Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतुकीवरील तात्पुरते निर्बंध

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टराची आत्महत्या, मोंथा चक्रीवादळाचे संकट, महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतुकीवरील तात्पुरते निर्बंध

२९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत जड वाहनांना असणार बंदी

गोरेगाव (पूर्व) येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित “इंडिया मेरीटाइम वीक – २०२५” या कार्यक्रमादरम्यान अनेक व्हीआयपी आणि संरक्षित व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर तात्पुरते वाहतूक निर्बंध लावण्यात आले आहेत.

मुंबई ट्रॅफिक पोलीस (पश्चिम उपनगर विभाग) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहनांना (Heavy Motor Vehicles - HMV) दक्षिण आणि उत्तर दिशेच्या दोन्ही मार्गांवरून वाकोला फ्लायओव्हर ते दहिसर टोल नाका या दरम्यान वाहतुकीस बंदी असेल.

तथापि, या निर्बंधांमधून रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांची आपत्कालीन सेवा वाहनांना सूट देण्यात आली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीत कोणाशी युती होणार - अजित पवारांची महत्वपूर्ण बैठक

अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे टकरे दिलीप वळसे पाटील

तसेच राष्ट्रवादी गटाचे आमदार बैठकीला उपस्थित आहेत

दर आठवड्याला राष्ट्रवादीची बैठक पार पडत असते

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिके निवडणुकीच्या दृष्टीने कोणाची युती करावी या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा केली जाणार आहे

अजित पवार गटाची मिटींगला सुरुवात

अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे टकरे दिलीप वळसे पाटील

तसेच राष्ट्रवादी गटाचे आमदार बैठकीला उपस्थित आहेत

दर आठवड्याला ncp बैठक पार पडत असते

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिके निवडणुकीच्या दृष्टीने कोणाची युती करावी या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा केली जाणार आहे

शेतकऱ्यांनो सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा - सुजात आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचे जाहीर व्यासपीठावरून शेतकऱ्यांना आवाहन

अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या फोडू नका

अधिकारी कर्मचारी सरकारच्या आदेशाचे पालन करतात तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा

हिंगोली शहरातील संविधान कॉर्नर येथील सभेत आंबेडकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

वाघ मानव संघर्ष पेटला; दोन महिन्यात 11जणांचा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ आणि मानव संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. या दोन महिन्यात वाघाने अकरा लोकांच्या नरडीचा घोट घेतल्याने वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

2022 साली गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स करता महाराष्ट्र शासनाकडून 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला होता.

लातूर जिल्ह्यात पावसाला सुरुवात, हवामान विभागाकडून येलो अलर्ट

लातूर जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते, तर सायंकाळी जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदपूर औसा लातूर रेनापुर या सह इतर भागात पावसाने हजेरी लावली आहे.

मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात

मुंबई शहरामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली दिसून येते त्यामुळे प्रवाशांचा आणि चाकरमानांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

कोंडाईबारी घाटात ट्रक चालकांचे आत्महत्या आंदोलन

नागपूर-सुरत महामार्गावर अवैध वसुली विरोधात ट्रक चालकांचा संताप

नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटात एका ट्रक चालकाचे आत्महत्या आंदोलन.

चालकाने आपला ट्रक महामार्गावर आडवा करून वाहतूक पूर्णपणे थांबवली.

ट्रक चालक सुमारे तीन तासांपासून ट्रकच्या कॅबिनवर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत आहे.

महामार्ग पोलिसांनी पैशांची मागणी अवैध वसुली केल्याचा ट्रक चालकाचा आरोप.

मोंथा चक्रीवादळामुळे भारताच्या किनारपट्टीवर रेड अलर्ट, ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मोन्थ चक्रीवादळाचा प्रभाव वाढत असून, हवामान खात्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांच्या किनारी भागांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा, आर्थिक लूट करणारी आंतरराष्ट्रीय टोळीला अटक

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून अमेरिकेतील नागरिकांची आर्थिक लूट करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडलीय. छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा MIDC मधील एका कॉल सेंटरमध्ये बसून थेट ११६ गुन्हेगार ऑनलाईन गंडा घालायचे.

बंजारा समाजाचे शिष्टमंडळ 31 तारखेला घेणार मुख्यमंत्री फडणवीस भेट

बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी 9 दिवस आमरण उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून संवाद साधत विजय चव्हाण यांना आश्वासन दिले.त्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे मंत्री संजय राठोड आणि आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीमध्ये बंजारा आंदोलन विजय चव्हाण यांनी आपला उपोषण मागे घेतलं. येत्या 31 तारखेला बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती उपोषण करते विजय चव्हाण यांनी दिली आहे.

Mumbai News : मुंबईत दमदार पावसाची हजेरी

मुंबईत पाऊस पडत आहे

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे

मुंबई शहरात सुद्धा पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे

Yavtmal News : यवतमाळमध्ये पालिकेच्या अपारदर्शकते विरोधात काँग्रेसचे आंदोलन

यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सुरू असलेल्या टेंडर प्रक्रियेत होत असलेल्या भ्रष्टाचार आणि अपारदर्शकते विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

घनकचरा व्यवस्थापन,रस्ते आणि नाली स्वच्छते संबंधी टेंडर प्रक्रिया थांबवावी.

बस स्टॅन्ड.2.0 मध्ये करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी यासह आठ मागण्या घेऊन शहर काँग्रेसचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी नगरपालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

Pune : ऑलिंपिक महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल

2022 साली गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्स करता महाराष्ट्र शासनाकडून 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता,मात्र या निधीचा ताळमेळ लागत नसल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला होता.

या ऑडिटमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिरगावकर यांच्यावर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या विरोधात पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै संदीप भोंडवे यांच्यासह काही खेळाडु व राज्य क्रीडा संघटना यांनी आंदोलन केले होते.

या आंदोलनामध्ये नामदेव शिरगावकर यांसवर गुन्हा दाखल करुन योग्य तपास करावा अशी प्रमुख मागणी केली होती .

काल अखेर पुणे पोलीसांना महासचिव नामदेव शिरगावकर गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यामुळे आता तपासात काय पुढे येते हे पहावे लागेल..

Political News : लातूरमध्ये काँग्रेसला खिंडार, मनपाच्या माजी बांधकाम सभापतींचा भाजपात प्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून आज मुंबई येथे भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात आलाय, लातूर जिल्ह्यातून काँग्रेसचे नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती गिरीश पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

तर विधानसभा निवडणुकीत बंडखोरीचा ठपका ठेवत भाजपाने निलंबित केलेल्या गणेश हाके, आणि माजी आमदार बबन खंदारे यांचे देखील निलंबन रद्द करत भाजपाने घर वापसी दिली आहे.

दरम्यान या पक्षप्रवेशाने भाजपाची ताकद वाढली जाणार आहे, तर लातूर शहरात काँग्रेसला मोठ खिंडार पडलय. तर येत्या काळात काँग्रेस मधील अनेकांचा प्रवेश भाजपमध्ये होईल अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.

Parbhani News : परभणीत जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक

परभणीत जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक

जिल्हाधिकारी कार्यालयात घडला प्रकार

पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

दगडफेक करणारा शेतकरी असल्याची माहिती

Best Bus : बेस्टच्या 150 नवीन इलेक्ट्रॉनिक बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा लवकरच

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (BEST) मार्फत एकूण 150 नवीन 12 मीटर लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्‌या प्रवर्तित करण्यास सज्ज.

या बसगाड्या 'वेट लीज' पद्धतीने चालविल्या जाणार असून, त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.

यापैकी 115 बसगाड्‌यां PMI इलेक्ट्रो मोबिलिटी या उत्पादक कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबिलिटी प्रा. लि. या कंत्राटदार ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील,

35 बसगाड्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि. या उत्पादक कंपनीच्या असून त्या ईव्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रा. लि. या ऑपरेटरमार्फत चालविल्या जातील.

Dhule News : धुळ्यात सलग चौथ्या दिवशी पावसाचा कहर

हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला सलग चौथ्या दिवशी यलो देण्यात आला होता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार सलग चौथ्या दिवशी पावसाने धुळ्यात लावली जोरदार हजेरी

जोरदार पावसामुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान होण्याची भीती

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात ट्राफिक जाम

बच्चू कडू यांच्या आंदोलनात येणाऱ्या वाहनांची गर्दी झाल्याने ट्राफिक जाम

ट्राफिक जाममुळे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लागल्या रांगा

ट्राफीक जाम झाल्याने बच्चू कडू यांना नागपूरात सभास्थळी पोहोचण्यासाठी होणार उशीर

वाहतूक कोंडी सोडण्याचा पोलीसांचा प्रयत्न

Jalgaon: जळगावमध्ये भरधाव बस टोलनाक्याच्या भिंतीवर धडकली, एकाचा मृत्यू 

जळगाव -

जळगावमध्ये भयंकर अघात

टायर फुटल्याने बस टोलनाक्याच्या भिंतीवर आदळली

महिला प्रवासी चाकाखाली चिरडून जागीच ठार

Pune: ३० ऑक्टोबरला पुण्यातील जैन बोर्डींग हॉस्टेलचा अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता

पुणे -

३० ऑक्टोबर रोजी पुण्यातीलजैन बोर्डींग हॉस्टेलचा अंतिम निकल जाहीर होण्याची शक्यता

सकल जैन समाजाच्या बांधवांसाठी आनंदाची वार्ता लवकरच

जैन बोर्डींग प्रकरणी धर्मदाय आयुक्तांकडून "स्टे" कायम

एच एन डी जैन बोर्डींग हॉस्टेलचा व्यवहार पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता

बिल्डर विशाल गोखले पाठोपाठ ट्रस्टींकडून सुद्धा हा व्यवहार रद्द होण्याची शक्यता

30 ऑक्टोबर रोजी दोघांकडून प्रतिज्ञापत्र धर्मदाय आयुक्तांकडे केले जाणार सादर

Sambhajinagar: पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर की औरंगाबादचा मुद्दा चर्चेला

पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर की औरंगाबादचा मुद्दा चर्चेला

आता पदवीधर मतदारसंघाचे नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर करा;

औरंगाबाद हे नाव हवेच कशाला? भाजपची मागणी

Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

युरोपियन लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून गिफ्ट कार्ड वरून फसवणूक

१८० तरुण तरुणी एका कंपनीत काम करायचे

छत्रपती संभाजी नगर मधल्या चिकलठाणा एमआयडीसी मधील एका कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा

सर्वजण उत्तर पूर्व राज्यातील तरुण तरुणी

जवळपास १०० हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन कारवाई सुरू

वर्षभरापासून सुरू होते कॉल सेंटर

अमेझॉन चे गिफ्ट व्हाउचर तुम्हाला मिळाले असल्याचे आम्हीच दाखवून करायची फसवणूक

Sindhudurg: पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

पावसामुळे जलक्रीडा बंद असल्याने राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी

पर्यटकांचे मोठे आकर्षण असलेला राजकोट किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. यंदाच्या दिवाळी सुट्टीत मालवणमध्ये पर्यटक दाखल झाले आहेत मात्र, वादळी पावसामुळे ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग पर्यटनासाठी तसेच जलक्रीडा तात्पुरत्या स्वरूपात बंद असल्याने पर्यटकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांनी आपले लक्ष रॉकगार्डन आणि राजकोट किल्ला या स्थळांकडे वळवले आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये साथी पोर्टलविरोधात कृषी विक्रेत्यांचा बंद

यवतमाळात साथी पोर्टल विरोधात कृषी विक्रेत्यांचा बंद

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून बियाणे खरेदीसाठी बियाणे पोर्टल टू चा वापर अनिवार्य केला आहे या पोर्टलचा वापर करणे विक्रेत्यांसाठी किचकट ठरत असून साथी पोर्टल टूचा वापर शक्य नसल्याने त्याला स्थगिती देण्यात यावे यामागणीसाठी यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांकडून एक दिवस निविष्ठा विक्री बंद ठेवण्यात आली.दरम्यान महाराष्ट्र फर्टिलायर्स पेस्टीसाईड साइस डीलर्स असोसिएशने निविष्ठा केंद्र बंदची हाक दिली होती.

नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाचा उमेदवार बिले काढणारा नसावा - मंत्री शिवेंद्रराजे भोसले

सातारा पालिका निवडणुकीसाठी अनेक इच्छुक असले तरी नगरसेवक असो किंवा नगराध्यक्ष, काम करणारा उमेदवार असावा.अनेकजण वॉर्डात वर्षानुवर्षे गटरची कामे कशासाठी करतात, हे सर्वांना माहीत आहे. माझी गल्ली, माझा वॉर्ड असा संकुचित विचार करणारे उमेदवार सातारा पालिकेत नकोत.नगरसेवकपदाचा उमेदवार नगरपालिकेत येऊन बिले काढणारा नसावा,अशी परखड भूमिका नगर विकास आघाडीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी मांडली आहे.

Congress: हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर,राष्ट्रवादी (शरद पवार गट ) चे माजी उपनगराध्यक्ष अविनाश नीलमवार यांच्यासह 20 माजी नगरसेवक, 8 विद्यमान नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष आणि असंख्य कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Pune: पुण्यातील दोन वर्षांच्या चिमुरडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मीरा भट्टड एक मिनिट सात सेकंदात सांगते अठरा राज्यांसह त्यांच्या राजधान्या

हडपसर येथील मीरा भट्टड या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरडीने केवळ एक मिनिट सात सेकंद इतक्या कमी वेळात अठरा राज्यांसह त्यांच्या राजधान्या सांगून सर्वांना अचंबित केले.

तीची ही हुशारी व कौशल्याची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली असून तीचा सन्मानपत्र व पदक देवून गौरव करण्यात आला आहे.

मीराची ही अचाट बुध्दीमत्ता व आकलनक्षमतेचे तसेच, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालीय.

Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक

युरोपियन लोकांना वेगवेगळी आमिष दाखवून गिफ्ट कार्ड वरून फसवणूक

१८० तरुण तरुणी एका कंपनीत काम करायचे

छत्रपती संभाजी नगर मधल्या चिकलठाणा एमआयडीसी मधील एका कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकला छापा

सर्वजण उत्तर पूर्व राज्यातील तरुण तरुणी

जवळपास १०० हून अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी एकत्र येऊन कारवाई सुरू

वर्षभरापासून सुरू होते कॉल सेंटर

अमेझॉन चे गिफ्ट व्हाउचर तुम्हाला मिळाले असल्याचे आम्हीच दाखवून करायची फसवणूक

Pune: पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

ट्रस्टच्या वतीनेही व्यवहार रद्द करण्यास्तही अर्ज दाखल करण्यात येणार, सूत्रांची माहिती

गोखले ग्रुपने व्यवहार रद्द केल्यानंतर आता ट्रस्ट सुद्धा अधिकृत माघार घेणार असल्याची सूत्रांची माहिती

जैन बोर्डिंग संदर्भात धर्मदाय आयुक्त यांच्यासमोर सुनावणी सुरू

Karad: कराडच्या माजी नगराध्यक्षा शारदा जाधव भाजपामध्ये

जनशक्ती आघाडीच्या चार माजी नगरसेवकांसह केला भाजपा प्रवेश

आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली केला भाजपा प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत केला प्रवेश

शारदा जाधव यांच्या प्रवेशामुळे कराडच्या राजकारणाची समीकरण बदलणार

भाजपाची नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बेरीज

Pune: पुण्यातील दौंडला मिळणार नवीन पंचायत समिती कार्यालय

सांगलीतील जत, लातूर जिल्ह्यातील औसा आणि पुण्यातील दौंडला मिळणार नवीन पंचायत समिती कार्यालय

जत, औसा आणि दौंडमध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता

तिन्ही नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास जवळपास ३१ कोटी रुपयांचा निधी मंजूर

जुन्या झालेल्या इमारतींच्या पुर्नबांधणीसंदर्भात ग्रामविकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांना मंजुरी देण्याचा सरकारचा प्रयत्न

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला

आरोपी वाल्मीक कराडच्या संपत्ती जप्तीच्या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये झाली आरोपी वाल्मीकरांचे प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकीलाकडून करण्यात येत आहे आणि आता पुढील सुनावणी ही 11 नोव्हेंबरला होणार आहे

१ नोव्हेंबरच्या मोर्चासाठी नाशिकमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

- मनसेने शहरात लावलेल्या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा

- मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाकडून चलो मुंबईचा नारा

- मतदार यादीतील घोळ आणि मत चोरी संदर्भातील मुद्द्यांवर मनसेचे बॅनर्स

- मोठ्या संख्येने मनसैनिक आणि शिवसैनिक मुंबईला नेण्यासाठी नियोजन

- या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन करण्याचा मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न

Jalgaon: जळगाव जिल्ह्यातील कृषी विक्रेत्यांचा बंद

जळगाव कृषी केंद्रांमधून बियाणे विक्री करण्यासाठी साथी पोर्टल वापरणे कृषी विभागाकडून बंधनकारक करण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात हे पोर्टल वापरणे शक्य नसून अनेक विक्रेते बियाणांची हंगामी विक्री करत असतात. यामुळे साथी पोर्टल कंपनीस्तरावर लागू करावी. परंतु विक्रेत्यांसाठी नसावी या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील कृषी केंद्र एक दिवस कृषी केंद्र बंद ठेवत आंदोलन करण्यात असल्याची माहिती 'माफदा'चे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्याच्या कृषी विभागाकडून मागील वर्षांपासून बियाणे उत्पादनापासून विक्रीपर्यंतच्या संनियंत्रणासाठी कंपन्या व घाऊक विक्रेते यांच्यासाठी साथी पोर्टल १ चा व किरकोळ विक्रेत्यासाठी साधी पोर्टल २ वापराची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Pune: पुण्यातील नवले ब्रिजजवळ दोन कार आणि ट्रकचा भीषण अपघात

अपघातात ट्रक पलटी तर चार चाकी वाहनांचे मोठे नुकसान

आज पहाटेच्या साडेपाच वाजण्याच्या सुमारास नवले ब्रिजजवळ दोन कार आणि एका विचित्र अपघात झाला

या घटनेत कारचालक आणि ट्रकचालक दोघेही जखमी झाले असून, ट्रकचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर

Nandurbar: नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे सातपुड्याच्या नद्यांना पुन्हा पूर

तळोदा तालुक्यातील बोरवान नदीला आला मोठा पूर....

नदीला पूर आल्याने तळोदा,टाकली,बोरवान रस्ता झाला बंद....

तळोदा तालुक्याला जोडणाऱ्या बोरवाण नदीला पूल नसल्याने वाहतूक ठप्प...

नदीला पूर असल्याने ग्रामस्थांना करावा लागतो अडचणीचा सामना...

नदीला पूल बनवून देण्याची शासनाकडे गावकऱ्यांची मागणी....

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षाद्या, वडवणी तालुक्यात मोर्चा

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी मोर्चा.

मोर्चाकरांनी मोर्चाचे रूपांतर केले रस्ता रोको आंदोलनामध्ये.

वडवणी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन.

मोर्चेकर्‍यांनी वडवणी मध्ये बीड परळी मार्गावर रास्ता रोको आंदोलन

Mumbai: मुंबईत आगवणे कुटुंबीय घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

वर्षा आगवणे आणि तिच्या कुटुंबियातील सदस्य घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबईत आगवणे कुटुंबीय घेणार उद्धव ठाकरे यांची भेट

वर्षा आगवणे आणि तिच्या परिवारावर रणजीत निंबाळकर यांनी छळ केल्याचा आरोप काल सुषमा अंधारे यांनी केला होता

आगवणे कुटुंबातील वर्षा नामक मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतरचा रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आला होता

Hina Gavit: माजी खासदार डॉ हिना गावित यांची आज घरवापसी...

हिना गावित यांचा आज होणार पुन्हा भाजपमध्ये प्रवेश...

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा उपस्थितीत हिना गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश....

विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभेतून अपक्ष उमेदवारी केली होती....

निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पुन्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान...

Bacchu kadu: शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टर मोर्चा

बच्चू कडू यांच्या दुसरा दिवसाच्या ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात.....

राज्यभरातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते नागपूरकडे निघाले

वर्धा जिल्ह्यातील सुकळी गावातून ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात

बच्चू कडू दुसऱ्या दिवशीही स्वतः ट्रॅक्टर चालवत आहे

मोर्चात शेतकरी नेते रविकांत तुपकर,कॉम्रेड अजित नवले देखील ट्रॅक्टर मोर्चा सहभागी

बच्चू कडू यांच्या महा एल्गार मोर्चामध्ये धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन धनगरी वेशात सहभागी

आणखी 52 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ट्रॅक्टर मोर्चा नागपूरला धडकणार

दुपारी बच्चू कडू यांची नागपूरच्या कापूस संशोधन केंद्राच्या मैदानावर महा एल्गार सभा

Beed: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

सकाळपासून दुकाने व बाजारपेठा ठेवण्यात आल्या बंद

शहरवासीय व सर्वपक्षीयांच्या वतीने थोड्याच वेळात काढण्यात येणार मोर्चा

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातीला आरोपींना फाशी द्यावी,कडक कारवाई करावी अशी नागरीकांची मागणी

Nanded: नांदेडमध्ये छट पूजा सण उत्साहात साजरा

नांदेडमध्ये छट पूजा सण उत्साहात साजरा करण्यात आला. नांदेड शहरातील आसना नदीच्या काठावर हा सण साजरा करण्यात आला. उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात केला जातो.आता महाराष्ट्रातील अनेक भागात देखील छटपूजा हा सण साजरा करण्यात येत आहे.चार दिवस देवीची आराधना करून हा सण साजरा केला जातो.

Ratnagiri: मोंथा चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट

अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्र देखील असणार खवळलेला, जिल्ह्यात चौथ्या दिवशी पावसाची बरसात

मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता

किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहण्याची देखील शक्यता

ताशी 40 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

आज देखील मच्छीमारांना खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असं आवाहन

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन

किनारपट्टी भागात सकाळपासून ढगाळ हवामान

काल रात्री देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

आणखीन दोन दिवस कोकण किनारपट्टी वरती पावसाची शक्यता

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

धंगेकर आज मुंबईला येणार आणि एकनाथ शिंदे यांची भेट

जैन बोर्डिंग च्या विषयाबाबत रवींद्र धंगेकर करणार एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा

दोन दिवस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर काही बोलू नका योग्य तोडगा निघेल असा आश्वासन एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांना दिलं होतं

दोन दिवसानंतर स्वतः रवींद्र धंगेकर आज मुंबईत याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी करणार चर्चा

Eknath Khadse: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावतील निवासस्थानी चोरी झाले आहे..

एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तर मजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे.

नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल ते चोरून नेला ही माहिती अध्याप समोर आलेली नाही.

घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

सायबर क्राईम करून पैशांची फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक,दोन आरोपी परराज्यातील

हिंगोलीत सायबर पोलिसांनी मोठी कार्यवाही केली आहे, बाहेर राज्यातून लॅपटॉप सह इतर साहित्य सोबत घेऊन येत नागरिकांना जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या परराज्यातील दोघांना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले तर यामध्ये हिंगोली मधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, प्रल्हाद शंभुलाल स्वालका, मनोज ओमप्रकाश शर्मा अशी बाहेर राज्यातील आरोपींची नावे आहेत तर हिंगोलीच्या शिरडशहापूर मधील मनोज शिवहार स्वामी असे हिंगोलीतील एका आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

दरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक चार चाकी वाहन, दोन लॅपटॉप सह आयपॅड असा लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अस्मानी संकटाने शेतकऱ्यांची स्वप्नं चिरडली

भंडारा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी आकाश अचानक काळवंडलं,आणि क्षणातच अस्मानी संकट कोसळलं.साकोली, लाखनी, पवनी या तालुक्यांत सलग तीन ते चार तास मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला.पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत क्षणात वाहून गेली!कापणी करून शेतात ठेवलेलं धान पाण्यात बुडालं,तर बांध्यात उभं असलेलं पीक चक्क जमीनदोस्त झालं...पाण्याखाली गेलेल्या शेतांकडे पाहत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले.....ज्यांच्या हातात आज धानाच्या गंजी असायला हव्या होत्या,त्या हातात आता फक्त चिखल आणि अश्रू उरले आहेत...! “संपूर्ण वर्षभर आम्ही उन्हातान्हात कष्ट करून पिक उभं केलं,पण आता ते पाण्यात गेलं… आम्ही काय करायचं?”अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या जगण्याचा आधार हिरावून घेतला आहे.धानाचं सोने आता मातीमोल झालं…आणि भंडाऱ्याच्या शेतकऱ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न —"देवा, आमचं काय चुकलं?…अशी भावना एका शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

जळगाव महापालिका निवडणुकीची ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत

जळगाव दोन वर्षांपासून रखडलेली जळगाव महापालिकेची निवडणूक प्रक्रिया अखेर गती घेत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ११ नोव्हेंबरला प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे.काही महिन्यांपासून इच्छुक उमेदवारांचे लक्ष या सोडतीकडे लागून होते. आयोगाने २७ ऑक्टोबरला आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे. या आरक्षण सोडत प्रक्रियेबाबत राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी महापालिका आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.

प्रशांत बनकर ची पोलिस कोठडी आज संपणार...

डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत बनकर यांची पोलिस कोठडी आज संपते आहे.फलटण न्यायालयाने 28 ऑक्टोबर पर्यंत बनकर ला पोलिस कोठडी सुनावली होती.आज फलटण पोलिस प्रशांत बनकर ला पुन्हा न्यायालयात हजर करतील. मात्र फलटण पोलिस पुन्हा प्रशांत बनकर ची वाढवून पोलिस कोठडी ची मागणी करणार का हे पहावे लागणार आहे.

नागपूरसाहित विदर्भावर तीव्र अवकाळी पावसाचे संकट

- पुढील 3 दिवस विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता..

- बंगालच्या उपसागरात मोंथा चक्री वादळाचा विदर्भाला बसणार फटका

- अवकाळी पावसामुळे शेतकरी सापडणार अडचणीत.

- शेतात उभं असलेलं पीक पावसामुळे झोडपल जाणार

- कापूस, तूर, संत्रा, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसणार मोठा फटका

- शेतकऱ्यांसह नागरिकांना सावधानतेचा हवामान विभागाचा इशारा.

पाथर्डी पोलीस ठाण्यात महिलांचा गोंधळ; चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी, चारही महिला अटक

पाथर्डी पोलीस स्टेशनमध्येच चार महिलांमध्ये लाथाबुक्क्यांची मारामारी होऊन वातावरण तंग झाले. उपस्थित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडण सोडविले. मात्र एकमेकींना धमक्या देत पुन्हा संघर्ष सुरू झाल्याने पोलिसांनी अखेर चौघींना अटक केली आहे.

एसटी बस मध्ये प्रवास करताना झालेल्या किरकोळ वादातून थेट पोलिस ठाण्यात आलेला वाद मारामारी पर्यंत गेला होता अखेर पोलिसांनी त्या महिलांविरोधात

बी.एन.एस कलम १७० (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही महिलांना अटक केली आहे.या घटनेमुळे काही वेळ पोलीस ठाण्यात चांगलाच गोंधळ उडाला होता.

Maharashtra Live News Update: वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन

अमरावती जिल्ह्याच्या जेष्ठ नेत्या माजी मंत्री वसुधाताई पुंडलिकराव देशमुख यांचं निधन

वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने वसुधाताई देशमुख यांच निधन...

गेल्या काही दिवसापासून अमरावती मध्ये एका खाजगी रुग्णालयात वसुधाताई देशमुख घेत होत्या उपचार

1999 ते 2004 मध्ये वसुधाताई देशमुख जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री होत्या

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नेत्या होत्या

2004 च्या विधानसभा निवडणूक मध्ये अचलपूर मतदार संघातुन त्यांचा पराभव झाला होता

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना वसुधाताई देशमुख मंत्रिमंडळात होत्या

अमरावती आणि विदर्भाच्या वसुधाताई देशमुख ह्या मोठ्या राजकारणी होत्या..

आज दुपारी अमरावती मध्ये होणार अंत्यसंस्कार..

nagpur | बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा आज नागपूरला

बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा आज दुपारी नागपूर शहरात धडकणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी होणार असल्यामुळे नागपूर-वर्धा रोडवर वाहतुकीची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली असून, वाहतूक मार्गात बदल करण्याची अधिसूचना जारी केली आहे. वर्ध्याकडून नागपूरकडे येणारी वाहने जामठा चौक, एनसीआय, मेट्रो रेल्वे यार्ड, सिमेंट फॅक्टरी मार्गे वळवण्यात आली आहेत. कालच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी सुरक्षेचा आढावा घेतला.

YAVATMAL; यवतमाळ जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 16 लाख मतदार

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 16 लाख 61 हजार 537 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.मिनी मंत्रालयाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून प्रशासकीय तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान प्रशासन स्तरावर निवडणुकीची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.तसेच राजकीय पक्षही कामाला लागले आहे.सभांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना चार्ज केले जात आहेत तर दुसरीकडे वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत.

Pune | पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत आता ११ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत. या सोडतीकडे राजकीय कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.११ नोव्हेंबरला प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होईल, ज्यावर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येतील. त्यानंतर २ डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवकांची निवड केली जाईल, ज्यात ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. आरक्षण जाहीर झाल्यावर कोणाचा पत्ता कट होणार, हे स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह, खिशात सापडली सुसाइड नोट

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबवा! बनावट रोजगार ॲप्सवर राम शिंदेंचा कडक इशारा|VIDEO

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

Shreyas Iyer Surgery : श्रेयस अय्यरवर शस्त्रक्रिया, नेमकं काय झालं होतं? कधी मिळणार हॉस्पिटलमधून डिस्चार्ज?

SCROLL FOR NEXT