भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाच्या हद्दीत हा अपघात झाला बाप लेकी हे देवदर्शन करण्यासाठी गेले होते देवदर्शनावरून घरी परतत असताना भिवंडी तालुक्यातील डोहोळे गावाजवळ महामार्गावरील भरधाव येणाऱ्या ट्रॅकने दुचाकीस मागून धडक दिल्याने अपघात झाला.
दुरबार जिल्ह्यात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील संवेदनशील भागातून जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पथसंचालन करण्यात आले आहे. शहरातील नेहरू चौक परिसरातून पतसंचालनाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील माळीवाडा, काली मस्जिद, मंगळ बाजार, शिवाजी महाराज नाट्यमंदिर ते शहर पोलीस ठाणे पर्यंत पथसंंचालन करण्यात आले असून उद्या होणाऱ्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडावे यासाठी पोलीस दलाने शक्ती प्रदर्शन करत शहरभरातील संवेदनशील भागातून पथसंचालन केले आहे.
सर्वच मराठा ओबीसीत जाणार असेल तर सर्वच व्हीजेएनटी आणि सर्वच बलुते आलुते एस सी आणि एसटीमध्ये जातील. मुख्यमंत्र्यांना गॅझेटवरून जात बदलण्याचा अधिकार कोणी दिला, असा सवाल हाकेंनी केला.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंतरावली सराटीमध्ये मागील पाच दिवसापासून ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू होतं आजओबीसी उपसमितीचे सदस्य आणि मंत्री अतुल सावे यांच्या फोननंतर अंतरवाली सराटी येथील ओबीसी बांधवांचे उपोषण स्थगित झालं आहे.अतुल सावे यांच्या आश्वासनानंतर उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थगित केल आहे. अंबडचे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते पाणी घेऊन या उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडल आहे...
- गणपती विसर्जन मिरवणुकीवर असणार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच
- विसर्जन मिरवणूक मार्गावर ८४ सीसीटीव्ही आणि ३ हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार तैनात
- यंदा पहिल्यांदाच गणपती विसर्जन मिरवणुकीत एआय कॅमेरांचा वापर
- विसर्जन मिरवणूक मार्ग एआय कॅमेरांच्या निगराणीखाली
- गणपती विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांची जय्यत तयारी
- मुस्लिम बहुल भागातून गणपती विसर्जन मिरवणूक जात असल्याने नाशिक पोलीस अधिक सतर्क
- विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर देखील बंदी
- रात्री १२ वाजेपर्यंत गणपती विसर्जन मिरवणुकीला परवानगी
बाईट - संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक
राजापूरच्या हातिवले टोल नाका दरम्यान हा भीषण अपघात घडला
या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी महिंद्राची मेराझो कार अचानक थेट ट्रकच्या खाली घुसली आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
5 जणांच्या टोळक्याकडून बेकरीची तोडफोड करत एकावर एडक्याने हल्ला
कोल्हापुरातल्या शालिनी पॅलेस ते फुलेवाडी पेट्रोल पंप मार्गावरील घटना
बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड
जवाहरनगर येथील 5 जणांना जुना राजवाडा पोलिसांनी केली अटक
पुणे शहरात उद्या होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या निमित्ताने ठिकठिकाणी शुभेच्छांचे फ्लेक्स लागले आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे एकत्रित असलेल्या एक फ्लेक्स सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरतोय. शहरातील अलका टॉकीज चौकात लागलेला या फ्लेक्सवर दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. राज्याच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं हीच श्रींची इच्छा आहे असं साकडं सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या फ्लेक्स च्या माध्यमातून गणरायाकडे केलं आहे
नंदुरबार शहरातील चौधरी परिवाराकडून मागील पंधरा वर्षापासून पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना करण्यात येत असते दरवर्षी नवनवीन देखावा साकारण्यात येत असून यावर्षी चौधरी परिवाराच्यावतीने खानदेशाची कुलस्वामिनी असलेल्या आईशप्तसुंगी गडाच्या देखावा सादर केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी वृत्तपत्र, घरगुती रंगाच्या वापर करून शंभर टक्के पर्यावरण पूरक असा देखावा तयार करण्यात आला आहे. सप्तशृंगी गडाच्या देखावा पाहण्यासाठी परिसरातील चिमुकले मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात चौधरी परिवाराकडून तयार करण्यात आलेल्या सप्तशृंगी गडाच्या देखावा सध्या शहरभरात चर्चेच्या विषयी ठरत आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो लागवड केली होती, पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतातील झाडे खाली पडली असून झाडावरील टोमॅटो खराब झाले आहेत, त्यामुळे व्यापारी वर्ग हा माल घ्यायला तयार नाही, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
काशीगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जेपी नॉर्थ समोर "हिल गॅलेक्सी" या नव्या प्रोजेक्टची जाहिरात सोशल मीडियावर करण्यात आली होती. या जाहिरातीत प्रार्थना स्थळ, मशीद व प्राण्यांचा बळी देण्यासाठी जागा उपलब्ध असल्याचे नमूद करण्यात आले होते. या बांधकामस्थळी जाहिरात फलकही लावण्यात आले होते.
उल्हासनगरमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सरिता खांनचंदानी यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले असून, या प्रकरणात उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांचे नाव जाणूनबुजून गुंतवण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
- नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला
- दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला
- दारणा धरणातून ४६०० क्यूसेक वेगानं दारणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
- तर गंगापूर धरणातून देखील सकाळपासून २०३० क्यूसेक वेगानं सोडण्यात येतंय पाणी
- नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
- उद्या गणपती विसर्जनासाठी नदीकिनारी जाणं टाळा, प्रशासनाचं आवाहन
- कृत्रिम तलावत गणपती विसर्जन करा अथवा मूर्ती दान करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन
- गणपती विसर्जनासाठी पालिकेकडून २८ नैसर्गिक तर ४९ कृत्रिम तलावांचं नियोजन
राज्यातील CCMP कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची MMC मध्ये होणार नोंद.
महाराष्ट्र वैद्यक परिषदेला (एमएमसी) स्वतंत्र नोंदणी पुस्तकात नोंद करण्याचे आदेश.
राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा.
कल्याण मध्ये मुख्य बाजारपेठेत 22 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. वारंवार तक्रार करून देखील महावितरण विभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. याआधी ही कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौक पर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याच्या याच्या फटका बसत आहे. गेल्या वावीस तासांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने कल्याण मधील व्यापाऱ्यांनी महावितरणच्या भोंगलकाराबाराच्या नाराजी व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे
धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील खेड येथे इस्लाम धर्माचे प्रेषित व शांततेचे संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या ईद ए मिलादुन्नबी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला फातिहा ख्वानी करण्यात आली.त्यानंतर गावातून जुलूस काढण्यात आला.या कार्यक्रमात उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आल,यावेळी मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहण्यास मिळाला.
कल्याणमध्ये मुख्य बाजारपेठेत 22 तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. वारंवार तक्रार करून देखील महावितरण विभागाकडून दुर्लक्ष केला जात आहे. याआधी ही कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली चौक पर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना याच्या याच्या फटका बसत आहे. गेल्या वावीस तासांपासून वीज पुरवठा खंडित असल्याने कल्याण मधील व्यापाऱ्यांनी महावितरणच्या भोंगलकाराबाराच्या नाराजी व्यक्त करीत निषेध व्यक्त केला आहे
दहा दिवसांच्या उत्सवानंतर उद्या अनंत चतुर्दशी निमित्त राज्यात सर्वत्र विसर्जन मिरवणुकींचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्यातील विसर्जन मिरवणुकांची सुरुवात उद्या सकाळी ९.३० वाजता होणार आहे. मानाच्या गणपतीसह शहरातील प्रमुख गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी पुणे शहरात मोठी गर्दी होते. सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सुद्धा तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मानाच्या गणपती पासून होते. याच अनुषंगाने यंदा मानाच्या पाच ही गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणुकीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मानाचा पहिला म्हणजेच पुण्याचे ग्रामदैवत असलेला कसबा गणपती ची मिरवणूक सकाळी ९.३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरुवात होईल. तसेच शहरातील प्रमुख आकर्षण असलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी चार वाजता बेलबाग चौकातून सुरू होईल.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात घडलेली एक घटना राज्याला हादरवून सोडणारी आहे. खेळता खेळता अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने आईच्या मांडीवर प्राण सोडले. ही घटना हृदय पिळवटून टाकणारी असली तरी राज्यभरात लहान वयात हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलावर अखेर सुरक्षा भिंत बांधली....
पूल शिकस्त झाल्याने रेल्वे पुलावरील वाहतूक प्रशासनाने बंद केली आहे..
पुलावरून कुठलेही वाहन जाऊ नये यासाठी आता थेट विटांची मजबूत भिंत बांधली आहे...
साठ वर्षांपूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते...
विघ्नहर्त्याचे विसर्जन आता काही तासांवर आले आहे. हे विसर्जन शांततेत आणि निर्विघ्न पार पडावे, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. आज ईद आणि उद्या विसर्जन असे दोन उत्सव लागोपाठ आल्याने पोलिसांनी आज शहरातून रूट मार्च काढला. नागरिकांना शांततेचे आवाहन केले. विसर्जन लक्षात घेता प्रत्येक मुख्य चौकात मचाण उभारण्यात आली असून, त्यावरून मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. फिरते सीसीटीव्ही वाहन, ड्रोन आणि इतर साधनांच्या मदतीने संपूर्ण मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे. विसर्जनाच्या बंदोबस्तासाठी जवळपास बाराशे पोलिस कर्मचाऱ्यांची तैनाती केली जाणार आहे. यात चार एसडीपीओ, 40 पोलिस निरीक्षक आणि 800 पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचा समावेश आहे.
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सवावर खड्ड्यांचं ग्रहण लागल्याचे चित्र समोर येत आहे. बाप्पाचं आगमनही खड्ड्यातून झालं आणि आता विसर्जनही त्याच खड्ड्यातून होत आहे. यामुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड संताप लाट आहे. गणेश उत्सव आधी महापालिका प्रशासनाने गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचं आश्वासन देत 24 तास आपली मॅनपावर वापरत खड्डे भरण्याचे आदेश देत ज्या रस्त्यावर खड्डे असतील आणि ज्या ठेकेदारांनी हलगर्जीपणा केला तर त्या ठेकेदारांना कठोर कारवाईचा इशाराही दिला होता. मात्र गणरायाचे आगमन खड्ड्यातून झाले यानंतर दीड दिवस ,पाच दिवस आणि सात दिवसाचे गणपतीचे विसर्जन देखील या खड्ड्यातील रस्त्यातून मार्ग काढत विसर्जन घाटावर पोहचून गणरायाचे विसर्जन झाले मात्र आता अनंत चतुर्थी ही आली तरी खड्डे जैसे थे आहेत. महानगरपालिकेकडून काही दिवसांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्यात आले होते मात्र दोन दिवसांतच ते काम उखडलं गेलं आहे.
ईद ए मिलादनिमित्त चंद्रपूर शहरात मुस्लिम बांधवांनी मोठी मिरवणूक काढली. मैत्री आणि शांतीचा संदेश देत ही मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. शहरातील विविध भागातून निघालेल्या मिरवणुका मुख्य मिरवणुकीत सहभागी झाल्या. शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणीचोख बंदोबस्त तैनात केला होता.
भंडाऱ्यातील तुमसर येथे आज ईद-ए-मिलाद मोठ्या उत्सहात व शांततेत साजरी करण्यात आली.जगाला शांती,सदभावना व बंधूत्वाचा संदेश देणा-या मोहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षी भंडाऱ्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते.यात हजारो मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.तर तुमसर राष्ट्रवादी युवक काँग्रेस(AP) कडून मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले व ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा दिल्या, व मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा देत मिठाई चे वाटप करण्यात आले.
लातूरच्या मांजरी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेती पिकांना मोठा फटका बसलाय, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा येथे सुनील गुराळे या शेतकऱ्याचे देखील सोयाबीन पीक मांजरा नदीला आलेल्या पुरामुळे, पाण्यात वाहून गेल आहे., दरम्यान संपूर्ण सोयाबीन पीक पाण्याने वाहून गेल्याने, शेतकऱ्याने आपली व्यथा गायनाच्या माध्यमातून मांडली आहे., तर हा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होतोय.
नाशिकच्या मालेगाव मध्ये आज ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती मोठ्या उत्सहात व शांततेत साजरी करण्यात आली.जगाला शांती,सदभावना व बंधूत्वाचा संदेश देणा-या मोहम्मद पैगंबर यांची जयंती दरवर्षी मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते त्या निमित्ताने शहरातून भव्य जूलूस(मिरवणूक) काढण्यात येते यात हजारो मुस्लीम बांधव व धार्मिक मौलाना सहभागी झाले होते.तर आज संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ईद निमित्ताने मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदबस्त तैनात करण्यात आला होता.
खेळता खेळता आईच्या मांडीवरच सोडला श्रावण गावडे या मुलाने प्राण
कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोडोली इथली हृदयद्रावक घटना, जिल्ह्यात हळहळ
मित्रांसोबत गणेश मंडळाच्या मंडपात खेळत होता श्रावण गावडे
अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि खेळ सोडून तो आईच्या कुशीत विसावला
मात्र आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच श्रावणला हृदयविकाराचा तीव्र झटका आला
उद्या होत असलेल्या गणेश विसर्जनामुळे मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर-मालेगाव-मनमाड-पुणे या मार्गात आज रात्री पासून ते उद्या रात्री पर्यंत बदल करण्यात आला आहे,या मार्गावर दोन्ही बाजूने होणारी अवजड वाहतुकीची होणारी कोंडी,त्यातच कन्नड घाट बंद असल्याने त्याबाजूने येणारी वाहतूक आणि याच मार्गावरून विसर्जनासाठी निघणाऱ्या मिरवणुका व गणेश भक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनाने ही सर्व अवजड वाहनांची वाहतूक मालेगाव-चांदवड-लासलगाव-विंचूर मार्गाने येवला कडे वळविली आहे तर पुण्यकडून येणारी वाहतूक याच मार्गावरून मलेगावकडे वळविण्यात आली असल्याचे पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याचे दर पहिल्यांदाच एक लाख दहा हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत. सध्या प्रति तोळा सोन्याचे दर एक लाख दहा हजार शंभर रुपये इतके झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे. चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली असून चांदी प्रति किलो एक लाख 24 हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेला जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी करत हिंगोलीत ओबीसी समाज बांधवांनी औंढा जिंतूर राज्यमार्ग रोखून धरत सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे येळी पाटी येथे हजारोच्या संख्येने ओबीसी बांधव या रास्ता रोको आंदोलनासाठी एकत्र जमल्याच पाहायला मिळालं दरम्यान सरकार ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी ओबीसी नेते चंद्रकांत लव्हाळे यांनी केला तर कुणबी दाखल्याच्या आधारे ओबीसी मध्ये लाखो मराठा घुसखोरी करण्याची शक्यता असल्याने सरकारने घेतलेला निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली होती.
एका मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. पाटोदा पोलीस ठाणे हद्दीतील दगडवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळ तरुणाची निघृणपणे हत्या करण्यात आली. दीपक केरा बिल्ला असे मेंढपाळ तरुणाचे नाव असून हत्ये मागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा केला जातोय.
दीपक बिल्ला मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी तो मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये आला होता. शिरूर तालुक्यातील दगडवाडी परिसरात त्याचे वास्तव्य होते. आज पहाटे अज्ञातानी त्याची हत्या केल्याचं समोर आलं. दोन दिवसांपूर्वीच एका तरुणाची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा मेंढपाळ तरुणाच्या हत्येने बीड हदरले आहे.
एक तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू
सरकारने काढलेला जीआर तत्काळ रद्द करण्याची मागणी
हजारोंना संख्येने ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी
मावळच्या इंदोरी मधील प्रगतिशील शेतकरी प्रशांत भागवत यांनी आपल्या घरगुती बाप्पाच्या पुढे साकारलय केदारनाथ चा इको फ्रेंडली देखावा. भागवत कुटुंब हे शेतकरी असून त्यांनी सहकुटुंब केदारनाथ दर्शनची सहल केली होती. त्याचवेळी मनाशी निश्चय केला की आपल्या घरगुती गणपतीच्या पुढे केदारनाथ चा देखावा सादर करायचा. केदारनाथ देखावा सादर करण्यात करतात त्यांना चार ते पाच दिवस लागले. आणि सर्व देखावा हा इको फ्रेंडली तयार केलेला आहे. हा देखावा बघण्यासाठी मावळच्या पंचक्रोशीतून भाविक येतात आणि दर्शन घेतात..
मराठवाड्यात मागील ३ महिन्यांत अतिपावसामुळे विभागातील ३ हजार ९२९ गावांतील खरीप पिकांचा चिखल झाला आहे. १५ लाख ७८ हजार ३३ शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या हातून गेल्या आहेत. असे असताना नुकसानीच्या पंचनाम्यांना अद्याप गती मिळालेली नाही. ५ लाख ६२ हजार ७२७ हेक्टरवरील पंचनामे सध्या पूर्ण झाले आहेत. ७ लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे अजून बाकी आहेत. १२ लाख ४६ हजार २४९ हेक्टरवरील खरीप पिकांची अतिवृष्टीमुळे नासाडी झाल्याचे विभागीय प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. लातूर दुसऱ्या क्रमांकावर, हिंगोली तिसऱ्या, धाराशिव नुकसानीत चौथ्या क्रमांकावर आहे.
राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 38 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून संपाचा आजचा सोळावा दिवस आहे. बीड मधील 1400 कर्मचाऱ्यांकडून मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली जात आहेत. दरम्यान या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश एनएचएमच्या आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
यंदा श्री गणनायक रथातून निघणार दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सर्व गणेश मंडळांची विसर्जन रथ बनवण्याची लगबग पाहायला मिळतीय.
पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या गणपतीची मिरवणूक यंदा श्री गणनायक रथातून निघणार आहे.उत्सवाचं यंदा 133 वं वर्ष आहे.
यंदा 'श्री गणनायक' रथामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत.या विसर्जन मिरवणुकीच्या रथाचे काम आता पूर्ण झालेल आहे.
आकर्षक विद्युतरोषणाईने हा रथ उजळून निघणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे यंदा केरळ मधील श्री पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.या मंदिराला अनुसरून या विसर्जन रथाची मांडणी करण्यात आली आहे. *विष्णूचे वाहन म्हणून श्री गणनायक रथावर समोरच्या बाजूला चार गरुड लावण्यात आलेले आहेत.8 स्तंभांवर हा रथ उभारण्यात आला आहे. केरळ मधील मंदिरांना असते त्याप्रमाणे या रथाला आकर्षक रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.केरळमधील मंदिरांप्रमाणे गोपुराही यामध्ये साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलायं.त्याचप्रमाणे 30 क्रिस्टल झुंबर या रथाला बसविण्यात आले आहेत.
बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे थोड्याच वेळात या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार आहे मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर आलं आहे.
या संदर्भात बारामतीचे उपयोगी पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाच्या पार्श्वभूमीवर या मोर्चाला आम्ही पुढील तारीख घ्या अशी आंदोलकांना विनंती केली होती म्हणत आम्ही या मोर्चाला परवानगी दिली नसल्याचं स्पष्ट केल आहे.
बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या अवैध वाहतुकीविरुद्ध मोठी कारवाई करत 25 लाख 35 हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे .. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील आंबुलकर यांना गुप्त माहिती आधारे खामगाव परिसरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा अवैधरित्या वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली होती, या माहितीच्या आधारे पोलीस पथक, आणि अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग यांच्या वतीने खामगाव तालुक्यातील पारखेड फाटा येथे सापळा रचून संशयित वाहन तपासण्यात आले.. तपासणी दरम्यान, वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.. दरम्यान पथकाने वाहनासह 50 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.. या प्रकरणी रामराज दुल्हारे , राहणार . फतेपुर, उत्तरप्रदेश या युवकविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
- नाशिकमधील सार्वजनिक गणेश मंडळांची गणेश विसर्जन मिरवणूक यंदा दुपारऐवजी सकाळी सुरू होणार
- यंदा गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी १०.३० वाजता सुरू होणार
- रात्री १२ पर्यंत विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांची परवानगी
- गणेश विसर्जन मिरवणुकीत नंबरवरून सुरू असलेला वाद मात्र अद्याप कायम
- काही गणेश मंडळांचा नंबर वरून सुरू आहे वाद
- मिरवणुकीत पुढे असलेल्या गणेश मंडळांना वेळ मिळतो, मागे असलेल्या मंडळांना वेळ मिळत नाही काही मंडळांचे मत
- त्यामुळे शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत मिरवणुकीला परवानगी देण्याची होती मागणी
- मात्र पोलिसांकडून नियम आणि अटींचं पालन करण्याचं गणेश मंडळांना आवाहन
नाशिक -
- नाशिकच्या गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवला
- गंगापूर धरणातून 2030 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
- गंगापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच
- गंगापूर, दारणा, वालदेवी, कश्यपी, भाम,भावलीसह इतर काही धरणातून पाण्याचा विसर्ग
- पावसाचा जोर वाढल्यास टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढवणार
- नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
जालन्यातील अंतरवाली सराटी ओबीसी नेत्यांचे आमरण उपोषण
उपोषणाचा आजचा पाचवा दिवस.
सरकारला आणि सरकारच्या उपसमितीला ओबीसींच्या भावनांची कदर नाही
जोपर्यंत सरकार ओबीसींना अस्वस्थ करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार उपोषणकर्त्यांचा इशारा ..
सोलापूर -
- बार्शीजवळील बायपास येथे एसटी बस आणि दुचाकीचा अपघात
- एसटी बस ओढ्याच्या पुलावरून गेली खाली
- एसटी बस कुर्डूवाडीवरून बार्शीकडे येत असताना तिरकस पुलावरून दुचाकी स्वाराला वाचवताना एसटी बस गेली पुलाखाली
- बार्शी जवळील तिरकस पुलाजवळील घटना
- दुचाकीवरून दूध घेऊन जाणारा व्यक्ती गंभीर जखमी
नाशिक -
जुन्या नाशिकमधील दूध बाजार परिसरात असलेल्या अतिप्राचीन उपाध्ये गणपती मंदिरात आज महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण पार पडलं.
यंदाचे अथर्वशीर्ष पठणाच हे तिसरे वर्ष आहे.
यावेळी महिलांच्या वतीने सामूहिक शंखनाद करण्यात आल्याने संपूर्ण परिसर बाप्पांच्या जयघोषाने दुमदुमून गेला.
अकोल्यातल्या लहान, मोठ्या 29 प्रकल्पांत 92 टक्के साठा
अकोल्यातल्या लहान, मोठ्या 29 प्रकल्पांत 92 टक्के साठा उपलब्ध झालाय.
ज्यामध्ये मोर्णा, निर्गुणा मध्यम प्रकल्प सप्टेंबरमध्येच भरले आहे
तर तीन मध्यम आणि २४ लघु असे मिळून 29 प्रकल्पांत 92 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 3 टक्के जास्त आहे.
माळशिरसच्या धर्मपुरीत पाण्यासाठी महिलांचे आंदोलन
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरीत पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
मागील आठ दिवसांपासून भीम नगर परिसरात पाणी पुरवठा बंद आहे.
पाणी पुरवठा सुरू करावा या मागणीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
नाशिक -
- नाशिकच्या मुंबई नाका परिसरात बर्निंग कारचा थरार
- एका चालत्या कारला अचानक लागली आग
- कारमध्ये असलेल्या दोन व्यक्ती वेळीच कारमधून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली
- कारमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच कारमध्ये असलेले दोन जण लगेच कारमधून पडले बाहेर
- स्थानिक लोकांनी आग विझवण्यासाठी केली मदत
सरकारला खाली खेचण्याच्या आंदोलनासाठी वर्गणी जमा करा
सात दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करू
बच्चू कडू यांनी ओढले राज्य सरकारवर ताशेरे
सिंधुदुर्ग -
तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्ग १२ सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद
भुईबावडा, फोंडाघाट मार्गे वाहतूक वळविली
गगनबावडा घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक बंद
नंदुरबारमध्ये मुसळधार पाऊस
हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट
रस्ते झाले जलमय,अनेक दुकानात पाणी गेल्याने नुकसान
पुढील २४ तासांत अति मुसळधार पावसाची शक्यता
नंदुरबार -
मंत्री माणिकराव कोकाटेंचा पालकत्व असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आदिवासींचे हाल
सर्पदंश झालेल्या महिलेला भर पावसात बांबूच्या झोळीतून जीवघेणा प्रवास करत वाट काढण्याची वेळ
रस्ता नसल्याने कंबर इतक्या पुरात पाण्यातून वाट काढताना नातेवाईकांचे हाल
दवाखान्यात नेण्यासाठी भर पावसात बांबू झोडीच्या आधार घेत अक्कलकुवा तालुक्यातील बारीपाडा ते वेहगी गोंडामाल असा सात किलोमीटरचा प्रवास
पुणे -
पुणे महापालिकेच्या 75 शाळा होणार मॉडेल स्कूल
शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय
75 शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यात येणार
शाळांमध्ये आवश्यक सुविधा पुरवताना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार
आराखडा तयार करून शिक्षण मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.