ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात मुलाचा मृत्यू झालाय तर आई गंभीर जखमी झाली आहे. मोठ्या संख्येने ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत.
कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील दांगट वस्तीत कोयता हल्ल्याची घटना घडलीय.
एका 30 वर्षीय महिलेवर युवकाने कोयता हल्ला केलाय. तरुणाने हल्ला का केला याचे कारण समजू शकले नाहीये. हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला तात्काळ उपचारासाठी हलवले आहे. जखमी महिलेला कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश घेतला. खुद्द एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुकेश यांनी बंडखोरी करीत वरोरा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली. त्यात ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. पण तरीही त्यांचे जिल्हा प्रमुख पद कायम राहिले होते. आज अचानक त्यांनी मुंबई गाठत थेट पक्ष बदलला. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या त्यांना कोणतेही पद देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मुकेश यांच्या शिवसेना प्रवेशाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. वरोरा - भद्रावती क्षेत्रात त्यांचा राजकीय प्रभाव मोठा आहे.
नवी मुंबईमध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर गोळीबार झालाय. ऐरोली नाका येथे राहत असलेल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली. दरम्यान या गोळीबारात कोणी जखमी नाहिये. घराच्या भींतीवर 2 राउंड फायर केल्याची माहिती मिळालीय. रबाळे पोलीस घटनास्थळी दाखल, अधिक तपास सुरू आहे.
पारोळा शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांनी एक, दोन नव्हे तर तब्बल १५ जणांना चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. तर नगरपालिकेने या मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी यानिमित्त केली जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहर परिसरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. कुत्र्यांनी रस्त्याने वापरणाऱ्या नागरिकांसह काही वाहन धारकांवर हल्ला चढवला. त्यात शहरातील ९ तर ग्रामीण भागातील ६ असे तब्बल १५ नागरिक जखमी झाले आहेत. या हल्ल्यात मोकाट कुत्र्यांनी अनेकांची हाताच्या बोटांचा लचका तोडला तर काहिंच्या मनगटावर, पायांना जबर चावा घेतला आहे.
पुण्यात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनविणे अथवा विसर्जित करण्यावर बंदी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने याबाबत आदेश काढलेत.
भाजीपालांच्या ४ दुकानांना भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तर शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर दोन तासांनी आग नियंत्रण मिळवले. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली. व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचा कांदा, लसूण आगीत खाक. कांदा लसूण ठोक विक्रेत्यांचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे. एका दुकानात वेल्डिंगचे काम सुरू असल्याने दुसऱ्या दुकानाला लागली.
जालन्यात पंचायत समिती कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या सरकारी गोडाऊनला अचानक आग लागली. आगीमध्ये टेबल खुर्च्या आणि जुनी कागदपत्र जळून खाक झाले आहे. घटनास्थळी अग्निशामक दल दाखल, आग वीझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. हे गोडाऊन पंचायत समितीचे आहे की जिल्हा परिषद कार्यालयाचे याची अद्याप माहिती समोर आली नाही.
काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. 28 फेब्रुवारी रोजी हंबर्डे यांचा पक्षप्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा पार पडणार आहे. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर यांचा अपघात. झालाय. दुचाकीने जात असताना एका मालवाहू वाहनाने धडक दिल्याने झाला भीषण अपघात झाला.
अमरावतीच्या तिवसा शहराच्या हद्दीतील वनविभागाच्या जागेवर आनंदवाडी सार्शी रोड येथे आग लागली आहे, दरवर्षीप्रमाणे उन्हाळा सुरू होताच या आगीने रुद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली आहे,या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवयाचे प्रयत्न सुरु असून तिवसा नगर पंचायतची अग्निशमन गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे आग विझवण्याचे काम सुरु आहे, हि आग जंगल परिसरात असल्याने लोकवस्तीला धोका नाही.
- सारंग साठे
- आम्ही अंत्यत जबाबदारपणे स्वतःहून हा शो रद्द केला आहे
- दोन दिवसांपुर्वीच हा शो रद्द करण्याचा निर्णय आम्ही जाहीर केला होता
- तरीही आज पुन्हा हा विषय परत का काढला जातोय हे कळत नाही
- आम्ही पुर्नविचार करुन पुन्हा नवा शो नव्याने आणु
- या विषयावर आमची अमेय खोपकर यांच्याशी चर्चा झाली होती. आम्ही त्यांना सर्व माहीती दिली आहे. आमची भुमिका त्यांना सांगितली.
एकनाथ शिंदे आणि राजन साळवी यांचा एकाच कारमधून प्रवास
शिंदेच्या घरी सुरू असलेली बैठक संपली
आनंदाश्रमामध्ये एकनाथ शिंदे आणि राजन साळवी दाखल
अहिल्यानगर -
आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आणि शहर लेखा व्यवस्थापक विजय रणदिवे या दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी..
पोलिसांनी आज दोघांनाही जिल्हा सत्र न्यायालयात केले होते हजर..
कोतवाली पोलीस ठाण्यात 16 लाख 50 हजार रुपयांच्या अफरातफर केल्या बद्दल झाला गुन्हा दाखल..
महापालिका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल..
आरोग्य अधिकारी अनिल बोरगे यांनी रात्री पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा केला होता प्रयत्न..
मात्र पोलिसांनी आशा टॉकीज चौकातच तत्काळ घेतले ताब्यात...
कांजूरमार्ग मधील डम्पिंग ग्राउंड मधील असलेल्या खुल्या मैदानातील कचऱ्याला लागली भीषण आग .
सुमारे दोन वाजेच्या सुमारास आग लागली.
धुराचे लोट विक्रोळी, कांजूरमार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले.
घटनास्थळी अग्निशामन दलाच्या दोन गाड्या दाखल व आगीवर नियंत्रण देखील आता अग्निशमन दलाने मिळवले आहे.
ही आग कशी लागली याची अद्याप माहिती समोर आली नसून पोलीस व अग्निशमन दल याचा तपास करत आहेत
नागपूर-
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात एका वाहनाचे अपघात होऊन त्यामध्ये तीन किलो अफू आढळून आली आहे
स्विफ्ट कार मध्ये राजस्थान मधून चेन्नईचे दिशेने सहा जण प्रवास करत असताना सकाळी स्विफ्ट कार नियंत्रित होऊन अपघातग्रस्त झाली
या अपघातात एक पुरुष प्रवासी मृत झाला असून इतर जखमी आहे
जेव्हा अपघातग्रस्त कारची पोलिसांनी तपासणी केली तेव्हा त्यामध्ये अफू आढळून आली आहे
पोलिसांनी संबंधित कार आणि अमली पदार्थ जप्त केले असून पुढील चौकशी सुरू आहे
दौंड -
वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा दौंड मधील सर्व पक्षाकडून जाहीर निषेध
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर यांचा दौंड शहरातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला
यावेळी राहुल सोलापूरकर यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले तसेच राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा
मुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवुन देण्याची प्रशिक्षणार्थी यांची मागणी
प्रशिक्षणार्थीचा सहा महीन्याचा कालावधी संपत आल्याने तो कालावधी वाढवण्यात यावा
जिल्ह्यातील 4500 प्रशिक्षणार्थी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असुन याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करुन प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी यांनी केलीय.
दरम्यान आपल्या मागण्याचे फलक हातामध्ये घेवुन प्रशिक्षणार्थी या मुक मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
नवी मुंबई -
माजी आमदार राजन साळवी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाण्याकडे रवाना.
वाशी येथील सिडको एक्सिबिशन येथून राजन साळवी कार्यकर्त्यांसह रवाना.
अनेक खाजगी बस आणि वाहनाने कार्यकर्ते रवाना.
राजन साळवी यांचं मोठं शक्ती प्रदर्शन, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.
ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राजन साळवी करणार शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश.
बीडच्या परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे तेरा लाख रुपयांचा गुटखा पकडला
पोलीस दलाच्या संवाद प्रकल्पांतर्गत क्यू आर कोडवर आली होती गोपनीय माहिती
माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई
क्यू आर कोड स्कॅन करून सर्वसामान्य नागरिक ही अवैध धंद्या विषयी देऊ शकणार माहिती
धाराशिव -
तुळजापूर शहराजवळील हंगरगा पाटी येथील कुलस्वामिनी सुत गिरणीला ला लागली आग
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट - आगीत मोठ्या प्रमाणावर साहीत्य जळुन खाक झाल्याची माहिती
अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आणली आटोक्यात तर कोणीतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती
पुण्यातील शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं शिवजयंतीला लोकार्पण होणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार,संस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण सोहळा
पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरात बनत असलेल्या शिवसृष्टीतील कामाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे
पहिल्या टप्प्याचं उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला होता त्यानंतर आता दुसरा टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे
एकूण चार टप्प्यात पुण्यातील शिवसृष्टीचं काम होणार आहे.यासाठी जवळपास 400 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे
पुणे -
- मोबस हॅाटेल कंपाउंड येथील सरकारी जागेचा वाद
- जागेच्या बेकायदेशीर व्यवहारा विरोधात आणि व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी आंदोलक करणाऱ्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात
- पुर्नवसानाच्या मागणीसाठी आंदोलन करणार्या व्यवसायिकांनाही घेतले ताब्यात
- आंदोलन मोडीत काढत पोलीसांकडुन जागेचा ताबा पुणे शहर तहसीलदारांकडे
गावठाण हद्दवाढ़ व्हावी या मागणीसाठी 7 दिवसापासून ग्रामस्थांनचे अमरण उपोषण
ग्रामस्थांची प्रकृती चिंताजनक..जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या मतदारसंघातील आंदोलन
बदलापूर रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड
कर्जत आणि मुंबई दिशेकडेल लोकल वाहतूक 25 ते 30 मिनिटे उशिराने
कर्जतकडे जात होती मालगाडी
अर्ध्या तासानंतर मालगाडी कर्जतच्या दिशेने रवाना
हिंगोली -
केंद्र शासनाच्या सीसीआय केंद्राकडून कापूस खरेदीला ब्रेक
सर्वर मध्ये तांत्रिक अडचण आल्याने मागील तीन दिवसांपासून कापूस खरेदी बंद
सोमवार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या कापसाच्या गाड्या सीसीआय केंद्रांवर उभ्याच राहणार
-नांदेड जिल्ह्यात सध्या गुलाब फुलांना मोठी मागणी वाढली असून गुलाब फुलांना चांगला दर मिळत असल्याने गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर गुलाब फुलांना मोठी मागणी वाढली आहे.फुल बाजारात शिर्डी गुलाब आणि डज गुलाबाला मोठी मागणी वाढलीय.गुलाबाला सध्या फुल बाजारात 110 ते 130 रूपये किलो दर मिळत असल्याने गुलाब उत्पादक शेतक-यांनी समाधान व्यक्त केलय.
सर्वर मध्ये तांत्रिक अडचण आल्याने मागील तीन दिवसांपासून कापूस खरेदी बंद
सोमवार पर्यंत शेतकऱ्यांनी कापूस भरून आणलेल्या कापसाच्या गाड्या सीसीआय केंद्रांवर उभ्याच राहणार
शिरवळ एमआयडीसी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११:१० वाजता जुन्या वादातून २२ वर्षीय अमर शांताराम कोंढाळकर याची निर्घृण हत्या करण्यात आली. तेजस महेंद्र निगडे (वय १९) याच्यावर हत्या करण्याचा आरोप असून त्याने पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. शिरवळ परिसरात तणावाचे वातावरण आहे.
अकोला-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरिल वाशिमच्या तोंडगाव टोल प्लाझाजवळ एका ट्रकने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
विश्रांतवाडी हद्दीतील धानोरी येथे गाड्यांची तोडफोड
अज्ञात इसमानी पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर दगड मारून तीन वाहनांची काच फोडली आहे.
विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
आरोपीं फरार असून पोलिस आरोपाचा तपास करत आहे
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या बावधनमध्ये एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल पोलीस आयुक्तालयात प्राप्त झाला आहे.
यामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल मध्ये एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल झाले आहेत.
पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे.
असे फेक मेल नेहमीच प्राप्त होतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
बीड -
- खंडणी प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार.
- खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने आज घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
- केज येथील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
पुणे -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात आज अभाविपचा महा आक्रोश मोर्चा
मोर्चाला पुणे,अहील्यानगर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थितीत राहणार
६१ प्रकारच्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार...
नाशिक -
- कानपुरमधील भोंदू बाबाला नाशिकच्या ग्राहक न्यायालयाचा दणका
- पीडित महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी ठोठावला दंड
- ग्राहक न्यायालयाच्या निर्णयाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून स्वागत
- सिडकोतील महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी घेतली होती भोंदूबाबाची मदत
- कानपुरमधील ग्राम करोली येथील लवकुश आश्रमाचे संतोष अजिंग भदोरियाला ग्राहक न्यायालयाने दिला दणका
- भूतबाधा दूर करण्यासाठी पीडित महिलेकडून अडीच लाखांची रक्कम घेत ऑनलाईन केली होती पूजा
- ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चा आधार घेऊन महिलेने घेतली होती ग्राहक न्यायालयात धाव
रत्नागिरी - माजी आमदार राजन साळवी उद्धव ठाकरेंना करणार जय महाराष्ट्र
दुपारी 3 वाजता ठाण्यात होणार राजन साळवी यांचा पक्ष प्रवेश
राजन साळवी यांच्या राजीनाम्यानंतर रत्नागिरीतील पदाधिका-यांनी देखील दिले राजीनामे
रत्नागिरीत पदाधिका-यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का..
बुलडाणा जिल्ह्यात १४ महिन्यात एसीबीच्या १८ कारवाईत २५ आरोपी जाळ्यात
सर्वाधिक लाचखोर आढळले महसूल आणि नगर प्रशासन विभागात.
बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उप अधीक्षक पदी शितल घोगरे रुजू झाल्यापासून त्यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहेत
डिसेंबर २०२३ ते आजपर्यंत या १४ महिन्याच्या कालावधीमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे आलेल्या तक्रारीनुसार १८ सापळे यशस्वी करण्यात आले आहेत
या कारवाईमध्ये २५ शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे
यापैकी सर्वाधिक लाचखोर कर्मचारी हे महसूल आणि नगर प्रशासनात आढळले असल्याचं समोर आल आहे...
रत्नागिरी - राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशापाठोपाठ आता ठाकरे गटाला रत्नागिरीत धक्का सत्र सुरुच
राजन साळवीं पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील दिले राजीनामे
राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने युवा निरीक्षकांचा राजीनामा
राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश याने देखील दिला युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा
राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांचा सुद्धा उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
पक्षप्रवेशासाठी राजन साळवी यांचा कुटुंब त्यांच्यासोबत
राजन साळवी यांच्यासोबत त्यांचे बंधू संजय साळवी पुतण्या दुर्गेश साळवी , मुलगा अथर्व साळवी हे देखील करणार शिवसेनेत प्रवेश
पंढरपूर -
- उन्हाळाच्या तोंडावर लिंबाचे भाव वाढले; आवक कमी झाल्याने दरवाढ
- फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.
- तापनात देखील वाढ होऊ लागली आहे. अशातच आता लिंबाचे दर वाढले आहेत. त्यातच लिंबाची आवक कमी झाल्याने दर काही प्रमाणात वाढले आहेत.
- एरवी किरकोळ बाजारात दोन रुपयांनाा मिळणारे लिंबू आता सात ते दहा रुपयांना विकले जात आहे.
अमरावती -
- जन्मदाखला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे प्रकरण
- अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथे आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
- मालेगाव, अकोलानंतर अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथे गुन्हा
- आठ जणांची चौकशी अंती खात्री पटल्याने गुन्हे दाखल
- जन्म दाखल्यासाठी बनावट कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फसवणुकीचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
हर्षवर्धन जाधव पुढची निवडणूक लढवणार
संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा मी निवडणूक लढवणार आणि राजकारणाच्या मैदानात येणार असल्याचे सांगितले आहे.
सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय.
हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर यापूढे विधानसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.
कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विभक्त पत्नी संजना जाधव यांनी त्यांचा पराभव करून आमदार झाल्या आहेत.
मात्र आता 2029 ची निवडणूक मी लढणार मतदारसंघाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक लढावी लागणार असल्याचे सांगितले.
नाशिक -
- बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉलेज रोड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
- टवाळखोरी आणि उपद्रव करणाऱ्या ६९ टवाळखोरांना पोलिसांकडून दंडुक्याचा प्रसाद
- बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांच्या टवाळखोरी विरोधी पथकाची कारवाई
- टवाळखोरांवर कारवाई करण्याबरोबरच रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई
- स्टॉप अँड सर्च मोहिमेत ११२, ट्रिपल सीट १३, विना कागदपत्रं ६ आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या ४ जणांकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल
कोल्हापूर - गर्भलिंग निदान करणाऱ्या दवाखान्यावर कळंब्यात छापा
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने टाकला छापा
डॉक्टर दिपाली ताईगडे ताब्यात
तर वरणगे पाडळीत गर्भवताच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोघी ताब्यात
रोख रकमेसह गर्भवताच्या गोळ्यांचे 5 पाकीट केली जप्त
नागपूर -
- हैदराबाद येथून दागिने रोख रक्कम आणि विदेशी चलन चोरी करून पळ काढणाऱ्या तिघांना नागपुरात अटक
- रेल्वे सुरक्षादल आणि गुन्हे शाखेने तेलंगणा एक्सप्रेस मध्ये आरोपींना काटोल रेल्वे स्थानकावर अटक करून 1 कोटी 55 लाख 18 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय..
- शील मुखिया, मलहू सोनाय, बसंती आर्या अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत..
- 11 फेब्रुवारी रोजी आरोपी चोरी करून तेलंगणा एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाला दिली होती..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.