर्ण नाही

तब्बल 50 लाख रुपये खर्चून वस्तीगृहाचे इमारत बांधण्यात आलीय

मात्र, हेच पडीक वस्तीगृह आता तळीरामांचा अड्डा बनला आहे.

सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदार लवकरचं राष्ट्रवादी अजित पवार गटात होणार दाखल?

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटात दिग्गज नेत्यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतलाय.

ज्यामध्ये शिराळाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप,कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे आणि आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अशा दिग्गज नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

नुकताच तशी एक बैठक देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मिरज येथील शासकीय गेस्ट हाऊस मध्ये पार पडली आहे.

या बैठकीला विलासराव जगताप,अजित घोरपडे,राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक हे उपस्थित होते, या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेश याबाबत चर्चा देखील पार पडली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा होऊन, पक्षप्रवेश होईल असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.

औरंगजेबानं तलवारीने कापले नाहीत त्यापेक्षा जास्त सरकारनं धोरणाने कापले, बच्चु कडू यांची टिका

औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावर बोलताना बच्चु कडू यांनी सरकारवर जळजळीत टिका केली आहे.

कबर नको आहे हे मान्य आहे पण त्या कबरीच्या प्रश्नात आमचा शेतकरी मरतोय.

जेवढे औरंगजेबाने तलवारीने कापले नाहीत तेवढे लोक या राज्यात सरकारी धोरणाने कापले.

राज्यात शेतकरी आणि तरुण मिळून वर्षाला 50 ते 60 हजार जण आत्महत्या करत आहेत याकडे कडू यांनी लक्ष केंद्रीत करताना.

सरकारने शेतकरी, युवक अपंग यांना काय चांगलं दिलं ते सांगाव असं आव्हान बच्चू कडू यांनी दिलं.

Bachchu Kadu: दिव्यांग, शेतकरी, मजुर, कष्टकऱ्यांना बजेटमध्ये स्थान नाही; बच्चु कडू यांची सरकारवर टिका

दिव्यांग, शेतकरी, मजुर, कष्टकऱ्यांसाठी बजेटमध्ये तरतुद नसल्याच्या मुद्द्यावरून बच्चु यांनी सरकारवर टिका केली आहे.

नियमित तरतुदी शिवाय दुसऱ्या कुठल्या नाहीत.

धर्म आणि जातीच्या नावावर सर्वच पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप बच्चु कडू यांनी यावेळी केला आहे.

Pandharpur: पंढरपुरातील एसटी बस स्थानकातील स्वच्छतेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीचे उपोषण

पंढरपूर येथील‌ एसटी बस स्थानकात कायम स्वरुपी स्वच्छता ठेवावी, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिसांची नियुक्ती करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने बस स्थानकात उपोषण सुरू करण्यात आले आहे.

महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष राजश्री ताड यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने एसटी प्रशासनाच्या विरोधात उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे दररोज हजारो भाविक एसटीने पंढरपूरला येतात. मात्र बस स्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या शिवाय महिलांचे अनेक वेळा दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

महिलांच्या सुरक्षेसाठी येथे कायम स्वरुपी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी महिलांनी उपोषण सुरू केले आहे

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा न्यायालयात हजर करणार

आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास खंडणी प्रकरणात महिलेला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची सातारा पोलिसांची माहिती

सातारा स्थानिक गुन्हे शाखेने एक कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना संबंधित महिलेला केली अटक

सध्या सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे

बदलापूरचे बाप्पा निघाले परदेश वारीला, यंदा तब्बल अडीच लाख गणेशमूर्ती परदेशात पाठवणार

बदलापूरचे गणपती बाप्पा यंदा मार्च महिन्यातच परदेशवारीला रवाना झालेत.

चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून कॅलिफोर्नियाला गणेशमूर्तींचा पहिला कंटेनर रवाना झाला असून मे महिन्या अखेरपर्यंत तब्बल अडीच लाख गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जाणार असल्याची माहिती चिंतामणी क्रिएशन्सचे निमेश जनवाड यांनी दिली आहे.

परदेशात असलेल्या भारतीयांनाही गणेशोत्सव साजरा करता यावा, बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी परदेशात गणेशमूर्ती पाठवल्या जातात.

बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी 6 महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.

दरवर्षी कॅलिफोर्निया, कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, युरोप, जर्मनी, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात.

Nandurbar News: जीव धोक्यात घालून विद्यार्थी घेत आहे शिक्षण

भिंतीला भेगा आणि छताला लाकडाचा आधाराखाली चिमुकले विद्यार्थी घेत आहे शिक्षण.....

पर्यायी व्यवस्था नसल्याने जीव मुठीत धरून शिक्षण घेण्याची विद्यार्थीवर वेळ....

नंदुरबार जिह्यातील मांडवी खुर्द जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रकार....

288 पटसंख्या असलेल्या शाळेत 7 खोल्यांपैकी 5 खोल्या जीर्ण अवस्थेत....

शाळा निर्लेखित झाल्या असल्या तरी त्यावर उपायोजना नाही....

शाळेची भिंत आणि पत्रे कधीं पडून येतील याची शाश्वती नाही....

विद्यार्थ्यांवर भिंत कोसळल्यास याला जबाबदार कोण पालकांचा संतप्त सवाल....

शासनाला वारंवार तक्रार देऊन ही दखल घेतली जात नसल्याचा पालकांचा आरोप....

Bachchu Kadu : पाचाड येथे बच्चु कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरु

दिव्यांग आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चु कडू यांनी आज किल्ले रायगडाचा पायथा पाचाड येथून आपल्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.

राजमाता जिजाऊ यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.

सरकारचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे नसल्याचा आरोप करीत सरकारचे दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यांनी या आंदोलनाचा पुकार केला आहे.

आज 21 मार्च ते 23 मार्च असे तिन दिवस हे अन्न त्याग आंदोलन केले जाणार असून शासनाने याची दखल घेतली नाही तर 23 मार्च रोजी या आंदोलनाची नवी दिशा ठरवली जाईल आसे कडू यांनी सांगितले आहे.

पुण्याच्या खेड तालुक्यातील पाईट पापळवाडी फाट्यावर मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याचा हल्ला

मेंढपाळाचा रात्रीच्या मुक्काम शेतात असताना मेंढ्या सोबत घोडी बांधुन मेंढपाळा झोपी गेला याचाच फायदा घेत बिबट्याने रात्रीच्या अंधारात दोन मेंढ्यावर हल्ला करताच मेंढपाळाने प्रतिहल्ला केला मात्र यावेळी बाजुला असणा-या घोडीची शिकार बिबट्याने केली या बिबट्याच्या हल्ल्याची मेंढपाळांमध्ये दहशत बसली असुन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केलीय

Dharashiv: ॲल्युमिनियम धातूच्या तारा चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश

ॲल्युमिनियमच्या महागड्या तारा चोरणाऱ्या तीन चोरट्यांना पकडण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे.

धाराशिव शहरातील वरूडा रोड येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी यात तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून हे बारा लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

तसेच पुढील कारवाई साठी या आरोपींना आनंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

डहाणूच्या धानीवरी गावात बांधकाम ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच काम, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी स्थानिकांकडून मागणी

डहाणूच्या धानीवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत पाच रस्त्यांची काम सुरू करण्यात आली असून ही काम निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत आज स्थानिकांनी ही काम रोखून धरली .

प्रत्येक रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाच होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी स्थानिकांकडून करण्यात आला आहे .

संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी स्थानिकांकडून करण्यात आली.

Maharashtra Politics: काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली

युवक काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांना सुरुवात

राज्यभरातील जवळपास 90 पदांवरती नव्या युवकांना देण्यात आली संधी

पुण्यातील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल

युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी राहुल शिरसाठ यांची निवड

पुण्यातील युवक काँग्रेसमध्ये मोठे बदल

Nagpur: नागपूर शहरातील 6 पोलीस ठाण्यांतर्गत कर्फ्यूमध्ये देण्यात आलेली 2 तासांची शिथिलता रद्द

- या सहा पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी चा आदेश

- पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आदेश

- काल 1 दिवसासाठी या सहा पोलीस स्टेशन अंतर्गत दुपारी दोन ते संध्याकाळी चार या दोन तासासाठी शिथिलता प्रदान करण्यात आली होती

- नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर एकूण 11 पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते

- त्यापैकी दोन पोलीस स्टेशन हद्दीतील कर्फ्यू काल उठवण्यात आला आहे....तर तीन पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता..

- त्यामुळे आता एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम करण्यात आलेला आहे

- गणेशपेठ, तहसील, कोतवाली, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, इमामवाडा आणि यशोधरानगर या नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम राहणार आहे.

कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने सिमेंट गाडीचा अपघात

नवीन कसारा घाटात ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंट च्या गाडीच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली या अपघातात दोघांचा चा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी ट्रक सिमेंट घेऊन नाशिक हून मुंबई च्या दिशेने जात आसताना नवीन कसारा घाटात ब्रेक फेल पॉईंट जवळ सिमेंट च्या ट्रक चालकाचा ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक थेट दरीत कोसळली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला हे मृत्यू पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन च्या सदस्य मदतीने बाहेर काढत शवविच्छेदनासाठी कसारा रूग्णालयात पाठवण्यात आले आहे.

जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी केली अटक

1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना केली अटक

सातारा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Amaravati: अमरावतीत महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय संप, खाजगीकरण आणि रिक्त पदांच्या मुद्द्यावर २०० कोटींचे व्यवहार ठप्प

अमरावतीत बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी काल एक दिवसीय संप केला.

खाजगीकरण रोखणे आणि रिक्त पदांवर भरती करण्याच्या मागणीसाठी हा संप करण्यात आला.

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

अमरावतीच्या श्याम चौक स्थित झोनल कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

अमरावती जिल्ह्यातील महाबँकेच्या ५४ शाखांपैकी बहुतांश शाखा बंद होत्या.

केवळ नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने काही शाखा सुरू होत्या. प्रत्येक शाखेत दररोज ४५ ते ५० लाख रुपयांचे व्यवहार होतात.

त्यामुळे काल एका दिवसात दोनशे कोटींचे व्यवहार ठप्प होते,संपामुळे एटीएम व्यतिरिक्त सर्व व्यवहार बंद पडले होते, मात्र आजपासून महाराष्ट्र बँकेचे कामकाज पूर्ववत होणार आहे

Pune News: वाहनांच्या उच्च सुरक्षा पाठीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

अत्याधुनिक उच्च सुरक्षा पाटी म्हणजेच एचएसआरपी साठी 30 एप्रिल पर्यंत मुदत दिली होती

मात्र वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे त्याची मुदतता वाढवण्यात आली आहे

जुन्या वाहनधारकांनी लवकर अशा नंबर प्लेट बसवून घेण्याचा आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे

देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल 2019 पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केलं होतं

ही प्लेट होलोग्रम स्टिकरसह येते ज्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो

Nashik: एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय बनावटीचं तेजस विमान बाहेर पडणार

- नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ( HAL ) मध्ये तेजस विमानाची सुरू आहे निर्मिती

- दरवर्षी ८ विमान बनविण्याचं भारताचं आहे नियोजन

- तेजससाठी लागणारे इंजिनही अमिरेकेने देण्याचं केलंय मान्य

- वायुसेनेला तेजस विमानाच्या मदतीनं मिळणार मोठी ताकद

नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला आरोपींना न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पीसीआर दिला होता

- आज आरोपींचा पीसीआर संपत असून पुन्हा एकदा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता

- न्यायालयाकडून पीसीआर वाढविला जातो का याकडे लक्ष...

- या घटनेतील मास्टर माईंड फहीम खान याला सायबर पोलीस प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन चौकशी करणार का?

- तसेच फहिम खान वर आलेल्या आणखी काही वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात तपासत घेतात का हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे..

Pune: पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी एक धक्का

माजी नगरसेविका कल्पना थोरवे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

कल्पना थोरवे यांचे पती संभाजी थोरवे यांनी ही केला प्रवेश

काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश

पुण्यात ठाकरेंच्या पक्षातील गळती थांबेना

Nashik: सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी

- चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुलं राहणार

- ५ ते १२ एप्रिल दरम्यान होणाऱ्या चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचे मंदिर २४ तास खुलं राहणार

- भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं, यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय

- चैत्रोत्सवाच्या कालावधीत सप्तशृंगी गडावर खासगी वाहनांना प्रवेश बंद

- नांदुरीपासून गडावर जाण्यासाठी २५० बसेसची व्यवस्था

समृद्धी महामार्गावर होणार टोलवाढ, 19 टक्क्याहून अधिक भरावे लागणार शुल्क

- नागपूर ते मुंबई या 701 किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे

- येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत दाखल होणार आहे...

- मात्र हा संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने त्याच्या टोल मध्ये मोठी वाढ केली आहे.

Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नाशिकमध्ये येण्याची शक्यता

- कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने विविध विभागांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आढावा बैठक

- याआधी देखील मुंबईत दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी घेतलीय कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक

- मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये घेणार कुंभमेळा नियोजनाची आढावा बैठक

- अद्याप मुख्यमंत्र्यांचा अधिकृत दौरा प्राप्त झालेला नसला, तरी प्रशासनाकडून तयारीला सुरुवात

- कुंभमेळ्याच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन फडणवीस पाहणी करणार असल्याचं  नियोजन

Solapur: सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अखेर जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी येत्या 27 एप्रिलला होणार मतदान तर 28 ला मतमोजणी

गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेल्या निवडणुकीला अखेर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिला हिरवा कंदील

18 जागांसाठी पार पडणार मतदान,यामध्ये सोसायटी मतदारसंघाच्या 11,ग्रामपंचायत मतदारसंघाच्या 4,व्यापारी मतदारसंघाच्या 2 आणि हमाल - तोलार मतदारसंघाच्या 1 जागेसाठी होणार मतदान

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्याने माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख, माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि माजी आमदार दिलीप माने यांची प्रतिष्ठा लागणार पणाला

तुळजापूर मंदिर संस्थानकडून मंत्री आशिष शेलार यांचीही दिशाभूल

बँक गॅरंटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात,मात्र मंदिर संस्थान पैसे घेत नसल्याची शेलारांना दिली माहिती

मंदिर संस्थाननी नियमबाह्य बँक गॅरंटीची जाचक अट रद्द करावी-कर्मचाऱ्याकडून संस्थानच्या अध्यक्षांना विनंती अर्ज

39 कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटीसाठी 78 लाखांची रक्कम एफडी म्हणून बँकेत जमा, दोन वर्षाच्या आत नोकरी सोडली तर पैशांवर सोडावं लागणार पाणी

तर दोन लाख न देऊ शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पैसे कपात

तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून पैसे वसुली होत असल्याची साम टिव्हीने बातमी लावल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर आरडी करण्याच्या हालचाली

कर्मचाऱ्यांकडून आरडीसाठी नकार,बँक गॅरंटी रद्द करण्याची अर्जाद्वारे मागणी

कर्मचाऱ्यांच्या नावावर एफडी असो की आरडी नियमबाह्य पद्धतीने सक्ती कशासाठी ?

बाजार समितीमध्ये नवीन गहू दाखल होताच गव्हाच्या दरात 400 रुपयांची घसरण

वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाला २ हजार ३६५ ते २ हजार ५५० रुपये पर्यंतचे दर मिळाले.

हे दर मागील पंधरा दिवसाच्या तुलनेत तब्ब्ल ४०० रुपयांनी घसरल्याच पहायला मिळालं, फेब्रुवारी महिन्यात गव्हाला २ हजार ९०० रुपयांपर्यंत दर मिळाले होते.

जिल्ह्यातील गव्हाची काढणी आता जवळपास आटोपले असून शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजारात विक्रीसाठी आणत असल्याने दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

वाशिम बाजार समितीत १ हजार ३०० क्विंटल पोत्याची आवक झाली होती. तर कारंजा बाजार समितीत गव्हाची आवक ३ हजार ५०० क्विंटल झाली होती.

Jalna: जालन्यात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालन्यात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणारी टोळी स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे.

या टोळीकडून जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांचे आठ गुन्हे उघडकीस आले असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीकडून तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जालना जिल्ह्यात सोयाबीन, हरबरा, गहु, तुरी या शेतमालाचे चोरीचे गुन्हे वेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल होते या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून शेतमाल चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे

Washim: वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक नुकसानीचा निधी मंजूर

वाशिम जिल्ह्यात ३१ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर आणि २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ५३,८३१ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे नुकसान झाले. यात ६५,५०४ शेतकरी बाधित झाले होते.

जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अहवाल सादर करत निधीसाठी मागणी केली होती. तब्बल सात महिन्यांनंतर अखेर शासनाने मदत जाहीर केली आहे.

१८ मार्चला यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता हा निधी लवकर वितरित होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनचे रत्नागिरीत आंदोलन

पुरेशा प्रमाणात लिपिक, शिपाई, तसेच सफाई कर्मचारी यांची भरती करा...

द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा... मान्यता प्राप्त संघटनेबरोबर झालेल्या करारांची काटेकोर अंमलबजावणी करा व द्विपक्ष बोलणे पूर्ण स्थापित करा...

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित चालू करा.. यासह इतर मागण्यासाठी, आपल्या न्याय व रास्त मागण्या उच्चव्यवस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरीत आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर बँकेतील कर्मचाऱ्यांनी निर्देशाने केली.

Amaravati: अमरावती जिल्ह्यात दोन महिन्यांत तबल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा...

सततची नापिकी, कर्जाचा डोंगर,शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकरी संपवत आहे जीवन..

दर दोन दिवसाआड अमरावती जिल्ह्यात एका शेतकऱ्याची आत्महत्या..

राज्य व केंद्र सरकार या कडे लक्ष देणार का?सामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न

सप्तश्रृंगीगड देवी चैत्रोत्सव यात्रे निमित्ताने प्रशासनाची तयारी आढावा बैठक

साडेतीन शक्तिपीठां पैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला येत्या ६ एप्रिल पासून सुरुवात होत त्यासाठी यात्रेच्या नियोजना साठी प्रशासन,ट्रस्ट्र तसेच विविध विभागाचे अधिकारी यांची यात्रेच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली.

यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविकांची दर्शनाला गर्दी लक्षात घेता, नांदूरी ते सप्तश्रृंगीगड घाट रस्त्याची दुरुस्तीची कामे तातडीने पुर्ण करावी, तसेच या काळात रस्त्याच्या मध्ये दुकाने लावण्यास प्रतिबंध करण्यास आला आहे.

तर आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Dharashiv: धाराशिवमध्ये बीओटीतुन बसपोर्ट उभारणी करणार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहीती

धाराशिव मध्ये बांधा-वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खाजगी विकासकांच्या माध्यामातून पहील्या टप्प्यात भव्य बसपोर्ट उभारण्यात येणार आहे.

या बरोबरच येरमाळा व उमरगा येथील बसस्थानक देखील विकसित करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलीय.

राज्यातील एसटी महामंडळाच्या विविध जागा भविष्यात बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खाजगी विकासाच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहे.

सुसज्ज बसस्थानक, प्रसाधनगृह, कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतीगृह याबरोबरच अद्यावत आगार व यामध्ये इलेक्ट्रिक बसेच चार्जिंग स्टेशन, सोलर प्लांट, वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या सुविधा असणार आहेत.

याची निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाणार अस ही सरनाईक यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्याची स्थिती ११ अपात्र तर २६ प्रस्ताव प्रलंबित, गेल्यावर्षी २६ जण ठरले पात्र

जळगाव आर्थिक मदत मिळत असल्याने निकषात बसत नसतानाही अनेक जण शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणाला 'आत्महत्या' ठरवत आहेत.

त्यामुळे जिल्हास्तरीय समितीकडून या प्रस्तावांना फेटाळले जात असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ४० पैकी केवळ तीन प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

तर ११ अपात्र ठरले असून २६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

२०२४ मध्ये जिल्हास्तरीय समितीसमोर १६८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील केवळ ९६ प्रस्ताव निकषात बसले.

त्यामुळे त्यांना मंजुरी देण्यात आली होती. तर ७२ प्रस्तावांना अपात्र ठरविण्यात आले होते.

गेल्यावर्षाची ही स्थिती असताना यंदा मात्र जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात ४० जणांचे प्रस्ताव प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यातील ३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ११ प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. २६ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

मियाझाकी या जापनीज आंब्याच्या एका नगाची किंमत तब्बल 10 हजार रुपये

आंब्याचं सीजन सुरू झाल आहे. हापूस,दसेरी, केसर, गावरान यासह विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध होत आहेत.

परंतु सध्या नांदेडमध्ये एका अंब्याची चर्चा जोरदार सुरु आहे.

या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिक आहे. कारण या एका आंब्याची किंमत आयकून तुम्ही थक्क देखील व्हाल.

मियाझाकी असं या जापनीज आंब्याचे नाव आहे.

जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे.

या मियाझाकी या एका आंब्याची किंमत तब्बल 10 हजार रुपये एवढी आहे.

Ulhasnagar: उल्हासनगरमध्ये प्लॅस्टिक दुकानाला भीषण आग, संपूर्ण दुकान जळून खाक

उल्हासनगरच्या गोल मैदान परिसरातील भाजपा जिल्हा कार्यालयाच्या बाजूला जय मातादी ट्रेडर्स नावाचं दुकान आहे.

या दुकानात प्लॅस्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा होता. गुरुवारी रात्री या दुकानाला अचानक आग लागली.

आगीची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.

ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाने दिली असून या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

SCROLL FOR NEXT