कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागात आज कर्नाटकी बेंदूर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सिद्धनेर्ली इथं पारंपरिक 'करीच्या बैलाची' मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी बैलाला पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. यंदा या परंपरेला सामाजिक बांधिलकीची जोड देत सिद्धनेर्लीतील पाटील कुटुंबीयांनी गावातील ३५ बैलधारक शेतकऱ्यांचा सत्कार केला. इथं कर्नाटकी बेंदूर सणात 'करीचा बैल' काढण्याचा मान हा दरवर्षी रोटेशन पद्धतीने पाच घराण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आला आहे. यंदा कृष्णात पाटील यांच्या घरी ६० वर्षांनी हा मान मिळाला.
उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्ता मेळाव्यादरम्यान चोरट्याला रंगेहाथ पकडले...
गर्दीचा फायदा घेत कार्यकर्त्याचा खिसा कापण्याचा प्रयत्न फसला...
शिवसैनिकांनी दिला चोरट्याला चोप...
शिर्डीतील मेळाव्यादरम्यान घडला प्रकार...
मेळावा संपल्यानंतर उद्धव ठाकरे गाडीतून मार्गस्थ होत असताना चोरीचा प्रयत्न...
रंगेहाथ पकडल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी चोरट्याला दिला चोप...
राहाता पोलिसांनी चोरट्याला घेतले ताब्यात...
नागपूर
- नागपूरच्या सेंट्रल एव्हेन्यू, गांधीबाग परिसरातील बॉम्बे स्कूटर्स या इमारतीचा काही भाग कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
- या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील हा भाग कोसळला.
- या दुर्घटनेत एका कारसह तीन मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे.
- या घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले....मलबा हटविण्याचे कामही सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाळ्यातल्या पहिल्याच पावसाने नदी नाले आणि शेतातून वाहू लागले आहे. आठवडा भरापासून हलका पाऊस होत होता, मात्र आज सायंकाळी अर्धा तास जोरदार पाऊस झाला. मोठा पाऊस पडेल या आशेने शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत. आज पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतात खरीप हंगामाचे काम करीत असताना दुपारच्या सुमारास अचानक मेग गरजेने सह पावसानं हजेरी लावली. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा शेतातच मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या बेटाला येथील शेतशिवारात घडली. रामकृष्ण देशमुख असं वीज कोसळून मृत पावलेल्या 52 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात वीज कोसळल्यानं पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे पाऊण तास मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत तर या पावसामुळे पंधरा दिवसांपासून रखडलेल्या बळीराजाच्या पेरण्यांना देखील सुरुवात होणार असल्याने बळीराजा सुखावला आहे
विषारी सापाच्या दंशाने चिमुकल्याचा मृत्यू
झोपेत विषारी साप चावल्याने सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील लचमागुडा गावात घटना घडली. समीर मारोती आत्राम असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटीही समोर आल्या आहेत. पाटण आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनाने गडचांदूर येथे हलवण्यात आले. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेमुळे जिवती तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर संतप्त नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, तातडीने सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा परिसरात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस.
खरीपाच्या पेरण्या झालेल्या पिकांना पावसामुळे मिळणार जीवदान.
तामसा परिसरात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला.
पाणीपातळीत देखील वाढ होण्याची शक्यता.
सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना वडगाव मावळ न्यायालयाने दिली चार दिवसाची पोलीस कोठडी
केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते यात शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ते प्रति दोन हजार प्रमाणे अर्थ सहाय्य दिले जाते मात्र जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात चक्क एक पैसा आल्याचा संदेश मोबाईल वर प्राप्त झाला आहे
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पानोरा फाट्यावर दुचाकी आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. दुर्गवाडा येथील अमोल इंगळे (४९) व संतोष काकडे (४२) हे दोघे दुचाकीने दर्यापूरकडे येत असताना, समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या कल्टिव्हेटरला त्यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये संतोष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अमोल यांच्या हात-पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
केतन अग्रवाल खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सिया गोयल आणि केतन अग्रवाल याला लोणावळा पोलिसांनी आज वळगाव मावळ कोर्टात हजर केला आहे. आजच्या न्यायालयाच्या सुनावणीत न्यायालय सिया गोयल आणि चेतन चौधरीला आणखी काही दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देणार का ? तसेच पोलिसांनी आतापर्यंत तपासात काय निष्पन्न केलं याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावाचा आणि लेटरहेडचा गैरवापर करून चक्क ४ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या बनावट प्रशासकीय मान्यता (प्रमा) आदेश तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी पहिली मोठी कारवाई करत, मुख्य संशयित आणि चामोर्शी नगरपंचायतीचा स्वीकृत नगरसेवक आशिष पिपरे याला रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर येथून बेड्या ठोकल्या आहेत.
रायगडच्या हरिहरेश्वर येथून बाणगंगा गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बाणगंगा, सावरवाडी आणि साक्षभैरी या तीन वाड्यांना जोडणाऱ्या हा रस्ता मुळात दगड मातीचा कच्चा असून पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला आहे. रस्त्यावर चिखल झाल्याने रस्ता निसरडा झाला असून येथून वाहन चालवताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्ता धोकादायक बनल्याने शाळकरी मुले, नोकरदार आणि वयोवृद्ध नागरिक मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. प्रशासनानेकडे गांभिर्याने पहावे अशी मागणी केली जात आहे.
TET पेपर फुटी प्रकरणी पुण्यात मनसेच आंदोलन
मनसेकडून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
आयुक्त कार्यालयासमोरच मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
TET पेपर फुटी प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करा मनसे कार्यकर्त्यांची मागणी
अक्कलकोट तालुक्यातील पारंपरिक करूणहुनवी सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा
बादोला बु येथे कारूणीहुनवीनिमित्ताने बैलाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली
बैलांना रंगीबेरंग, घंटा, फुलांच्या माळा, आकर्षक अलंकारांनी सजवले तर बैलांच्या शिंगांना रंग देऊन पारंपरिक रूप दिले जाते.
शेतकऱ्याकडून पिकांच्या समृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली जाते.
रायगडच्या गोरेगावमध्ये चार मजली इमरतीचा कॉलम फुटला
अलहसन सहकारी गृह निर्माण इमारत बनली धोकादायक
ग्राम पंचायतीने या पुर्वीच इमारत धोकादायक असल्याची बजावली होती नोटीस
गोरेगाव ग्राम पंचायतीने इमारतीचा विज आणि पाणी पाणी पुरवठा तोडत रहिवाशांना इमारत खाली करण्याची दिली अंतीम सुचना
-केतन अग्रवाल हत्याकांडा मधील आरोपीची आज पोलीस कोठडी संपणार
केतन हत्याकांडा मधील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीला न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती .
मावळ तालुक्यातील वडगांव न्यायालयात ह्या दोघांना हजर करणार
* मनसे नेते अमित ठाकरे यांनी घेतले संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधीचे दर्शन
* थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वर मधून पालखी सोहळ्याला होणार सुरुवात
* पालखीच्या प्रस्थानाआधी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीची पूजा करून घेतले आशीर्वाद
* पारंपरिक वारकरी फेटा घालून अमित ठाकरे यांनी घेतले दर्शन
* मंदिर संस्थानतर्फे अमित ठाकरे यांचा सन्मान
कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन
महिला कृषी आयुक्त कार्यालयावर चढून केले आंदोलन
कृषी आयुक्त कार्यालयासमोर केला आंदोलन
पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग समोर आंदोलन
काही महिलांनी इमारतीच्या वरती चढून केलं आंदोलन
सई विरार शहरात पावसाची मध्यरात्रीपासूनच जोरदार बॅटिंग सुरु असल्यामुळे वसईचा गिरीश रस्ता पाण्याखाली गेला आहे.
साचलेल्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.
जळगाव शहरातील कासमवाडीत साडेतीन वर्षांच्या बालकावर कुत्र्याचा हल्ला
हल्ल्याची संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावर नागरिकांचा संताप
वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीमध्ये विरोधक आक्रमक झाले आहेत.. सांगली महापालिकेकडून भांडवली मूल्य सर प्रणाली अंतर्गत घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे.. मात्र यालाच नागरिकांचा प्रचंड विरोध सुरू झाला आहे. हा विरोध दर्शवण्यासाठी सांगली महापालिकेतील विरोधक आता एकवटले आहेत..काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली सांगली महापालिकेसमोर टाळ वादन करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात महिलांकडून वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असताना सिंधुदुर्गात मात्र आगळीवेगळी वटपौर्णिमा पाहायला मिळत आहे.
जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून महिला आजच्यादिवशी वडाची पूजा करतात.
मात्र सिंधुदुर्गात गेल्या 17 वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते आणि जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे अशी प्रार्थना केली जाते.
- मनसे नेते अमित ठाकरे थोड्याच वेळात त्र्यंबकेश्वरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या दर्शनाला येत आहेत
- पालखीचे पूजन आणि पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होणार आहे
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा निकाल
आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा
आरोपी भीमराव कांबळे याला फाशी शिक्षा
६० दिवसात केसचा निकाल
न्यायालयाने १ तास १० मिनिट केली सुनावणी
समाजात किळस आणणारे कृत्य आरोपीने केलंय
आरोपीची पूर्वीचे गुन्ह्याची दखल घेतली
आरोपी समाजासाठी कलंक आहे
- पोलीस भवनला येऊन आयुक्त पदाचा पदभार स्विकारण्यासाठी पूर्वी त्यांना सलामी देण्यात येईल
- विश्वास नांगरे पाटी नागपूरचे वर्तमान पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडून आयुक्त पदाचे प्रभार स्वीकारील...
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अंतिम निकाल तयार केला आहे
सर्व सात गुन्हे आरोपीचे सिद्ध झाले आहेत
देशातील यापूर्वीच्या खटल्यातील निकालांचा आधार घेतला आहे
बलात्कार आणि अमानुष खून केल्याप्रकरणी यापूर्वी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे
तालुक्यातील गोगाव गावाजवळील ओढे, नाले झालं ओव्हरफ्लो
गोगाव गावाला जोडणारा पूल गेला पाण्याखाली, वाहतूक झाली विस्कळीत
अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागात पावसाची दमदार एन्ट्री
ठाकरेंचा आज शिर्डीत कार्यकर्ता मेळावा
शिर्डीचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात आज धडाडणार ठाकरेंची तोफ
खासदार संजय राऊत, खा, अरविंद सावंत, आदित्य ठाकरे, खा. राजाभाऊ वाजे, खा. अनिल देसाई, ठाकरेंसोबत
अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी एका मोठ्या जुगार अड्ड्यावर रेड टाकली आहे. जुना सातुर्णा एमआयडीसी परिसरातील मेहेरबाबा कॅन्टीनजवळ ही धडक कारवाई करण्यात आली. जुगाराच्या या अड्ड्यावरून पोलिसांनी ५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, गुन्हा दाखल झालेल्या इतर ३ फरार आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.
- पुणे ग्रामीण पोलिस आरोपी भीमराव कांबळे ला कोर्टात हजर करणार
- पीडित चिमुरीडीचे कुटुंब आणि त्यांचे सदस्यांना कोर्ट रुम मध्ये बसण्याची परवानगी
- विशेष सरकारी वकील ऍडव्होकेट अजय मिसर उपस्थित राहणार
- सकाळी ११ वाजता विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे कोर्ट रुम मध्ये येणार
- सन्माननीय न्यायाधीश निकालाचे वाचन करायला सुरुवात करतील
- शिक्षा का सुनावली गेली याची कारणे वाचले जातील
- न्यायाधीश अंतिम निकाल आणि शिक्षा जाहीर करतील
नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे ला विशेष न्यायालय शिक्षा सुनावणार
हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अजय मिसर यांची मागणी
सोलापूर -
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरवरून टीका केल्यानंतर पालकमंत्री गोरे यांचा सल्ला
'उद्धवजींना माझा सल्ला आहे त्यांनी आता सबुरीने घ्याव, दुसऱ्याला दोष देऊन प्रश्न सुटत नाहीत आत्मपरीक्षण करण्याची वेळ'
'उद्धव ठाकरेंना सहा खासदार सोडून गेल्याच दुःख होईल. याचं दोषण दुसऱ्याला देण्यापेक्षा आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास ते करतील, त्यांना सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील'
'उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांनी याचा विचार केला पाहिजे. समोरची लोक सातत्याने का निवडणूक याचा विचार त्यांनी केला पाहिजे'
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावर जयकुमार गोरे यांचा टोला
भंडारा -
गोबरवाही प्रादेशिक नळयोजना पाच दिवसांपासून ठप्प
सहा गावात पाणी टंचाई; महिलांची पाण्यासाठी वणवण
राजीव सागर धरणातून पाणी सोडण्याची मागणी
अमरावती -
बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण, तरीही लोकार्पण रखडले..
नेत्यांच्या तारखेसाठी अमरावतीकर वेठीस?
अरुंद पर्यायी मार्गावर रोज अपघातांची मालिका; बडनेरेकरांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संताप....
नाशिक -
- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान
- संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरापासून पालखीचं होणार प्रस्थान
- वारीच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीनाथांच्या पालखी रथाला आकर्षक सजावट
- आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वरात लाखो वारकरी आणि भाविकांची गर्दी, त्र्यंबकनगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमली
- यंदा कुंभमेळ्याच्या रस्ते खोदकामामुळे पालखीच्या पारंपरिक मार्गात बदल
- तब्बल २८ दिवसांचा प्रवास करून निवृत्तीनाथांची पालखी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार
जालना -
जालन्यातील चितळी पुतळी येथे दोन दुकानांना लागली अचानक आग
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, लाखो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान.
चितळी पुतळी येथील शिवशक्ती वस्त्र भांडार आणि शिवशक्ती कृषी सेवा केंद्र या दुकानांना रात्री तीनच्या सुमारास अचानक आग लागली.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून आगीमुळे लाखो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे.
लोणावळ्यात अखेर पावसाची दमदार हजेरी
गेल्या २४ तासांत तब्बल १३१ मिलीमीटर पावसाची नोंद
यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस बरसला आहे
या मुसळधार पावसामुळे धबधबे, डोंगररांगा आणि निसर्ग पुन्हा एकदा बहरला असला
तरी एकूण हंगामाचा विचार केला तर पावसाची सरासरी अद्यापही अपेक्षेपेक्षा कमीच आहे
वडगाव कोर्टात आणलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन झाला पसार
वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने पलायन केल्याची घटना घडली.
कामशेत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी इमरान शेख याला रिमांडसाठी वडगांव न्यायालयात आणण्यात आले होते.
न्यायालयाबाहेर बेडी घालत असताना आरोपीने पोलिसाच्या हाताला हिसका देत बेडीसह पळ काढला.
पुणे -
राज्यात आजपासून पुढील ३ दिवस अनेक भागात दमदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर अमरावती जिल्ह्यांना एक आणि दोन जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज
कोकण किनारपट्टी सोडून राज्यातील इतर भागांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे
जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी जुलै महिन्याची सुरुवात चांगली होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे -
जिल्हा परिषद शाळांमध्ये अंगणवाड्या भरवा शिक्षण विभागाचे परिपत्रक
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राथमिक शिक्षक संचालकाचे आदेश
अतिरिक्त खोल्या उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये अंगणवाड्या स्थलांतरित करण्याचे आदेश
यावर्षीपासून परिपत्रकात दिलेल्या निर्देशानुसार अंमलबजावणी करण्याचे आदेश
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी एकाच परिसरात आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
भिवंडी शहरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले होते
शहरातील आमपाडा व खंडू पाडा परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते
प्रभूआळी परिसरात पावसामुळे एका इमारतीचे सुरक्षा भिंत कोसळली सुदैवाने कोणीही जखमी नाही
तर शांतिनगर परिसरात घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
सध्या पाऊस थांबल्यामुळे पाण्याचा निचरा झाला असून
भिवंडी महापालिकेने केलेल्या नालेसफाईची अक्षरशः पोलखोल झालेली आहे
बुलडाणा -
जनतेला सुरक्षित अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाची बैठक
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकाची घेतली बैठक.
नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा.
बुलडाणा -
संत मुक्ताबाई पालखीचे बुलढाण्यातून पंढरपूरकडे प्रस्थान
भक्तिमय वातावरणात वारकऱ्यांचा उत्साह
आ. संजय गायकवाड यांच्याकडून वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी व मुक्कामाची विशेष व्यवस्था
चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहित
कोकणात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली त्यामुळे कोकणातील धबधबे आता प्रवाहीत होऊ लागलेत.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा देखील प्रवाहित झालाय.
पावसामुळे उंच कड्यावरून मोठ्या वेगाने पाणी कोसळत असून निसर्गाचे मनमोहक रूप पर्यटकांना अनुभवायला मिळतय.
नागपूर -
- नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला शॉपमध्ये बेदाराकपणे घुसली कार
- मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भरधाव कार अचानक पणे रोडच्या लगत असलेल्या दुकानाचे शेडमध्ये घुसली
- कारचा वेग इतका अधिक होता की यामध्ये दुकानाच्या परिसरात असणाऱ्या लोखंडी साहित्य आणि पोलही वाकून गेले
- सुदैवाने मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे दुकानाचे नागरिक नव्हते मात्र दुकानाच मोठं नुकसान झालं,
- यात पोहेवाल्या शॉपच जवळपास अडीच लाखाचा नुकसान झालं.
- मध्यरात्री शहरात उच्चभ्रू कुटुंबातील मुलं भरडा रेसिंग कार रस्त्यावर उतरतात आणि त्यामधून अशा पद्धतीची घटना घडत असल्याची चर्चा आहे...
- त्यामुळे ही गाडी ही भरधाव रेसिंगच्या नादात तर कार घुसली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर -
- मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्या दोन दिवस हजेरी लावलेल्या पावसाने मात्र आता दडी मारल्याने नागपूरकर उकाड्याने त्रस्त झाले आहेत
- 23 जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर दोन दिवस पाऊस झाला
- त्यामुळे तापमान घसरून उकाडा दूर झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली आहे
- दररोज पावसाचे वातावरण तयार होते पण तसेच पावसाच्या सरी न बरसताच निघूनही जात आहे
- पारा 35 अंशावर असून सरासरीपेक्षा 1.1 अंशाने अधिक असल्याने दमट वातावरणात उकाड्याचा त्रास वाढला आहे...
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे कुंभारकर परिसरात रात्री अचानक घराला आग लागल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
सुमारे पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.. तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शॉर्टसर्किटने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वाशिम -
शेगावच्या संत श्री गजानन महाराजांची पालखी गेल्या दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात आहे. शिरपूर जैन येथील मुक्काम भक्तिमय वातावरणात पार पडला.
पालखीचे आगमन होताच भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि गण गण गणात बोते च्या जयघोषात श्रींचे उत्स्फूर्त स्वागत केले
नागपूर -
- विश्वास नागरे पाटील आज स्वीकारणार नागपूर पोलिस आयुक्त पदाचा पदभार
- विश्वास नागरे पाटील रात्रीच नागपुरात दाखल, पोलिस अधिकाऱ्यांनी केले स्वागत..
- हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण तापले असताना त्यांना राजकीय विरोधाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे..
नाशिकमध्ये द्राक्षाच्या बागेत बिबट्याचा रात्रीचा मुक्त संचार
नाशिकच्या निफाड तालूक्यात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर
अनेक ठिकाणी जनावरांचा फडशा पाडला असतानाच गोंदेगाव येथील शेतकरी हरीभाऊ सांगळे यांच्या द्राक्षाच्या बागेत रात्रीच्या वेळेस बिबट्याचा मुक्त संचार
वनविभागाने पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतक-यांनी केलीय.
यवतमाळ पालिकेच्या 515 दुकानांवर अवैध ताबा
हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे
यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे
नाशिक -
- त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेल्या शिवलिंगांचे अनेक वर्षांनंतर प्रथमच झाले दर्शन
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून संवर्धनाच्या कामाअंतर्गत अमृतकुंडातील पाणी उपसून स्वच्छता करण्यात आली
- स्वच्छतेदरम्यान कुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग स्पष्टपणे दिसून आले
- तब्बल ६५ फूट खोल असलेले अमृतकुंड पेशवेकालीन असल्याचे मानले जाते
- याच कुंडातील पाण्याचा उपयोग श्री त्र्यंबकेश्वराच्या नित्यपूजा आणि अभिषेकासाठी केला जातो
- सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना अमृतकुंडात प्रवेशास परवानगी नाही
रत्नागिरी - चिपळूण शहराला मुसळधार पावसाचा दणका
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातगटारे तुंबल्यामुळे रस्ता पाण्याखाली.
नगरपरिषदेच्या नालेसफाईचा पहिल्याच पावसाने केला पंचनामा.
शहरातील चिंच नाका, अनंत आईस फॅक्टरी परिसरात गटारे तुंबल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर.
रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहन चालकांची कोंडी
तीन तास पडलेल्या पावसाने नागरिकांची उडवली दैना.
चिपळूण शहरातील नालेसफाईवर प्रश्नचिन्ह
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.