Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: राष्ट्रीय ओबीसी महासंघाला संविधान चौकात आंदोलनांस परवानगी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शुक्रवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२५, गणेशोत्सव, मनोज जरांगेंचा मोर्चा, जरांगेंचे मुंबईत आंदोलन, महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

obc : राष्ट्रीय ओबीसी महासंघाला संविधान चौकात आंदोलनांस परवानगी 

राष्ट्रीय ओबीसी महासंघाला संविधान चौकात आंदोलनांस परवानगी मिळाली आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उद्यापासून साखळी उपोषण सुरू होणार आहे

- संविधान चौकात हे साखळी उपोषण सुरू होणार आहे

- याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे संविधान चौकात येऊन पाहणी करत आहे... पोलीस परवानगी मिळाली आहे

Kolhapur : गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळकडून खास भेट

गणेश उत्सवात दूध उत्पादकांना गोकुळ कडून खास भेट दिली आहे.

गोकुळची म्हैस आणि गाय दूध खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ

म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना दूध संकलन वाढविण्यास प्रोत्साहन मिळावा यासाठी गोकुळचा निर्णय

एक सप्टेंबर पासून होणार अंमलबजावणी

या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी मिळणार साडेचार ते पाच कोटींचा जादा दर

मात्र गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही

गोकुळचे चेअरमन नवीन मुश्रीफ यांची माहिती

लातूरची मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली.

लातूर जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून संततधार पाऊस कोसळतोय, त्यामुळं जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान सततच्या पावसामुळे लातूरची प्रमुख असणारी मांजरा नदी धुतले भरून वाहत आहे,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह

मुंबईमध्ये मराठा आंदोलन सुरू आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवकांचा सोलापुरात भव्य मोर्चा

- चार हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

- राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी-कर्मचारी एकत्रिकरण समितीच्या नेतृत्वात मागील 7 दिवसापासून सोलापूर जिल्हधिकारी कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरूय.

- 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन आणि प्रत्येक वर्षी 30 टक्के प्रमाणे आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यामध्ये समावेश करावा

- याशिवाय विविध मागण्यासाठी आरोग्य सेवकांनी हा मोर्चा काढला.

- शासनाने जर मागण्या मान्य केल्या नाही तर बेमुदत काम बंद आंदोलन सुरूच राहिल असा ईशारा आंदोलकांनी दिलाय.

राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विमानतळाकडे रवाना...

राज्य सरकारकडून घडामोडींना वेग...

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर घडामोडींना वेग..

उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी

शिर्डी विमानतळाकडे रवाना...

विशेष विमानाने जाणार मुंबईला...

उपसमितीची आज तातडीची बैठक होण्याची शक्यता...

सरकारच्या भुमिकेकडे सकल मराठा समाजाचे लक्ष...

मराठा बांधव गावाकडच्या दिशेने

मुंबईत नवी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

तसेच अनेक ठिकाणी मराठा बांधवांची गैरसोयी होत आहे

पुन्हा एकदा मुंबईतून आपल्या गावाच्या दिशेने मराठा बांधव गावी जाताना दिसून येत आहे

श्रीगोंदा येथे अजित पवारांच्या दिशेने कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न....

श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात बोलतांना अजित पवारांना कांद्यावर बोलण्याची करण्यात आली होती विनंती....

संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, आणि तालुका अध्यक्ष नाना शिंदे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात....

कांद्याचे दरा संदर्भात अजित पवारांना बोलण्याची करण्यात आली होती विनंती...

कांद्यासंदर्भात अजित पवारांनी शब्द न बोलल्याने भाषणाच्या शेवटी अजित पवारांकडे कांद्याची माळ फेकण्याचा केला प्रयत्न

Navi Mumbai: नवी मुंबईत मुसळधार पाऊस

जोरदार पावूस पडल्याने एपीएमसी मध्ये पाणी साचण्यास सुरवात

रस्त्यावर १ ते दीड फुट साचले पाणी

Pune News: पुण्यात ताम्हिणी घाटात दोन एसटी बसचा अपघात

दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या

ताम्हिणी जवळ चाचिवली येथे दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात

अपघातात 15 जण प्रवासी जखमी

आज सकाळी नऊ वाजता घडली घटना

पुणे कोलाड महामार्गावर मुळशी धरणाजवळ दोन एसटीचा समोरासमोर अपघात होऊन 15 जून जखमी झाले आहेत.

श्रीवर्धन ते बीड एस टी कोकणातून पुण्याकडे तर चिंचवड ते खेड ही एसटी पुण्याहून कोकणाकडे निघालेली होती.

वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक लागला नाही.या चालकांनी एसटी उजव्या बाजूला घेऊन डोंगराच्या बाजूला थांबविण्याचा प्रयत्न केला,मात्र यावेळी समोरून आलेल्या चिंचवड ते खेड या एसटीचा समोरासमोर धडक बसली.

नवी मुंबईत मुसळधार पाऊस

नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

सायन पनवेल महामार्गावर पाणीच पाणी

जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांचा मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत कल्याण काळे यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आमरण उपोषण सुरू केल आहे . जरांगे यांना अनेक आमदार खासदारांकडून पाठिंबा मिळत आहे.अशातच जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी देखील मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे - बळवंत वानखडे यांची मागणी

मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे - काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांची मागणी

येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन दडपल्या जाईल- काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांचं मोठं वक्तव्य

दुसऱ्याचा आरक्षण काढून मराठ्यांना आरक्षण नको मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

केंद्र सरकारने आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता स्पेशल अधिवेशन घेतलं पाहिजे व मराठ्यांचा प्रश्न निकाली काढला पाहिजे

भाजपने काँग्रेसवर आरोप करू नये भाजपचीच स्पष्ट भूमिका असली पाहिजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी

खाली आणी वर त्यांच सरकार आहे केंद्र त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे

Parbhani: परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर

परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात बहरलेली सोयाबीन, तूर आणि कापूस ही पिके पुराच्या पाण्यात फस्त झाली आहेत. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे

लेंडी नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे तब्बल १४ गावे संपर्क बाहेर गेली असून, यामध्ये पुयणी, आडगाव, तेलजापूर, गणेशवाडी, वनभुजवाडी, नाव्हा, नाव्हलगाव, खडी, कांदलगाव, तसेच फळा, सोमेश्वर, आरखेड, घोडा आणि उमरथडी या गावांचा समावेश आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा दिवसापासून उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न...!

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या पंधरा दिवसापासून डॉक्टर वायबसे व त्याच्या गुंडाच्या टोळीवर कोणी दाखल करण्यात यावे यासाठी उपोषणास बसले होते. पंधरा दिवसापासून न्याय मिळत नसल्याने वायबसे कुटुंबीय यांनी कालच आत्मदहनाचा इशारा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांना दिला होता.

केज तालुक्यातील कासारी येथील रामहरी महादेव वायबसे व त्यांचे कुटुंब गेल्या 14 ऑगस्ट पासून या दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आमरण उपोषणाला बसलेल आहे. ऊन वारा पाऊस अंधार यांचा सामना करत अन्यायाविरुद्ध लढा संविधानिक पद्धतीने त्यांचा सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन कुठली भूमिका घेत नसल्याने. न्याय देत नसल्याने येणाऱ्या 24 तासात मला न्याय न दिल्यास मी आत्मदहन करणार असा इशारा कालच वाय बच्चे कुटुंबीयांनी पोलीस व जिल्हाधिकारी यांना दिला होता.

तळोदा तालुक्यात रस्त्याअभावी जातोय आदिवासी बांधवांचा जीव.....

दुर्गम भागात रस्त्या अभावी गेला वृद्ध महिलेचा जीव....

पडत्या पावसात जंगलातून 7 किलोमीटरची पायपीट ठरली मृत्यूला कारणीभूत....

रस्त्या अभावी 70 वर्षीय बारकीबाई वळवी या आदिवासी महिलेला गमवावा लागला आपला जीव....

हातबारी ते लेखापूर या गावापर्यंत रस्ता नसल्याने भर पावसात बांबूच्या जोडीतून आदिवासींना करावा लागतो विचारासाठी जीव घेणा प्रवास....

मुसळधार पावसात ताडपत्री चा आधार घेत बांबू झोळीतून वृद्ध महिलेचा जीवघेणा प्रवास ठरला अखेरचा....

वेळेवर रुग्णालयात असताना आल्याने उपचारानंतर काही क्षणातच वृद्ध महिलेचा गेला जीव....

अनेक वर्षांपासून मागणी करूनही रस्ता होत नसल्याने गावकरी आक्रमक..

कारंजा येथील बालहौसी गणेश मंडळाने कडधान्यापासून साकारला इको फ्रेंडली बाप्पा..

वाशिमच्या कारंजा येथील बालहौसी गणेश मंडळ गेल्या पंधरा वर्षापासून इको फ्रेंडली बापाच्या मूर्तीची स्थापना करते, यंदाचा बाप्पा पारंपरिक पिकांना महत्त्व देत कडधान्यापासून हा बाप्पा साकारला आहे. विशेष म्हणजे मंडळचे सदस्य आपल्या हाताने बाप्पा साकारतात,हा बाप्पा साकारताना नेमकी कोणती कडधान्य वापरली आहेत.

मनोज जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांसाठी- बाळासाहेब थोरात

सरकारने तातडीने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे...

मात्र ज्यांना अध्यक्ष केले त्यांना वेळ नाही...

ते मतदारसंघातच छोटी मोठी कामे करत फिरताय...

ज्यांना अध्यक्ष केले त्यांनी गेलं पाहिजे, आंदोलकांशी बोललं पाहिजे...

मात्र अजून त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही...

बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांवर टीका...

लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत- उद्धव ठाकरे

बी सुदर्शन रेड्डी यांना आपण आधीच पाठिंबा दिला आहे. लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. चमत्कार कसाही होऊ शकतो. हा चमत्कार करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे, ते सर्वजण मिळून चांगले उपराष्ट्रपती देतील, अशी मला खात्री वाटतेय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंशिवाय विरोधीपक्ष पूर्ण होत नाही. त्यांनी आधीच आपल्याला सपोर्ट केला आहे. उद्धव ठाकरे यांना धन्यवाद करण्यासाठी मी दिल्लीवरून मी इथो आलोय. मातोश्रीवरून देश आणि महाराष्ट्रासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलोय, तो मला मिळाला आहे, असे रेड्डी म्हणाले.

Nanded: नांदेड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस.

नांदेड शहरातील जनजीवन विस्कळीत.

रात्री आणि पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील अनेक भागात साचले पाणी.

श्रावस्ती नगर आनंद नगर दत्तनगर वसनगर भाग जलमय.

अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उघड्यावर.

पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी पाण्याचा निचरा होण्यास विलंब.

घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान.

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीगोंदा येथे आगमन..

शेतकरी मेळाव्या ठिकाणी झाले दाखल..

आमदार संग्राम जगताप,शिवाजीराव गर्जे,माजी आमदार राहुल जगताप,घनश्याम शेलार यांची उपस्थिती..

शेतकरी मेळाव्यात काय बोलणार याकडे लक्ष..

हवामान खात्याचा यलो अलर्ट नंतर नवापूर तालुक्याला पावसाने झोडपलं....

हवामान खात्याने दिलेला येल्लो अलर्ट नंतर नवापूर तालुक्यात बरसलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील नदी-नाले, ओढे आणि रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांवर पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून येतो आहे.

नवापूर तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार...

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरात शिरलं पावसाचं पाणी.....

विसरवाडी गावात एका बेकरीत पाणी गेल्याने व्यावसायिकांचं लाखोचं नुकसान.....

बेकरीतील साहित्य, यंत्रसामग्री पाण्यामुळे खराब झाली असून संपूर्ण व्यवसाय उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती....

घर आणि दुकानांमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणीच पाणी.....

घरात पाणी शिरल्याने अनेक गरीब कुटुंब उघड्यावर तर संसार उपयोगी साहित्य देखील खराब..

Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात मुसळधार पाऊस

यवतमाळ -

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा शहरात मुसळधार पाऊस

संपूर्ण रस्ते जलमय झाल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली

बस स्थानक परिसरात पाणी साचले आहे.

जिल्ह्याला आज हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

उमरखेड, महागाव, पुसद आदी तालुक्यांमध्ये धुवाधार पाऊस बरसात आहे.

Amravati: अमरावती- मुंबई विमान सेवा बंद, प्रवाशांचे नियोजन कोलमडले

अमरावती -

अमरावती- मुंबई विमान सेवा बंद.

विमानात तांत्रिक बिघाड.

प्रवाशांचे नियोजन कोलमडले

Beed: बीड जिल्ह्यात धुवाधार पाऊस; 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून दमदार पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे नदी नाल्याने धोक्याची पातळी ओलांडली असून बीड खरवंडी महामार्गावरील नवगणराजुरी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पुलाचे काम सुरू आहे. काल झालेल्या जोरदार पावसामुळे नवगण राजुरी येथील डोमरी नदीला पूर आला असून यामुळे नवगणराजुरी सह पन्नासहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाला असून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ताटकळत बसावे लागले आहे एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे नदीवरील पाणी धोक्याची पातळी ओलांडली काही डोमरी येथील तलाव ओव्हर फ्लो झाला आहे कोणत्याही क्षणी तो धोक्याची पातळीवर लढू शकतो आणि पुलावरून जाणाऱ्या लोकांस धोका निर्माण होऊ शकतो म्हणून वाहतूक बंद करण्यात आली आहे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद झाल्याने 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिकमधून आमदार सरोज अहिरे यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे यांनी मराठा आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. नाशिकमधून आझाद मैदानाच्या दिशेने निघालेल्या मराठा बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व अहिरे स्वतः दाखल झाल्या आहेत. मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून गरज पडल्यास आंदोलकांसोबत आंदोलनात सहभागी होण्याची देखील तयारी आहे, सरकारने मराठा बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणीही सरोज अहिरे यांनी केलीय. तर सरोज आहिरे या मराठा नसताना त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला मात्र नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० हून अधिक आमदार मराठा असून त्यांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला नाही, याची आम्हाला लाज वाटते, आगामी काळात मराठा बांधव या लोकप्रतिनिधींना धडा शिकवतील असा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलाय.

गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील एका घरात साकारली लाल महालची प्रतिकृती

पुण्यातील गणेशोत्सव म्हणजे जगात भारी आणि त्यात अस्सल पुणेकर हे विविध आकर्षक, भव्य-दिव्य,आधुनिक आणि त्यासोबतच प्रबोधन पर देखावे सादर करतात. अशाच पुण्यनगरीतील मध्यवर्ती भागातील नारायण पेठेत संकेत सोपान बलकवडे यांनी त्यांच्या घरात लालमहाल तयार केला आहे. पुण्यनगरीतील लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या आठवणींचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे. राजमाता जिजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतला होता. याच महालात महाराजांचे बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.

आपला इतिहास अशा माध्यमातून आजपण जिवंत रहावा आणि त्यातून नागरिकांना सुद्धा त्याची महती कळावी या उद्देशाने ही प्रतिकृती बलकवडे यांनी साकारली आहे. हुबेहूब लालमहाल तयार करण्यासाठी संपूर्ण एक महिना लागला...

रत्नागिरीत शाळा दुरुस्तीचा संदेश देणारा इको फ्रैंडली गणपती

गणेशोत्सव म्हटल कि देखावे आलेच. मग ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असोत किंवा मग घरगुती गणपती असोत, अनेक ठिकाणी देखावे हे दिसत असतात. काही देखावे हे तर लक्षवेधी असतात, तर काही देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचाही अनेकजण प्रयत्न करत असतात, तर काही देखाव्यांमधून आपल्या आजूबाजूला घडत असणारी सत्य स्थिती मांडली जाते. रत्नागिरीतल्या कुवारबाव येथील अजय वर्तक यानीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्या घरी असाच एक देखावा साकारला आहे. वर्तक कुटुंबीयांनी साकारलेल्या गणेशमूर्तीच्या देखाव्यातून शालेय इमारतींची जीर्ण झालेली अवस्था आणि त्यांच्या दुरुस्तीची नितांत गरज यावर्षीच्या देखाव्यातून मांडली आहे.. गणेशोत्सवात गणपती बापाच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या गणेशभक्तांना शाळेच्या दुरुस्तीसाठी दान करण्याचे आवाहन करण्याचा प्रयत्न त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून केला आहे

Dharashiv: धाराशिवमध्ये २ दिवसांपासून वातावरणात बदल, सूर्यदर्शन नाही

धाराशिव -

धाराशिवमध्ये २ दिवसांपासून वातावरणात बदल, सूर्यदर्शन नाही

आज सकाळपासून पावसाने केली सुरुवात,जिल्ह्यातील उमरगा परिसरात नदी नाल्यांना पूर

Hingoli: हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी 

हिंगोली -

मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने सकाळच्या सत्रातील शाळांना हिंगोलीच्या वसमत आणि औंढा तालुक्यात सुट्टी जाहीर

वसमत विभागाचे उपविभागीय अधिकारी

विकास माने यांचे आदेश

Pune: पुण्यात काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस

पुणे -

पुण्यात काही भागात मुसळधार तर काही भागात संततधार पाऊस

पावसातही गणेश भक्तांचा उत्साह

छत्र्या घेऊन देखावे पाहण्यासाठी आलेले पुणेकर भाविक

गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी घरातील दीड दिवसाचा गणपती बुडवल्यानंतर देखावे पाहिला घराबाहेर पडलेले पुणेकर

Pune: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज पहाटे चंडा वादन

पुणे -

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज पहाटे चंडा वादन

नादब्रम्ह कलावेदी ग्रुप तर्फे चंडा वादन" करण्यात आले

2019 पासून प्रत्येक वर्षी हा ग्रुप हे वादन गणपती समोर सादर करत आहे

तसेच विसर्जन मिरवणूकित देखील हा ग्रुप सहभागी असतो

Pune: महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण

पुणे -

महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी उत्पन्न जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर इत्यादी प्रवेश घेतेवेळी कागदपत्र लागतात

राज्य शासनाने हे दाखले शाळेतच मिळावेत यासाठी योजना सुरू केली आहे

पुणे जिल्ह्यात शहरासह 400 आपले सरकार सेवा केंद्र सुरू होणार आहेत

या सेवा केंद्रातून दाखले कसे द्यावे यासाठी आज प्राचार्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे

Pune: "कृत्रिम फुलावर बंदी घाला",कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्राद्वारे मागणी

पुणे -

"कृत्रिम फुलावर बंदी घाला",कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्राद्वारे मागणी

गौरी गणपती मध्ये सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी बनावटीच्या कृत्रिम फुलावर बंदी घालावी

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून मागणी

गौरी गणपती सणात मोठ्या प्रमाणात चिनी बनावटी कृत्रिम फुले बाजारात आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे

कृत्रिम आणि सिंथेटिक फुलांवर बंदी आणली तर शेतकऱ्याने आणलेल्या फुलांना चांगला भाव मिळेल असे या पत्रात म्हटलं आहे

Nagpur: नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेला प्रारूप आराखडावर आतापर्यंत 12 आक्षेप सादर

नागपूर -

- नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेला प्रारूप आराखडावर आतापर्यंत 12 आक्षेप सादर

- प्रारूप आराखड्यावर भाजपने समाधान व्यक्त केलं असलं तरी काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहेय...

- काँग्रेस शिवाय बसपा आणि आपने देखील प्रारूप आराखड्यावर हरकती नोंदविल्या आहे.

- गुरुवारी मनपाच्या मुख्यालयात चार आणि लकडगंज झोनमध्ये एक अशा पाच हरकती सादर झाल्यात

- 4 सप्टेंबर पर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहे. त्यावर पाच ते बारा सप्टेंबर दरम्यान एकत्र सुनावणी होणार आहे.

- 4 सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचनेचा आकडा वाढणार आहे.

Nagpur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

नागपूर -

- रवीभवन मधील कॅबिनेट मंत्र्यांचे बंगले तसेच नागभवन मधील राज्यमंत्र्यांची बंगले पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगल्याचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार

- रवी भवन मध्ये 30 कॉटेज आणि नागभवन मधील 16 कॉटेज आहे.. यात उद्योगमंत्री मुक्कामी असताना राविभवन मधील कॉटेज 13 मधील पिओपी छत कोसळले होते

- तसेच लाकडी स्ट्रक्चर ऊदळीने पोखरल आहे... त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने याच ऑडिट केलं जाणार आहे

- यासाठी व्हिएनआयटीला यासाठी 14.16 लाख रुपयाचा निधी वळता केला आहेय

Nagpur: नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती

नागपूर -

- नागपूर महानगरपालिकेत १७४ पदांसाठी पुन्हा मेगा भरती

- नागपूर मनपात २४५ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालीय, आता पुन्हा मेगा भरती होणार

- मनपाच्या विविध दहा संवर्गातील १७४ पदांची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू

- जवळपास दोन दशकानंतर नागपूर मनपात येवढ्या मोठ्या प्रमाणात भरती होत आहे

- अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे

Latur: संततधार पावसामुळे लातूर  जिल्ह्यात जनजीवन पूर्णत: विस्कळीत

लातूर -

संततधार पावसामुळे जिल्ह्यात जनजीवन पूर्णता विस्कळीत

जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर.

30 महसूल मंडळात अतिवृष्टी.

50 रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद.

Amravati: उद्यापासून राज्यभर बच्चू कडू काढणार शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा

अमरावती -

उद्यापासून राज्यभर बच्चू कडू काढणार शेतकरी, शेतमजूर हक्क यात्रा

उद्या वाशिम जिल्ह्यातून करणार शुभारंभ..

बच्चू कडू रोज प्रत्येक जिल्ह्यात 5 ते 6 सभा घेणार

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बच्चू कडू ठाम.संपूर्ण राज्यात बच्चू कडू सभा घेणार

2 ऑक्टोबर ऐवजी 28 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये बच्चू कडूचे कर्जमाफीसाठी मोठ आंदोलन

Wardha: वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वर्ध्यात घर आणि गोठ्याचे नुकसान

वर्धा -

- वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घर आणि गोठ्याचे नुकसान

- समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील घटना

- घरासह गोठ्यावरील छत उडाल्याने नुकसान

- छत उडाल्याने घरातील साहित्य पावसात भिजले

- गोठ्यांवरील टिनपत्रांचे छत उडाल्याने वैरण भिजून नुकसान

- मदत देण्याची मागणी

- सततच्या पावसामुळे परिसरात शेतीपिकांचेही नुकसान

- प्रशासनाने नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करण्याची मागणी

Nanded: नांदेड जिल्ह्यात पावसाचे सलग दुसऱ्या दिवशीही थैमान

नांदेड -

नांदेड जिल्ह्यात पावसाचे सलग दुसऱ्या दिवशीही थैमान.

रात्रभर पडलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत.

नांदेड शहरात पाणीच पाणी.

नांदेड शहरातील रस्त्यांना आले नदीचे स्वरूप.

नांदेड शहरातील अनेक खराब शिरले पावसाचे पाणी.

नांदेड जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय.

बचाव कार्यासाठी एचडीआरएफ, सीआरपीएफ, आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तैनात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : अरविंद केजरीवालांना मोठा झटका, आपच्या मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

Maharashtra Politics: सामान्य मुंबईकरांचा काय दोष? चंद्रकांत पाटील यांची मनोज जरांगेंना हात जोडून विनंती

Manoj Jarange Patil Protest Live Updates : जरांगेंची वाढीव आंदोलनाची मागणी, गृहखात्याने मागवला अहवाल

Veen Doghatli Hi Tutena: स्वानंदी अन् समर पुन्हा येणार आमने-सामने; 'वीण दोघांतली ही तुटेना'मध्ये होणार नव्या गोंधळाला सुरुवात

Maratha Protest: मी महाराष्ट्राचा मुसलमान; मुस्लिम बांधवाने मराठा आंदोलनात लक्ष वेधलं, VIDEO

SCROLL FOR NEXT