Shreya Maskar
खोबऱ्याची चिक्की बनवण्यासाठी ओल्या नारळाचा किस, गूळ, वेलची, जायफळ पूड आणि ड्रायफ्रूट्स इत्यादी साहित्य लागते.
खोबऱ्याची चिक्की बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये गूळ टाकून त्याचा पाक तयार करा.
त्यानंतर मिश्रणात ओल्या नारळाचा किस, वेलची आणि जायफळ पूड घालून चांगले परतवून घ्या.
यात तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता.
एका ताटाला तूप लावून तयार मिश्रण त्यात पसरवून घ्या.
तुमच्या आवडीच्या आकारानुसार वड्या पाडून घ्या.
8-10 तास चिक्की फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा.
हवाबंद डब्यात चिक्की साधारण 20-25 दिवस चांगली टिकते.