मीरा-भाईंदर काशिमीरा परिसरात मध्यरात्री तरुणांचा दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा विडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे. रविवारी मध्यरात्री काशिमिरा परिसरात बार बाहेर तरुणांनी जोरात ओरडत शिवीगाळ करत धिंगाणा घातला घालून बारची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला.
शेततळ्यात बुडून पती-पत्नीसह मुलाचा मृत्यू....
पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावातील घटना.....
विजय राजकुमार लोंढे (वय 30) प्रियांका विजय लोंढे (वय 28) प्रज्वल विजय लोंढे (वय 5) या तिघांचा झाला मृत्यू....
लोंढे कुटुंबीय मूळचे मंगळवेढा तालुक्यातील रहिवासी.....
मुंढवा शासकीय जमीन विक्री व्यवहार प्रकरणात काल पिंपरी चिंचवड शहरातील बावधन पोलिसांनी अटक केलेले सहाय्यक मुद्रांक दुय्यम निबंधक अधिकारी रवींद्र तारू यांना आज पोलिसांनी पौंड न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी न्यायालयाने रवींद्र तारू यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने मुंढवा येथील शासकीय जमीन खरेदी करत असताना त्या जमिनीची दस्त नोंदणी रवींद्र तारू यांच्या कार्यालयात केली होती.
नवले पुलाजवळ होणारा आजच्या दिवसातील दुसरा अपघात
अपघातात चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान
नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर परिसरात अपघात
- विधानसभा अधिवेशनात लावणार लक्षवेधी सूचना...
- अज्ञात व्यक्तीकडून आज विधानभवन परिसरात असतांना भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फो
- दहा ते पंधरा फोन सातत्याने केले, तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरोधात तक्रार करू नका अश्या धमक्यांना दिल्या आहे,
- या सगळ्या संदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याच भाजप आमदर कृष्णां खोपडे यांनी साम tv सोबत बोलतांना सांगितलं..
सोलापूरच्या राष्ट्रवादी कांग्रेस जिल्हा सरचिटणीसाच पुण्यातील विधान भवनबाहेर आंदोलन
बार्शी तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे
महिलांना घेवून त्यांनी आंदोलन केल
मुख्यमंत्री साहेब, अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांनी बार्शी तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे
* पालिका प्रशासनाकडून झाडांच्या बाबत कोणतीही योग्य माहिती मिळाली नसल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप
* एक्झिबिशन सेंटरसाठी झाडं तोडणार नसल्याचा मनपा आयुक्तांकडून खुलासा
* मात्र त्याबाबतचा जीआर काढण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी
* बैठक निष्फळ झाल्याने आंदोलन सुरूच राहण्याच्या मार्गावर
* पालिका आयुक्तांकडून पर्यावरणप्रमींशी चर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती..
नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर लावल्या जात असलेल्या जाचक अटींविरोधात शेतकऱ्यांनी खामगाव-नांदेड मार्ग रोखलाय. जाचक अटी सरकारने आणि नाफेडने मागे घ्याव्यात अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केलीये. सोयाबीन खरेदी केंद्रावर जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचं सोयाबीन नाकारलं जात असल्याने शेतकरी संतप्त झालेयेत. नाफेडच्या केंद्रावर ग्रेडरची मनमानी सुरू असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील तणाव पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. युतीचे वातावरण असूनही पॅनल क्रमांक 2 हा शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. इथे भाजपला एकही जागा मिळणे शक्य नाही,असा थेट इशाराच शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी भाजपला दिला.
मध्यरात्री पाचगावजवळ भीषण दुर्घटना, पतीसह चालक गंभीर जखमी
रविवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता पाचगाव जवळून जात असताना दुभाजक ओलांडत आलेल्या एका वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागून भीषण धडक दिली.
गडचिरोली : राष्ट्रवादी (अजित पवार गट)
महिला प्रदेश उपाध्यक्षा व आधारविश्व फाउंडेशनच्या अध्यक्षा गीता सुशील हिंगे यांचा रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. पती सुशील हिंगे गंभीर जखमी आहेत.
राज्यात महिला अत्याचाराचा प्रमाणात वाढ होत असतांना असाच एक प्रकार गडचिरोली जिल्ह्यात घडलेला आहे ...एका वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्याच विभागात काम करणाऱ्या एका परिचारिकेची वेतनवाढ रोखत तिच्याकडे लैंगिक सुखाची मागणी केल्याने तणावग्रस्त परिचारिकेने अखेर आत्महत्येचा केला प्रयत्न . तिच्यावर सध्या गडचिरोलीत उपचार सुरू आहे.
सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट महायुती सोबत लढणार - 30 जागांची केली मागणी.
विद्यापीठाच्या क्रीडा महोत्सवातील खेळाडूंच्या जेवणात निघाल्या आळ्या.सिनेट सदस्याची राज्यपालांकडे तक्रार
बीडच्या गेवराई नजिक धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास तेलंगणा राज्यातील शिर्डीकडे दर्शनासाठी जात असलेल्या एका कुटुंबाला आडवत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत आणि हत्यारांचा धाक दाखवत लुटले. त्यांच्याकडील सोने आणि रोख रक्कम असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या संपूर्ण घटनेचा थरार भर रस्त्यावर दिसून आला याचा एक ट्रक चालकाने घेतलेला व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. यानंतर काल अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गेवराई पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैनिकांनी देशासाठी केलेले समर्पण कुठल्याही मूल्यांमध्ये मोजता येत नाही. सैन्यातील खडतर जीवन जगून देशासाठी त्याग करणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनातूनही सैनिकांच्या कुटुंबियांना मदत देण्यात येते. हा निधी सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे बंधारा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मि. मि व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथे महानगर गॅस च्या कामांमध्ये शनिवार दि. ६. १२. २०२५ रोजी सकाळी नादुरुस्त झाली आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील दोन दिवसापासून सुरू आहे परंतु जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी आणखी तीन दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये 30 टक्के पाणी करण्यात लागू करण्यात येत आहे.
भाविकाकडून गुलाबाचे सुवर्ण फुल साईचरणी अर्पण
साईबाबांवरील अपार श्रद्धेने प्रेरित होऊन देश-विदेशातून आलेले भाविक साई चरणी विविध प्रकारे देणगी अर्पण करतात.
छत्तीसगड, दुर्ग येथील साईभक्त गितीका सहाणी यांनी साईचरणी 1 लाख 54 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गुलाब फुल फूल अर्पण केले आहे.
13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे हे गुलाब फूल साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आले.
साई संस्थानकडून देणगीदार साईभक्ताचा सत्कार करण्यात आला.
नाशिक -
- आदिवासी आश्रमशाळातील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन संपुष्टात
- आंदोलन वर्ग 3 आणि 4 रोजंदारी कर्मचारी करत होते आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन
- वर्ग ३ आणि ४ रोजंदारी आंदोलक कर्मचाऱ्यांना बाह्यस्रोताद्वारे भरतीची हमी
- आदिवासीमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिले आश्वासन
- ९ डिसेंबरला नागपूरमध्ये बैठक, शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन
- शहरातील त्र्यंबकनाका–गडकरी चौक मार्ग ५ महिन्यांनंतर मोकळा
नाशिक -
- परवानगीविना बाइक टॅक्सी सेवा, रॅपिडो कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा
- प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना नसतांना शहरात बाइक टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या एका कंपनीविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी शहरात ही सेवा सुरू झाली होती. मोटार वाहन निरीक्षक योगेश सपिके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, अॅपद्वारे बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करत शासनाची फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली.
विरोधी पक्षनेतेपदावरून जयंत पाटील यांची सरकारवर टीका
सरकारला विरोधी पक्ष नेता नेमायचा नाही
आज विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायला हवी होती
विरोधी पक्ष नेता नसेल तर सरकारला बरं असेल
किमान 2 आठवडे अधिवेशन चालवायला पाहिजे होत
विदर्भातील जनतेचे प्रश्न अधिवेशनात मांडले जाता नाहीत
नागपूर -
- व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय मुंबई विभाग अंतर्गत येणाऱ्या नागपूरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आज नामांतर सोहळा पार पडत आहे..
- संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं नामकरण केलं जाणार आहे
- या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री...मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंगल प्रभात लोढा हे उपस्थित असणार आहे...
रत्नागिरी-
'बसरा स्टार' जहाज अखेर भंगारात काढण्याची कार्यवाही सुरू
मिऱ्या किनाऱ्यावर तब्बल पाच वर्षे खडकात अडकून पडलं होतं जहाज
3 जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने जहाज भरकटलं आणि मिऱ्या किनाऱ्यावरील खडकात अडकलं
लाटांच्या सततच्या माऱ्यामुळे जहाजाचे झाले होते दोन तुकडे
एम. एम. शिपिंग कॉर्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरीटाइम बोर्डाची कन्सल्टंट म्हणून हे जहाज बाहेर काढण्याचे काम करत आहे
नाशिक -
सप्तशृंग गडावर ग्रामस्थांचा रास्ता रोको
काल झालेल्या अपघातामुळे ग्रामस्थ आक्रमक
अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग काम करीत असताना रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थ आक्रमक
घाटात केले आंदोलन
ज्या ठिकाणचे काम अगोदर न करता दुसऱ्या ठिकाणचे काम अगोदर केल्याने ग्रामस्थ आक्रमक
थेट घाटात रास्ता रोको झाल्याने घाटात वाहनाच्या लागल्या रांगा
नागपूर -
- विधानभवनावर आज चार मोर्चे धडकणार , यशवंत स्टेडियम पासून सर्व मोर्चे निघणार
- आपल्या विविधी मागण्या घेऊन हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोर्चे धडकणार
- मोर्चेकऱ्याच्या बंदोबस्तासाठी पोलिसाचा मोठा बंदोबस्त
- प्रत्येक चौकात पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून करडी नजर..
- आतापर्यंत 48 मोर्चासाठी परवानगी मागितली, याची संख्या वाढण्याची शक्यता..
नाशिक -
- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर किन्नर समाज देखील आक्रमक
- नाशिकच्या तपोवनात किन्नर समाजाकडून आंदोलन
- वृक्ष तोड थांबवा नाशिक वाचवा, झाडे वाचवा,तपोवन वाचवा, किन्नर समाजाकडून घोषणाबाजी
- "मानवता किन्नर समाज,नाशिक यांच्याकडून तपोवन येथील प्रशासनाच्या वृक्ष तोडीच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध
- तपोवन वृक्ष तोडी विरोधात सर्वच स्तरातून विरोध
- येणाऱ्या काळात प्रशासनाने वृक्षतोडीचा निर्णय मागे घेतला नाही तर महापालिकेला किन्नर समाजाकडून घेराव घालण्याचा इशारा
कोल्हापूर -
कोल्हापुरात भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनात तरुणांची फ्री स्टाईल हाणामारी
तरुणांमधील किरकोळ वादावादीचे रूपांतर झालं हाणामारीत
रागाच्याभरात तरुणांनी केली एकमेकांना जोरदार मारहाण
अचानक हाणामारी सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराहट
हाणामारीचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल
बेळगाव -
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांची धरपकड
कन्नड पोलिसांची मराठी भाषिकांच्या मेळाव्यावर दडपशाही
बेळगाव इथं मेळावा घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीवर कन्नड पोलिसांनी केली कारवाई
मराठी भाषिकांची जोरदार घोषणाबाजी तर पोलिसांची दडपशाही
कन्नड पोलिसांनी घेतलं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांना ताब्यात
नाशिक -
- नाशिक महापालिका आयुक्त आणि पर्यावरणप्रेमींमध्ये बैठकीला सुरुवात
- नाशिक महापालिकेत बैठकीला सुरुवात
- महापालिका आयुक्त मनिषा खत्री ऐकून घेतायत पर्यावरणप्रेमींच्या हरकती
* बैठकीला पर्यावरणप्रमींमधील देवांग जानी, शेखर गायकवाड, निशिकांत पगारे, जगबीर सिंह,रोशन केदार, चंद्रकांत पाटील, ऋषिकेश नाझरे यांच्यासह इतर पर्यावरण प्रेमी उपस्थित
लातूर -
शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयाच्या दारात ठिय्या
विद्युत पुरवठा सुरळीत चालत नसल्याने शेतकरी संतापले
लातूरच्या हाडगा शिवरात मागच्या काही दिवसापासून विद्युत पुरवठा सुरळीत चालत नसल्याने रब्बी पिकाच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे
वारंवार विनंती आणि अर्ज करूनही विद्युत पुरवठा सुरळीत चालत नसल्याने हडगा शिवारातील अनेक शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन केले
सोलापूर -
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती निकाल अपडेट
माजी आमदार राजेंद्र राऊत गटाचे हमाल तोलार मतदारसंघातून गजेंद्र मुकटे 593 मतांनी विजयी
भरतेश गांधी,प्रवीण गायकवाड हे व्यापार संघातून बिनविरोध निवड झाली आहे
माजी आमदार राजेंद्र विठ्ठल राऊत यांची बळीराजा विकास आघाडी ( चिन्ह कप बशी ) व विद्यमान आमदार दिलीप गंगाधर सोपल यांची बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडी ( चिन्ह छत्री ) या दोन पॅनल मध्येच प्रामुख्याने लढत होत आहे.
18 संचालका पैकी व्यापारी व आडते मतदारसंघातून 02 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत त्यामुळे 16 संचालकाच्या पदासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.
विरोधीपक्षनेते पदाबाबत अफवा
अफवांवर विश्वास ठेवू नका
आदित्य ठाकरे यांचे आवाहन
विरोधी पक्षनेतेपद आदित्य ठाकरेंना देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याची होती चर्चा
अहिल्यानगर -
नरभक्षक बिबट्याला ठार करावे तसेच इतर बिबट्यांना जेलबंद करावे
या मागणीसाठी पारनेर तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, करंदी ग्रामस्थांचा नगर - कल्याण महामार्गावरील तिखोल फाटा येथे रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात
२ डिसेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात भागूबाई विश्वनाथ खोडदे या ७० वर्षीय महिलेचा झाला मृत्यू
घटना घडून सहा दिवस उलटले तरी वनखात्याकडून बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश
किन्ही परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना
संतप्त ग्रामस्थांकडून प्रशासनाचा निषेध करत केला रास्ता रोको
पुणे विमानतळ परिसरात पुन्हा आढळून आला बिबट्या
शनिवार, रविवार पुन्हा एकदा दिसला बिबट्या
रात्रीच्या सत्रात विमानांच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा परिसर शांत होत असल्याने बिबट्या पुन्हा आला दिसून
पुणे विमानतळ परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार
वन विभागाकडून विमानतळ परिसरात ७ ट्रॅप कॅमेरा तैनात
एअरपोर्ट परिसरात एप्रिल, ऑगस्ट मध्ये दिसून आला होता बिबट्या
धुळ्याच्या साक्रीमध्ये बिबट्याचा सर्रासपणे वावर सुरू असल्याचे दिसून येत आहे, साक्री तालुक्यातील साक्री-
दहिवेल रस्त्यावर चार चाकी वाहनातून जाणाऱ्या वांधारकांना हा बिबट्या रस्त्याच्या कडेला बसलेला दिसून आला आहे,
या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे
इंडिगो कंपनीच्या विमान वाहतूक व्यत्ययामुळे चिपी-सिंधुदुर्ग विमानतळावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. इंडिगो विमान कंपनीच्या व्यत्ययामुळे हवाई वाहतूक क्षेत्रात सध्या अभूतपूर्व गोधळ निर्माण झाला आहे. कित्येक विमानफेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांनी अन्य विमान कंपन्यांकडे धाव घेतली आहे
ढोल ताशाच्या परंपरेला अमेरिकेच्या इंडियानापोलीसमध्ये जिवंत ठेवण्याचे स्वप्न तृप्ती संतोष बिनवडे यांनी 2023 मध्ये Indy गर्जना ढोल ताशा पथक स्थापन करून पूर्ण केलं आहे. या पथकात भारताच्या विविध राज्यातील आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील नामांकित महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सर्वसमावेशकता आणि विविधता हीच आमच्या ढोल ताशा पथकाची खासियत असल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. अमेरिकेतील इंडियानापोलीस या शहरात, इंडियाना पेसर्स विरुद्ध शिकागो बुल्स यांच्यातील बास्केटबॉल सामन्यात, आमच्या 51 कलाकारांनी विशेष महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख परिधान करत आपल्या सांस्कृतिक कलेचे भव्य सादरीकरण केलं.
- आम्ही 232 आमदार आहोत. त्यामुळे आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही. महायुतीच हाच आता ब्रँड आहे. विरोधकांनी विधायक सूचना केल्या तर आम्ही त्या पुढे नेऊ. पण केवळ विरोधासाठी विरोध केला, तर त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. परंपरेनुसार चहापानाचा बहिष्कार करण्याची पद्धत विरोधकांकडे आहे. पण त्यांच्याकडे किती आमदार आहेत? संख्याबळ किती आहे? विरोधी पक्षनेता होण्याइतपतही संख्या नाही; तरी टीका करणे योग्य नाही. त्यामुळे किमान पुढील चार वर्षांत तरी स्वतःचा विरोधी पक्षनेता होईल, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.
- तुकाराम मुंढे यांना निलंबित करण्याची मागणी अधिवेशनात भाजप आमदार कृष्णा खोपडे मांडणार लक्षवेधी
- भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात आयएएस तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील दोन जुन्या गंभीर प्रकरणांना पुन्हा उजाळा देत त्यांच्या निलंबनाची विशेष लक्षवेधी सूचना मांडणार आहेत.
- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त असताना नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार घेतला.
- शासनाकडून सीईओ म्हणून औपचारिक नेमणूक नव्हती. अधिकार नसताना स्मार्ट सिटीवर स्वतः नियंत्रण घेतल्याचा आरोप.
- स्मार्ट सिटी प्रकल्पात “मर्जीतल्या कंत्राटदारांना” कोट्यवधींचे अनियमित पेमेंट. आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर ठपका.
- महिला अधिकाऱ्यांना दमदाटी आणि वर्तणुकीबाबत तक्रारी.
- मात्र, त्या वेळी महा विकास आघाडी सरकार असल्याने कारवाई दडपली गेली, असा भाजपचा आरोप.
अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात नगर - पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून छ. संभाजीनगरकडे जाणारी शिवाई बस कंटेनरवर आदळली...कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी जोरदार होती की, यात शिवाई बस चालकाच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला असून, बसमधील इतर ५ ते ६ प्रवासी जखमी झाले आहेत. २ गंभीर जखमींवर शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पळून गेला. सुदैवाने या भीषण अपघातात अद्याप पर्यंत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
धाराशिव नगर परिषद सार्वञिक निवडणूकी दरम्यान बनावट एक्झिट पोल प्रसारीत करीत आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप झाला होता.शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे तालुकाप्रमुख राकेश सुर्यवंशी यांनी या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती परंतु दखल न घेतल्याने सुर्यवंशी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देण्याचे आदेशित केले आहे.मतदानाच्या आदल्या दिवशी एका सोशल मिडीया पेजवर नियमबाह्य पध्दतीने एक्झिट पोल प्रसिद्ध करण्यात आला,एका बनावट टिव्ही चॅनलचा रिपोर्ट वापरून यात सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या महीला उमेदवार विजयी होणार असल्याचे भासवण्यात आले.मतदानापुर्वी एक्झिट पोल प्रसिद्ध करुणे हे निवडणूक नियमांचे स्पष्ट उल्लंघन असुन यामुळे मतदारांची दिशाभूल झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.या वर जिल्हाधिकारी काय अहवाल देणार याकडे लक्ष लागले आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 संचालकांच्या निवडणुकीसाठी बार्शी आणि वैराग येथील मतदान केंद्रावर अतिशय चुरशीने पण शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यंदाच्या निवडणुकीमध्ये तब्बल 96.98 टक्के मतदान झाले आहे. आज पर्यंतच्या निवडणुकीतील हे सर्वाधिक मतदान ठरले आहे. बाजार समितीच्या 18 संचालकांपैकी 10 संचालक बहुमतासाठी असणे गरजेचे आहे. बाजार समितीच्या आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुण्यातील नवले पुलाजवळील पुन्हा अपघात झाला आहे. त्याच ब्लॅक स्पॉटवर पुन्हा अपघात झाला. अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. नवले पुलावर स्कूल बस व कारची धडक झाली.
धाराशिव जिल्ह्यात मागील आठ दिवसापासून सातत्याने तापमानात घट होत असल्याने वातावरणातील गारवा वाढला आहे.दोन दिवसापासून 12 अंशापर्यंत पारा घसरल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं आजारी पडण्याची संख्या वाढली आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सर्दी खोकल्याचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले आहेत.
अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकात रात्री एका अल्टो एट हंड्रेड या चारचाकी वाहनाला शॉट सर्किट झाल्याने भीषण आग लागली. आगीत वाहन पुर्णपणे जळून खाक झाले. या गाडीत चार जण होते शॉर्टसर्किट झाल्याचे समजताच सर्वजण गाडीच्या बाहेर पडले सुदैवाने या घटनेत कुठलीही जिवीत हानी झाली नाही. वाहनाने पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी बायपास रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगाच रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अग्निशामक दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
कोल्हापुरच्या कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध सांगलीच्या जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.लिंगायत समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हा गुन्हा दाखल झाला आहे.जत तालुक्यातील बिळूर येथे 9 ऑक्टोबर रोजी एका प्रवचना दरम्यान
कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजाकडुन लिंगायत समाजाच्या भावना दुखवणारे भाषण केल्याचा प्रकार घडला होता.याप्रकरणी कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील पोलीस ठाण्यात शंकरगौड शिवनगौड बिरादार यांनी
तक्रार दाखल केली होती,त्यानुसार जत पोलीस ठाण्या काल कणेर मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- तपोवनातील वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलक पर्यावरणप्रेमींशी आज पालिका आयुक्त करणार चर्चा
- महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडून पर्यावरणप्रेमी आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण
- मागील २२ दिवसांपासून तपोवनात पर्यावरणप्रेमींकडून वृक्षतोडीविरोधात सुरू आहे आंदोलन
- विरोधी पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस ( AP ) आणि शिंदेंच्या शिवसेनेनं देखील तपोवनातील वृक्षतोडीला केलाय विरोध
- साधुग्राम उभारणीसाठी काही झाडं तोडावी लागणार असल्याच्या प्रशासनाच्या भूमिकेनंतर आंदोलनाला झाली होती सुरुवात
- कुंभमेळ्यानंतर या भागात होणाऱ्या MICE हब देखील आता देण्यात आलीय स्थगिती
- आजच्या चर्चेनंतर आंदोलनासंदर्भात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष
रविवारी संध्याकाळी साडेचार ते पावणे पाचच्या दरम्यान मुंबई आरटीओच्या अंतर्गत नोंद असलेली एक कार सिंहगडाच्या दिशेने निघाली होती.
गोळीवाडी येथील वनविभागाच्या उपद्रवशुल्क नाक्यावर हे वाहन तपासणीसाठी थांबविले.
उपद्रवशुल्क घेत असताना संरक्षण समितीच्या सुरक्षा रक्षकांनी वाहनचालकांना गाडीत मद्य आहे का, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. तसेच धूम्रपानाचे साहित्य आहे का, असे विचारल्यावर त्यांनी सिगरेट दाखवली.
नाशिकच्या येवला तालुक्यातील खर्डीसाठे या ठिकाणी शेतकरी वाल्मीक नागरे यांच्या 25 एकर शेतातील काढणी करून ठेवलेल्या मकाच्या गंजीला अज्ञात समाजकंटकाने पहाटेच्या सुमारास पेटवून दिले या आगीत अंदाजे 800 क्विंटल मका जळून खाक झाला असून शेतकऱ्याचे दहा लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले दरम्यान ज्यांनी कोणी हे कृत्य केले असेल त्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुढील दोन दिवस इच्छुक उमेदवारांनी पक्ष कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा आहे
दोन दिवसानंतर हे अर्ज प्रदेश कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार कोर कमिटी चर्चा करून पुढील निर्णय घेणार
- इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेमुळे मंत्री,आमदार नागपुरात पोहचले चार्टर विमान आणि रेल्वेने
- नागपुरात रविवारी एकूण पाच चार्टर विमान पोहचले
- राज्यपाल,मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही मंत्र्यांना सोबत घेऊन नागपुरात चार्टर विमानाने पोहचले
- तर गिरीश महाजन,हसन मुश्रीफ, संजय राठोड, भास्कर जाधव यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने नागपुरात पोहचले
- रविवारी दिवसभरात नागपुरात येणारी -जाणारी इंडिगोची 19 उड्डाणे रद्द झाली
- इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे अधिवेशन संपल्यानंतर 14 आणि 15 डिसेंबरला नागपुरातून पुणे आणि मुंबईसाठी विशेष रेल्वे गाड्यांचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवण्यात आल्याची माहिती सभापती राम शिंदे यांनी दिली
-
जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर या कालावधीत किमान तापमान ८ ते ११ अंश राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते.वातावरण अंधुक किंवा ढगाळ .भौगोलिक भाषेत या स्थितीला 'हेझ' म्हणतात.
धुके व कोरड्या वाऱ्यांमुळे जळगावचा पारा आज पासून पुढील चार दिवस ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अर्थात, थंडीचा गारठा वाढेल. रविवारी पारा १२.२ अंशांवर होता. सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली येऊ शकते, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.
कल्याण पूर्वमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात केंद्रीय मंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण राजकीय संदेश देत महायुतीत आपल्या पक्षाची निर्णायक भूमिका अधोरेखित केली.
मेळाव्यात भाषण करताना आठवले म्हणाले, महाराष्ट्रात माझा पक्ष ज्या पक्षासोबत जातो त्यांची सत्ता येते; आणि ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. हा ३०–३५ वर्षांचा इतिहास आहे.
ते पुढे म्हणाले की, आरपीआयने आदी काँग्रेससोबत हातमिळवणी केली तेव्हा त्यांची सत्ता आली होती, आणि आज भाजप-शिवसेना सोबत आल्याने महायुतीची सत्ता स्थिर आहे.
नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. नागपूरमध्ये राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे अधिवेशन जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.