पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस
महापालिकेच्या प्रारूप मतदार यादींवर २२ हजार हरकती
मुदतीच्या शेवटच्या दिवशी ९८६३ हरकती दाखल
एकूण २२,८०९ हरकती दाखल झाल्या असून त्यापैकी आज शेवटच्या दिवशी तब्बल ९ हजार ८६३ हरकतींची नोंद झाली
पुण महापालिकेच्या निवडणुकीसाठी ४१ प्रभागात ३५ लाख मतदार
माजी आमदार अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावखर यांची आमदार विजयसिंह पंडितांनी घेतली हॉस्पिटलमध्ये भेट. मतदानाच्या दिवशी मारहाणीमुळे जखमी झाले होते.
आय टी अभियंता यांना ३० दिवसात पैसे परत देण्याची आरोपींची हमी
शंकर महाराज अंगात येतात अशी बतावणी करून भोंदू बाबा आणि पंढरपूरकर ने कोथरूड येतील अभियंता ची १४ कोटींची फसवणूक केली होती
नाशिक मधून भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर या दोघांना अटक केली होती
आज कोर्टाला आरोपींनी लेखी हमी देत फिर्यादी यांचे १४ कोटी परत देण्याचं लिखित आश्वासन दिलं आहे
आगीचे कारण अद्याप स्पष्ट
घटनास्थळी अग्निशामक दल आणि घाटकोपर पोलीस दाखल
इमारतीमधील रहिवाशांना इमारतीमधून खाली काढण्याचे काम सुरू
कांदिवली एएनसीने मोठी कारवाई करत ५० लाख रुपये किमतीचे ड्रग्स जप्त करून दोन तस्करांना अटक केली आहे. सीनियर पीआय जगदाले यांच्या पथकाने ही सखोल सापळा कारवाई राबवली. यापूर्वीच एएनसीने २ कोटी रुपये किमतीची हेरोईन जप्त करून एका दांपत्याला अटक केली होती. सलग कारवायांमुळे परिसरातील ड्रग्ज रॅकेटवर मोठा आघात झाला आहे. पुढील तपास एएनसीकडून सुरू आहे.
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर वडपे गावाच्या हद्दीत धावत्या आयशर ट्रकला अचानक आग लागण्याची घटना घडली आहे.हा ट्रक भाजीपाल्याचे रिकामे प्लास्टिक कॅरेट घेऊन कल्याण हून मध्यप्रदेशला जात होती.ट्रक मध्ये ठेवलेल्या प्लास्टिक कॅरेट ने पेट घेतल्याने ही आग पसरली होती.ट्रकला आग लागण्याची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने जेसीबीच्या साह्याने माती टाकून आग विझवण्यात स्थानिकांना यश आले.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळपासून इंडिगो एअरलाईन्सच्या कॅबिन क्रू आणि ग्राउंड स्टाफच्या अचानक कामबंद आंदोलनामुळे मोठी गर्दी झालीय. प्रवाशांचा गोंधळ उडालाय.
कसारा विभागातील
माळ गावातील मुख्य वीजपुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर अचानक आग लागल्याने संपूर्ण ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्ष्मसुरत आगीचे मोठे डोम या ट्रान्सफॉर्मर मधून पाहयाला मिळले माळ गावातील आठ ही पाड्यातील विज पुरवठा खंडित झाल्याने अंधार पसरणा आहे यामुळे विज वितरण करण्याऱ्या अधिकारी यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर बसविण्याची व्यवस्था करावी असी मागणी लोक करीत आहेत .
शहापूर तालुक्यातील कसारा विभागातील माळ गावातील घटना
काल पंढरपूर नगरपालिका निवडणूकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रामध्ये अनाधिकृतपणे घुसून गोंधळ केल्याप्रकरणी व ईव्हीएम मशीनचे फोटो काढून गोपनीयतेचा भंग केल्यास प्रकरणी भगीरथ भालके व इतर अनोळखी पाच व्यक्ती विरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक केंद्र प्रमुख दशरथ गोरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या मतदारयादीत दुबारच नव्हे तर १०३ बार ४ व्यक्तींची नाव असलेले मतदार
मुंबईत तब्बल ४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे मतदार म्हणून एकापेक्षा अधिक वेळा नोंदवली गेलीयेत
४ लाख ३३ हजार व्यक्तींची नावे वारंवार नोंदवली गेल्यानं अश्या डुप्लीकेट मतदारांची संख्या सुमारे ११ लाखांवर
स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता त्यावेळेसच मी सांगितलं होतं एक जरी त्रुटी न्यायालयात प्रलंबित राहिले तरी हा कार्यक्रम सर्व पुढे जाणार आणि तसेच घडले.. आम्हाला हे समजत होतं तर हे जबाबदार मुख्यमंत्री निवडणूक आयोग यांना माहिती नसेल का?... घाई गडबडीत निवडणुका घेतल्या गेल्या याबाबत निवडणूक आयोगाचे फेल्युअर आहे.... निवडणूक आयोगच यामध्ये दोषी आहे.
शितल तेजवानी ला पुणे पोलिस करणार अटक
पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी तेजवानी ला अटक होणार
मुंढवा येथील जमीन प्रकरणात शितल तेजवानी याना अटक होणार
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे,तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) लागू करावे या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई ते नागपूर अशी भव्य पदयात्रा निघाली असून लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक–अध्यक्ष विष्णुभाऊ कासबे यांच्या नेतृत्वाखाली आज ही पदयात्रा अमरावती शहरात दाखल झाली.राज्यातील मातंग समाजावर सामाजिक,आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर अन्याय व उपेक्षा वाढत असल्याने स्वतंत्र आरक्षणाची मागणी तीव्र झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील १३% आरक्षणात अ-ब-क-ड उपवर्गीकरण लागू करणे आवश्यक असून महाराष्ट्र शासनाने आजतागायत याबाबत कुठलीही ठोस अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप समाजनेत्यांनी केला.
धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांची काल एका व्यक्तीने गाडी फोडल्यानंतर समाज बांधवानी तीव्र संताप व्यक्त केलाय. त्याच अनुषंगाने आज दीपक बोऱ्हाडे यांनी समाज बांधवांसह जालना चे पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेतली.राज्यभर फिरत असताना त्यांच्यावर भ्याड हल्ले होण्याची दाट शक्यता असून त्याच्या जीवितास धोका निर्माण झाला असून सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी समाज बांधवानी पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदणाद्वारे करण्यात आली.
बीड जिल्ह्यामध्ये काल सहा नगरपरिषदेच्या निवडणुकांची मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये बीड गेवराई आंबेजोगाई परळी धारूर माजलगाव या नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आता स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आले असून त्या ठिकाण कडे कोट पोलिसांचा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार असून यासाठी आता जिल्हा प्रशासन अलर्ट मोड वरती असून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर पोलिसांचा पहारा स्ट्रॉंग रूम वरती असणार आहे
पुणे येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली
या परिषदेत निवडणुकांच्या पुढे ढकलण्यात आलेल्या निर्णयावर ते बोलले
याशिवाय Evm चीप कुठे बनवले जाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारा असं ते म्हणाले
मतदानाच्या टक्केवारीवरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक.
आष्ट्यातील स्ट्रॉंग रूम समोर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या
आष्टा नगरपरिषदेत मतदानाचा टक्का वाढवल्याचा राष्ट्रवादी शरद पवार गट प्रणित शहर विकास आघाडीचा आरोप..
स्ट्रॉंग रूमच्या समोर कार्यकर्त्यांचा जोरदार गोंधळ, हजारो कार्यकर्त्यांचा स्ट्रॉग रूम समोर ठिय्या.
स्ट्रॉंग रूमच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा देखील आरोप
राज ठाकरे हे संजय राऊतांच्या भेटीला गेले आहे.
त्यांच्या नाहूरच्या निवासस्थानी राज ठाकरे पोहचले आहेत.
राज ठाकरे संजय राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले आहेत.
भाजपचे माजी ओबीसी प्रदेशाध्यक्षांच्या घरावर रात्री 12 वाजता दरम्यान दगडफेक
अज्ञात 5 ते 6 लोकांनी केली दगडफेक,दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या
पांढरकवडा येथील घटना,पोलिसात सहा अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हजारो नागरिकांची पोलिस ठाण्यावर धडक
घरातील महिलांसमोर अश्लील शिवीगाळ करीत जीवाने मारण्याची धमक,सार्वजनिक मालमत्ता आणि गैरकायद्याची मंडळ जमविणाऱ्यांविरोधात पोलिसांची अज्ञात आरोपी विरोधात केले गंभीर गुन्हे दाखल
नागपुर हिवाळी अधिवेशन कालवधी एक आठवडा
सोमवार ते रविवार असणार - ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असणार अधिवेशन
रविवारी ही असणार अधिवेशन
ठाण्यात कायद्याचा धाक राहिलाय का?
ठाण्यातील शहराच्या मुख्य भागात चोपरने केला हल्ला
ठाण्यातील काजुवाडी येथील रहिवासी असलेल्या देवराज दर्पे (वय २०)
या २० वर्षीय तरुणावर स्थानिक गुंडांनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चॉपरने केला हल्ला
कलाकार अनिता दाते यांच्या पाठोपाठ अभिनेता चिन्मय उदगीरकरने देखील केला तपोवनातील वृक्षतोडीला विरोध.
- तपोवन वाचवा तपोवन वाढवा हा आमचा नवीन नारा असल्याचे त्याने सांगितले.
-
काल बुलढाण्याबाबत जे जे दाखवलं गेलं आणि बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. अनेक मतदारांची नावे हे वेगवेगळ्या प्रभागात आहेत. इकडे गेले की तिकडे तिकडे गेले की इकडे पाठवतात. मी आणि माझी पत्नी एका बुथवर गेलो तर त्यांनी सांगितलं की तुमचं नाव दुसऱ्या बूथ वर आहे. काल एका मुलाला इकडे नाव नव्हतं म्हणून दुसऱ्या प प्रभागात पाठवला आणि त्याला तिकडे मारलं. इतरांना त्याला मारायचा अधिकार नाही त्याला मारत होते तेवढ्यात माझा मुलगा तिथे गेला आणि तो माझ्या मुलाला चिटकला की,मला वाचवा वाचवा म्हणून इतर अजून कोणी मारेल म्हणून त्या मुलाला इथून तू निघून जा असं माझा मुलगा म्हटला तर त्याचं काय चुकलं. निवडणुकीत इतकं तितकं होत असतं....! हा काय बिहार थोडी आहे...? आमच शहर सुशिक्षित आहे. बुलढाण्यात पोलिसांनीच दहशत माजवली.
राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भाजप पक्ष त्यांना देशद्रोही ठरवतो, मात्र काल राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीचे इलेक्शन पुढे ढकलल्यानंतर भाजपाने निवडणूक आयोगावर अतिशय बोचरी अशी टीका केली मात्र ते देशद्रोही ठरत नाही. शेवटी राहुल गांधी जे बोलत होते त्याची पाठ राखण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे करावी लागली निवडणूक आयोग हे त्यांचे काम फ्री अँड फेअर पद्धतीने करत नसल्याची टीका काँग्रेसचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाघोली येथील एका पेट्रोल पंपासमोर भरधाव कार उलटी होऊन महामार्ग फरफटत गेल्याचे समोर आले आहे,सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अहिल्यानगरसह राज्यभरातील नगरपालीका निवडणूकीत मतदान झालेले इव्हीएम मशिन आता प्रशासनाला पुढचे अठरा दिवस सांभाळावे लागणार आहे.. प्रत्येक नगरपालीकेत स्ट्राँगरूम बनवण्यात आले असून राज्य राखीव पोलीस दल, जिल्हा पोलीस आणि नगरपालीका कर्मचाऱ्यांची त्रिस्तरीय सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.. यासह सिसीटीव्हीच्या निगराणीत स्ट्राँगरूमवर करडी नजर ठेवली जात आहे.. जर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतीनीधीला स्ट्राँगरूमजवळ थांबायचे असेल तर त्यांनाही परवानगी देण्यात आली आहे.. नेमकी कशी सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
पुण्यातील एमपी/एमएलए विशेष न्यायालयात सुरु असलेल्या सावरकर विरुद्ध राहुल गांधी मानहानी प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या.खासदार राहुल गांधी यांच्यावर दाखल झालेल्या खटल्याच्या मूळ प्रक्रियेवरच आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मागील सुनावणीत फिर्यादी सात्यकी सावरकर यांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये गंभीर आणि मूलभूत त्रुटी आढळल्याचे उघड झाल्यानंतर, ॲड. मिलिंद पवार यांनी काही आक्षेप मांडले. न्यायालयात दाखल केलेल्या सीडी, ऑनलाईन लिंक्स आणि डिजिटल सामग्री तांत्रिकदृष्ट्या त्रुटीपूर्ण असल्याचे बचाव पक्षाचे वकील ॲड. मिलींद पवार यांनी सांगितले व न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
हिंजवडी येथील मर्सिडीज स्कूल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकीचा ईमेल मिळतात बीडीएस पथक आणि डॉग स्कॉड पथक शाळेत दाखल.
महाड नगर पालिका निवडणुक प्रक्रिये दरम्यान महाड शहरातील रोहिदास नगर येथे मतदान केंद्रा बाहेर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता सुशांत जाबरे याच्याकडून रिव्हॉल्वर काढण्यात आली आणि त्यानंतर हा राडा झाला असा आरोप मंत्री पुत्र विकास गोगावले यांनी केला होता. या प्रकरणी महाड तालुका आणि महाड MIDC पोलिस ठाण्यात दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कार्यकता सुशांत जाबरे याने विकास गोगावले यांचा विरोधात अंगरक्षकाकडील रिव्हॉल्वर हिसकावुन घेतली आणि सोन्याचे चेन, मोबाईल घेऊन लंपास झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे तर शिवसेनेच्या बाजुने महेश गोगावले याने सुशांत जाबरे याच्यासह बारा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पिस्टलचा वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हॉकीस्टीक, स्टप, बॅटचा वापर करून मारहाण आणि अडिच तोळे वजनाची सोन्याची चेन चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही गुन्हे महाड शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून अधिक तपास महाड शहर पोलिस करणार आहेत.
महाराष्ट्रातील समाजकारण- राजकारणातील निस्पृहतेचा आदर्श काळाच्या पडद्याआड गेल्याची शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नोटीस संदर्भात कोरेगाव भीमा आयोगासमोर अडवोकेट असीम सरोदे भूमिका मांडणार
उद्धव ठाकरेंच्या वतीने असीम सरोदे आज कोरेगाव विमा आयोगामध्ये वकीलपत्र सादर करणार
शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव दंगली संदर्भात लिहिलेल्या पत्रावरून उद्धव ठाकरेंना दिली होती नोटीस
प्रकाश आंबेडकर यांच्या वकील कडून उद्धव ठाकरे हजर राहत नसल्याने अटक वॉरंट काढण्याची केली आहे मागणी
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा नंदुरबार आणि नवापूर नगर परिषदेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली उशिरापर्यंत अनेक मतदान केंद्रावर मतदान सुरू होतं काही ठिकाणी अपवाद वगळता मतदान हे सुरळीत पार पडलेली आहे मात्र निकालाची तारीख पुढे ढकलल्याने आता या सर्व मतपेट्या नंदुरबारच्या वखार महामंडळाचा गोडाऊनच्या स्ट्रॉंग रूम मध्ये या स्ट्रॉंग रूमला काटेकोर अशी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून विस्तरीय सुरक्षा व्यवस्था प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत असून काल झालेल्या मतदानात सरासरी 70 टक्के मतदान हे झालेलं आहे मतमोजणी ही 21 डिसेंबरला होत असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे..
साखर आयुक्त डॉ.संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित
पाच सदस्य चौकशी समिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळणाऱ्या अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार
साखर आयुक्त संजय कोलते यांच्याकडून चौकशी समितीचे आदेश जारी
समिती साठ दिवसांच्या आत राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या मंत्री समितीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा घेतला होता निर्णय
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची केली होती मागणी
परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धाडसामुळे एका ट्रॅक्टरचालकाचे प्राण थोडक्यात वाचले आहेत.निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे जिल्हाभरात फिरत असताना,मानवत तालुक्यातील मंगरूळ परिसरात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मध्यरात्री आग लागलेली दिसली.धक्कादायक म्हणजे—ट्रॅक्टरच्या हेडवरच चालक गाढ झोपलेला, आणि आग लागल्याची त्याला कल्पनाही नव्हती.या क्षणी एसपी परदेशी यांनी तात्काळ गाडी थांबवली.रात्री दीडच्या सुमारास पथकाने ही आग विझवली… आणि झोपलेल्या चालकाला बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले.
खाकी वर्दीतील माणुसकी आणि तत्परता या घटनेवरून समोर आलीय..
नव्याने मंजूर झालेल्या मेट्रो मार्गासाठी सिंहगड रोडवरचा उड्डाणपूल तब्बल ६६ ठिकाणी फोडण्याचा प्रस्ताव
केंद्र सरकारने नुकतीच खडकवासला ते हडपसर-खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या ३२ किलोमीटर लांबीच्या आणि ९८५८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली आहे
काही दिवसांपूर्वीच सिंहगड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून हा नवा उड्डाण पूल बांधण्यात आला आहे
पण आता उड्डाण पूल मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी फोडण्यात येणार आहे
सिंहगड रोडवरचा हा उड्डाणपूल बांधताना मेट्रोच्या खांबांची जागा निश्चित केली असून, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ६६ ठिकाणी उड्डाण पुलाला छेद दिला जाणार आहे. त्यामुळे उड्डाण पुलाची रुंदी जवळपास प्रत्येकी दोन मीटरने कमी होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे
यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील लाख गावाजवळ अरुणावती प्रकल्पाच्या कालव्याला तीन जागी मोठे भगदाड पडल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांत पाणी शिरले आहे. शेतीला तलावाचे स्वरूप आले असून शेतीतील विद्युत खांबही कोसळला आहे. पाण्याचा जोरदार प्रवाह शेतात शिरल्याने पेरणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यात गहू, चना, भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले.आधीच अतिवृष्टी व आसमानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर आता सुलतानी संकटाने मार दिला.अरुणावती प्रकल्प प्रशासनाच्या दुर्लक्षित व निष्काळजी धोरणामुळेच हा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामा करून योग्य व त्वरित भरपाई देण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करून कॅनलची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
गुन्ह्यात आरोपी निलेश घायवळ फरार आहे
पोलिसांनी त्याच्याविरोधात इंटरपोलकडून ब्लू कॉर्नर नोटीस बजावली.
आता पोलिसांकडून घायवळ विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरास गेल्या वर्षभरात (1 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर) एक कोटी 51 लाख 67 हजार 100 भाविकांनी भेट दिली. यात देशभरातील पर्यटक सामील होते गेल्या वर्षभरात मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, कर्नाटक इत्यादी राज्यातील भाविकांनी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतलं. कोरोना काळानंतरचा हा सर्वाधिक आकडा असल्याच मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
सध्या उत्तरेकडून थंड वारे वाहत असल्यामुळे अमरावती शहरातील किमान तापमानात घट झाली आहे. आज किमान तापमान - १२.५ तर कमाल तापमान ३०.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. किमान तापमानासह कमाल तापमानातही घट होत आहे.सध्या अंशतः ढगाळ वातावरण असून चक्रीवादळ सेनयार सध्या थंडावले आहे. श्रीलंकेजवळ डिटवा नामक
वादळ सक्रीय झाले असून, आंध्र प्रदेशात थांबले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अंशतः वातावरण आहे. ही ढगाळ ढगाळ परिस्थिती ४ तारखेपर्यंत याच निवळल्यानंतर तसेच कालावधीत हिमालयावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पारा १० अंशाखाली घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कडाक्याची थंडी राहणार असल्याचा अंदाज श्री शिवाजी हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड कृषी हवामान केंद्राचे यांनी दिली. डिसेंबर महिना शक्यता आहे, असा अंदाजही कडाक्याच्या थंडीचा राहण्याची त्यांनी वर्तवला आहे.
ज्येष्ठ समाजवादी नेते, दैनिक मराठवाडाचे माजी संपादक पन्नालाल सुराणा यांच्या निधनाने भूमिहीन शेतकरी, मजूर, वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, जुना समाजवादी पक्ष,जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जन आंदोलन यांच्या उभारणीमध्ये पन्नालाल सुराणा यांचा मोठा वाटा होता. 'चले जाव' आंदोलनापासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत, त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक,राजकीय स्थित्यंतराचे ते साक्षीदार होते. मराठवाड्यात भूकंपात सर्वस्व गमावलेल्यांसाठी त्यांनी सुरू केलेल्या 'आपलं घर' मधून अनेक मुला- मुलींची आयुष्य घडली आहेत.
निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना थेट निर्देश
एकूण २२७ प्रभागांसाठी २२७ स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितले
या अधिकाऱ्यां दुबार मतदारांची तपासणी करणे
मतदान यादीतील चुका व तुटी शोधणे
तक्रारी स्वीकारणे व त्यावर कार्यवाही करणे
राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोघांकडूनही
दुबार नावं व मतदान यादीतील त्रुटींसाठी निवडणूक आयोगावर आरोप होत होते.
आता आयोगाकडून घेतलेल्या या निर्णयामुळे
मतदार यादीतील गोंधळ संपणार का याकडे लक्ष
गडचिरोली नगरपरिषद निवडणूक-२०२५ अंतर्गत आज आरमोरी, वडसा आणि गडचिरोली नगरपरिषदेत शांततेत मतदान पार पडले असून जिल्ह्यात सरासरी 70.60 टक्के मतदान नोंदविण्यात आले. यात आरमोरी नगरपरिषद मतदार संघात 72.85 टक्के, वडसा(देसाईगंज) 72.48 तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात 68.26 टक्के मतदान झाले आहे.
आरमोरी मतदारसंघात 11 हजार 792 पुरुष आणि 11 हजार 207 महिला असे एकूण 22 हजार 999 मतदार होते त्यापैकी 8271 पुरुष आणि 8484 महिला असे एकूण 16 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
वडसा मतदारसंघात एकूण 12 हजार 763 पुरुष मतदार व 13589 महिला असे एकूण 26 हजार 352 मतदार होते. यातील 9449 पुरुष मतदार व 9652 स्त्री मतदार असे एकूण 19 हजार 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
नांदेड जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठी एकुण 74.75 टक्के मतदान / निवडणुक विभागाची माहीती
मतदानाची अंतिम टक्केवारी
1- देगलूर – 71.31
2- बिलोली – 75.62
3- कुंडलवाडी – 79.39
4 - उमरी – 71.53
5- मुदखेड – 73.55
6 - भोकर – 75.27
7- हिमायतनगर – 77.71
8- किनवट – 74.27
9 - हदगाव – 65.80
10- लोहा – 81.80
11कंधार –76.02
: वाशिमच्या मानोरा तालुक्यात कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा मोठा फटका बसत आहे. दिवाळीनंतर मोठा मजूर वर्ग ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झाल्यामुळे स्थानिक स्तरावर विशेषतः महिला मजूर उपलब्ध नाहीत. परिणामी अधिक मजुरी देऊन बाहेरगावातून मजूर बोलावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.कापूस दर सध्या जिनिंगमध्ये सुमारे ७ हजार रुपये क्विंटलवर स्थिर आहेत. येत्या काळात भाव वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असली तरी मजुरीचा वाढता खर्च आणि मजूर न मिळण्याची समस्या हा हंगाम खर्चिक ठरत आहे..
- दोन चांदीच्या मूर्ती आणि दानपेटी घेऊन चोरटे फरार, चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद
- जानेवारी महिन्यात १५ दिवस असते मतोबा महाराजांची मोठी यात्रा
- यात्रेपूर्वीच मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ
- मागील काळात एक मूर्ती असताना चोरी झाली होती, मात्र चोरीला गेलेली मूर्ती एका शेतात नांगरणी करताना आढळली होती
- महिनाभर मूर्ती सापडत नसल्याने गावकऱ्यांनी स्थापन केली होती दुसरी मूर्ती
- त्यामुळे मंदिरात झाल्या होत्या दोन चांदीच्या मूर्ती
- आता दोन्ही मूर्ती चोरीला गेल्याने गाव बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
- जोपर्यंत मूर्ती सापडत नाही आणि चोरट्यांना पकडलं जात नाही तोपर्यंत गाव बंद ठेवण्याचा इशारा
वणी परिसरातील उद्योगधंदे आणि दयनीय रस्त्यांमुळे शेती व्यवसायात प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून उद्योगातील धूर आणि रस्त्यावरील धुळीमुळे पिकांच्या दर हेक्टरीवर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. वायुप्रदूषण शेती व्यवसायास मारक ठरत आहेत. प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आज धुळ्यात आठ पूर्णांक आठ अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद
गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने धुळेकर चांगलेच गारठले
कोकणातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी आंगणेवाडी ची यात्रा 9 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे ही यात्रा गावातील मानकरी एकत्र येऊन ठरवतात. यात्रेची तारीख आज ठरविण्यात आली आहे यात्रा कधी असणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असते यात्रा जाहीर होण्याच्या तारखेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असतं. 9 फेब्रुवारी 2026 रोजी यात्रा होणार आहे. यात्रेत मोठ्या संख्येने राजकीय नेते नवस बोलणे आणि नवस फेडण्यासाठी उपस्थित राहत असतात त्यामुळे यात्रेकडे विशेष लक्ष असतं
एमपीएससी आयोगामार्फत घेण्यात येणारी संयुक्त पूर्व गट 'ब' 2025(अराजपात्रित) ही परीक्षा 21 डिसेंबर ला होतं आहे, नगरपरिषद व नगरपंचायतची मतमोजणी आत्ता 21 डिसेंबर ला होणार आहे, त्यामुळे 21 डिसेंबर ची संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याचं वेळी होणार कि पुढे जाणार याबद्दल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, हिचं परीक्षा 9 नोव्हेंबर ला होणार होती, परंतु पावसामुळे पुढे ढकलून 21 डिसेंबर होणार आहे,
भरण्यात येणारी पदे
1) सहायक कक्ष अधिकारी, 03 पदे
२) राज्य कर निरीक्षक २७९ पदे
3) दुय्यम निबंधक. 0 पदे
4) पोलीस उपनिरीक्षक. 392 पदे.
एअर इंडिया एक्सप्रेस कडून पुणे अबुधाबी थेट उड्डाण सेवा सुरू करण्यात आली आहे
पुणे विमानतळावरून अबुधाबी साठी नव्या विमानसेवा सुरू झाल्यामुळे दुबई बँकॉक नंतर अबू धाबीसाठी ही तिसरी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे
त्यामुळे पुणेकरांना आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि प्रवासासाठी आणखी एक डेस्टिनेशन मिळाले आहे.
या नव्या आंतरराष्ट्रीय मार्गामुळे पुण्याच्या नागरिकांसह व्यावसायिक उद्योजक विद्यार्थ्यांना आणि मध्यपूर्व भागात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला
त्यामुळे सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात त्यांना रात्री उशिरा दाखल करण्यात आलं होत
मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली
त्यांचे पार्थिव शरीर शासकीय रुग्णालयला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे
- विद्यापीठाच्या 102 वर्षांच्या इतिहासात डॉ. क्षीरसागर या पहिल्या नियमित महिला कुलगुरू ठरल्या आहेत
- डॉ. मनाली क्षीरसागर या नागपुरातील वायसीसीई तंत्रज्ञान संस्थेत संचालिका म्हणून कार्यरत आहेत
- नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेपासून आतापर्यंत 25 नियमित कुलगुरूंची नियुक्ती करण्यात आली आहे
- विद्यापीठातील रिक्त पदे भरणे आणि विद्यार्थी हिताला प्राधान्य देणार असल्याच्या डॉ. क्षीरसागर यांचा मानस
* जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी 853 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली..
* सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा, तर नवमतदार आणि महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय होती...
* मतदान प्रक्रिया पार पडली असली तरी कोर्टाच्या निकालामुळे निकालासाठी 19 दिवसाची प्रतिक्षा करावी लागणार..
* नागपूर जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 7.95 टक्के मतदान
*
* साडेअकरा वाजेपर्यंत 19.03 टक्के मतदान
* दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 45.95 टक्के मतदान
* सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सरासरी 64.43 टक्के मतदान पार पडले..
नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत नवनवीन टिस्ट येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने 11 पैकी यवतमाळ नगरपरिषदेची संपूर्ण तर तीन पालिकेतील सहा जागांची निवडणूक पुढे ढकलली काल मतदान झालेल्या 9 पालिका व एका नगरपंचायतीची मतमोजणी तीन ऐवजी 31 डिसेंबरला होणार आहे त्यामुळे भाग्य इव्हीएम बंद झालेल्या उमेदवारांना निकालासाठी 18 दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करण्यास सुरुवात
भटक्या कुत्र्यांना मोकळ्या जागी किंवा परवानगीशिवाय खाद्य देणे दंडणीय असणार
पुढील पंधरा दिवसात महापालिकेकडे भटक्या कुत्र्यांची अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक
शहरातील भटक्या कुत्र्यांची हालचाल आरोग्य स्थिती समजून घेण्यासाठी नोंदणी बंधनकारक
महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची माहिती
सध्या ऊसतोड सुरु असुन बिबट शिकारीच्या शोधात बाहेर पडत असताना आता बिबट समुह संख्येने बाहेर पडत असल्याने शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगार चांगलेच धास्तावलेत त्यामुळे टोळीने फिरणा-या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतेय
- सुनील अग्रवाल यांच्या फार्महाऊसवर भरारी पथकाची धाड, बहुजन रिपब्लिक एकता मंचाचा सुलेखा कुंभारे याही पोहचल्या फार्म हाऊसवर...
- भरारी पथकाच्या धाडीत ५० हजार रुपये, दारु बॅालल्स आणि शाई मिटवण्याचे द्रव्य सापडल्याची प्राथमिक माहिती
- सुनील अग्रवाल हे भाजपचे कामठी नगरपरिषदेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांचे नातेवाईक असल्याची जोरदार चर्चा
- या कारवाईत १२ जणांना ताब्यात घेण्यात आलंय, यापैकी काही बोगस मतदार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे...
- या सगळ्या प्रकरणात पोलीस काय गुन्हे दाखल करत कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष, तेच दुसरीकडे निवडणूक रद्द करण्याचा याचिकेने कामठी निवडणूक अडचणीत सापडली आहे..
जिल्ह्याची एकूण टक्केवारी ( अंदाजे ) - 68.01 %
सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान झालेले मतदान
प्रशासनाकडून अंतिम आकडेवारी नाही अंदाजे आकडेवारी जाहीर.
मंचर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
पुरुष – 6515
स्त्रीया –6218
इतर - 1
एकूण – 12734
टक्केवारी ( अंदाजे )– 74.19%
माळेगाव
पुरुष 7344
महिला 7112
इतर 1
एकूण 14457
टक्केवारी ( अंदाजे ) 77.19%
जेजुरी
पुरुष 5895
महिला 6436
इतर 2
एकूण 12333
टक्केवारी ( अंदाजे ) 78.06%
वडगाव
एकूण मतदान 14553
पुरुष 7321
महिला 7233
पुरुष टक्केवारी 71.89
महिला टक्केवारी 74.85
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजप मागविणार इच्छुकांचे अर्ज
पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत.पण त्यापूर्वी कोणत्या प्रभागात कोण इच्छुक आहेत याची प्राथमिक चर्चा कोअर कमिटीच्या बैठकीत होणार आहे.
साधारणपणे १५ डिसेंबरनंतर भाजपकडून ही प्रक्रिया सुरु केली जाणार असल्याचे शहर भाजपकडून सांगण्यात आले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरातील राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे..
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती होण्याची शक्यता नाही.
भाजपने तर स्वबळाची तयारी सुरु केली आहे.यामध्ये सर्व प्रभागातील बूथ यंत्रणा तयार करून संघटनात्मक पातळीवर तयारी केली आहे.
१५ डिसेंबरनंतर पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत.
मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. राज्यात आज अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेच्या शक्यतेमुळे सतर्कतेचा इशारा कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 10 नगरपालिकेच्या अध्यक्ष आणि 122 प्रभागाचे नगरसेवक निवडण्यासाठी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच शासकीय तंत्रनिकेतन केंद्र येथील मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांनी पकडले त्याला पोलीस ताब्यात घेत असतानाच त्यास पळून जाण्यास मदत केली व शासकीय कामात अडथळा आणला याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा व या प्रभागाचा उमेदवार कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.