धायरी सिंहगड रस्ता परिसरातील वाढत्या गुन्हेगारीची पायामुळे उखडून, नागरिकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी नांदेड सिटी पोलिसांनी सुरू केलेल्या निर्भय नागरिक अभियानात धायरी परिसरात पोलिसांची धडक मोहीम
मुंबईतील जुहू लोटस आय हॉस्पिटलसमोर असलेल्या गॉड गिफ्ट वसाहतीतील घटना
वसाहतीमध्ये असलेल्या परप्रांतीय पांड्ये नावाच्या तीन मुलींकडून मराठी माणसाला शिवीगाळ आणि मारहाण
शिवीगाळ आणि मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
डिंपल पांडे आणि तिच्या दोन बहिणींकडून शेजाऱ्यांना नेहमीच त्रास
त्या तिघांविरोधात जुहू पोलीस ठाण्यात तक्रारी
पोलीस कसलीच कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा आरोप
काँग्रेसचे प्रवक्ते हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या मढी येथे मुस्लिम व्यापाऱ्यांची भेट घेतली.
मढी ग्रामसभेत कानिफनाथ यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव घेण्यात आला होता त्यावरून चांगलाच वाद पेटला होता.
याच पार्श्वभूमीवर सपकाळ यांच्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून रात्री १२ वाजता रस्त्यावर येऊन वाढदिवस साजरी करण्याची पद्धत जोर धरू लागली आहे.
रात्री १२ वाजता एखाद्याच्या वाढदिवस असेल तर मोठ्या प्रमाणावर टोळक्यांकडून फटाके फोडून, मोठ्याने साउंड लावून धिंगाणा घालत वाढदिवस साजरी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यावरच आता थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड दम आणि असे कृत्य करणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालीमार येथे आंदोलन
भय्याजी जोशी वर गुन्हा दाखल करून कारवाई करावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक
काळे झेंडे दाखवत सुरू आहे निषेध, भैय्या जोशींच्या प्रतिमेस जोडे मारत केलं आंदोलन
दत्ता गाडेचा मोबाईल शोधण्यासाठी पुणे पोलीसांचे पथक आरोपीसह ऊसाच्या शेतात जाणार आहेत. पुणे पोलिसांची क्राइम ब्रांच गुनाट गावी जाणार असून, दत्ता गाडेच्या मोबाईलचा शोध घेतला जाणार आहे. गाडेच्या मोबाईलमधून अनेक महत्त्वाचे पुरावे हाती येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
नाशिकच्या येवला शहरातील शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिका-यांनी येवला तहसिल कार्यालयावर धडकत आंदोलन केले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, कांद्यावरिल निर्यात शुल्क ताबडतोब रद्द करावे, सोयाबीनला योग्य दर मिळावा,शेतक-यांची कर्जमाफी ताबडतोब करावी अशा विविध मागण्यांसाठी शिवसेनेने आंदोलन करत मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला.
जळगावजामोद तालुका शिवसेनेच्या वतीने भैय्याजी जोशी यांनी मुंबईमध्ये मराठी भाषा ही अनिवार्य नाही त्या वक्तव्याचा जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले..
यावेळी भैयताजी जोशीच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आले...
शासनाने भैय्याजी जोशींनी मराठी भाषे व मराठी माणसांचा अपमान केल्याबद्दल त्यांचे विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली
निर्णय जनतेच्या हिताचा असेल तर स्वागत करेल अन्यथा मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत जायची वेळ आली तरी जाऊ
बाबा आढावांचा सरकारला इशारा
पुण्यात प्रवासी व मालवाहतूकदार संघटनानि केलं आंदोलन
बाबा आढाव यांच्या नेतृत्वात पार पडल आंदोलन
पुण्यातील आरटीओ कार्यालयाबाहेर रीक्षा संघटनांचे आंदोलन
वाहनांचा नंबर प्लेट बदलताना नियम पाळले जात नसल्याचा आरोप
बाबा आढाव यांच्याकडून RTO अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं
आम्ही रस्त्यावरची माणस आहोत निर्णय चांगला असेल तर स्वागत करू आणि निर्णय सर्वांच्या तोट्याचा असेल तर मुख्यमंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जाऊन आंदोलन करू
बाबा आढाव नंबर प्लेट संदर्भात आक्रमक
सुरेश धस पण आकाच निघाले..
म्हणजे धनंजय मुंडे यांचे नेतृत्व कायमस्वरूपी बीडमधून संपवून स्वतःचे वर्चस्व यापुढे टिकवून ठेवण्यासाठी त्यांची लढाई होती
संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणे हे फक्त त्यांच्यासाठी निमित्तमात्र होते.
तृप्ती देसाई यांचा सुरेश धस यांच्यावर जोरदार निशाणा.
पुण्यातील रमणबाग चौकात शिवसैनिकांचे आंदोलन
"मुंबईत येणाऱ्या व्यक्तीनं मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही", असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी केलं होतं वक्तव्य
या वक्तव्याचा निषेध म्हणून आज शिवसैनिकांचे आंदोलन
अण्णा जोशी यांचा पुतळा याला जोडे मारले
भैय्याजी जोशी यांनी माफी मागायला हवी विधानसभेत या संदर्भातील ठराव मंजूर करून घेतला पाहिजे.संजय राऊत
भुजबळ जातीय विष पेरून अजित पवार सरकारला अडचणीत आणतात. तुझं वय काय झालं? बोलतो काय? चुकलं त्याला सजा झाली पाहजे.मनोज जरांगे पाटील
शिरवळ पोलिसांनी उच्चभ्रू सोसायटीतील गोडाऊनवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला आहे.
छाप्यात गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणारी अत्याधुनिक यंत्रसामग्रीही आढळली आहे. पोलिसांनी 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल, गुटखा बनवायचे मशीन, साहित्य आणि 4.5 लाखांचे वाहन जप्त केले.
ही कारवाई तब्बल 12 ते 15 तास चालली, ज्यात 4 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी या अवैध उद्योगाच्या मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू केला आहे.
महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
शिरवळ पोलीस आणि अन्न-औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विशेष भूमिका बजावली. स्थानिक नागरिकांनी या कठोर कारवाईचे स्वागत केले आहे.
नाशिकच्या चांदवड मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत दरम्यान कार्तिकेश्वर कॉलनीमध्ये पहाटेच्या सुमारास चोरटे रेकी करत असताना निदर्शनात आले मात्र यावेळी चोरीचा प्रयत्न असफल झाल्यानंतर चोरट्यानी तिथून पळ काढला ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहून आपल्या घराला सीसीटीव्ही बसून घ्यावे असे आव्हान चांदवड पोलिसांनी केले आहे..
तुळजाभवानी मंदीराचे पावित्र्य जपण्यासाठी भाविकांनी तोकडे कपडे घालुन येवु नये दर्शनासाठी शॉर्ट पॅन्ट घालुन येण बरोबर नाही कुर्ता पॅन्ट घाला, साधा पॅन्ट शर्ट घाला भावना पाहुन आल पाहीजे. त्यामुळे सर्वांनी पावित्र्य जपले पाहीजे इथे बरमुडा घालुन येण बरोबर नाही, हे काय मॉर्निंग वॉकची जागा नाही अस संभाजीराजे छत्रपती म्हणाले. दरम्यान तुळजाभवानी मंदीरात भाविकांसाठी ड्रेस कोड लागु करण्याची मागणी पुजारी मंडळाच्या वतीने देखील यापुर्वीच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थांनी बँक गॅरंटी च्या नावाखाली कर्मचाऱ्याकडून घेतलेल्या पैशावर छत्रपती संभाजी महाराजांची नाराजी
पैसे कशाला घेतात ?तुम्हाला योग्य वाटत नव्हतं तर नोकरीवरच घ्यायचं नाही - संभाजी महाराज
तुळजाभवानी मंदिरातील 39 कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयाने 78 लाखाची संस्थांनकडून सक्तीने वसुली, तर इतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होत आहेत पैसे
तुळजाभवानी मंदिर संस्थांचा तुघलखी कारभाराची साम टिव्हीने दाखवली होती बातमी
भंगार वेचक महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास वाशी पोलीसांनी मोठ्या शिताफिने अटक केलेय.
पीडित महिलेच्या मदतीने आरोपीचे रेखाचित्र काढून त्याचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दाखल एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अटक आरोपीचा चेहरा रेखाचित्राशी जुळत असल्याची माहिती वाशी पोलीसांना मिळाली.
याप्रकरणी पीडित महिलेने आरोपीला ओळखले असता वाशी पोलिसांनी आरोपी सलीम याचा ताबा घेत अधिक चौकशी केली.
याप्रकरणी आरोपीला मदत करणारी एक महिला सह आरोपी अद्याप फरार असून तिचाही शोध पोलीस घेत आहेत.
नेरुळ विभागात डिझेल चोरीच्या घटनामध्ये वाढ होतेय. जुईनगर रेल्वे स्थानकासमोर सायन पनवेल महामार्गावर सिमेंट बल्कर मधून डिझेल चोरीची घटना घडलेय.
3 चोरट्यांनी सिमेंट बल्करच्या डिझेल टॅंकचे कुलूप तोडून नळीच्या सहाय्याने 200 लिटर डिझेलची चोरी केलेय.
याप्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात तीन चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिलानी शेख या आरोपीला नेरुळ पोलिसांनी अटक केलेय.
याप्रकरणी दोन आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी येथील ढाकणे पिता पुत्राला सतीश भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी मारहाण केल्याची घटना 19 फेब्रुवारी रोजी घडली होती.
या प्रकरणात आता शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय..
या प्रकरणात सतीश भोसले आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याने ढाकणे कुटुंब प्रचंड दहशतीखाली असून आम्हाला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
महाड तालुक्यातील शेल, भोगावमधील ग्रामस्थांना सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे.
गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून या गावाला पुरेसं पाणी मिळत नाही गावच्या शेजारी असणारी विहीर जवळपास कोरडी पडली आहे.
त्यामुळे पाण्यासाठी गावातील महिलांना वणवण करावी लागते आहे. घरातील कामं आणि मुलांचा अभ्यास सोडून महिलांना पाण्यासाठी फिराव लागत आहे.
या गावाला पूर्वी नळाने पुरवठा केला जात होता मात्र मागील दहा वर्षापासून ही योजना बंद पडली आहे.
गावासाठी नव्याने जलजीवन योजना राबवणत आली आहे मात्र तिचं काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे शेल, भोगाव या गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.
पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
भंडाऱ्यात एका वकिलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला व बार असोसिएशन च्या वतीने आरोपी वकिलाला समर्थन देण्यात आले.
मात्र भंडाऱ्यात दलित संघटनाच्या माध्यमातून वकिलांसह जिल्हा सत्र न्यायालय भंडारासमोर बार असोसिएशन व नराधम वकिलाच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपी नराधम वकिलास बार असोसिएशन मधून निष्कषित करावे, वकिलाला जमानत होऊ नये आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशा मागण्यांना घेऊन घोषणाबाजी करत बार च्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
रात्री पासुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरु
आगीसह धुराचे लोट उलटल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे
मारुती इंडस्टियल इस्टेट कपंनी लागली आग
आगीत कंपनीचे मोठे नुकसान..
चाकण राजगुरुनगर नगरपरिषद, खेड सिटी, आग्निशामक दलाचे चार गाड्या घटनास्थळी दाखल
कारमधून 147 किलो गांजासह 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पंढरपूरच्या भटुंबरे गावाच्या अहिल्यादेवी चौकात करण्यात आली.
याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील तिघांविरोधात पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
अंबरनाथ तालुक्यातील आडीवली ढोकळी गावात फर्जाना शिरागुल शेख ही ३६ वर्षीय महिला वास्तव्याला होती.
२३ वर्षांपूर्वी बेकादेशीरपणे भारतात प्रवेश करून ताहीर मुनीर अहमद खान यांच्यासोबत ती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. तर बीथी उर्फ प्रिया नूर इस्लाम अख्तर ही २४ वर्षीय तरुणी मागील एक वर्षांपासून बेकादेशीरपणे भारतात वास्तव्याला होती.
ती सुद्धा आडीवली ढोकळी परिसरात गणेश चंद्र दास याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेने या दोन बांग्लादेशी महिलांसह त्यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून बांगलादेशींना आश्रय देणाऱ्या दोन पुरुषांनाही बेड्या ठोकल्या.
या सर्वांविरोधात पारपत्र अधिनियम, विदेशी व्यक्ती अधिनियम यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्या 8 मार्च रोजी बीड जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना पदयात्रा काढली जाणार आहे.
आज बीड जिल्ह्या या यात्रेचे आगमन आज होणार असून दुपारी 4 वा ही यात्रा नारायण गडावर दाखल होणार आहे.
नारायण गडाचे दर्शन घेतल्यानंतर ही यात्रा शिरूर कासार येथील शांतीवन - आर्वी या ठिकाणी मुक्कामी असेल.
उद्या सकाळी 8 वा ही यात्रा मसाजोग येथे पोचणार असून सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे भेट घेऊन या पदयात्रेला सुरुवात होईल.
9 तारखेला ही पदयात्रा बीड शहरात पोचणार आहे. यावेळी महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून सद्भावना सभेने यात्रेचा समारोप केला जाईल.
या सदभावना यात्रेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ असणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.