Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

आमचं आंदोलन राज्य निवडणूक आयोगा विरोधात आहे,भाजपा विरोधात नाही,

उत्तर मात्र भारतीय जनता पार्टी देत आहे,हे आश्चर्य आहे.

निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीत जरा तरी अंतर ठेवा.

एक जुलै मतदार यादीचा निवडणुका आयोगाचा हट्ट का ?

मतदार यादी दुरुस्त करून दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारा चार नोव्हेंबर किंवा दहा नोव्हेंबर पर्यंतच्या दुरुस्त झालेल्या याद्या स्वीकारण्यास हरकत काय ?

केडीएमसीच्या रुग्णालयात गोंधळ,  रुग्णाला उपचार न मिळाल्याने संतप्त नातेवाईकांचा संताप

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्री नगर रुग्णालयात आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीला त्याच्या नातेवाईकांनी महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयाने परिस्थिती गंभीर असल्याने त्याला कळवा रुग्णालयात नेण्यास सांगितले.रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने नातेवाईकांनी कार्डिओ ॲम्ब्युलन्स मागवली, मात्र डॉक्टर सोबत जाण्यास तयार नव्हते.

नगरपरिषद आणि नगरपंचायत आचारसंहिता घोषित झाल्यानंतर आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना

सोलापूर, धाराशिव येथे नियोजित कार्यक्रम रद्द करून मंत्री आशिष शेलार मुंबईच्या दिशेने रवाना

सोलापूर येथे सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित गझल महोत्सव आणि धाराशिव येथे संत तुकाराम यांचा कार्यक्रम नियोजित होता

मात्र आचारसंहिता जाहीर झाल्याने सर्व कार्यक्रम रद्द करून आशिष शेलार मुंबईला रवाना

Solapur: सोलापूर जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका लागणार

-

- जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा लागली पणाला

- पंढरपूर, बार्शी, करमाळा, सांगोला मोहोळ, कुर्डूवाडी, अकलूज, अक्कलकोट, माळशिरस, दुधनी, मैंदर्गी, मंगळवेढा, नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका होणार

- तर अनगर, वैराग, माढा आणि नातेपुते नगरपंचायत निवडणुकीची धामधूम होणार

- नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाड्या होणार की महायुती, महाविकास आघाडी म्हणून लढणारे आकडे असणार सर्वांचे लक्ष

Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड,शेवगाव, श्रीगोंदे, पाथर्डी, नगर परिषदेच्या निवडणुका होणार

जामखेड

नगराध्यक्ष पद खुला प्रवर्गाताली महिलांसाठी

- एकूण नगरसेवक संख्या 24, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 3, जमाती 1, नामाप्र 6 व सर्वसाधारण 7.

शेवगाव

नगराध्यक्ष पद खुला प्रवर्गाताली महिलांसाठी

- एकूण नगरसेवक संख्या 24, महिला राखीव 12, अनुसूचित जाती 4, जमाती 0, नामाप्र 6 व सर्वसाधारण 7,

-

श्रीगोंदे

नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव

- एकूण नगरसेवक संख्या 22, महिला राखीव 11, अनुसूचित जाती 3, जमाती 0, नामाप्र 6 व सर्वसाधारण 6.

पाथर्डी-

नगराध्यक्ष पद ओबीसी पुरुषासाठीसाठी

एकूण नगरसेवक संख्या 20, महिला राखीव 10, अनुसूचित जाती 2, जमाती 0, नामाप्र 5 व सर्वसाधारण

गवान झूलेलाल साहिबांविरोधातील वक्तव्याचा निषेध; सिंधी समाजाचा संताप

सिंधी समाजाचे आराध्य देव भगवान झूलेलाल साहिब यांच्या विरोधात छत्तीसगड राज्यातील रायपूर मधील अमित बघेल यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीच्या निषेधार्थ उल्हासनगरात संतापाची लाट उसळली. भारतीय जनता पक्ष, सिंधी जनरल पंचायत, महिला मंडळे, युवक संघटना यांनी एकत्र येऊन मध्यवर्ती पोलिस स्टेशनसमोर निषेध नोंदवला. भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधरिया, नेते शेरी लुंड,उल्हासनगर चे आमदार कुमार ऐलानी आणि कल्याण पूर्व आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात आरोपीवर IT Act व भारतीय दंड संहिता अंतर्गत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. समाजाने इशारा दिला की तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. या प्रसंगी "अमित बघेल मुर्दाबाद"च्या घोषणा देत समाजातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला.

Congress: काँग्रेसच्या उमेदवारांची नावांची यादी जाहीर करण्याची तारीख निश्चित

काँग्रेसमधून मोठी बातमी

निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होताच उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करण्याची तारीख निच्छित

येत्या १२ आणि १३ नोव्हेंबर ला काँग्रेसची पार्लिमेंट्री बोर्डाची बैठक

या बैठकीत केली जाणार नगर परिषद आणि नगरपंचायत ला सामोरे जाणारे उमेदवारांच्या यादींची चर्चा आणि निवड

याच दोन दिवसात पहिली आणि दुसरी यादी जाहीर केली जाणार

Nagar Parishad Election 2025: नगरपरिषदेच्या निवडणूकांची तारीख जाहीर; २ डिसेंबरला होणार मतदान

२ डिसेंबर रोजी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत अर्ज करायचे आहे. यानंतर मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नामनिर्देशन दाखल 10 नोव्हेंबर

अर्ज मुदत 17 नोव्हेंबर

अर्ज छाननी 18 नोव्हेंबर

अर्ज माघार 21 नोव्हेंबर

निडणूक चिन्ह 26 नोव्हेंबर

मतदान- 2 डिसेंबर

मतमोजणी - 3 डिसेंबर

Nagar Parishad Election 2025: डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही- निवडणूक आयोग

मतदारांच्या सोयीसाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. मतदारांना त्यांचं नाव, मतदार केंद्र, उमेदवारविषयी माहिती मिळेल. गुन्हेगारी, शैक्षणिक, आर्थिक संपत्तीविषयी माहिती मिळू शकेल.

मतदार यादीच्या बाबतीत संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगानं दखल घेतली आहे. एक यंत्रणेवर टूल विकसित केले आहे. नगरपरिषद, नगरपंचायत हे संभाव्य दुबार मतदार डबर स्टार आले आहेत. तिथे संबंधित अधिकारी मतदारांना संपर्क साधून कुठल्या प्रभागात, मतदान केंद्रावर मतदान करेल, याची माहिती...

इतर मतदान केंद्रात त्याला मतदान करता येणार नाही.

डबल स्टार असलेल्या मतदारांना मतदान करता येणार नाही. मतदान केलं नाही, किंवा दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येतील.

Nagar Panchayat Election 2025: नगर पंचायतीसाठी उमेदवाराला 2 लाखांची खर्च मर्यादा- निवडणूक आयोग

नगर पंचायतीसाठी उमेदराला 2 लाखांची खर्च मर्यादा

उमेदवारांविषयी माहीती मतदारांना खास एप द्वारे मिळेल

मतदार यादीत दुबार नावांबाबत खबरदारी घेतली आहे.

दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

डबल स्टार म्हणून दुबार मतदाराची नोंद होणार

एकाच ठिकाणी मतदान करता येणार

Maharashtra Election Commission PC :42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे- निवडणूक आयोग

नगर परिषद आणि नगर पंचायती संबंधित माहीती देणार

246 नगर परिषदांमध्ये 10 नविन नगर परिषद समावेश

42 नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार आहे.

15 नवनिर्मित नगरपंचायती आहेत

नगर परिषदची निवडणून बहुसदस्य पद्धतीने

288 अध्यक्ष निवडले जाणार

नगर परिषदेच्या एक वार्डमध्ये दोन किंवा 3 जागा

1 कोटी 7 लाख 30 हजार 576 एवढे मतदार

निवडणूका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन्स द्वारे होणार

Maharashtra Election Commission PC Live Update:४२ नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर

६८५९ सदस्य, २८८ अध्यक्षांची निवड होणार आहे. राज्यात २४६ नगरपरिषदामध्ये १० नव्या नगरपरिषदांचा समावेश आहे. राज्यामध्ये १४७ नगरपंचायती आहेत. त्यापैकी ४२ ची नगरपंचायती निवडणूक होत आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. नामनिर्देशन पत्र संकेतस्थळ उपलब्ध असेल. अर्ज करताना जातवैधता प्रमाणपत्र नसेल तर निवडून आल्यानंतर सहा महिन्यात सादर करावे लागेल.

Maharashtra Election Commission PC Live: २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर

आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत.

Pune News : शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्या जेरबंद

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट जेरबंद झाला

गेल्या पंधरा दिवसात पिंपरखेड परिसरात बिबट्याने तीन जणांचे बळी घेतले.

त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक होऊन बिबट्याच्या पिंज-याला वनविभागाच्या ताब्यात देणार नाही अशी ठाम भुमिका ग्रामस्थांनी घेतली

निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी शिरूर तालुक्यातील घटनास्थळी पाहणी करण्यासाठी दाखल

बिबट्याने 13 वर्षीय रोहन बोंबेची हत्या नेमकी कशी केली? महिन्याभरात तिघांचा बिबट्याने जीव कसा घेतला? जेरबंद बिबट्याचं काय केलं जाणार? जिल्ह्यातील सर्व बिबट्यांचा बंदोबस्त लावण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार? याबाबत संतप्त ग्रामस्थांशी जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत.

किरकोळ वदातून महिलेने केली चार चाकी वाहनांची तोडफोड

किरकोळ वादातून एका महिलेने चार चाकी वाहनांची तोडफोड केली आहे. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरासमोर काल रात्री महिलेने चार चाकी वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनाची दगडाने तोडफोड केली आहे. तोडफोड केल्यानंतर महिला आणि वाहन चालकांमध्ये शाब्दिक वाचावाची देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच निगडी पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल होऊन वाहनाची तोडफोड घेणे करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतला आहे मात्र या प्रकरणात अजूनही चार चाकी वाहन चालकाने निगडी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार न दिल्याने, वाहनांची तोडफोड करणाऱ्या महिलेविरोधात अजून कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे

आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर

आजपासून इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर करण्यात आले आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

भुजबळ यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला भुजबळांना देण्यात आलाय.

सुप्रिया सुळे यांची सोशल मिडिया पोस्ट

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब लवकर बरे होऊन पुन्हा सर्वांच्या भेटीला येतील, हा विश्वास आहे. भुजबळ साहेब, तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा.

ऊस दरासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतकरी सेनेसह 14 संघटना मैदानात

साखर कारखान्यांनी आर एस एफ नुसार मागील हंगामातील गाळप झालेल्या सालचा हिशोब अद्याप दिलेला नाही आणि कारखान्यातील उपपदार्थांना चांगले दर मिळाले असल्यामुळे यावर्षीच्या हंगामातील FRP अधिक दोनशे रुपये किमान दर देणे दर द्या

Maharashtra Live News Update: मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा खडाजंगी झाली आहे. शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने मंत्री संतापल्याचे वृत्त आहे.

प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात शिवसेना (उबाठा), मनसे आणि मराठी एकीकरण समितीचे संयुक्त आंदोलन

दहिसरमध्ये आज आमदार प्रकाश सुर्वे यांच्या “माय मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे” या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि मराठी एकीकरण समिती या तिन्ही संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले.

हे आंदोलन गोकुळ आनंद, दहिसर (पूर्व) येथून सुरुवात होऊन झोन 12 पोलिस उपायुक्त (DCP) कार्यालयापर्यंत निघाले. या दरम्यान परिसरात “मराठी मानाचा , माणसाचा अपमान सहन करणार नाही”, “प्रकाश सुर्वे माफी मागा” अशा घोषणांचा गजर झाला.

पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजवू लागले आहेत. सर्वच पक्षांकडून या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्यात मात्र महायुती मधील दोन मंत्र्यांमध्ये वेगळ्याच निवडणुकीवरून मतभेद निर्माण झालेत... वर्षभराने होणाऱ्या पुणे पदवीधरच्या निवडणुकीवरून मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या मते चांगलेच वाक्युद्ध रंगल आहे.

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन

कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ बैलगाडी आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी आंदोलन छेडण्यात आले. मागील काही दिवस या मार्गांवर पडलेल्या खड्ड्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलेले रिल्स चर्चेचा विषय बनले होते. मात्र प्रशासनाने कोणतीही हालचाल न केल्याने ठाकरे गटाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेत स्थानिक आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांनी आमच्यावर टीका करावी उद्धव ठाकरेंवर टीका करावी मत देखील चोरावीत पण वेळ मिळाला तर आपली लोक सुस्थितीत राहावीत असं वाटत असेल तर या रस्त्याने प्रवास करावा आणि रस्त्याचे काम करावे असा खोचक टोला लगावलाय.

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे. नोटिफिकेशन कधीही येऊ शकतं, असे वकिलांनी कोर्टात सांगितले. मात्र हे तत्काळ सुनावणी घेण्याचं कारण असू शकत नाही. तुम्ही याआधीच यायला हवं होत, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेय.

बिबट्या प्राणी नाही तर आंतकवादी....!

उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या १२०० हुन आधिक झालीय कुत्री कमी अन बिबट्यांची संख्या वाढल्याची भावना व्यक्त करत बिबट्या हा प्राणी नसुन तो आंतकवादी आहे त्यामुळे माणसांवर हल्ला करणारा बिबट वनतारा पाठविण्याचा निर्णय झाला असला तरी तिकडेही हा बिबट आंतकवादी प्रमाणेच कृती करेल त्यामुळे हा बिबट्याच्या आंतकवादी वृत्तीच्या बिबट्याला आंतकवादी प्रमाणेच ठार करावे अशी भुमिका युवक शेतकरी घेतलीय

Maharashtra Live News Update: माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणार आहेत.

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

केंद्रीय मार्ड ने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच सेन्ट्रल मार्डचे चे प्रतिनिधी डॉ. सचिन पाटील, डॉ. महेश तिडके, डॉ. कुणाल गोयल आणि डॉ. महेश गुरव उपस्थित होते.

बिबट्याच्या हल्ल्यत मृत झालेल्या रोहनवर अंत्यसंस्कार

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या मुलांवर अंत्यत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहनच्या घराजवळ एक बिबट्या जेरबंद करण्यात आला.

अंधारेंचा हल्लाबोल

निवडणुकावर अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत, राहुल गांधी यांनी मातरदार याद्या संबंधित कसे घोळ आहे ते समोर आणलेय... आदित्य ठाकरेंनी देखील हे समोर आणलेय... बुलढाणामध्ये मयत व्यक्तींनी मतदान केल... मनसे प्रमुखांनी गाडीबर पुरावे दिले, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

आशिष शेलार यांचे आभार मानतो. त्यांनी राहुल गांधींच्या व्होट चोरीच्या आरोपाला समर्थन केलेल आहे. मतदानाची चोरी तुमच्या अधिपत्याखाली होत आहे. याची एक प्रकारे चोरीची कबुली देत आहे. मात्र निवडणूक आयोगाकडे जाऊन तक्रार करत नाही असा टोलाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी आशिष शेलार यांना लगावला.
आमदार नितीन राऊत

Pune: पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

- पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई

- वाहतुकीला नेहमीच ठरतात अडसर

- कारवाई होते सातत्याने मात्र पुन्हा अतिक्रमणे दिसतात

- या कारवाईमुळे पुणे स्टेशन समोरील वाहतूक कोंडीला मोकळा श्वास मिळणार का?

- प्रवाशांचा सवाल

Pune: बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहनच्या मृतदेहावर ४२ तासांनंतर अंत्यसंस्कार

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या रोहन विलास बोंबे या १३ वर्षाच्या मुलांवर अंत्यत दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

तब्बल ४२ तासांनी चोख पोलिस बंदोबस्तात झाले अंत्यसंस्कार.

Ratnagiri: करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोलच्या मालमत्तेवर कारवाई, प्रशिक्षण केंद्रासोबत 5 गोदामे सील

रत्नागिरी- आकर्षक परताव्याचं आमिष दाखवून करोडोंची फसवणूक

फसवणूक करणाऱ्या आरजू टेकसोलच्या मालमत्तेवर प्रशासनाचा कब्जा

प्रशिक्षण केंद्रासोबत 5 गोदामे सील

आर्थिक गुन्हे शाखेकडे 587 जणांच्या तक्रारी

कंपनीच्या मालमत्तेचा लिलाव करण्यासाठी हालचाली सुरू

लिलावासाठी सक्षम प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्यांची नियुक्ती

कच्चा माल देऊन पक्का माल घेण्याचं कंपनी देत होती आश्वासन

गुंतवणूक केलेल्या रकमेवर आकर्षक परतावा देण्याचं दिलं होतं कंपनीने खोटं आश्वासन

Amravati: दिवाळीत लालपरीला लक्ष्मी पावली, भाऊबीजेनंतर 3 कोटी 21 लाखांची कमाई

अमरावती -

अमरावती दिवाळीत लालपरीला लक्ष्मी पावली, भाऊबीजेनंतर तब्बल 3 कोटी 21 लाखांची कमाई

मागील वर्षीच्या तुलनेत एसटी महामंडळाचे दिवाळीत 30 टक्क्यांनी उत्पन्न वाढले;महिलां प्रवाशांची संख्या ही 40 टक्क्यांनी वाढली

18 ते 26 ऑक्टोबर या दरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यात धावल्या एसटी बसेस

अमरावती-पुणे पुणे-अमरावती जादा बसचे केले होते नियोजन

Pune:  इथेच बिबट्याला गोळ्या मारा, शिरूरमधील ग्रामस्थ आक्रमक

शिरूर -

- बिबट्याचेच संरक्षण करा माणसाचे नका करू

- बिबट्या येथून हलवू नका

- इथेच बिबट्याला गोळ्या मारा ग्रामस्थ आक्रमक

- जो बिबट्या घावलाय त्याला मारा

सततच्या पावसामुळे कोकणातील प्रमुख भात पीक मातीमोल

कोकणातल्या शेतात भात पिकाचे विदारक चित्र समोर आलेय. शेतात तयार झालेलं भात पिक पुन्हा रुजले. रत्नागिरीत 411 हेक्टर भाताचं नुकसान झालेय. रत्नागिरी जिल्ह्यातील 170 गावातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसलाय. शेतीचे पंचनामे सुरु आहेत मात्र प्रशासनाकडून तुटपूंजी मदत मिळतेय. गुंठ्याचा खर्च 500 रुपये मात्र प्रशासनाचा मदतीचा दर गुंठ्याला 85 रुपये मिळत आहे.

nashik : द्राक्ष शेतीतून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

दुचाकीवरून दुसऱ्या दुचाकी स्वराला लाथ मारणे मुंब्रातील एका तरुणाला पडले महागात

मुंब्रातील एम एम वाली या ठिकाणी एक तरुण दुचाकीवरून जात असताना मागून येणारा एक दुचाकी स्वार त्या तरुणाला लाथ मारून पाडण्याचा प्रयत्न करत होता.. या घटनेत तरुण पडता पडता बचावला मात्र मुंब्रा पोलीस ठाण्यातील अंमलदार राऊंडप वर होते त्यांच्या निदर्शनात ही घटना आल्यानंतर लाथ मारणाऱ्या दुचाकी स्वराला त्यांनी ताबडतोब बाजूला घेऊन त्यावर योग्य ती कारवाई केली आहे यानंतर या तरुणाने हात जोडून माफी देखील मागितली आहे..

एफआरपी थकवल्यास साखर कारखान्यांचा परवाना रद्द करणार साखर आयुक्तांचा इशारा

एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांना यंदाच्या गाळप हंगामात परवाना न देण्याचा इशारा साखर आयुक्त यांनी दिला आहे.

राज्यातील ७ कारखान्यांनी अद्याप एफआरपी थकविली असून आणखी कारखान्यांची चौकशी सुरू आहे.

राज्यातील २१४ कारखान्यांपैकी २८ जणांना परवाने देण्यात आले आहेत, तर उर्वरित प्रस्ताव तपासणीत आहेत.

एफआरपी थकवल्यास परवाना थांबविण्याबरोबरच निधी भरण्यासाठी हमीपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे.

एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या,  ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो

नायक चित्रपटात अनिल कपूरला जसे एक दिवसासाठी मुख्यमंत्री केले होते,त्या पध्दतीने हे राज्य एक दिवसासाठी माझा ताब्यात द्या, ईव्हीएम मशीनचा घोळ बाहेर काढतो असे खुले आव्हान दिले आहे. माळशिरसचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आहे.

वनविभागाने दिलेला शब्द पाळावा.. गोळी घालण्याच्या आदेशाचे पालन करावं

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट जेरबंद केलाय. हाच बिबट्या नरभक्षक असल्याचं म्हणत वनविभागाने गोळ्या घालण्याचे आदेश कार्यान्वित करावे, दिलेला शब्द पाळावा. बळी ला बळी अशा भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Maharashtra Live News Update: - फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

- फलटण येथील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी नागपुरात डॉक्टरांची शांतता रॅली

- शासकीय मेडिकल रुग्णलयातील निवासी डॉक्टरांची शांतता रॅली

- मेडिकल चौक ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत काढण्यात येणार शांतता रॅली

41 हजाराच्या लाज प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यास अटक

एका शासकीय कंत्राटदाराला बिले काढून देण्यासाठी 35 हजार रुपये मागितले तसेच वर्क ऑर्डर्स साठी सहा हजार रुपये असे 41 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या अमरावतीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहन पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली... रोहन पाटील हा अभियंता कुठलाही कामाचे 2 टक्के प्रमाणे टक्केवारी घेऊनच कंत्राटदारांचे बिल काढायचा पैसे न दिल्यास दिले रोखून ठेवायचा असा त्यांच्यावर सातत्याने आरोप आहे, अशातच एका कंत्राटदाराने या लाचखोर अभियंत्यास पैशाचा व्यवहार करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवले.

श्री राजेश्वर मंदिरात 'हरिहर मिलन' सोहळा...

अकोला शहरातील आराध्य दैवत श्री राजेश्वर मंदिरात पारंपरिक 'हरिहर मिलन' सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलं... यानिमित्ताने मंदिर परिसरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. या विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर उजळून निघाले होतेय. भगवान शंकराच्या पिंडीचा साज 'हरिहरेश्वर' या रूपात तयार करण्यात आलाये. भगवान विष्णू आणि महादेव यांच्या ऐक्याचे प्रतीक म्हणून या सोहळ्याचे विशेष महत्त्व राहतंये. या राज-राजेश्वर मंदिरात दरवर्षी कार्तिक एकादशीनंतर होणारा हा हरिहर मिलन सोहळा आता अकोल्यातील धार्मिक परंपरेचा भाग ठरतोये. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन कार्यक्रम देखील पार पडले.

जालन्यात अवकाळी पावसाचा फटका,शेतातच मक्याला फुटत आहे कोंब , तर कापसाच्या होत आहे वाती..

जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने काढणीला आलेल्या पिकांची दुरावस्था झालीय, सतत च्या पावसाने मक्का उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय . जालना तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतातच मक्याच्या कणसाला कोंब फुटत असून यामुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. तर काढणीला आलेल्या कापसाच्या अक्षरशः वाती झाल्यात, कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात हीच स्थिती असून हातातोंडाशी आलेला घास यामुळे हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांची झालीय..

जालना जिल्ह्यातील मतदार यादी तब्बल 15 हजार नागरिकांची दुबार नावे; जिल्हा प्रशासनाकडून मतदारांची नावे पोर्टलवर प्रसिद्ध

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर जाहीर केली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 12 लाख 73 हजार 833 मतदारांचा समावेश करण्यात आलेला आहे मात्र निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदार यादी मध्ये जालना जिल्ह्यात तब्बल 15 हजार 880 नागरिकांची नावे दुबार आणि काही जणांची नावे तीन ठिकाणी नोंदविली गेली असल्याचं निदर्शनास आलं आहे.

मुंबई विमानतळ 20 नोव्हेंबरला 6 तास बंद

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5 या वेळेत पूर्णपणे बंद राहणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून दरवर्षी करण्यात येणाऱ्या वार्षिक रनवे मेंटेनन्स कामासाठी ही तात्पुरती बंदी जाहीर करण्यात आली आहे. या दरम्यान दोन्ही धावपट्ट्यांवर आवश्यक दुरुस्ती, लाईन मार्किंग, लाईटिंग सिस्टीम तपासणी तसेच सुरक्षा-संबंधित तांत्रिक कामे केली जाणार आहेत. विमानतळावरील ऑपरेशन्स नियमानुसार पुन्हा दुपारी 5 नंतर सुरू होतील. विमान कंपन्यांनी प्रवाशांना आपल्या उड्डाणांचे वेळापत्रक तपासण्याचे, तसेच शक्य असल्यास प्रस्थानापूर्वी संबंधित अपडेट्स पाहण्याचे आवाहन केले आहे.

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे रास्तारोको आंदोलन सुरु असताना मध्यरात्री पोलीसांच्या विनंतीवरुन वाहतुक सुरळीत करण्यात आली असुन आंदोलकांचा मुक्काम मात्र रस्त्यावर गेलाय बिबटमुक्तीशिवाय लढा थांबणार नसल्याची भुमिका आंदोलकांनी घेतली असुन बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या रोहन बोंबे या चिमुकल्यावर आज तिस-या दिवशी शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यानंतर प्रशासिकय आधिकारी यांच्या सोबत बैठकीनंतर आंदोलनाला पुन्हा सुरवात होणार आहे वनमंत्री आणि पालकमंत्री यांनी घटनास्थळी पहाणी करण्यासाठी यावं अशी ठाम भुमिका आंदोलकांनी घेतलेली आहे

MUMBAI : लोटे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांवर सोनपात्र नदी दूषित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

खेड तालुक्यातील कोतवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सोनपात्र नदीमध्ये लोटे एमआयडीसी परिसरातील काही रासायनिक कंपन्यांनी रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याची गंभीर घटना समोर आलीय. या प्रकरणी कोतवली ग्रामपंचायतीच्या सरपंच अक्षता महेश तांबे  यांनी तक्रार दाखल केल  होती . सोनपात्र नदी दुषित केल्याप्रकरणी खेड पोलीसांनी योजना ऑर्गेनिक कंपनी, पुष्कर केमिकल कंपनी, श्रेष्टा ऑर्गेनिक कंपनी तसेच लोटे एमआयडीसीमधील इतर काही रासायनिक कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

NANDED : गेट बसवण्याच्या कारणावरून भावकीत वाद.

घराचा गेट बसवण्याच्या कारणावरून भावकीत वाद झाला. या वादाचे रूपांतर तुफान हाणामारी झाले. नांदेडच्या कंधार तालुक्यातील बाचोटी गावातील ही घटना आहे. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.तीन जणां विरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YAVATMAL : यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम झाली असून यवतमाळ जिल्ह्यातील सोळा लाख 61 हजार 537 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. याशिवाय आरक्षणाची अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार मंत्र्यांच्या कामाचा आढावा

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार मंत्र्यांच्या कामाचा आढावा

मंत्र्यांच्या कामाचे केले जाणार ऑडिट

कुचकामी मंत्र्यांना मिळणार कडक समज, विश्वसनीय सूत्रांची माहिती

महायुती सरकारला झाले 11 महिने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

रायगडनंतर नंदुरबारमध्येही महायुतीत राडा; शिवसेना-भाजपात तेढ,भाजप आमदाराला सेनेशी युती आवडेना

SCROLL FOR NEXT