निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सामानाची आज पुन्हा एकदा तपासणी केली. ठाणे येथील रेमंड हेलिपॅडवरून शिंदे हे कोकणात शिवसेनेच्या उमेदवारांच्या मतदारसंघात प्रचारसभा घेण्यासाठी ते निघाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आपले समान त्यांना दाखवले. काल सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील सभेपुर्वीही त्यांचे सामान निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासले होते.
- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज येवला दौऱ्यावर
- ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांचा छगन भुजबळांच्या मतदारसंघात दौरा
- येवला तालुक्यातील अनेक गावांमध्ये सांत्वनपर भेटी घेणार
- तर छगन भुजबळ देखील आज येवल्यातच, येवल्यात भुजबळांच्या प्रचार सभा
- अजित पवारांच्या निवडणूक खर्चाबाबत मोठा आरोप
- ''अजित पवारांच्या फेसबुक पेजवर ४३ लाख खर्च''
- कॅाग्रेस नेते सचिन सावंत यांचा मोठा दावा
- निवडणूक काळात अजित पवार यांच्या फेसबुक पेजवर ४३ लाखांचा खर्च. विधानसभा निवडणुकीची ४० लाख खर्चाची मर्यादा अजित पवार यांनी ओलांडली. या संर्दभात सचिन सावंत यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
- काही सामाजिक संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातुन ही माहीती उघड.
- सावंत यांच्याकडून या अहवालाची प्रत निवडणूक आयोगाला तक्रारी बरोबर सादर.
भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार.
18 तारखेला सकाळी 10 वाजता होणार जाहीर सभा.
नेरुळ मधील राम लीला मैदानावर होणार अमित शाह यांची जाहीर सभा.
भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी
सोलापुरात निवडणूक आयोगाकडून मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगेची तपासणी
महायुतीच्या प्रचारार्थ मुरलीधर मोहोळ सोलापूर दौऱ्यावर
सोलापूर विमानतळावर झाली तपासणीच
रत्नागिरी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज रत्नागिरी दौरा
मुख्यमंत्र्यांचं दापोलीत आगमन
दापोलीत हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी
निवडणूक प्रशासनाकडून बॅगांची झाली तपासणी
सर्व बॅगांची करण्यात आली तपासणी
दापोलीत थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होणार
छत्तीसगडच्या कांकेरमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षारक्षकांमध्ये चकमक
जवानांनी केलेल्या गोळीबारात ५ नक्षलवाद्यांचा खात्मा
चकमकीत २ जवान जखमी
जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू
आणखी काही नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती
ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता
शरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी
म्हसळा येथील सभेसाठी दाखल झाले शरद पवार
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ सभा
म्हसळा हेलिपॅड वरती भरारी पथका कडून तपासणी
माहीमचे शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्यावर सुषमा अंधारे यांची टीका
सदा सरवणकर यांनी पासपोर्ट अर्जात ते संसद सदस्य असल्याचा उल्लेख
ते खासदार कधी झाले? सुषमा अंधारे यांची टीका
खामगाव- बुलडाणा महामार्गावर पोलिस व्हॅन आणि पिकअपची समोरासमोर धडक.
अपघातात दोन पोलिसासह ३ जण गंभीर जखमी.
जखमीनवर बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु.
तिघांची प्रकृती गंभीर, मध्यरात्री झाला अपघात.
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज नाशिकमध्ये धडाडणार
- नाशिक पश्चिम मतदारसंघात मनसे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंच्या शहरात २ सभा
- मनसेच्या स्थापनेनंतर नाशिक शहरातूनच मनसेला मिळाली होती मोठी ताकद
- नाशिक शहरातून मनसेला मिळाले होते तीन आमदार
- पुन्हा एकदा तीच ताकद मिळवण्यासाठी राज ठाकरे आज काय बोलणार, याकडे लक्ष
- आज राज ठाकरे नाशिककरांना काय साद घालतात हे पाहणं देखील असणार आहे महत्त्वाचं
- सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर
- अजित पवार आज देवळाली मतदारसंघातील उमेदवार सरोज अहिरे यांच्यासाठी गिरणारेमध्ये घेणार सभा
- गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी घेत आहेत सभा
- नाशिक जिल्ह्यात मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मिळाली होती मोठी ताकद
- त्यामुळेच अजित पवार यांचं या विधानसभा निवडणुकीत देखील नाशिक जिल्ह्याकडे विशेष लक्ष
- देवळालीत अजित पवारांच्या उमेदवारासमोर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं देखील आव्हान असल्यानं अजित पवार आज काय बोलणार? याकडे लक्ष
राहुल कनाल यांची औवेसी भावांविरोधात मुंबई पोलिस आयुक्तांकडे तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाकडे तक्रार.
भाषणादरम्यान केलेल्या वक्तव्या प्रकरणी दोघांची तक्रार.
भाषणादरम्यान केलेली वक्तव्य ही हिंसाचार शांतता भंग करणारे व विशिष्ट समाजाची भावना दुखावणारी
पुणे शहरातील तापमानात वाढ
गेले आठवडाभर तापमान होते कमी
मात्र शुक्रवारी तापमानात झाली वाढ
तापमानात वाढ झाल्याने हवेतील गारवा झाला कमी
पुढील दोन दिवस तापमान स्थिर राहील असा अंदाज
भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
पुण्यातील निवासस्थानी माजी राष्ट्रपतींनी केले मतदान.
प्रतिभाताई पाटील यांचं वय 89 असून, निवडणूक आयोगाच्या होम वोटिंग उपक्रमानुसार घरीच बजावला मतदानाचा हक्क.
राहुल गांधी आज अमरावती दौऱ्यावर
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ धामणगाव येथे घेणार जाहीर सभा
या सभेसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, महाविकास आघाडीतील नेते राहणार उपस्थित
राहुल गांधी आज विदर्भातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.