Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर..

Marathi Breaking Live Headlines Updates : धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मुंबईत ठाकरेंचा जल्लोष मोर्चा, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

आमदार जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर..

राजकीय मतभेद असणारे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड कळवा येथील तरण तलावाच्या उद्घाटनाचा वेळी एकनाथ शिंदे बरोबर एकाच मंचावर उपस्थित होते..

अनेक वेळा जितेंद्र आव्हाड यांनी NDA सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले आहे...

आज जितेंद्र आव्हाड यांचा मतदार संघात विविध लोकपर्ण साठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरभरून निधी देऊन अत्याधुनिक तरण तलावाच्या उद्घाटन केला आहे...

जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर..

आदिती तटकरे यांनी उडवली महिलांची खिल्ली

आम्ही पैसे दिले की महिला शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गर्दी करतात, महिलांपेक्षा व्यापारीच आम्हाला विचारतात पैसे कधी टाकणार आहात. अस खिल्ली उडवणार वक्तव्य खुद्द महिला व बालविकासच्या मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या मदतीवरून वाशिम इथ केलय....

वाशिम येथील महिला व बालविकास विभागाच्या अहिल्या भवनच्या लोकार्पण सोहळ्या निमित्य आयोजित संवाद कार्यक्रमात तटकरे बोलत होत्या.

आदिती तटकरे यांच्या या वक्ताव्यानंतर आता वाद उद्भवण्याची शक्यता आहे.

पुण्यात काँग्रेसचा मशाल मोर्चा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी

युवक काँग्रेसकडून पुण्यात आज कॅण्डल मार्च काढत करण्यात आली मागणी

कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून कॅन्डल मार्च काढण्यात आली

या कॅन्डल मार्चमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी नागरिक कॅण्डल मार्चमध्ये सहभागी झाले होते

नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी यासाठी पुण्यात कॅण्डल मार्च काढण्यात आला

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील लेणी क्रमांक 29 येथील सीता न्हाणी धबधबा प्रवाहित

खुलताबाद तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने धबधबा ओसंडून वाहतोय

ऐतिहासिक सीता न्हाणी धबधबा या पावसाळ्यात पहिल्यांदाच प्रवाहित

धबधब्याचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची होणार गर्दी

खासदारांना निवेदन देणार म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ठेवले डांबून

पुण्याचे खासदार आणि देशाचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना येरवडा पोलिसांनी डांबून ठेवल्याचा आरोप.

खासदार चंदन नगर येथे जनता दरबार या कार्यक्रमासाठी येणार असताना त्यांना वडगाव शेरी काँग्रेसच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या लाठी चार्ज प्रकरणी निवेदन देऊन गुन्हे मागे घेण्याबाबत विनंती करणार होतो असे काँग्रेसचे पवन सोनवणे यांनी सांगितले मात्र पोलिसांनी तब्बल दोन तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे

आम्ही जनता म्हणून तुम्हाला निवेदन देण्यासाठी येणार होतो फक्त आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत म्हणून आम्हाला डांबून ठेवल्याचा आरोप प्रियंका रणपिसे यांनी केला.

मेळघाटातील विषबाधा प्रकरण तापलं; आदिवासी मंत्र्यांसमोर पालकांचे आंदोलन, सेंट्रल किचन बंद करण्याची मागणी

मेळघाटातील धारणी येथील टीटंबा आदिवासी आश्रम शाळेत 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर आज आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी शाळेला भेट दिली. यावेळी संतप्त पालकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. सेंट्रल किचन तातडीने बंद करून आश्रम शाळेतच ताजे अन्न तयार करण्याची व्यवस्था करावी, तसेच दोषींवर पोलिसांत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर सेंट्रल किचन बंद करण्याचे आश्वासन मंत्री अशोक उईके यांनी दिले.

शहापूरमध्ये ढगफुटीचा तडाखा; धबधब्यावर आलेले पाच पर्यटक पुरात वाहून गेले, एकाचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली. धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पाच पर्यटकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. यापैकी तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. एका पर्यटकाचा मृतदेह सापडला असून, आणखी एक जण अद्याप बेपत्ता आहे. घटनास्थळी शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाने नागरिकांना धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

नागपूरमध्ये 'आपली बस' व्हॉट्सॲप तिकीट सेवा आज होणार सुरू

नागपूर महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा तसेच महापालिकेच्या 'आपली बस' व्हॉट्सॲप तिकीटिंग सेवेच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आज नागपुरात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. काही वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार असून, नव्याने नियुक्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले जाणार आहे. तसेच नागरिकांसाठी 'आपली बस'ची व्हॉट्सॲप तिकीट सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात येणार आहे.

रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी धबधब्यांवर गर्दी

पावसाचा जोर कमी असल्याने रायगडमध्ये पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक बाहेर पडले आहेत. यामुळे पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असणाऱ्या धबधब्यांवर मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. धोकादायक धबधबे, ओढे नदी पात्र वगळत पर्यटक छोट्या आणि सुरक्षित धबधब्यांवर पावसाळी पर्यटनासाठी जाताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांशी संवाद

सीमेवरील गावांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्हायब्रंज व्हिलेज कार्यक्रमात ४०० विद्यार्थ्यांसोबत पंतप्रधान मोदी संवाद साधत आहेत.

अभिजीत दिपके कपिल सिब्बलांच्या भेटीला

सीजीपीचे अभिजीत दिपके हे आज कपिल सिब्बल यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.

निंबवली फाट्याजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग 

भिवंडी तालुक्यातील वडपे - वंजारपट्टी नाका रस्त्यावरील निंबवली फाटाजवळ उभ्या टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.नाशिकहून भिवंडीतील पोगाव येथील ॲमेझॉन गोदामात किराणा साहित्य घेऊन येणाऱ्या टेम्पोला भीषण आग लागली.टेम्पो चालक रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून चहा पिण्यासाठी उतरला असता अचानकपणे ही आग लागली.स्थानिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा केला प्रयत्न केला मात्र,टेम्पो आगीच्या भक्षस्थानी सापडल्याने संपूर्णपणे जळून खाक झाला आहे.या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.शॉर्ट सर्किटने टेम्पोला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनास्थळी वाहतूक आणि भिवंडी तालुका पोलिस दाखल झाले आहेत.

मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामस्थांसह साडी चोळी अर्पण करीत केले जलपूजन 

साक्री तालुक्यातील मालनगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामस्थांसह साडी चोळी अर्पण करीत जलपूजन केले आहे, धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याने आमदार मंजुळा गावित यांनी समाधान व्यक्त केले आहे.

जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांचे आंदोलन नंतर काँग्रेसची भूमिका काय..

राहुल गांधी गेल्या आठ ते दहा वर्षापासून नेट परीक्षेमधील अनागुंतीच्या कारभाराच्या विरोधामध्ये जे रॅकेट चालत आहे त्याविषयी बोलत आहेत . राहुल गांधी यांनी कोटा येथे जाऊन जे नेट परीक्षेचा हब आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला . या परीक्षेच्या संदर्भामध्ये संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या विरोधात कायदे करू व खर्दापास करू अशी भूमिका राहुल गांधी यांची होती.

उल्हासनगरात ७९ हजारांचा गुटखा जप्त, एर्टीगा कारमधून सुरू होता पुरवठा

उल्हासनगरमध्ये गुटख्याची वाहतूक करणाऱ्या टोळीवर एसीपी शंकर आवताडे यांच्या पथकाने धडक कारवाई करत एर्टीगा कारसह सुमारे ७९ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत कार चालक विशाल अंभोरे याला अटक करण्यात आली असून प्रदीप जैस्वाल उर्फ गुड्डू आणि विनोद गंगवानी हे दोन आरोपी फरार आहेत.

खळेगाव येथे पावसा अभावी जळालेल्या संत्र्याच्या बागेत शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सुरू‌ 

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील पाऊस नसल्याने जळालेल्या संत्र्याच्या बागेत शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. ऊन, वारा, पाऊस आणि अंधाराची पर्वा न करता शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून उपोषण सुरूच ठेवणार असा इशारा शेतकऱ्यांकडून दिला जात आहे.

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

जळगाव:क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यातील ढिसाळ कारभार आणि उदासीनतेमुळे एका राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला शासकीय नोकरीतील ५% खेळाडू आरक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जळगावचे रहिवासी असलेले राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस खेळाडू संदीप श्रीराम व्यवहारे यांनी पत्रकार भवन, बळीराम पेठ, जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला.

कारगिल विजय दिवसानिमित्त वीर जवानांना अभिवादन 

कारगिल युद्धातील ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ आज देशभर कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात येतोय..राहाता शहरातील हुतात्मा चौकातही भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करत टायगर हिलसह महत्त्वाच्या शिखरांवर तिरंगा पुन्हा फडकवत ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी करणाऱ्या वीर जवानांना यावेळी माजी सैनिक , विद्यार्थी आणि नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले..

अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

अकोल्यात ऐका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या अत्याचारानंतर पीडित मुलीच्या आत्महत्या प्रकरणात बातमी समोर येतये. पीडित कुटुंबीयांच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी मुलीचा मृतदेहासह बाळापुरातील अकोला नाका रस्त्यावर रास्ता रोका केलाय. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून आत्महत्याकरण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या नराधम पोलिस कर्मचारी पवन वडगावे त्वरित अटक करा, या मागणीसाठी आज बाळापुरातील अकोला नाका परिसरात हा रस्ता रोको करण्यात आला आहे.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा,शिवसेना ठाकरे गटाचा जल्लोष 

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्ली येथे त्यांच्या राजीनाम्या साठी विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले,विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्याने मुंबईत ठाकरे बंधूंच्या उपस्थितीत विजयी आनंदोत्सव साजरा होत असताना नाशिकच्या येवला येथील विंचूर चौफुली वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घालत शिवसेना ठाकरे गटाने फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला.

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात RPI आठवले गटाच्या वतीने भव्य निदर्शने

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात RPI आठवले गटाच्या वतीने भव्य निदर्शने

सोलापुरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरूय RPI आठवले गटाच्या वतीने निदर्शन

RPI आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या नेतृत्वात सुरूय निदर्शन

ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर शोकसभा

ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या निधनानंतर शोकसभा

शोकसभेला शरद पवार राहणार उपस्थित

शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस मधील काही नेते तसेच पुणे शहरातील अनेक मान्यवर करणार भाषण

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी...

नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याच्या विसर्गात करण्यात आली कपात..

धरणात होतोय 49 हजार 66क्युसेक पाण्याचा विसर्ग...

गोदावरी नदीचा पूर काही अंशी ओसरला...

प्रल्हाद जोशींनी शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला

दिल्लीच्या जंतर मंतर येथील तरुणाईच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला

त्यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशींनी शिक्षण मंत्री पदाचा पदभार स्वीकारला

मालवाहतूक करणारा ट्रक अपघात होऊन पलटी, ट्रक च्या अपघाताने वाहतूक कोंडी

पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील ग्रेड सेपरेटरवर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक पलटी होऊन आज सकाळी अपघात झाला आहे.

मोरवाडी पासून चिंचवडच्या दिशेने जाणाऱ्या ग्रेड सेपरेटर मध्ये आज सकाळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याने जुना पुणे - मुंबई महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

युवाशक्तीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागले

युवाशक्तीपुढे केंद्र सरकारला झुकावेच लागले...

आंदोलनाच्या यशानंतर नंदुरबारमध्ये जल्लोष

गडचिरोलीत वाहनाच्या बॅटरीचा स्फोट; १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यालगतच्या तेलंगणातील गुडेम गावात वाहनाच्या बॅटरीचा स्फोट होऊन १४ वर्षीय लोकेश निकाडे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घराजवळ खेळत असताना दोन बॅटऱ्यांचा संपर्क होऊन अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात लोकेश गंभीर जखमी झाला.

उपचारासाठी त्याला कागजनगर येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या शरद पवार यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या शरद पवार यांना गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिरात असलेल्या कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या शुभेच्छा

दिलीप वळसे पाटील यांच्याकडून शरद पवार यांचा "माझे गुरु" म्हणून उल्लेख

अंध भक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत - उद्धव ठाकरे

दिल्लीच्या जंतर मंतर येथील तरुणाईच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

या तरुणाईच्या यशानंतर मुंबईतील ठाकरे बंधूंच्या विजयी रॅली दरम्यान उद्धव ठाकरे यांनी तरुणाईंशी संवाद साधला

यावेळेस त्यांनी तरुणांचं कौतुक केलं. आणि अंध भक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकलेले आहेत असे वक्तव्य त्यांनी केले.

Pandharpur : भाविकांची गावी परतण्यासाठी बस स्थानकावर मोठी गर्दी

आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी आलेले भाविक आता परतीला लागले आहेत. आज सकाळ पासूनच भाविकांनी एस बस स्थानकावर मोठी गर्दी केली आहे. यावर्षी राज्य परिवहन महामंडळाने साडेपाच हजार बस गाड्या आणि 13 हजार कर्मचारी काम करत आहे. वारकर्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महामंडळाने 40 प्रवाशी एकत्र आले तर त्यांना त्यांच्या गावा पर्यंत सोडण्यात येत आहे.

जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांचे आंदोलन नंतर काँग्रेसची भूमिका काय

राहुल गांधी गेल्या आठ ते दहा वर्षापासून नेट परीक्षेमधील अनागुंतीच्या कारभाराच्या विरोधामध्ये जे रॅकेट चालत आहे त्याविषयी बोलत आहेत. राहुल गांधी यांनी कोटा येथे जाऊन जे नेट परीक्षेचा हब आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला ..या परीक्षेच्या संदर्भामध्ये संसदेत आम्ही आवाज उठवू आणि त्या विरोधात कायदे करू व खर्दापास करू अशी भूमिका राहुल गांधी यांची होती

बीड पोलिसांना 112 वर खोटा फोन करणाऱ्या दोघांवर गुन्हा

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे 'डायल 112' या आपत्कालीन क्रमांकावर 10 वेळा खोटा फोन करून पोलिसांची दिशाभूल करण्यात आली.

25 जुलैच्या मध्यरात्री कोणतीही आणीबाणी नसताना खोट्या कॉलमुळे पोलिसांचा वेळ वाया घालवल्याप्रकरणी त्यांच्यावर बीएनएस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Maharashtra News Live Update: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, सांगलीच्या शिवसैनिकांचं विठ्ठलाला साकडं

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असं साकडे सांगलीच्या शिवसेनेने विठ्ठलला घातला आहे.आषाढी एकादशी निमित्ताने सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या चरणी तशी प्रार्थना केली आहे.शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या नेतृत्वाखालील सांगली जिल्ह्यातल्या शिवसेना शिंदे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला आहे,विठ्ठलाचे दर्शन घेत चंद्रभागेच्या तिरी लाडक्या बहिणीचा भाऊ एकनाथ शिंदे, पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत,अशी साद घातली आहे.

रांजणगावात महिलांनी लांबवले चांदीचे दागिने

रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील एका सोनाराच्या दुकानात खरेदीसाठी आलेल्या चार अज्ञात महिलांनी सोनाराच्या दुकानातील चांदीचे दागिने लांबल्याची घटना घडली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे चार अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील महावीर ज्वेलर्सचे दुकान चालक प्रणय वर्मा हे दुकानात असताना चार महिला दुकानात आल्या त्यांनी चांदीच्या जोडव्यांची मागणी केली, बरेच वेळ दुकानात दागिने पाहिल्यानंतर सदर महिला काहीहि खरेदी न करता निघून गेल्या, काही वेळाने प्रणय हे दुकानातील वस्तूची पाहणी करत असताना त्यांना दुकानात प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवलेले तब्बल ८२ नग चांदीचे जोडवे नसल्याचे निदर्शनास आले, दरम्यान दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलांनी चोरी केल्याचे लक्षात आल्याने प्रणय दिलीप वर्मा वय ३० वर्षे रा. भांबर्डे रोड रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे यांनी याबाबत रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी चार अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार अमित चव्हाण हे करत आहे.

ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रवाना

ठाकरे बंधूंच्या संयुक्त तिरंगा विजय जल्लोषसाठी ठाण्यातून ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसैनिक मुंबईकडे रेल्वे ने ठाणे स्थानक येथून रवाना...

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा दिल्यानंतर...आज मुंबईत 'ठाकरे बंधूं'ची संयुक्त तिरंगा विजय जल्लोष पाहायला मिळणार....

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपर फुटी वर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार आणि केंद्र सरकारच्या विरोधात 'ठाकरे बंधूं'ची तोफ धडाडणार...

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि मनसे नेते अविनाश जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनने एकत्र प्रवास

निसर्गाच्या कुशीत असलेल्या बाबा धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी

सिंधुदुर्गातील सर्वात उंच असणारा आंबोली जवळील कुंभवडेचा बाबा धबधबा सध्या ओसंडून वाहत आहे. सह्याद्रीच्या कुशीतून फेसाळत कोसळणाऱ्या या धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. आज रविवार असल्यामुळे सांगली,कोल्हापूर, बेळगाव, गोवा तसेच सिंधुदुर्गातील पर्यटकांनी बाबा धबधब्यावर गर्दी केली आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगात एक प्रशस्त गुहा आणि या गुहेच्या वरून साधारण २०० ते २५० फूट उंचीवरुन कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. येथील रम्य व स्वर्गाची अनुभूती देणारा परिसर देखील पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. आज विकेंड मुळे बाबा धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली असून डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसून येत आहेत

Maharashtra News Live Update: साताऱ्यातील कण्हेरचे चारही दरवाजे उघड

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून धरणांमध्ये झपाट्याने पाणीसाठा वाढत आहे.कण्हेर धरण ९३ टक्के भरले असून चारही दरवाजे उघडत ५ हजार क्युसेकने वेण्णा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेले कोयना धरण ७३ टीएमसीवर पोहोचले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख मोठी धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.या मुसळधार पावसामुळे भात लागवडीला वेग आला आहे.

मळमळ, उलट्या अन् जुलाबाचा त्रास; रात्रीच्या जेवणानंतर प्रकार उघडकीस..

अमरावतीच्या मेळघाटातील टीटंबा आश्रमशाळेतील विषबाधेच्या घटनेची व्याप्ती आता अधिक वाढली असून रुग्णालयात उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ७० वर पोहोचली आहे. बाधित सर्व विद्यार्थी १८ वर्षांखालील असून त्यांच्यावर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मात्र सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्या बाहेर आहे सर्वांवर योग्य उपचार सुरू आहे..

धाराशिव जिल्ह्यातील 226 प्रकल्पात केवळ 9 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक,जिल्ह्यातील 71 गावांवर टंचाईचे सावट

निम्मा पावसाळा संपत आला तरी धाराशिव जिल्ह्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.अपेक्षित पाऊस न झाल्याने जलसाठे वाढण्याऐवजी घटत असून जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर होऊ लागली आहे. जिल्ह्यातील एकूण 226 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प कोरडे पडले असून 127 प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली खाली गेला आहे.सध्या एकूण प्रकल्पांमध्ये केवळ 9 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.टंचाईग्रस्त गावांसाठी 135 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे

लोणावळ्यावर वरून राज्याची शरद चौथ्या दिवशी ही दमदार बॅटिंग सुरू..गेल्या २४ तासांत १२३ मिमी पावसाची नोंद...

पर्यटननगरी लोणावळ्यावर वरुणराजाची सलग चौथ्या दिवशीही दमदार बॅटिंग सुरूच असून घाटमाथा अक्षरशः धुक्याची चादर आणि धबधब्यांनी नटला आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १२३ मिमी पावसाची नोंद झाली असून, यंदाचा एकूण पाऊस ३६५४ मिमीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच कालावधीत ३४८० मिमी पाऊस झाला होता. यंदा पावसाने मागील वर्षाच्या तुलनेत आघाडी घेतली असून, घाटमाथ्यावर निसर्गाचे मनमोहक रूप खुलले असून पर्यटनस्थळी चार चाकी गाडीत जाताना पावसाचा अनुभव वेगळा पर्यटक घेत आहे...

तुळजाभवानी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी 29 जुलै पर्यंत बंद राहणार

पौर्णिमा तसेच सलग सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा गर्दीत वाढ होणार असल्याने तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने 29 जुलै पर्यंत तुळजाभवानी मंदिराचे महाद्वार भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या कालावधीत भाविकांना बिडकर पायऱ्या मार्गे मंदिरात सोडण्यात येणार आहे.याशिवाय भाविकांना सुलभ दर्शनासाठी 29 जुलै या कालावधीत मंदिर पहाटे एक वाजता उघडण्यात येणार आहे.मंदिर संस्थांच्या व्यवस्थापक तहसीलदार माया माने यांनी याबाबत जाहीर प्रकटन काढत ही माहिती दिली आहे. भाविकांची गर्दी ध्यानात घेऊन भाविकांना सुलभ दर्शनासाठी 29 जुलै पर्यंत मंदिर पहाटे १ वाजता चरणतीर्थ पूजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.सकाळी ६ वाजता अभिषेक पूजेला प्रारंभ होणार आहे या कालावधीत रात्री १०.३० वाजताच्या सुमारास प्रक्षाळ पूजेनंतर मंदिर बंद करण्यात येणार आहे.

यवतमाळात वंचितच्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल

दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनात विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्तारोको करण्यात आले या प्रकरणात वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर निरज वाघमारे यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

‘विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या घरासमोर मोर्चा काढू’

विदर्भ राज्य निर्मितीच्या मागणीसाठी पुन्हा एकदा विदर्भवादी नेत्यांनी वज्रमूठ आवळली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आज विदर्भ राज्य निर्माण संकल्प मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी, विदर्भवादी नेते वामनराव चटप, शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. विदर्भ वेगळा होणार नाही, तोपर्यंत लग्न करणार नाही म्हणणाऱ्या फडणवीसांनी लक्षात घ्याव,असं म्हणत लेकीच्या लग्नाच्या वेळी गिफ्ट म्हणून फडणवीस यांनी विदर्भ राज्याची निर्मिती करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा, नागपुरात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या दोन नेत्यांच्या घरासमोर मोर्चा निघेल, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी, त्यामुळे आता फारशी तीव्रता नाही - राधाकृष्ण विखे-पाटील

मराठा आरक्षणाचे बरेच प्रश्न मार्गी लागलेले आहेत.. त्यामुळे आता त्याची तीव्रता फारशी नाही, सातारा आणि कोल्हापूर गॅजेट बाबत सरकार गंभीर आहे.. असं मत राजाच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.. हैदराबाद गॅजेटचा प्रश्न शंभर टक्के निकाली लागला आहे.. शिष्यवृत्तीचा प्रश्न देखील मार्गी लागला आहे.. जी-जी चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्याशी झाली होती. ते सर्व आदेश राज्य सरकारने काढले आहेत.. सातारा आणि कोल्हापूर गॅझेटचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत कायदे तज्ज्ञांचा मार्गदर्शन घेण्यात येत आहे..

लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू, निसर्गाचे सौंदर्य खुलले, धबधबेही प्रवाहित....

लोणावळ्यात पावसाचा जोर अधिक वाढला असून. मावळ तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान पर्यटन नगरीत होत असल्याची नोंद करण्यात आली. या पावसामुळे येथील निसर्ग सौंदर्य खुललं असून नैसर्गिक धबधबे प्रवाहित झाले आहेत. सध्या लोणावळा शहरातील सहारा ब्रिज पॉईन्टवर जागोजागी नेसर्गिक धबधबे प्रवाहित झाल्याचं चित्रं दिसून असून पर्यटकांना खुणावत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली; गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू

Sunetra Pawar: बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही; दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा मोठा निर्धार

Ladki Bahin Yojana : आजपासून जमा होणार ₹३,०००? रक्षाबंधनापूर्वी खात्यात पैसे येण्याबाबत मोठी अपडेट

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळणार, मुख्य अभिनेत्रीने केली भावुक पोस्ट

Urine Infection : पुरुषांनो सावधान! लघवी करताना जाणवणारी 'ही' लक्षणं देतात युरिन इन्फेक्शनचे संकेत

SCROLL FOR NEXT