Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Dasara Melava Live Update : नारायण गडावरील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील बारा वाजता संबोधित करणार

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरूवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५, दसरा उत्सव, उद्धव ठाकरे आणि शिंदेंचा मुंबईत दसरा मेळावा; पंकजा मुंडे मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Maharashtra Dasara Melava Live Update : नारायण गडावरील दसरा मेळाव्याला मनोज जरांगे पाटील बारा वाजता संबोधित करणार

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आणि उपस्थितीमध्ये आज नारायणगडावर दसरा मेळावा होत आहे मनोज जरांगे पाटील ठीक बारा वाजता नारायणगडावरून समाज बांधवांना संबोधित करणार असल्याची माहिती गडाचे महंत शिवाजी महाराजांनी दिली आहे नारायण गड हा सर्व समाजाचा गड असून वाईट विचारांचे दहन करून चांगले विचार सोबत घेऊन आज गडावरून जायचं आहे त्याचबरोबर सर्व समाज बांधवांनी सामाजिक सलोखा राखला पाहिजे असेही आवाहन नारायण गडावरून महंत शिवाजी महाराजांनी केले आहे

Maharashtra Dasara 2025 : झेंडूचे दर घसरले, किंमत प्रति किलो ५० रूपये

नाशिकमध्ये ५०० टनांपैकी निम्मी फुले सडली. स्थानिक बाजारात पावसाच्या फटक्याने झेंडूचे दर घसरून किलोला ४० ते ५० रुपयांपर्यंत घसरले. नवरात्र आणि दसऱ्यासाठी झेंडूची फुलं ही भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाची ठरतात. राज्यातील झेंडूचा बाजार नाशिक आणि पुण्यावर अवलंबून आहे. मात्र परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुले सडल्याने झेंडू सडू लागला आहे. त्यामुळे यंदा झेंडूचे दर ४० ते ५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ४ किलो फुलांच्या क्रेटचा दर १५० ते २०० रुपये इतका झालाय. नाशिकमध्ये ५०० टन झेंडू होतो. त्यातील निम्मा स्थानिक तर निम्मा बाहेरील बाजारात जातो. मात्र पावसाचे पाणी झेंडूच्या बागांत साचल्याने मोठे नुकसान होत आहे. नाशिकमधून मुंबई, सुरत, बडोदा, इंदूर, उज्जैन, भोपाळला जाणारी २५० टन फुले ओली झाल्याने स्थानिक पातळीवरच त्यांची विक्री करावी लागत आहे.

सावरगाव घाट दसरा मेळावा, बहिण-भाऊ एकत्र येणार? | Pankaja Munde - Dhananjay Munde

WASHIM : वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीचा फटका...खरीप हंगामातील ७९३ गावांची पैसेवारी सरासरी ४७

वाशिम जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. या परिस्थितीचे प्रतिबिंब हंगामी पैसेवारीत उमटले असून, सन २०२५-२६ या वर्षातील खरीप हंगामातील ७९३ गावांची सरासरी पैसेवारी ४७ अशी जाहीर झाली आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पाच ते सहा वेळा अतिवृष्टी, तसेच संततधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

खरीप हंगामातील पीकस्थितीचे वास्तव अधोरेखित करण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांत पैसेवारी जाहीर केली जाते. त्यानुसार ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या पहिल्या पैसेवारीत जिल्ह्यातील सर्व ७९३ गावांची पैसेवारी ५० च्या आत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pune Weather Today :  पहिल्याच दिवशी ऑक्टोबर हीट; पुण्यातील दापोडी मध्ये पारा ३३ अंशांवर

पुणे शहरासह उपनगरांत बुधवारी दिवसभर आकाश निरभ्र आणि ऊन पडले होते

महिन्याच्या पहिल्याच दिवशी उन्हाच्या चटक्याने ऑक्टोबर हीटची चाहूल लागली

पहिल्याच दिवशी दापोडीत सर्वाधिक ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अन्यत्र २९ ते ३२ अंश सेल्सिअस नोंद झाली

गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर ओसरला आणि हवामानात बदल झाला. बुधवारी सकाळपासून आकाश निरभ्र आणि सूर्यनारायणाने दर्शन दिल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला

दिवसभराच्या उन्हामुळे हलका चटका जाणवू लागला

पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात आकाश सामान्यतः ढगाळ राहील, तर हलक्या ते अतिहलक्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

संघाची शताब्दी, RSS संघाचा दसरा मेळावा | RSS Dasara Melava 2025

Maharashtra Dasara Melava Live  हजारो वर्षाची परंपरा,तुळजाभवानीच्या सिमोल्लंघनासठी नगरहुन येथे मानाची पलंग पालखी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सिमोल्लंघनासाठी गेली हजारो वर्षांपासून नगरहुन मानाची पलंग पालखी येत असते.तुळजाभवानी मातेचे माहेर असलेल्या नगरहुन पलंग पालखीचा मान हा भगत कुटुंबीयांना आहे.त्यांची ३० वी पिढी आज ही मोठ्या भक्तिभावाने देवीची सेवा करतात याच पालखीचे देवीची मंदीराभोवती मिरवणूक काढली जाते.

Maharashtra Live : तुळजाभवानी मंदिरात पोलीस व सुरक्षा कर्मचारी यांच्यात तुफान गोंधळ व हाणामारी

देवीची पालखी ठेवण्याच्या पिंपळा कट्ट्या बाजूला थांबण्यावरून वाद

पोलिसांनी बीव्हीजी कर्मचाऱ्याला हटवले असता बीव्हीजी कर्मचाऱ्यांनी केला विरोध

देवीची मिरवणूक चालू असताना गोंधळ

बीव्हीजी चे कर्मचारी अनेक जण मद्यधुंद अवस्थेत असल्याचा भाविकांच्या ही तक्रारी

भाविकांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या पोलीस व बीव्हीजी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षारक्षकांमध्येच हाणामारी झाल्याने मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आज देवीचा सिमोल्लंघन सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक तुळजापुरात झाले होते दाखल

त्याच हजारो भाविकासमोर गोंधळ झाल्याने मंदिर प्रशासनावर टीकेची नामुष्की

RSS Dasara Melava Live Update : सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार? 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शतकीय विजयादशमी आणि शस्त्रपूजन सोहळा नागपूरच्या रेशीमबाग मैदानात होत आहे. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलतात, याकडे संपूर्ण देशातच लक्ष लागलेलं असतं. आज मुख्य मंचावर असलेला बॅक ड्रॉप हा लक्ष वेधून घेत आहे...आज वसुदेव कुटुम्बकम असा घोष केला जातोय.. बॅक ड्रॉप मध्ये असलेले "संघ के चरण बढ रहे है" मागे असलेले पृथ्वीच चिन्ह आहे.... यावर सरसंघचालक बोलतील असं बोललं जातं...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऐतिहासिक विजयादशमी सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे राहणार आहे. यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उभा करून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित असतील. संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दुतावासांनाही निमंत्रण दिले आहे.

सोहळ्यासाठी संघाच्या देश आणि विदेशात असलेल्या विविध संस्थांचे प्रमुख यावर्षी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या सोहळ्याला एक वेगळे महत्त्व आहे. तसेच उद्योग, चित्रपट अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांची यावर्षीच्या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे. शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता बैठकीची विशेष व्यवस्था करण्यात आली

Gandhi Jayanti : सेवाग्राम आश्रमात रामधूनने गांधी जयंतीला सुरवात

सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त सकाळी ५.४५ वाजता रामधून गाण्यात आलीय.ही रामधून नई तालीम येथील घंटाघर पासून तर बापू कुटी पर्यंत होती. यात आश्रमतील गांधींवाद्याचा समावेश होता.त्यानंतर बापूकुटी परिसरात प्रार्थना करण्यात आलीय.गांधींवाद्यानी सकाळी ६.३५ ते ७.३० यावेळेत सामूहिक श्रमदान केले.आज महात्मा गांधी यांची जयंती असल्याने आश्रमात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे.

Dasara 2025 Live update : साईबाबा पुण्यतिथी आणि दसरा उत्सवाचा आज मुख्य दिवस.. आज साईमंदिर राहणार रात्रभर दर्शनासाठी खुले

शिर्डीत साईबाबांच्या 107 व्या पुण्यतिथी उत्सवाचा मुख्य दिवस असून या उत्सवाचा मोठा उत्साह बघायला मिळतोय.. उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज साईमंदिर भक्तांना दर्शनासाठी राहणार रात्रभर खुले राहणार आहे.. साईभक्त मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले असून साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली आहे.. थोड्यावेळाने शिर्डीत भिक्षा झोळीचा कार्यक्रम संपन्न होणार असून साई संस्थानचे अधिकारी, साईभक्त आणि शिर्डी ग्रामस्थ या सोहळ्यात सहभागी होतील.. साईं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

Pankja munde dasara melava Live : बीडच्या सावरगाव घाट मध्ये भगवान भक्ती गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा आज दसरा मेळावा

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी भगवानगडावर सुरू केलेला दसरा मेळावा कालांतराने या मेळाव्याचे सूत्र पंकजा मुंडे यांच्याकडे आली आज रोजी बीडच्या सावरगाव घाट राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जन्मभूमी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली 10 वा दसरा मेळावा होत आहे गतवर्षी याच मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर आले होते तर लक्ष्मण हाके देखील या मेळाव्यास उपस्थित राहिले होते मात्र या वेळेच्या मेळाव्यास दोन्ही बहिण भाऊ एकत्र येतात का याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले असून सावरगाव घाट येथील मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलतात याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे

दसरा सणानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमीच्या निमित्ताने पंढरपूर येथील श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सजावटी मुळे देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे‌.

देवाचे प्रवेशद्वार,चौखांबी,सोळखंबी संत नामदेव पायरी,सभा मंडप आदी ठिकाणी झेंडू, अष्टर, शेवंती, गुलाब, ॲार्कीड, अॅांथोरियम, सुर्यफूल, ब्लु डेजी, पिंक डेजी, कमिनी, अशोकाची पाने, जिप्सो, मनीप्लांट, ड्रेसिना. इत्यादी फुलांचा व पानांचा वापर केला आहे. ही सजावट पुणे येथील भाविक राम जांभूळकर यांनी केली आहे

Maharashtra Live News Update : राज्यात आज ५ दसरा मेळावे! ठाकरे-शिंदेंच्या भाषणांकडे सर्वांच्या नजरा; जरांगे काय बोलणार?

महाराष्ट्रात आज पाच दसरा मेळावे होणार आहेत. संघाचा दसरा मेळावा नागपूरमध्ये होणार आहे. संघाला १०० वर्षे पुर्ण झाली आहेत, भाषणात मोहन भागवत काय बोलणार? याची उत्सुकता लागली. पंकजा मुंबई आणि मनोज जरांगे पाटील यांचा बीडमध्ये दसरा मेळावा होणार आहे. मराठा आरक्षणसाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलेय, मनोज जरांगे पाटील काय बोलणार? याकडे मराठा समाजाचे लक्ष लागलेय. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा मुंबईत होणार आहे. शिंदे अन् ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

आव्हानांवर मात करूया, आपत्तीग्रस्त बांधवांना नव्या उमेदीने उभे करुया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विजयादशमीच्या सणाकडून प्रेरणा घेऊन आव्हानांवर, संकटावर मात करण्याची हिंमत बाळगुया, असे आवाहन करतानाच, विजयादशमीचे हे पर्व राज्यातील नागरिकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, अशी प्रार्थना मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्याही मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन यांच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा देतानाच, राज्यात पावसामुळे अनेक भागात अभूतपुर्व बिकट परिस्थिती उद्भवली आहे. या संकटसमयी आपण सगळे एकजुटीने या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहूया. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वतोपरी योगदान देऊया. या बांधवांना पुन्हा नव्याने उमेदीने करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन केले आहे.

‘विजयादशमीचा सण हा असत्यावर सत्याचा विजयाचा संदेश घेऊन येतो. या सणाकडून सकारात्मक अशी ऊर्जा घेऊया. बिकट परिस्थितीवर मात करून, अडचणीतून मार्ग काढण्यात महाराष्ट्र नेहमीच पुढे राहीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते अनेक अग्रणींनी आपल्याला हाच वारसा-वसा दिला आहे. ही प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी सज्ज होऊया. आपल्या सर्वांच्या एकजूटीतून महाराष्ट्र विकासाची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी निर्धार करूया, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार

२९ सप्टेंबर पासून राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघ गर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल. वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: बेरोजगारांना मोठा दिलासा! १० हजार ३०९ जणांना शासकीय नोकरी | VIDEO

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोप कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maggi Recipe : पहाडी-स्टाइल चटकदार मॅगी घरीच १० मिनिटांत बनेल, फक्त फॉलो करा 'ही' रेसिपी

Mahatma Gandhi Jayanti Marathi Wishes: महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने तुमच्या प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा आणि मेसेजस

Gold Rate Today: सुवर्णनगरीत दसऱ्याला सोनं खरेदीसाठी ग्राहकांची लगबग; वाचा आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT