Maharashtra Breaking Live Marathi news Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Updates: माघी वारीत विठु चरणी ३ कोटी ४ लाखांचे दान

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 14 February 2025: आज शुक्रवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकीय घडामोडी, जीबीएस आजाराचे अपडेट, महाकुंभमेळा अपडेट, व्हॅलेंटाईन डे, राजन साळवी, देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीतील वाद अपडेटसह मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

माघी वारीत विठु चरणी ३ कोटी ४ लाखांचे दान

पंढरपुरात नुकत्याच झालेल्या माघी वारीच्या सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दानपेटी तब्बल तीन कोटी तीन लाखाचे उत्पन्न भाविकांकडून अर्पण करण्यात आले आहे. यामध्ये 52 ग्रॅम सोने तर सहा किलो चांदीच्या वस्तू विठ्ठलाच्या खजिन्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 47 लाखांनी उत्पन्न घटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर

पुण्यामध्ये केंद्रीय गृह विभागाची पश्‍चिम विभागीय बैठक २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शहा यांचा पुण्यात राजकीय कार्यक्रम होणार की नाही याबाबत स्पष्टता आलेली नाही. पश्‍चिम विभागीय बैठक कोरेगाव पार्क भागातील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.

Pune News : वनराज आंदेकर खून प्रकरण, 21 आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर

माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरण

21 आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर...

पुणे पोलिसांकडून एकूण सतराशे पानांचा दोषारोपपत्र सादर करण्यात आला आहे...

१ जुलै २०२४ मध्ये रात्री सयाजी गायकवाड आणि त्याच्या सदस्यांनी वनराज आंदेकर वर केला होता खुनी हल्ला

या गुन्ह्यात एकूण 21 आरोपींना अटक असून दोन अल्पवयीन मुले आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आले होते

 Pune : केसनंद येथील अनाधिकृत मशिदीच्या बांधकामावर फिरला बुलडोजर

केसनंद येथील दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मशिदीवर प्रशासनाच्या वतीने अखेर बुलडोझर फिरवण्यात आला. केसनंद येथील ग्रामस्थ कुशाल सातव यांनी केसनंद येथील दफनभूमीच्या जागी अनधिकृतपणे उभारलेल्या मज्जिदी विरोधात प्रशासकीय विभागाकडे तक्रारी अर्ज केला होता.

याच अनुषंगाने भाजपचे हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांनी देखील केसनंद मध्ये भेट देत अनधिकृत मज्जिद बांधकामावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाची केली होती. याची दखल घेत प्रशासनाच्या वतीने केसनंद येथील अनाधिकृत मज्जिदीच्या बांधकामावर हातोडा फिरवण्यात आला आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १० नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलाय,अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविली आहे.

Maharashtra Politics : मुंडे-धस यांच्यात गुप्त भेट; बावनकुळेंकडून शिक्कामोर्तब

मुंडे-धस यांच्यात गुप्त भेट झाली आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्कामोर्तब केला आहे.

Kolhapur :  गर्भलिंग निदान करणाऱ्यांबाबत सरकार आक्रमक

आता गर्भलिंग निदान करणाऱ्यांबाबत सरकार आक्रमक

गर्भलिंग निदान प्रकरणात अनेकवेळा एक आरोपी सापडत असेल तर त्यांच्यावर मोका कारवाईचा विचार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

कोल्हापूरात आणि एकूणच राज्यभरात गर्भलिंग निदान करून देणाऱ्यांना आबिटकर यांचा इशारा

रायगडच्या पालकमंत्री पदासाठी तुळजाभवानीला साकड घालणार; मंत्री भरत गोगावले यांच मोठे विधान

रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही कायम आहे.. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी महायुती मधील राष्ट्रवादी आणि शिवसेना आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे., तर लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय होणार आहे.. त्यामुळेच तुळजाभवानीला साकड घालणार असल्याच मंत्री भरत गोगावले यांनी आज लातूर येथे माध्यमांशी बोलताना दिलीय.

Navi Mumbai : अटल सेतू वरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अटल सेतू वरून एकाचा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

वैभव पिंगळे या 50 वर्षीय शिक्षकाने अटल सेतू वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न.

वैभव पिंगळे हे अलिबाग तालुक्यातील शिवाजीनगर कुर्डुस येथील रहिवासी असल्याची माहिती.

सकाळी आपल्या ह्युंदाई क्रेटा वाहनाने ते अटक सेतूवर आले होते.

सकाळी 9 वाजता त्यांनी अटल सेतू वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

पोलीस वैभव पिंगळे यांचा शोध घेत असून अद्याप ते सापडले नाहीत.

तुळजाभवानी मंदिराचा गाभाऱ्याचा विस्तार करा; तुळजापुरातील पुजाऱ्यांची मागणी

श्री तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचे विस्तारीकरण करण्याची मागणी तुळजापूर येथील पुजाऱ्यानी केली आहे. आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सध्या जीर्णोधाराचे काम सुरू आहे. देवीला पुरातन रूप देण्याकरिता गाभारा परिसरात असलेल्या टाईल्स हटविल्यानंतर गाभाऱ्यातील शिळाना तडे गेल्याचे समोर आले आहे. यातच मंदिरातील वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराचा गाभारा मोठा करावा, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबीकडुन होणारी कारवाई म्हणजे निव्वळ फार्स

- ⁠ एसीबी ने कारवाई केलेल्या सरकारी अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याऐवजी सरकारकडून अभय मिळत असल्याचं समोर. 

- ⁠राज्यातील 173 अधिकारी आणि कर्मचार्यांना अपसंपदा जमवल्याप्रकरणी पकडण्यात आल्यानंतरही त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही.

- त्यातील 30 क्लास वन म्हणजे वर्ग एक  अधिकाऱी आहेत. ⁠

- अभियोगपूर्व म्हणजे खटला भरण्याच्या मंजुरीसाठी शासन अथवा सक्षम अभिकरणांकडे प्रलंबित असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांची संख्या 287 आहे.⁠

- ⁠थेट लाच घेताना रंगेहाथ पकडले गेलेल्या आणि शिक्षा झालेल्या परंतु अद्यापही बडतर्फ न केलेले 22 आधिकारी आणि कर्मचारी आहेत.

एका शिक्षकाने उभारली अनोखी शाळा,  365 दिवस आणि 12 तास चालणारी शाळा

नाशिक महाराष्ट्र राज्यच शेवटच गावात असलेल्या हिवाळी गावात भरत आहे..

अनोखी शाळा जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी दूर्गम भागात इंग्रजी माध्यमांना लाजवेल अशा पद्धतीचं शिक्षण देणारी अनोखी शाळा निर्माण झालीय..

विशेष म्हणजे हि शाळा 365 दिवस 12 तास सुरू असते..

आदिवासी मुलांना पारंपारीक शिक्षणाबरोबर आधुनिक शिक्षण आणी विशेष कौशल्य शिक्षक केशव गावित यांनी शिकवले आहे.

या शाळेत शिकणारे लहान विद्यार्थी दोन्ही हाताने दोन वेग वेगळी भाषेत लिहतात या शाळेचे सर्व स्तरातून कौतूक होत असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणी शिक्षणमंत्री दादा भूसे यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेचा लोकार्पण सोहळा पार पडतोय....

मुख्यमंत्री कक्षाच्या धर्तीवर राज्यात कृषिमंत्री कक्षाची स्थापना होणार

कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांची अमरावतीत मोठी घोषणा...

कृषिमंत्री कक्षात येणाऱ्या सूचना थेट कॅबिनेटमध्ये मांडणार - ॲड.माणिकराव कोकाटे

शेतकऱ्यांच्या सूचनांची २४ तासात दखल घेणार, त्यासाठी चांगले अधिकाऱ्यांची नेमणूक करणार कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

Raigad News: वेतन वाढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

वेतन वाढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे या संस्थेच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी वेतन वाढीच्या मुद्द्यावरून बेमुदत काम बंद आंदोलन पुकाराल आहे.

याच एक भाग म्हणून महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मधील कर्मचारी देखील बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

गेली अनेक वर्षे तुटपुंज्या मानधनावर हे कर्मचारी काम करीत असून संस्थेने पगार वाढ करावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येत आहे.

Nashik News: नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग

नाशिक -

- नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग

- दुपारच्या सुमारास अचानक डोंगरावरील झाडांना लागली आग

- डोंगरावरील झाडं आगीच्या भक्षस्थानी

- पांडवलेणी डोंगरावर शेकडो वर्षे जुनी बुद्ध लेणी

- तर डोंगराच्या पायथ्याशी फाळके स्मारक

- डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर जंगल असल्यानं आग पसरण्याची भीती

- जंगलातील वन्य संपदेला देखील आगीचा धोका, आगीच कारण मात्र अद्याप अस्पष्ट

Washim News: वाशिममध्ये दोन दुचाकीचा भीषण अपघातात, एक जण जागीच ठार, २ गंभीर

वाशिम -

दोन दुचाकींच्या अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी

वाशिम जिल्ह्यातील रिसोड ते लोणी महा मार्गावरील चाकोली जवळ भरधाव वेगात दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झालाय

या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या अपघातामध्ये ठार झालेल्या तरुणाचे नावं अमोल घोडके असून तो अडोळी येथील रहिवाशी आहे.

अपघातामधील गंभीर जखमींना वाशिमच्या सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून अपघाताचा तपास रिसोड पोलीस करत आहेत.

Latur News: अवैधरित्या चालत असलेल्या स्टोन क्रेशरचा त्रास, सरपंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

लातूर -

अवैधरित्या चालत असलेल्या स्टोन क्रेशरचा यशवंतवाडी गावाला त्रास

सरपंचाचे चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

गावाशेजारील अवैधरीत्या चालत असलेल्या स्टोन क्रेशरमुळे गावात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

तसेच ब्लास्टिंगमुळे गावातील अनेक घरांना तडे देखील गेले आहेत

त्यामुळे तात्काळ स्टोन क्रेशर बंद करावे या मागणीसाठी सरपंच ओम चव्हाण यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे..

Pune News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोअर ग्रुप स्थापन

पुणे -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोअर ग्रुप स्थापन

कोअर ग्रुपमध्ये अजित पवारांसह एकूण सात जणांचा समावेश

कोअर ग्रुपमध्ये छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचाही समावेश

पक्षातील महत्त्वाच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी कोअर ग्रुपचा उद्देश

Nagpur News: 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन,  प्रेमीयुगलानी रक्तदानाचे गिफ्ट देण्याचे आवाहन

नागपूर -

- 'व्हॅलेंटाईन डे' च्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

- शासकीय मेडिकल रुग्णालयाच्यावतीने नागपूरच्या प्रसिद्ध फुटाळा तलाव चौपाटीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले...

- 'व्हॅलेंटाईन डे' निमित्त तरुणाईला रक्तदान करण्याचे आवाहन...बालकर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन

- या रक्तदान शिबिरात शासकीय मेडिकलचे डॉक्टर्स, विद्यार्थी,कर्मचारी सहभागी झाले

- गेल्या 16 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे

- प्रेमी युगुलांनी एकमेकांना महागडे गिफ्ट देण्याऐवजी 'रक्तदानाचं' गिफ्ट देण्याचे मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांचे आवाहन

खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

सुदर्शन घुले ला दोन कोटी खंडणी प्रकरणांमध्ये सीआयडीने ताब्यात घेतले होते त्याला दोन दिवसांची सीआयडी पोलीस कोठडी देण्यात आली होती ती आज संपली आणि सुदर्शन गोलेला आज के च्या जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते यावेळी आरोपीचे वकील अनंत तिडके तर सरकारी वकील जे बी शिंदे यांच्या युक्ती वादा नंतर सुदर्शन घुलेला न्यायालयाकडून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर

उद्याही ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे पाडणार मोठं खिंडार

दुपारी 2.30 वाजता शिंदेंची जाहिर आभार सभा

रत्नागिरीतील चंपक मैदान येथे होणार सभा

याच सभेत ठाकरेंचे शिलेदार करणार शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम करणार प्रवेश

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंडाबाबत प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय

- पूर्ण अभ्यास करूनच नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंडातील कॉंक्रिटीकरण काढण्याबाबत होणार निर्णय

- पूर्ण अभ्यास केल्याशिवाय आणि तज्ञांची मतं जाणून घेतल्याशिवाय रामकुंडातील काँक्रीटीकरण काढलं जाणार नाही

- नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची माहिती

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी यासंदर्भात अभ्यास होण्याची शक्यता

- रामकुंडातील काँक्रीटीकरण काढण्याची गेल्या काही वर्षांपासून गोदाप्रेमींची मागणी

- कॉंक्रिटीकरणामुळे रामकुंडातील जिवंत पाण्याचे झरे बुजल्याचा गोदाप्रेमींचा आहे दावा

 तुळजापूर बसने घेतला अचानक घेतला पेट - 65 प्रवासी थोडक्यात बचावले

प्रवासी बसमध्ये चढ - उतार करण्यासाठी थांबली असताना पेट घेतल्याने जीवीत हानी टळली

बसवकल्याण कडुन तुळजापूर कडे जात होती बस

लोहारा तालुक्यातील खेड शिवारातील लोकमंगल कारखान्याजवळील घटना

बसच्या इंजिनने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालक वाहकाने प्रवाशांना सुखरूप काढले बाहेर

शेजारील लोकमंगल कारखान्याच्या कर्मचाऱ्यांने अग्निशमन गाडीला फोन केल्याने बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आले यश

Chandrapur News:  चंद्रपूरमध्ये घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

चंद्रपूरमध्ये घरफोडी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

घरफोडी करणाऱ्या अंतरराज्यीय टोळीला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अटक केली.

त्यांच्याकडून १ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मानकचंद कुमावत (३५), भूंडाराम कुमावत (३८), गणपत कुमावत (४१) अशी आहेत.

हे तिघेही तेलंगणातील आहेत. पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहे.

Pune News: पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी १७ मार्चला

- पुजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पुढील सुनावणी १७ मार्च रोजी

- ⁠१७ मार्च पर्यंत पुजा खेडकरला अटकेपासुन संरक्षण

- ⁠सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

- ⁠तपासात सहकार्य करण्याचे आदेश

Pune News:  पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच, विश्रांतवाडीत कारच्या काचा फोडल्या

पुणे -

पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

विश्रांतवाडी हद्दीतील धानोरी येथे गाड्यांची तोडफोड

अज्ञात इसमानी पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर दगड मारून तीन वाहनांची काच फोडली आहे.

विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

आरोपीं फरार असून पोलिस आरोपाचा तपास करत आहे

Ahmednagar News: नेवासा येथे हजारो भाविकांनी प्रवरा नदीच्या तिरी आरती करत अनुभवला महाकुंभ पर्वाचा क्षण

अहिल्यानगर -

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे ग्रामदैवत मोहिनीराज महाराजांच्या यात्रोत्सवा निमित्ताने प्रवरा नदीच्या तीरी भव्य दिव्य महाआरती सोहळा संपन्न झाला.

संत महंतांसह हजारो भाविकांनी या सोहळ्याला हजेरी लावली.

महाकुंभ पर्वकाळात झालेल्या या महाआरतीने हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवला.

यावेळी "हर हर महादेव,"गंगा गोदावरी माता की जय", "अमृतवाहिनी प्रवरा माता की जय"च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदूमला होता..

तर दिपोत्सवाने प्रवरामाई उजळून निघाली होती..

Pune News: थकबाकी भरा अन्यथा पाणीकपात अटळ, जलसंपदा विभागाचा पुणे पालिकेला इशारा

पुणे -

थकबाकी भरा अन्यथा पाणीकपात अटळ जलसंपदा विभागाचा पुणे पालिकेला इशारा.

पुण्याचा पाणी प्रश्न यंदाही पेटण्याची चिन्हे

जलसंपदा विरुद्ध महापालिका वाद

पुणे महापालिकेने पाणी वापराबाबतचे ७१४ कोटी रुपयाची थकबाकी येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत भरा अन्यथा पाणी कपातीस तयार रहा जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला दिला इशारा

जलसंपदा विभागाने याबाबतची दुसरी नोटीस पुणे महानगरपालिकेला बजावली आहे,पुण्याचा पाणी प्रश्न ऐन उन्हाळ्यात भेटण्याची चिन्हे आहेत

पाणीपट्टीची महापालिकेकडे ७१४ कोटी रुपयांची थकबाकी

२०२४-२५ ची १७३.८५ कोटी रुपयांची थकबाकी

येत्या २५ फेब्रुवारी पर्यंत थकबाकी जमा न केल्यास त्यां टप्प्याटप्प्याने पुणे शहराचा पाणीपुरवठा कमी करण्यात येणार

Pune News: बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस आधिकारी पुजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

पुणे -

- बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस आधिकारी पुजा खेडकरच्या अटकपुर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

- ⁠सर्वोच्च न्यायालयत होणार सुनावणी

- ⁠पुजा खेडकरच्या विरोधात युपीएससीने गुन्हा दाखल केला आहे

- नावात बदल करुन आयोगाची फसवणूक करणे, बनावट दिव्यांग प्रमाणपत्र यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

- ⁠दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास आहे

- ⁠आधी दिल्लीतील स्थानिक न्यायालयात, त्यानंतर उच्च न्यायालयाने पुजा खेडकरचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला आहे

- ⁠आता पुजा खेडकरची सर्व मदार सर्वोच न्यायालयावर आहे

Mumbai News:  गोरेगाव रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलाचे अपहरण, आरोपीला २४ तासांत अटक

गोरेगाव रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलाचे अपहरण,

आरोपीला २४ तासांत अटक.

पाच वर्षीय मुलाची सुखरूप सुटका

Amravati News:  अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा बैठक

अमरावती -

अमरावतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जिल्हा बैठक संपन्न

शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांचे बैठकीला प्रमुख मार्गदर्शन

शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी केले बैठकीचे आयोजन

दर्यापूर आमदार गजानन लवटे यांची प्रमुख उपस्थिती

अमरावती जिल्हाभरातील पदाधिकाऱ्यांची बैठकीला मोठ्या संख्येने गर्दी

अमरावती जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढावी यासाठी पक्षबांधणीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

बैठकीला जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख, शहरप्रमुख,जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, सर्कल प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, आजी, माजी नगरसेवकांची उपस्थिती

Beed News: सुदर्शन घुलेची खंडणी प्रकरणातील सीआयडी कोठडी आज संपते, कोर्टात हजर केले जाणार

बीड -

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेची खंडणी प्रकरणातील सीआयडी पोलीस कोठडी आज संपत आहे.

सुदर्शन घुलेला 11 वाजता केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार

Dharashiv News: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये प्लाझ्मा, लेझर बीम लाईटच्या वापरास बंदी

धाराशिव -

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास बंदी

नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचना

शिवजयंती महोत्सवामध्ये विविध संघटना पक्ष मंडळ यांच्याकडून शिवजयंती साजरी केली जाते

धाराशिव जिल्ह्यात 17 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान प्लाझ्मा बिम लाईट आणि लेझर बिम लाईटच्या वापरास बंदी

Pune News: पुण्यात लोहियानगरमध्ये पार्किंगमधील वाहनांना लागली आग, 11 दुचाकी जळून खाक

पुण्यात लोहियानगरमध्ये पार्किंगमधील वाहनांना लागली आग

आगीमध्ये अनेक वाहनं जळून खाक

11 दुचाकी जळून खाक

आगीचं कारण अस्पष्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT