भर पावसात आदिवासी भागातील महिला आणि नागरिकांनी एकत्र येत अकोले तालुक्यातील वारंघुशी फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करत अवैध दारू विरोधात एल्गार पुकारला.. पोलिसांना वारंवार निवेदन देऊनही अवैध दारू विक्री थांबत नसल्याने संतापलेल्या आदिवासी महिलांनी भर पावसात आंदोलन केले.
काच फोडून वाहन चालक बाहेर निघाल्याने मोठा अनर्थ टळला...
शहादा तालुक्यातील कुडावद ते भुते आकाशपूर गावानजी घडली घटना.
नाल्याला मोठा पूर आल्याने चार चाकी वाहन गेल पाण्यात वाहून....
शहादा तालुक्यातील मामाचे महिदा गावातील एका व्यापाऱ्याची हे वाहन असल्याची माहिती....
भंडाऱ्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला काल पासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. तर आज तुमसर शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बजरंग गणेश उत्सव मंडळा तर्फे सार्वजनिक गणपती बाप्पाचा विसर्जन मोठ्या थाटात झालं.
- अटक माओवाद्याचा माहे नोव्हेंबर 2023 मध्ये मौजा कापेवंचा येथे झालेल्या रामजी चिन्ना आत्राम यांच्या हत्येमध्ये होता सक्रिय सहभाग
- सन 2024 मध्ये पेरमिली दलम संपूष्टात येण्यापूर्वी पेरमिली दलममध्ये राहून करत होता सदस्य पदावर काम
- गडचिरोली डिव्हीजनमध्ये सहा वर्षांपासून सक्रीय असलेल्या माओवाद्यास गडचिरोली पोलीस दलाने अत्यंत शिताफिने हैद्राबाद (तेलंगना) येथुन केली अटक
- महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस
विसर्जन मिरवणूक पाहून पुणेकरांनी गर्दी टाळण्यासाठी मेट्रोला प्राधान्य दिलं आणि सोपा पर्याय म्हणून मेट्रो निवडली खरी पण पुणे मेट्रोत तुफान गर्दी झाली होती. रात्री ११ वाजताची ही गर्दी आहे. विसर्जनाच्या रात्री मेट्रो २ वाजेपर्यंत सुरु होती. पुण्यातील सिव्हिल कोर्ट या मेट्रो स्थानकावरचा हा वीडियो आहे. सिव्हिल कोर्ट हे मेट्रोच जंक्शन आहे. पिंपरी चिंचवड, स्वारगेट, कोथरुड आणि रामवाडी जाण्यासाठी हे जंक्शन आहे. त्यामुळे मिरवणुकीनंतर याच मेट्रो स्टेशनवर पुणेकरांनी तुफान गर्दी केली.
- विखे पाटलांनी पुन्हा सुनावले लक्ष्मण हाकेंना खडे बोल
- पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का?असा विचार करतोय...
- विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांना खोचक टोला
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी विनोद विश्वनाथ आढे हे मागील 2 दिवसांपासून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात वसंतराव नाईक पुतळा परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत. प्रमुख तीन मागण्या देऊन विनोद आडे हे उपोषणाला बसले आहेत.
हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला तातडीने ST आरक्षण लागू करावे. शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन शासनादेश काढावा.समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक योजना व सुविधा राबवाव्यात अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले आहेत आमचे उपोषण शांततेच्या मार्गाने असून, या आंदोलनाची योग्य दखल घेऊन शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विरार पोलीस ठाण्याच्या गणरायाचे विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न झाला. दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा-अर्चा केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होत नृत्याचा आनंद लुटला.
ढोल-ताशांच्या गजरात, गुलालाच्या रंगात आणि भक्तिभावाने गणरायाला निरोप देण्यात आला. पोलीस व कर्मचाऱ्यांनी शिस्तबद्धतेने सोहळा पार पाडत गणरायाचे विसर्जन केले.
गणेश विसर्जनानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा..
वेळे, खंडाळा, शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक धीम्या गतीने..
पुण्याच्या पारंपरिक विसर्जन मिरवणुकीत यंदा एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना मिळाला. श्री शिवाजीराजे मर्दानी अखाडा, छत्रपती शिवाजीनगर गावठाण, पुणे यांच्या वतीने त्रिशुंड गणपतीसमोर मर्दानी खेळाची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
या प्रात्यक्षिकात विशेष आकर्षण ठरली जेनोव्हा, इटली येथील परदेशी तरुणी अॅना मारा, हिने मर्दानी खेळातील कौशल्य दाखवत उपस्थितांचे मन जिंकले. तिच्यासोबत अखाड्याचे मावळे आणि रणरागिणी यांनीही जोशपूर्ण आणि तितक्याच ताकदीने सहभाग घेतला.
इतर रस्त्यावरील मंडळ गेल्यानंतर महराष्ट्र तरुण मंडळ पुढे जाणार
केळकर रास्ता आणि शास्त्री रस्ता आणखी मंडळ असल्याने शेवटचा गणपती अलका चौकात थांबलं
विसर्जन मिरवणूक 32 तासात संपणार
अर्धा तासांत सार्वजनिक विसरर्जन मिरवणूक संपणार?
पोलीस आयुक्त टिळक चौकात दाखल झालेत
दहिसर पूर्वेकडील जनकल्याण नगरमध्ये मोठी आग लागली आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. दहिसर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने हैदराबाद लागू करण्याचा शासन निर्णय काढला मात्र आता याच शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली असून हैदराबाद गॅजेटनुसार आमचा एसटी मध्ये प्रवेश निश्चित होणार असल्याचे सांगत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोलीत साम टीव्हीवर केली आहे, आज हिंगोलीत बंजारा व शिख बांधवांची एकत्रित बैठक झाली या बैठकी नंतर जितेंद्र महाराज यांनी भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान सरकारने निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून लढाई लढतील असा इशारा देखील यावेळी बंजारा समाजाच्या धर्मगुरूंनी दिला आहे तर एसटी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढणार असल्याचं या वेळी सांगण्यात आले आहे त्यामुळे मराठा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय आता सरकारच्याच अंगलट आल्याचं बोलल्या जात आहे
10 दिवस पाहुणा म्हणून आलेल्या बाप्पाला निरोप देताना एका चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या चिमुकल्याचं नाव मनिष जोशी असं असून तो बदलापुरातला आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या मनिषने टाहो फोडला. 'बाप्पा तू जाऊ नकोस' अशी आर्त विनवणीही त्याने बाप्पाला केली. अखेर घरातल्यांना त्याची समजूत घालावी लागली. त्याचाच हा व्हिडिओ आहे.
पुण्यामध्ये अद्याप लाडक्या गणरायाचे विसर्जन झालेले नाही. ३१ तासानंतरही पुण्यात गणपती विसर्जन सुरूच आहे. पावसाच्या सरी कोसळतोय, पण भक्त दंग झाले आहे.
समुद्रात भरती आल्यामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले आहे. हायटाईड कमी झाल्यानंतर लाडक्या गणरायाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने लोखंडी सळयांनी भरलेला ट्रकचा अपघात जाला. अपघातात कंटेनरमधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तात्काळ जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय.
विरारच्या डोंगरपाडा येथील 40 वर्ष जुनी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. श्री गणेश असे या को-ऑपरेटिंग हाऊसिंग सोसायटीचे नाव आहे.
या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या चाळीस वर्षे जुन्या इमारतीमध्ये तब्बल 17 कुटुंब राहत होते.
वसई विरार शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. पालिकेच्या अग्निशमन जवानांनी सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून
इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना खाली करून घेतले आहे.
पुरंदरमध्ये विमानतळ नको ग्रामस्थांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
मुख्यमंत्र्यांना दिले ग्रामस्थांनी निवेदन
आज मुख्यमंत्री आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त पुरंदर मध्ये आहे
आम्हाला विमानतळ नको,देवभाऊ यांना आम्ही बहिण म्हणून राखी बांधली आहे त्यामुळे आम्हाला ते ओवाळणी म्हणून विमानतळ रद्द करतील
आम्हाला विमानतळ नको आहे,विकासाचे नावाखाली सगळे सुरू आहे.
मुख्यमंत्री आमची मागणी मान्य करतील आम्हाला आशा आहे.
धुळे तालुक्यातील वरखेडी फाटा परिसरात भीषण अपघात
ट्रॅक्टरने हुलकावणी दिल्याने लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक झाला अपघातग्रस्त
अपघातात कंटेनर मधील दोघा जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी
जखमीस तात्काळ परिसरातील नागरिकांतर्फे बचाव कार्य करीत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने ट्रक चालकाने पूलाला ट्रक ठोकल्यामुळे झाला भीषण अपघात
नाशिकच्या बागलाण येथून नांदगाव येथे मजुरांना शेती कामासाठी घेऊन जात असलेलय पिकअप गाडीचा आंबसन फाट्याजवळ अपघात होऊन 12 मजूर गंभीर जखमी झाले आहे,या रस्त्यावरील काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण असल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असल्याने वेगाने जात असलेला पिकअप पलटी होऊन हा अपघात झाला असून या सर्व गंभीर जखमींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आज पुण्यात
पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्याला उपस्थित राहणार
भिवडी गावात आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक समाधी स्थळावर अभिवादन करतील
हुतात्मा उमाजी नाईक विद्यालय येथे जयंती सोहळा कार्यक्रम
नाशिकच्या मालेगाव बाजार समितीत रोज मोठ्या प्रमाणावर तालुक्यासह अन्य भागातून शेतकरी व खरेदीदार खरेदी विक्री साठी येत असतात,मात्र सतत च्या पावसामुळे संपूर्ण भाजी बाजार आवारात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याने अनेक जण भाजी घेऊन जाताना घसरून पडत आहे तर भाजी पाल्याच्या छोट्या गाड्या चिखलात रुतून पडत असल्याने त्यांना धक्के मारून बाहेर काढावे लागत आहे हे कमी की काय या ठिकाणी असलेले मोकाट जनावरे भाजीपाला खाऊन फस्त करत असल्याने भाजी विक्रते व खरेदीदार त्रस्त झाले असून बाजार समिती मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावाला बसले भूकंपाचे दोन सौम्य झटके...
भूकंपाच्या झटक्याने गावातील अनेक घरातील भांडे पडल्याची घटना तर एका ठिकाणी नाल्याला भेगा गेल्याची ग्रामस्थांची माहिती..
सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास बसले भूकंपाचे धक्के...
भूकंपाचे धक्के बसल्याने गावातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण...
काही वर्षांपूर्वी ही गावात अशाच पद्धतीने दोनदा भूकंपाचे धक्के आल्याची ग्रामस्थांची माहिती.
पुणे पोलिस गणपती मंडळांपुढे हतबल
अलका टॉकीज चौकात गर्दीच्या ठिकाणी उडवले फटाके
नियोजन करूनही पुण्यातील विसर्जन मिरवणूक रेंगाळली
एकजण ताब्यात पोलिसांच्या नाकावर टिचून फोडले चौकात फटाके
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बीडच्या भरत खरसाडे यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोन.
माजी मंत्री तानाजी सावंत यांनी फोन द्वारे सांत्वन करत भरत खरसाडेबाबत विचारपूस करत आम्ही तुमच्या सोबत आहोत धीर धरा घासू नका असा धीर दिला.
माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडून कॅश स्वरूपात तीन लाख रुपयांची आर्थिक मदत.
नाशिकच्या म्हसरुळ परिसरात बाप्पाला निरोप देतांना सई कदम या एका चार वर्षांच्या चिमुकलीला अश्रू अनावर झाले होते, बाप्पा त्यांच्या मम्मी पप्पांना भेटून परत येणार आहेत असं सईला तिची आई वारंवार सांगत होती मात्र बाप्पाचे विसर्जन करू नका असा हट्ट करत सई लाडक्या बाप्पाचा हातच सोडायला तयार नव्हती.. सोशल मिडीयात हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय..
गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील आमने सामने
गणेश उत्सव मिरवणुकीत मल्हार पाटील समर्थकांच्या गराड्यात, समर्थकांकडून दंड थोपटून गाण्याच्या तालावर खासदार ओमराजेना आव्हान
नादी नको लागू माझ्या तुला चांगलाच रडविन,ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडविल गाण्यावर मल्हार पाटलांचे रील व्हायरल
स्मित हास्य करत खासदार ओमराजे निंबाळकरून भाजप कार्यकर्त्यांना प्रतिसाद
चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर आज आरतीच्या वेळेत बदल...
दररोज रात्री 10:30 वाजता होणारी शेजारती आज रात्री 9:15 मिनिटांनी होणार...
आरतीनंतर साई मंदिर होणार बंद...
आरतीची वेळ ग्रहण काळात असल्याने आजच्या आरती वेळेत करण्यात आलाय बदल.
ओबीसींचे हक्क, अधिकार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यभरात आंदोलन करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपली संघर्ष यात्रा 2.0 सुरू ठेवली आहे.
या यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन ते जनजागृती सभा घेत आहेत. यापूर्वी ही त्यांच्यावर 8 वेळा काही समाजकंटकांनी जीवघेणे हल्ले झाले.
तरीही, हाके यांनी न घाबरता बीड जिल्ह्यातील गेवराई, केज आणि धारूर येथील दौरे सुरू ठेवले आहेत.
धारूर तालुक्याच्या वतीने भोगलवाडी येथे ‘महा एल्गार सभा’चे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण आणि गणेशोत्सव यामुळे ओस पडलेले मच्छी बाजार आज पुन्हा गजबजले आहेत.
गेल्या काही दिवसात मासे बाजारात मत्स्य खवयांनी पाठ फिरविली होती.
मात्र काल गणपती विसर्जन झाल्यानंतर आणि आज पहीलाच रविवार आल्यामुळे मासे बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. माशांचे दरही त्यामुळे वधारले होते.
पापलेट सोळाशे रुपये किलो, सुरमई तेराशे रुपये, मोरी मासा सहाशे ते आठशे रूपये किलो तर बांगडे तीनशे ते चारशे रुपये किलो अशा दराने विकले गेले.
माशांचे दर वाढलेले असूनही खवय्यानी ते खरेदी केल्याचे पाहायला मिळत होते.
अलका टॉकीज चौकात भाविकांची गर्दी
डीजे ने अलका चौक दणाणला
आता पर्यंत १२० मंडळ अलका चौकातून विसर्जनाला गेले..
कुमठेकर रोड, लक्ष्मी रोड वरून अजून ही मंडळ सुरू
विसर्जन मिरवणूक सुरू होऊन झाले २४ तास
अनेक मंडळांचे विसर्जन अजून बाकी
यंदाही पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला विलंब होण्याची शक्यता
काल बरोबर ९.३० वाजता पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणुक झाली होती सुरू
अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जन केल्यानंतर कोकणवासीय चाकरमानी आता मुंबईकडे रवाना व्हायला सुरुवात झाली आहे. कोकणातली सर्वच रेल्वे स्टेशन गर्दीने फुलून गेली आहेत. अनेक प्रवाशांना तिकीट न मिळाल्याने दुप्पट तिप्पट दराने तिकीट घ्यावी लागली आहेत.
कालपासून अलका टॉकीज चौकातून १०० मंडळाच्या गणपतींचे विसर्जन
काल सकाळी ९.३० वाजता झाली होती पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
अजूनही अनेक मंडळ त्यांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी या विसर्जन मिरवणुकीत सहभागी
शिक्षक दीन सर्वत्र साजर होत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या शेलोडीच्या जिल्हा परिषद शाळेत आगळा वेगळा शिक्षक दीन साजरा करण्यात आलाय. .
शाळेतील शिक्षकांची गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आलीय ..
दरम्यान ग्रामस्थांसह विद्यार्थ्याच्या शिक्षकांवर पुष्पवृष्टी सुद्धा केलीय. .
यावेळी शिक्षकांचा शाल श्रीफळ हार घालून सन्मान ही केलाय .
एकीकडे सरकारी शाळा ओस पडत असताना चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलोडी येथील शाळेत 2009 पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी, नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळा ठरलेली आहे..
चंद्रग्रहनाच्या पाश्र्वभूमीवर आज तुळजाभवानी मातेचा धार्मिक विधीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
तसेच राञी ९.५७ ते १.३० या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला शुभ्र श्वेत सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे.
शिवाय ग्रहनकालावधीत देवीच्या नित्योपचार धार्मिक पुजा विधीत बदल करण्यात आला आहे.
तसेच ग्रहण सुटल्यानंतर सोमवारी पहाटे १.३० वाजता पंचामृत स्नान , शुद्ध स्नान आरती व धुपारती होईल. तर सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून नित्याची पूजा होईल.
दहा दिवस गणरायाची मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर अखेर बाप्पाला निरोप द्यावा लागतो. मात्र बाप्पाला निरोप देताना अनेकांना असह्य वेदना होत असतात. अशातच बाप्पाला निरोप देतं असतांना एक चिमुकली धाय मोकलून रडत असल्याचं दिसून आले आहे. अमरावतीच्या विद्यापीठ परिसरातील दत्तविहार कॉलनीतील श्रीजा थोरात हिचा हा व्हिडिओ असून सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे या चिमुकलीची बाप्पांवर असलेली आस्था आणि निरागसता पाहायला मिळत आहे. दरम्यान थोरात कुटुंबियांनी आपल्या घरीच एका टब मध्ये बाप्पाचे विसर्जन केले आहे. बाप्पा विसर्जित झाल्यानंतर त्याच मातीत थोरात कुटुंब एक झाड लावणार आहे. त्यामुळे त्यांच्या इको फ्रेंडली निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
धाराशिव शहरासह जिल्ह्याभर गेली दहा दिवसाच्या भक्तीमय गणेशोत्सानंतर मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आलाय.सजवलेल्या वाहनातून बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली यामध्ये काही मंडळानी पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे देखावे उभे केले,काहीनी ऐतिहासिक गोष्टींना उजाळा दिला ढोल ताशा व लेझीम पथक पारंपरिक खेळाचे सादरीकरण हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
गणेशोत्सव म्हटलं की तो चिमुकल्यांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि थिरकण्याचा खास सोहळाच असतो.
जळगावजामोद शहरातील विविध गणेश विसर्जन मिरवणुकांना भेटी देत असताना, चिमुकल्यांच्या आग्रहास्तव जळगावजामोद मतदार संघाचे भाजपा आमदार डॉ. संजय कुटे हे त्यांच्या तालावर मनसोक्त थिरकले
आणि त्यांच्या निरागस आनंदात सहभागी होऊन तो क्षण द्विगुणित केला.
मिरवणुकीदरम्यान लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण थिरकत होते.
डॉ. संजय कुटे सुद्धा चिमुकल्यासह थिरकण्याचा मोह आवरू शकले नाही आणि त्या क्षणी बाप्पाच्या आनंदमय ऊर्जा सगळीकडे जाणवली.
जी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष याचा शुक्रवारी सायंकाळी नाना पेठेत गोळीबार करून खून करण्यात आला
गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकर असे खून झालेल्याचे नाव
या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडूअण्णा आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, पुतण्या शिवम आंदेकर, नातू स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, अमन युसुफ पठाण उर्फ खान, यश सिद्धेश्वर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
लातूर जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळाला, जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात हलकीचा ठेका, आणि सुरसनई ,लेझीमच्या तालावर लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.,
तर सकाळपासून शहरात मानाच्या गणरायांची मिरवणूक निघाली होती.,
तर यंदा जिल्ह्यात डॉल्बी मुक्त मिरवणुका काढल्याने, ढोल ताशा यांच्या पथकाने संपूर्ण शहर दुमदुमले होते.
फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशाचा गजर करत आपल्या लाडक्या बाप्पाला लातूरकरांनी अगदी मनापासून निरोप दिलाय..
11 दिवस विधीवत पुजा आर्चा केल्यानंतर रात्री उशिरा रायगडकरांनी आपल्या बाप्पाला भावपुर्ण निरोप दिला.
पारंपारीक खालू वाद्यावर लेझिम नाचत या मिरवणुका विसर्जन ठिकाणी रात्री उशिरा पोहचल्या.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त साद घालत गणेश मुर्तींच विसर्जन करण्यात आल.
रायगडमध्ये 169 सार्वजनिक तर 18 हजार 42 खाजगी गणपतींना निरोप देण्यात आला. रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूका सुरू होत्या.
गेल्या महिन्यात २७ ऑगस्ट रोजी आपल्या लाडक्या गणरायच आगमन झालं. आणि अखेर आज त्याच्या निरोपाची वेळ आली.
काल अनंत चतुर्दशीला मंडळांच्या ११ दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
मात्र सर्वांचा लाडका लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे.
थोड्याच वेळात त्याचे विसर्जन होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय.
मुसळधार पावसामुळे शेतातील कपाशी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कपाशीवर करपा, मावा व पान खाणारी अळी व कीडरोग डोके वर काढत आहेत.
भरधाव जाणाऱ्या एका केटीएस ट्रक चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांना चिरडले यामध्ये एक वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर पती-पत्नीसह मुलगा गंभीर जखमी झाले.
ही दुर्दैवी घटना यवतमाळच्या पुसद तालुक्यातील मारवाडी ते सत्तरमाळ मार्गावर घडली.
घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. श्रीराम राठोड वय 70 वर्ष राहणार मारवाडी खुर्द असे मृत झालेल्या वयोवृद्धाचे नाव आहे.
भव्य विसर्जन देखाव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या शनिपार मंडळाने यंदा बाप्पाला निरोप देण्यासाठी तब्बल ३५ फुट उंच देवमासा साकारला.
या अतिदिव्य अशा देवमासाच्या प्रतिकृतीवर गणरायाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.
गेल्या अनेक वर्षांपासून शनिपार मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीसाठी मोठे मोठे देखावे तयार करण्यात येतात.
मोरारी बापू यांचा रामकथा पर्व सोहळवा यवतमाळ येथील चिंतामणी मार्केट यार्ड लोहारा इथे आज पासून आयोजित करण्यात आलाय. या कथा पर्व सोहळ्यासाठी नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने सात ते 14 सप्टेंबर या कालावधीत यवतमाळ शहरातील विविध 18 ठिकाणाहून विशेष बस फेऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विघ्नहर्त्याचे विसर्जन चंद्रपूर भाजपात विघ्न निर्माण करणारा ठरला. विसर्जनाच्या निमित्ताने भाजपमधील दोन दुफळी पुन्हा एकदा समोर आली.
चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गावरून बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघते.
हजारो लोक यात सहभागी होतात. बाप्पाला शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे मंडप रस्त्याशेजारी लागतात. हा दरवर्षीचा शिरस्ता आहे.
आजवर भाजपतर्फे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच मंडप राहायचा. मात्र, भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी आपला वेगळा मंडप उभारला.
त्यामुळे मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे यानिमित्ताने दिसून आले. आजपर्यंत जिल्ह्यातील भाजप मुनगंटीवार यांच्याभोवती केंद्रित होती.
रत्नागिरीतील प्रसिद्ध श्री रत्नागिरीचा राजा या गणपतीच आज विसर्जन होणार आहे.
रत्नागिरीचा राजाच्या प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दर्शन घेतलं.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ निर्णय घेतील.
युती संदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार भाजपच्या वरिष्ठांना.
त्यामुळे या संदर्भातील लवकरच गोड बातमी कोकणवासी यांना मिळेल अशी अपेक्षा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली
क्रांतिकारी गणेशोत्सव मंडळाचा विसर्जन सोहळा आज उत्साहात पार पडला. गणरायाच्या आरत्या, डफडे व डि जे चा गजर आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पांना साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला.
यावेळी तरूणांनी विशेष गर्दी केली होती. परिसरातील नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. डफड्यांच्या तालावर रविकांत तुपकर यांच्या परीवारातील सर्वांनी. चौकट डान्स केला .
यावेळी महीला भगीनी पण थिरकल्या रविकांत तुपकर व सौ शर्वरीताई तुपकर यांनी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला.
विसर्जना वेळी गणपती बाप्पां चं ट्रैक्टर चालवत रविकांत तुपकर यांनी स्वतः सारथ्य केले गणपती विसर्जनाच्या वेळी वाजत-गाजत, डफडे व डि जे च्या गजरात भावपूर्ण वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.
पैनगंगा नदी मध्ये बाप्पांचं विसर्जन केले गेले.उत्साह आणि ओढीबरोबरच डोळ्यांत पाणी आणणारा हा निरोपाचा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी आसमंत दणाणून गेला
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.