Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करणार: भाजप उमेदवार राहुल आवाडे

Namdeo Kumbhar

BjP Candidate List:  जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करणार: भाजप उमेदवार राहुल आवाडे

भाजपाची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केलीय. भाजपच्या पहिल्या यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून राहुल आवाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. राहुल आवाडे यांचं पहिल्या यादीत नाव जाहीर होताच इचलकरंजी मध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आवाडे यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रतिक्रिया दिलीय. भारतीय जनता पार्टीने आपलं नाव जाहीर करून आपल्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास निवडून येऊन सार्थ करणार, आवाडे म्हणालेत.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात 10वी अटक, बेलापूर आरोपीला अटक

नवी मुंबईतील बेलापूर भगवतसिंह ओमसिंह,32 ला अटक करण्यात आली. बाबा सिद्दिकिंवर गोळीबारासाठी पिस्तूल पूरावल्याचा ओमसिंहवर आरोप आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता

अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची आज रात्री महत्वाची बैठक होणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत पहिल्या टप्प्यातील नावांवर शिक्कामोर्बत होणार आहे. महायुतीत भाजपाने आपली यादी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीदेखील आपली यादी उद्या जाहीर करणार आहेत.

Assembly Election: बेलापूरमधून मंदा म्हात्रे आणि ऐरोली मधून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी 

बेलापूरमधून मंदा म्हात्रे ह्याना उमेदवारी देण्यात आल्याने भकपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. संदीप नाईक तुतारी हाती घेणार की अपक्ष लढणार याकडे लक्ष आहे. संदीप नाईक निवडणूक लढण्यावर मात्र ठाम आहेत.

विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

दोन तीन दिवसापूर्वी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. आता विधानसभेवेळी त्यांनी शरद गटात प्रवेश केलाय.

आमच्यात कुठलाच तिढा नाही, संजय राऊतांनी आधीच क्लेअर केलेय - नाना पटोले

वाशिम आणि दिग्रस येथील डॉ. सिध्दार्थ देवळे, ॲड. सुधाकर देशमुख ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले... ह्यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार संजय देशमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील 10 जागांवर शिक्कामोर्तब होणार

आजच्या काँग्रेस CEC च्या बैठकीत मुंबईतील 10 जागांवर शिक्कामोर्तब होणार

मुंबईतील 36 पैकी 27 जागांवर शिक्कामोर्तब

आतापर्यंत झालेल्या चर्चेतून मुंबईत काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा आल्या

मुंबईतील 9 जागांचा तिढा मात्र कायम

आतापर्यंत मुंबईत पूर्ण झालेल्या जागावाटप गणित :

एकूण जागा : 36

तिढा सुटलेल्या जागा : 27

कॉंग्रेस : 10

शिवसेना : 15

शरद पवार राष्ट्रवादी : 01

समाजवादी पक्ष : 01

Manoj Jarange Patil: 

तुम्हाला पाडायचे की उभे राहायचे तुम्ही ठरवा. माझी इच्छा राजकारणात जायची इच्छा नाही. महाविकास आणि युतीवाले सगळे सख्खे मावस भाऊ आहेत. आपण उभे राहिले की भाजप वाले खुश होतील. आणि उभे नाही केले तर माहाविकास आघाडी वाले खुश होतील.

Dhule News:  अखिलेश यादव यांची सभा महाविकास आघाडीसाठी वादाची ठिणगी

धुळे शहर विधानसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीचेच घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी व ठाकरे गट शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे, समाजवादी पार्टीच्या वतीने अखिलेश यादव यांनी ईर्षात जहागीरदार यांना उमेदवार घोषित करताच शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देखील निवडून येणारा चेहरा हा मशालीचाच असेल असे जाहीर केले आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे देखील हा राष्ट्रवादीचा पारंपारिक मतदारसंघ असल्याचे म्हणत या जागेवर दावा केला आहे, त्यामुळे आता धुळे शहर विधानसभा उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादाची थिणगी पडली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे,

Kopargaon Assembly Election: कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा पेच...

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा पेच...

भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद...

दोन दिवसापासून भाजप श्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर स्नेहलता कोल्हे मतदारसंघात परतल्या...

देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव यांची घेतली होती भेट...

कार्यकर्त्यांचा निवडणूक लढवण्याची आग्रह...

देवेंद्र फडणवीस मतदार संघातील कार्यकर्त्यांशी लवकरच संवाद साधणार...

कोल्हे परिवार अंतिम निर्णय दोन दिवसात स्पष्ट करणार...

Nashik News: - गोदावरी नदीपात्रात गाडी अडकली 

- गोदावरी नदीची पाणी पातळी अचानक वाढल्याने नदीपात्रात अडकली चार चाकी गाडी

- काल रात्रभर नाशिक शहर आणि जिल्ह्यात झाला आहे मुसळधार पाऊस

- गंगापूर धरणातून पुन्हा 1 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ

- नदीपात्रात लावलेली एक गाडी पुराच्या पाण्यात अडकली

 Pune News: दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे उतरले मैदानात

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे सुपुत्र मयुरेश वांजळे उतरले मैदानात

खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मयुरेश वांजळे इच्छुक

बहुतांश सर्व पक्षातील नेत्यांच्या वांजळे यांनी घेतल्या भेटी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप, शिवसेना यांच्या नेत्यांची घेतली भेट

अद्याप कोणत्या पक्षाकडून ते उभे राहणार याबाबत समजू शकलेले नाही मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून नागरिकांच्या गाठी भेटी सुरू आहेत

त्यांचे वडील रमेश वांजळे यांची गोल्डमन म्हणून ओळख होती,

२००९ मध्ये रमेश वांजळे यांनी मनसेच्या तिकीटावर उमेदवारी घेत भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं

२०११ मध्ये रमेश वांजळे यांचं निधन झालं. त्यांची कन्या सायली वांजळे ही त्या भागातून नगरसेवक आहे

खडकवासला मतदारसंघाची रचना पाहायला गेलं तर या मतदारसंघाचा 70 टक्के भाग हा शहरी असून 30 टक्के भाग हा ग्रामीण आहे

खडकवासला मध्ये भाजप चे विद्यमान आमदार भीमराव तापकीर असून त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी मधून सचिन दोडके इच्छुक आहेत

Malshiras Election: माळशिरसमध्ये भाजप अलर्ट मोडवर; अनुसूचित जातीचा उमेदवार देण्याचा भाजपचा विचार

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस राखीव विधानसभा मतदारसंघात आता भाजप अलर्टमोडवर आला आहे. संविधान बदलणार या महाविकास आघाडीच्या अप प्रचाराचा चेहरा उघडा पाडण्यासाठी अनुसूचित जातीचा उमेदवार देण्याचा भाजपकडून विचार सुरू आहे. माळशिरस मधून अतुल सरतापे यांचे नाव आघाडीवर आहे

महाविकास आघाडी कडून उत्तम जानकर यांची उमेदवारी निश्चित असताना त्यांच्यापुढे आव्हान देण्यासाठी भाजपमध्ये अद्याप उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. विद्यमान आमदार राम सातपुते यांच्यासह माळशिरस मधील स्थानिक तसेच अनुसूचित जातीचा चेहरा म्हणून भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश चिटणीस अतुल सरतापे यांच्या नावाचा आग्रह काही वरिष्ठ नेत्यांनी धरला आहे.

Maharashtra Politics: शिवसेना ठाकरे गटाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि शरद पवार गट व्यथित

शिवसेना ठाकरे गटाच्या आडमुठ्या भुमीकेमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार हे दोन्ही पक्ष व्यथित

ताकद नसलेल्या जागांसाठी ठाकरे गट अडून बसल्याने जागावाटप रखडल

सेनेच्या भूमिकेमुळे दोन्ही पक्षांत

नाराजी

वरिष्ठ पातळीवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा सुरु

वरिष्ठांनी यात लक्ष घालण्याची काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची भूमिका

Beed News: बीडमध्ये भाजपला धक्का ? भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

बीडमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पहिल्या टर्म नंतर सलग दुसऱ्या टर्ममध्ये राजेंद्र मस्के यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली होती. मात्र विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राजेंद्र मस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

दरम्यान राजेंद्र मस्के हे बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र निवडणुकीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच मस्केंनी राजीनामा दिल्याने मस्के यांच्या मनामध्ये नेमक चाललय काय ? ते कोणत्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार की अपक्ष उभा राहणार या सर्व विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे

Dhule News: विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच तडीपारीच्या कारवाईला पोलीस प्रशासनातर्फे सुरुवात

विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलीस प्रशासनातर्फे कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात झाली आहे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील तीन सराईत गुन्हेगारांना धुळे जिल्हयासह चार जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे, धुळे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या सुचनेनुसार उपविभागीय दंडाधिकारी यांनी हे आदेश पारित केले आहे, या कारवाईमुळे तिघांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेल्या भिती व दहशतीचे वातावरण कमी होण्यास मदत होईल, या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वातील रथी महारथींचे धाबे चांगलेच दनाणले आहेत,

Maharashtra Politics: शरद पवार यांच्या पक्षात जोरदार इनकमिंग, मुंबईत मोठे पक्षप्रवेश

नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे ॲड. संभाजीराव पाटील, श्री. पंडितराव धुमाळ, ॲड. एन. पी. पाटील जमालपुरकर, श्री. विनायक बाजपाई, श्रीमती आशाताई अरविंद कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी परिवारात सहर्ष स्वागत; पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! यावेळी प्रदेश सरचिटणीस श्री. बसवराज पाटील नगराळकर व लातूर जिल्हाध्यक्ष श्री. संजय शेटे देखील उपस्थित होते.

Beed News: मनसे बीड जिल्ह्यात उमेदवार देणार? इच्छुक उमेदवार मयुरी खेडकर अन् रमेश गालफाडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यात विधानसभा निवडणुकीत एकला चलो ची भूमिका घेतलीय. त्यानंतर आता बीड जिल्ह्यात मनसे उमेदवार देणार असल्याचं बोललं जात आहे. आज गेवराई मतदार संघातील इच्छुक उमेदवार मयुरी खेडकर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब मस्के आणि केज मतदार संघाचे इच्छुक उमेदवार रमेश खेडकर यांनी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतलीय. त्याचबरोबर उमेदवारीची मागणी देखील केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे..

ठाणे जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाचा ठाणे जिल्ह्यातील भातशेतीला मोठा फटका बसला आहे. अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, शहापुर तालुक्यात जवळपास ८० ते ९० टक्के भातशेती या पावसामुळे अक्षरशः वाया गेली आहे.

नांदेड मधील देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे आज स्वराज्य पक्षात प्रवेश करणार

दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरातील CRPF शाळेजवळ स्फोट

दिल्लीच्या प्रशांत विहार परिसरातील CRPF शाळेजवळ स्फोट

दिल्ली पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली

घटनास्थळी पोलिसांना कुठलही सदिग्ध गोष्ट सापडली नाही

थोड्याच वेळात पोलिसांकडून FIR दाखल केला जाणार

दिल्ली पोलिसांसोबत NSG आणि स्पेशल सेल ची टीम देखील घटनास्थळी दखल

पोलिसांकडून आजूबाजूच्या CCTV कॅमेऱ्यांची तपासणी सुरू

पोलिस यंत्रणा घटनुळे अलर्ट मोडवर

बीडच्या मुळकवाडीत भर रस्त्यावर गोळीबार

बीडच्या मुळकवाडी येथे भर रस्त्यावर गोळीबार केल्याची घटना घडलीय.. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे..संदीप तांदळे असं जखमी व्यक्तीचे नाव आहे..

सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड सहपत्नी पारंपारिक पोशाखात मुळगावी दाखल झाले

देशाचे सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांनी आज त्यांचे मुळगाव असलेल्या खेड तालुक्यातील कन्हेरसर येथे सहपत्नी पारंपारिक पोशाखात कुलदैवत यमाई देवीचे दर्शन घेतले यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरन्यायाधीश डॉ धनंजय चंद्रचूड यांचे स्वागत केलेय सरन्याधीश धनंजय चंद्रचुड सरन्यायाधीश झाल्यानंतर पहिल्याच मुळगावी येत असल्याने ग्रामस्थांनी स्वागत करुन सन्मान केलाय.

रत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी रंगणार सामना

रत्नागिरी - चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी रंगणार सामना

दोन्ही उमेदवारांची नावं जवळपास निश्चित

चिपळूणमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच होणार कांटे की टक्कर

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार शेखर निकम, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असणार प्रशांत यादव

रत्नागिरी-सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे फक्त चिपळूणची जागा

चिपळूणची जागा निवडून आणण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार दोघांनीही कसली आहे कंबर

गेल्या महिन्यात झाल्या होत्या दोन्ही नेत्यांच्या सभा

मातोश्रीवर साडेबारा वाजता तातडीची बैठक

उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक..

बैठकीत शिवसेना उद्धव ठाकरे मध्ये येणाऱ्या इनकमिंग बाबत होनार चर्चा...

शिंदे सोबत गेलेल्या आमदारांपैकी काही आमदार परत उद्धव ठाकरे गटाकडे येऊ इच्छितात... त्याबाबत बैठकीत होईल चर्चा

परत येणार आमदारांना घेणार नाही अशी उद्धव ठाकरेंची भूमिका...

तसेच इतर पक्षातूनही अनेक मान्यवर नेतेमंडळी देखील उद्धव ठाकरे गटात येण्याच्या प्रतीक्षेत

बीड - पैशाचा पाऊस पाडतो म्हणत तब्बल 45 लाखांचा गंडा..

बीड शहरातून अंधश्रद्धाविषयी पुन्हा एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.. तांत्रिक विद्या अवगत करून पैशांचा पाऊस पाडतोत..आम्ही तुला मालामाल करतो, असे म्हणत बीड शहरातील एका लॅब टेक्निशीयनला तब्बल ४५ लाख २३ हजार ३१५ रुपयांचा गंडा घातला आहे.

काल साधारण दहा तास बैठक झाली त्यानंतर आज आम्ही साडेबारा वाजता हा मातोश्रीवर शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली
संजय राऊत

शायना एन सी वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रीय

महायुतीच्या वरळी विधान सभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार शायना एन सी वरळी विधानसभा मतदारसंघात सक्रीय.

शायना एन सी यांनी वरळी मतदारसंघातील सर्व महापालिका वॅार्डातील मतदारांशी संपर्क वाढवला.

वरळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसमाजाच्या मतदारांशी शायना एन सी यांनी भेटीगाठी सुरू केल्या.

विधानपरिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन

विधानपरिषदेचे माजी सदस्य जेष्ठ नेते नरेंद्र बोरगांवकर यांचे वृद्धापकाळाने निधन

धाराशिव व लातुर जिल्हा एकञ असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर होते कार्यरत

तुळजाभवानी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तसेच बालाघाट शिक्षण संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव पदावर केले काम

तुळजापूर रोडवरील मोतीझरा स्मशानभूमीत दुपारी ४.३० वाजता होणार अंत्यसंस्कार

Khandala Ghat Traffic:  खंबाटकी घाटात वाहतूक ठप्प, कंटेनर बंद पडल्याने ट्रॅफिक जाम

खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने येणारी वाहने घाटात अडकून पडली आहेत. आज रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात कोल्हापूर आणि साताऱ्याचा दिशेने वाहने निघाली असल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने गरम होऊन बंद पडली आहेत. त्यामुळे आणखीनच वाहतूक कोंडीत भर पडली आहे.शिरवळ रेस्कु टीम,भुईज पोलीस, खंडाळा पोलीस महामार्ग पोलिसांकडून ही वाहतूक कोंडी काढण्याचं काम सुरू करण्यात आला आहे.

Nashik News: दिंडोरीत नरहरी झिरवाळांचे वाढले टेन्शन

- दिंडोरीत नरहरी झिरवाळांचे वाढले टेन्शन

- दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिंदेच्या शिवसेनेकडून दावा

- माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे आणि पदाधिकारी घेणार थोड्याच वेळात वर्षावर घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

- नागपूरात झालेल्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदे यांनी दिंडोरीची जागा लढवण्याचा शब्द दिला होता

- त्यामुळे ही जागा शिवसेनेला सुटेल, धनराज महाले यांचा दावा

Sangli News: जत मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक

सांगलीच्या जत मतदार संघातून सामाजिक कार्यकर्ते तुकाराम बाबा महाराज शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक आहेत. मुंबईत संजय राऊत यांच्यासह भास्कर जाधवांची तुकाराम बाबा महाराज यांनी शिवसेना पदाधिकारयां सोबत भेट घेतली आहे.सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जत मतदारसंघातून तुकाराम बाबा महाराजांना उमेदवारी देण्याची एकमताने मागणी केली आहे.जत हा

काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा मतदारसंघ आहे,त्यामुळे तुकाराम बाबा महाराजांच्या उमेदवारीच्या मागणीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे.

दिवाळीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी वर्गातच तयार केले, आकाश कंदील, पणत्या, किल्ल्यावरील मातीच्या बाहुल्या....

जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूतील अभंग इंग्लिश शाळेतील मुलांना दिवाळी सणानिमित्ताने शाळेतील वर्गात आकाश कंदील, पणत्या, किल्ल्यावरील मातीच्या बाहुल्या, आणि सजावटीला लागणाऱ्या रंगीबेरंगी वस्तू तयार करण्याचे धडे दिले जात आहे, तर विविध रंगातील या वस्तू घेण्यासाठी समस्त देहूकर अभंग इंग्लिश स्कुल च्या दिवाळी मेळाव्याला भेटी देऊ लागले असून या वस्तू विकून जो नफा मिळतोय तो समाज कार्याला म्हंजे अनाथ आश्रमाला देण्यात येतो त्यामुळे या शाळेतील चिमुकले सामाजिक उपक्रम राबवित असल्याने या मुलांचा या निमित्ताने शाळेत अभ्यासक्रम घेण्यात येतो.. गेली तीन वर्षांपासून देहूतील या शाळेचा हा उपक्रम सुरू आहे..

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का

हडपसरमध्ये पाच माजी नगरसेवक सोडणार अजित पवार यांची साथ

अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे सोडणार अजित पवार यांची साथ

हडपसर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार

विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात लढवणार निवडणूक

आनंद अलकुंटे माजी नगरसेवक

सलग तीन वेळा पुणे महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पीएमपीएल चे माजी संचालक म्हणून ही काम केलं आहे.

हडपसर मधून अजित पवार समर्थक माजी नगरसेवक प्रशांत म्हस्के, माजी नगरसेविका रुक्साना इनामदार यांचे पती शमशुद्दीन इनामदार यांच्यासह अजून दोन नगरसेवक दादाची साथ सोडणार

मंगळवारी शक्ती प्रदर्शन करत आनंद अलकुंटे हडपसर मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार..

Rain Update : बीड - बीडच्या केज तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी

बीडसह केज तालुक्यातील विविध भागात विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. यादरम्यान वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतराम देवडकर रा. नाथापूर असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर या पावसामुळे कापसाचे व काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले असून बीड तालुक्यातील वंजारवाडी परिसरात नदीला पूर आल्याचं पाहायला मिळालं...

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुण्याला लवकरच 4 नव्या वंदे भारत ट्रेन

पुण्यातून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दोन वंदे भारत एक्सप्रेस झाल्या होत्या सुरू

पुणे ते कोल्हापूर,पुणे ते हुबळी तसेच मुंबई ते सोलापूर अशा 3 वंदे भारत रेल्वे गाड्या पुण्याला मिळाल्या आहेत

त्यातच अजून काही नव्या वंदे भारत गाड्यांची भर यात पडणार आहे त्यामुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे

पुणे ते शेगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बेळगाव या मार्गांवर वंदे भारत ट्रेन होणार सुरू

शिरूर - हवेली विधानसभेत आयात उमेदवार देवू नये राष्ट्रवादी अजित पवार गट पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक

शिरूर - हवेली विधानसभा मतदार संघ भाजपकडे राहणार की राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे जाणार याबाबत रस्सीखेच सुरू आहे.

मात्र हा मतदार संघ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे गेला तरी पक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे.

मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठक घेवून आमच्यातील पाच ईच्छुकापैकीच उमेदवारी घावी असे पत्र पवार यांना दिले आहे.

वाघोलीत शिरूर व हवेली या दोन तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाने आयात उमेदवार न देता आम्ही पाच जण जे ईच्छुक आहोत. त्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी.तुम्ही या पाच पैकी जो उमेदवार द्याल तो आम्हाला मान्य राहील.आम्ही त्यासाठी काम करू. असे मत या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत मांडले.

अहिल्यानगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पकडली दोन कोटी रुपयांची दारू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक कोटी दोन लाखाची विदेशी दारू जप्त केली आहे. गोवा राज्यातील मडगाव येथून इंदौर, मध्य प्रदेशला विदेशी दारू घेऊन जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे बायपास रोडवरील अरणगाव शिवारात सापळा लावून हा ट्रक ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दीपक पाटील, शहाजी पवार, शैलेश जाधव या तीन जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या आरोपींची कसून चौकशी करून या विदेशी दारूचे मध्यप्रदेश कनेक्शनच्या मुळाशी जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : जी जबाबदारी दिली ती पार पाडावी लागते; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Pune Assembly Election: पर्वतीतून मिसाळ यांना चौथ्यांदा उमेदवारी; कोण आहेत माधुरी मिसाळ, जाणून घ्या

Hingoli Vidhan Sabha : हिंगोली विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर; बंडखोरीची शक्यता

Diwali Special Chivda Recipe: 'या' ट्रिक्सचा वापर करुन तयार करा पातळ पोह्यांचा चिवडा

Astro Tip: घरात काढा हळदीचे स्वस्तिक चिन्ह, पडेल पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT