एसटी बसमधून उतरून रस्ता ओलांडणाऱ्या शाळकरी विद्यार्थिनीला भरधाव स्कॉर्पिओनं धडक दिली. या धडकेत शाळकरी मुलगी रस्त्यावर दूरवर फेकल्या गेली. त्यात ती गंभीर जखमी झाली. हा अपघात भंडारा - रामटेक महामार्गावरील सातोना गावातील चौकात घडला. या भीषण अपघाताची संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. घटनेनंतर गावातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत, गंभीर जखमी मुलीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
मुंबई गोवा महामार्गावरील वडखळ पुलावरून एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. दोन दिवसा पुर्वी या पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळून भगदाड पडले होते. भगदाड पडलेल्या या पुलाचे स्ट्रक्चर ऑडीट करण्याऐवजी काँक्रिटने खड्डा भरावा त्या प्रकारे हे भगदाड भरण्यात आले असून आज याच पुलावरून वाहतुक सुरु करण्यात आली आहे. प्रवासी, पर्यटक आणि वाहन चालकांच्या सुरक्षेची दक्षता न घेता भगदाड पडलेल्या पुलावरून वाहतूक सुरु झाल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.
सातारा जिल्ह्यातील तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत आरोग्य सेवांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा, औषधांचा साठा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती तसेच आरोग्य केंद्रातील विविध विभागांची माहिती घेतली.
गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३सीच्या रखडलेल्या कामाविरोधात तरुणांनी अनोखे आंदोलन छेडलं आहे. 'आधी रस्ता पूर्ण करा' अशी मागणी करत त्यांनी चक्क महामार्गालाच प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांकडून एक किलो गांजा
फुरसुंगी परिसरात गांजा विक्रीवर अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचा छापा; सुमारे १ किलो गांजा जप्त
डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी केली कारवाई
अमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या ८४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले
तपासणीनंतर गांजा सेवन केल्याचे आढळलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल
पुण्यात हडपसर,मांजरी,कवडी फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर जवळ खड्ड्यांनी नागरिक संतप्त
प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
पुणे -
पुण्यात सराईत गुन्हेगारांकडुन धारदार १२ लोखंडी शस्त्रे जप्त
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
पर्वती पोलीस स्टेशन हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व आरोपी शोध घेत असताना जनता वसाहत पर्वती परिसरात सापडले शस्त्र..
गौरव कांबळे व त्याचे ३ मित्रांसोबत जनता वसाहत पर्वती पुणे येथे बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे घेवुन उभा असताना पोलिसांनी केली कारवाई..
नंदुरबार -
शहादा धडगाव घाटात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई
कार्यवाहीत 59 लाख 80 हजार रुपयांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त
रॉयल ब्लू मार्ट व्हिस्की चे 470 बॉक्स आणि 2 महिंद्रा बोलेरो वाहने जप्त
मध्य प्रदेशातील एका आरोपीला अटक एक चालक फरार
अनधिकृतपणे दिलेलं आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही, हे आम्ही आधीपासूनच सांगत होतो. तुम्ही सगळ्यांची फसवणूक करताय, सरकार असंवैधानिक गोष्टी करण्यासाठी का झुकतंय, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. ओबीसींच्या आरक्षणाला संवैधानिक आधार आहे, पण हे असं कोणीतरी जबरदस्ती मागतोय आणि सरकार देत आहे. कोणाच्यातरी दबावाखाली झुकून सरकारने ओबीसी आरक्षणाचा गळा दाबू नये. कोणाच्या दबावामुळे जर सरकार आरक्षण देत असेल तर ते न्यायालयात टिकणार नाही आणि याची सुरुवात या कास्ट व्हॅलेडीटी आणि कास्ट सर्टिफिकेट रद्द होण्यापासून झालेली आहे. मी जरांगे पाटलांना दोष देणार नाही; पण ते कायद्यानुसार योग्य नाही, हे कायद्याने दाखवून दिलं आहे.
पर्वती पोलीस स्टेशन हददीत गुन्हे प्रतिबंधक गस्त व आरोपी शोध घेत असताना जनता वसाहत पर्वती परिसरात सापडले शस्त्र..
गौरव कांबळे व त्याचे ३ मित्रांसोबत जनता वसाहत पर्वती पुणे येथे बेकायदेशीरपणे धारदार शस्त्रे घेवुन उभा असताना पोलिसांनी केली कारवाई..
आरोपी नामे गौरव राजु कांबळे वय १८ वर्षे जनता वसाहत पर्वती व त्याचे ३ विधीसंघर्षित साथीदारासंह ८हजार ५०० रुपये किमतीच्या एकुण १२ धारदार लोखंडी शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले आहे.
या आरोपी विरोधात पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस करत आहेत.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभागांतर्गत नंदुरबार आगारात 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या असून त्यांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. नंदुरबार नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते बसचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. ढोल ताशांच्या गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत पार पडलेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी नवीन बसने शहरात फेरफटका मारला.
सर्व सुविधायुक्त असलेल्या या बसेसचा प्रवाशांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले असून प्रवासी महासंघाच्या मागणीला अखेर यश आले आहे...
दुर्गम आदिवासी आणि पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या भागांतील एकाही पात्र नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आयुष्मान कार्ड ई केवायसी मोहिमेला गावागावांत गती देण्याचे निर्देश डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत दिले. जिल्ह्यात 7 लाख 46 हजार 372 नागरिकांची 50.35 टक्के ई केवायसी पूर्ण झाली असून, मोहीम वेगाने राबवण्यासाठी 1 हजार 162 लॉगिन्स पुन्हा सक्रिय करण्यात आले आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेत कामगारांच्या थकीत पगाराचा मुद्दा चांगलाच पेटला असून, कामगारांनी थेट आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या कार्यालयाबाहेर आक्रोश आंदोलन केले. “मनीषाताई बोलो… पगार दे दो!” अशा घोषणांनी महापालिकेचा पहिला मजला अक्षरशः गजबजून गेला.
पूरप्रसंगी सांगलीकर नागरिकांना मदतकार्य व सुरक्षेसाठी बोट लोकार्पण सोहळा पार पडला..यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत प्रतिष्टान कडून बोट देण्यात आली.. या सोहळ्याला डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होते.. सांगलीच्या अरविंद पुलाजवळ हा सोहळा पार पडला.. सांगली जिल्ह्याला दरवर्षी पोराचा फटका बसत असतो. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मदत कार्य म्हणून बोटीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.. यावेळी शिवसेना नेते यांनी उदय सामंत यांच्याकडे बोट देण्याची मागणी केली.. यावेळी उदय सामंत प्रतिष्ठानकडून ही बोट सांगलीकरांना देण्यात आली..
नंदुरबार पोलिसांनी वाकड भागातून घेतलं ताब्यात
मंदार चौधरी असे मुलाचे नाव असून चौकशीसाठी घेतलं ताब्यात
नंदुरबार भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपवरून राजकीय वाद रंगला होता
कपील सिब्बल यांनी युक्तीवाद केला
सिब्बल यांनी कोर्टात घटनाक्रम माडंला
शिंदे गटाने स्वत: २०१८च्या पक्षघटनेत बदल केले
बैठकीच्या अध्यक्षपदी स्वत: एकनाथ शिंदे होते.
मूळ पक्षघटना अस्तित्वातच नव्हती असा तर्क सिब्बल यांनी मांडला
शिवसेना चिन्ह आणि पक्षावर सुनावणी सुरू
ज्येष्ठ वकील कपिल सिबल बोलत आहेत
तारखांच्या यादीत माझे नाव होते.
२६.०७.२०२२ रोजी एक बैठक झाली होती.
या बैठकीचे अध्यक्षस्थान एकनाथ शिंदे यांनी भूषवले होते आणि त्यात शिवसेनेचे २ नेते उपस्थित होते
त्यांनी स्वतःच २०१८ चे संविधान बदलले
मराठ्यांशी एकनाथ शिंदे बेईमान झाले, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे एवढा जिव्हारी वार करतील असं वाटलं नव्हतं
वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द केलेले नाही सरकारने रद्द केले आहे
मंत्री बावनकुळे यांनी प्रमाणपत्र रद्द करायला लावले
नोंदी शिंदे समितीने शोधल्या ग्रामपंचायतला लावल्य
कॉक्रोज जनता पार्टीची पत्रकार परिषद सुरू झाली आहे.
-लातूर महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. सभागृहात विविध प्रश्नांवरून भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भरत गोगावले अचानक दरे गावामध्ये दाखल झाल्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. ठाकुर्ली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या कार्यकर्त्यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.
बीडच्या माजलगाव शहरात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी महापुरुष स्मारक बचाव संघर्ष समितीच्या वतीने तीव्र रूपाची उपोषण करण्यात आले होते. यानंतर जिल्हा प्रशासन अक्षय मोड वरती थेट माजलगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत अनधिकृत पणे करण्यात आलेल्या अतिक्रमानावरती जेसीबीच्या साह्याने तोडक कारवाई करण्यात आली असून त्यावरती हातोडा चालवला आहे या कार्यवाहीमुळे आता माजलगाव शहरातील गुदमरलेला श्वास मोकळा होईल अशी भावना आता माजलगावकर व्यक्त करत आहेत.
जरांगेंच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे मत मांडले आहे. ते म्हणाले जात पडताळणी विभाग स्वतंत्र आहे. त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही.
जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी काढलेल्या अनुदगाराच्या निषेधार्थ जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जळगाव येथील काँग्रेस भवनासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
होमिओपॅथी डॉक्टरांच्या एमएमसीमध्ये नोंदणीला नंदुरबार मधून देखील विरोध
चुकीची प्रॅक्टिस थांबवा रुग्ण वाचवा असा फलक घेऊन डॉक्टरांचं आंदोलन
मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन असच सुरू राहणार असल्याचा डॉक्टरांचा पवित्रा
हत्ती एवढीच स्त्री मध्ये क्षमता, पण कधीही ती दाखवत नाही"
इतिहासात राणी अहिल्याबाई यांचे सर्व जीवन लोकांसाठी होते, तसेच सुनेत्रा पवार यांचे जीवन आहे
सुनेत्रा पवार यांचे जीवन आता महाराष्ट्रासाठी आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी धमक आणि त्या नक्की करून दाखवतील
कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी सरकारचा कट
सरकार मराठा समाजाचं नुकसान करतंय
हा सरकारचा कट आहे हे सिद्ध करून दाखवणार
नोंदी सापडूनही प्रमाणपत्र रद्द केली
देशातील नामांकित आयटी पार्क पैकी एक असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात देखील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. आयटी पार्क हिंजवडी मान आणि मारुंजी परिसरातून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सांगोला तालुक्यात अवैध गर्भलिंग निदान करताना एका एजंटला सांगोला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात ही कारवाई करण्यात आली.
वाकी शिवणे गावात एका घरामध्ये बेकायदेशीर गर्भ लिंगनिदान करत असल्याची गुप्त माहिती पोलीस हवालदार शिवाजी पांढरे यांना मिळाली होती. याची सखोल माहिती घेतली असता भास्कर रामचंद्र घाडगे हा व्यक्ती मंगळवेढ्यावरून आलेल्या एका पती-पत्नीला आपल्या घरामध्ये बोलवून गर्भलिंगनिदान करत होता.
बीएचएमएस डॉक्टरांना एक वर्षाचा कोर्स करून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणी करता येणार असल्याने राज्य सरकारचा निर्णया विरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात आहे... आज अन्य सुविधांसह ओपीडी बंद ठेवली आहे...याचा परिणाम आरोग्य सेवेवर पडताना दिसून येत आहे...
- द्वारका परिसरात वाहन घसरुन एक दुचाकीचालक गंभीर जखमी
- नाका तोंडातून आले रक्त, ईतर वाहनचालकांनी जवळीलच एका खासगी रुग्णालयात केले उपचारासाठी दाखल
- पावसामुळे रस्ते चिखलमय झाल्याने अपघातांची मालिका सुरू
चंद्रपूर जिल्ह्यातील कारवा येथील आश्रमशाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोप मुलांच्या पालकांनी केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवापूर तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे शिवण नदीवरील खोलघर धरण ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात पूर्णपणे भरले आहे. या धरणाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी शिवण नदीद्वारे विरचक प्रकल्पात जमा होत असल्याने,अवघ्या पाच दिवसांत विरचक धरणातील पाणीसाठा 5 टक्क्यांनी वाढून 52 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कोपरगाव तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्यांचा मुक्त संचार वाढला आहे.. आज पहाटेच्या सुमारास येसगाव शिवारातील भानुदास म्हस्के यांच्या वस्तीवर बिबट्याने अचानक एन्ट्री केली.. दबक्या पावलांनी भक्ष्याच्या शोधत आलेल्या बिबट्याने म्हस्के यांच्या घराच्या अंगणात झोपलेल्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करत, त्याला उचलून नेले.. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे
मेहकर आगाराच्या निष्काळजी कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जानेफळ येथे विद्यार्थी व प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या एसटी बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावर गळून पडली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, मात्र या घटनेने बसच्या तांत्रिक तपासणीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नाशिकच्या लासलगाव शहरांमध्ये बस स्टँड परिसरामध्ये असलेल्या एका वडापाव दुकानाला रात्रीच्या वेळी अचानक आग लागली होती
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना कळताच त्यांनी तातडीने परिसरात असलेल्या सार्वजनिक मित्र मंडळाच्या टँकर सह कार्यकर्त्यानी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न केले
मात्र आगीमध्ये सर्व दुकान जळून भस्मसात झाले होते.मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आणि कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या लोकप्रतिनिधीची बैठक
बैठकीसाठी लोकप्रतिनिधी भेटीसाठी अंतरवाली सराटीत दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भात चर्चेला झाली सुरुवात
गांजा विक्रेत्यांना पकडण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाने तुकाई टेकडी परिसरात सापळा रचला.
अवघ्या *९० मिनिटांत तब्बल ८४ जण* गांजा खरेदीसाठी तेथे पोहोचले. साध्या वेशातील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनाच त्यांनी गांजा विक्रेते समजून संपर्क साधला.
या ८४ जणांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत तरुण नोकरदारांचा समावेश होता.
पुण्यातील कॅम्प भागात कारच्या दरवाजाला धडकून विचित्र अपघात
दुचाकी चालकाचा जागेवरच मृत्यू
सूर्यकांत लक्ष्मण बिडकर मयत असे व्यक्तीचे नाव
अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अकोली बु. ग्रामपंचायत कार्यालयात अतिवृष्टी नुकसानीच्या सर्वेक्षणाचे शासकीय काम सुरू असताना महिला ग्रामविकास अधिकारी किरण चांदेकर यांच्यावर दगडफेक करून त्यांना जखमी करण्यात आले. सुरज सुधाकर ससाणे (रा. अकोली बु.) याने मद्यधुंद अवस्थेत कार्यालयात येऊन शिवीगाळ करत दगडफेक केल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी तामगाव पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, मारहाण व धमकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास बोपटे करीत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोठी–कोरणार पूल अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या तडाख्याने खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुलाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत असून परिसरातील १६ गावांचा संपर्क पुन्हा धोक्यात आला आहे.
आज पासून निवासी डॉक्टर संपावर जाणार ससून मधील 250 डॉक्टरांचा समावेश
बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी मध्ये नोंदणी करून प्रमाणपत्र देण्याला ऍलोपथी डॉक्टरांचा विरोध आहे
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ मेडिकल कडून सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फॉर्मकॉलजी बीएचएमस डॉक्टरांना प्रमाणपत्र दिले जात आहे
रत्नागिरी शहरालगत खेडशी येथील महालक्ष्मी मंदिरासमोरील नव्याने बांधलेल्या काँक्रीट रस्त्यावर तब्बल सात फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असलेल्या अजगरामुळे काही काळ वाहतुकीचा वेग मंदावला, मात्र सतर्क वाहनचालकांच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य अपघात टळला.गुळगुळीत काँक्रीट रस्त्यावर अजगराला पुढे सरकणे कठीण जात असल्याने तो बराच वेळ रस्त्यावरच अडकून पडला होता
मुद्रांक शुल्कातून २२ हजार कोटींची कमाई
गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्नात १७ टक्के वाढ
- आरएसएस शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा अमेरिका-कॅनडा दौरा
- २९ ऑगस्टला न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये 'वननेस सेलिब्रेशन' कार्यक्रमात मोहन भागवतांचे बीज भाषण होणार
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षात तरुणांपर्यंत म्हणजेच झेनजी पर्यंत पोहोचण्यासाठी नवनवे उपक्रम हाती घेतलेले आहे..
- सहकारी संस्थेच्या चौकशीचे आदेश देण्याचा सहकार राज्यमंत्र्यांना अधिकार नाही नागपूर खंडपीठाचे महत्वपूर्ण निर्देश....
- अकोला लेबर फेडरेशनविरोधातील राज्यमंत्र्यांचा चौकशी आदेश रद्द
- मंत्र्यांनी अधिकारांची व्याप्ती ओलांडल्यानं नागपूर खंडपीठाचे ताशेरे
भीमा नदीची पाणी पातळी वाढली..
लवंगी - उमराणी बंधारा पाण्याखाली..
दक्षिण सोलापूर,अक्कलकोट तालुक्यातील नदीकाठच्या शेतीत शिरलं पाणी
अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील निंभा गावाजवळ पेढी नदीवरील निम्म-पेढी धरणामुळे बाधित झालेल्या अळणगाव गावाचे पुनर्वसन कठोरा पोटे टाऊनशिप समोर करण्यात आले आहे. मागील आठ ते नऊ वर्षांपासून या पुनर्वसित गावात नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, पुनर्वसनावेळी करण्यात आलेल्या नागरी सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील मोहदा येथे दरोडा आणि धाडसी चोरी अशा दोन घटना एकापाठोपाठ घडल्या होत्या.यवतमाळ पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना पुण्यातून अटक केली.त्यांच्याकडून चारचाकीसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.पसार आरोपींचा सात पोलिस पथकांकडून शोध घेतला जात आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह ‘गुंगी गुडिया’ या टिप्पणीचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली असून विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. नवी मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करत ‘जोडे मारो’ आंदोलन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.