दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मूळ मागण्या बाजूला राहिल्या.. त्यामध्ये राजकारण घुसलं..काही समाज विघातक शक्ति घुसल्या,अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दिली आहे.
सरकारच्या विरोधात आज कँडल मार्च काढणार होते...मात्र यात राजीनामा दिल्यानं आंदोलनांला झाल्यानं आज यश मिळाल्यानं तिरंगा रॅली काढण्यात आलीय..
शहरातील व्हेरायटी चौक येथून निघालेल्या या रॅलीत काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी तिरंगा हातात घेऊन मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली....
कुठलेही प्रश्न संवादाने सुटतात, चुकीच्या मार्गाने जाऊन प्रश्न सुटणार नाहीत....
माझी 22 उपोषण झाली पण कधी हिंसा केली नाही.....
राजीनाम्या नंतर कोण हरलं आणि कोण जिंकलं हे मी मानत नाही....
मात्र समाजाच्या भलाईसाठी जे जे करता येईल ते करत रहा....
राजीनाम्या नंतर अण्णा हजारेंनीं दिली प्रतिक्रिया.....
नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये समविचारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर फटाक्यांची आतषबाजी व ढोल ताशांच्या गजरात जोरदार जल्लोष साजरा केला.कार्यकार्र्त्यानी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला तर यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या जल्लोषात आंबेडकरवादी व समविचारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आज पुण्यातील तरुणाई गुडलक चौकामध्ये जल्लोषासाठी उतरली होती. जैन जी नंतर झेन अल्फा लोडिंग असणारी छोटी मुलगी या जल्लोषात सहभागी झाली होती की सर्वांना आकर्षित करत होती. झेंजीने जे आंदोलन केलं त्यामुळे एक मोठी एनर्जी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे
लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई व्हावी
लाठीचार्जसाठी थेट अमित शाह जबाबदार
देशातील तरुणांचा विजय झाला
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त असताना तुकाराम मुंडे यांनी दूध भेसळ आणि बनावट दूध रॅकेटविरुद्ध राज्यभर मोठी धडक मोहीम राबवली होती. या कारवाईत राज्यभरात शेकडो छापे टाकून कोट्यवधींचे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आणि अनेक गुन्हे दाखल झाले. त्यांच्या या कामगिरीचे आणि प्रामाणिक कार्यपद्धतीचे कौतुक करण्यासाठी बदलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून आनंदोत्सव साजरा केला.
दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात आले,आझाद समाज पक्ष, रिपब्लिकन सेना, भीम टायगर सेना, व तुम्ही पुरोगामी संघटनांच्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या वेळी पोलीस प्रशासनाला संविधानाची प्रत भेट देऊन लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करण्याची मागणी करण्यात आली.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात जल्लोष....फटाके फोडून आणि घोषणाबाजी करत आनंद व्यक्त
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून जल्लोष करण्यात येत आहे
TET पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेदरं कुमार गुप्ता आणि त्याचा सहकारी साथीदार इंद्रजीत सिंग या दोघांना भिवंडी जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायालयात न्यायमुर्ती श्रीमती एस एस रामदिन यांच्या न्यायालया समोर भिवंडी पोलिसांनी हजर केले होते. या दोघांनाही न्यायालयाने 30 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.या दोघांनी यापूर्वीचे आरोपी धीरज,आकाश आणि राजीव शहा या तिघांच्या संगनमताने TET पेपर लीक करण्यात मदत केल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून याच संशयावरून पोलिसांनी आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे.
ठाकरे बंधूची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. CJP ची पहिली मागणी मान्य झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आपला देश अस्वस्थ होता
गेल्या १२ वर्षापासून जनतेवर दबाव टाकला जात होता
विद्यार्थ्यांच्या आणखी दोन मागण्या बाकी आहेत
तरुणांवरील गुन्हे मागे घेणार का? हे शहांनी पुढे येऊन सांगावं
तरुणांचा मोर्चा आता शहांकडे वळेल
उद्याचा मुंबईत मार्च होणारच
CJP आणि सरकारची महत्त्वाची बैठक सुरू आहे. आता यामध्ये नीट पेपरफुटीप्रकरणी आणि इतर मागण्यांवर चर्चा होणार आहे.
शरद पवार यांनी पत्रकारपरिषदेत युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले असे मोठे वक्तव्य केले आहे. युवकांनी संयमाने भावना मांडल्या. युवकांनी भावना देशाच्या नेतृत्वासाठी मांडल्या असंही ते म्हणाले. देशातील लोकशाहीने या निमित्त कात टाकली आहे. तसेच शरद पवारांनी मागण्या ऐका असं मोदींना भेटीत सांगितलं होतं. नव्या पिढीला हाताळताना लाठीमार गरजेचा नव्हता. त्यामुळे हे आंदोलन देशाच्या बाहेरपर्यंत गेलं असंही शरद पवार पत्रकार परिषदेत म्हणाले.
राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरुवात होणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी आंदोलनासंदर्भात ही पत्रकार परिषद असेल.
जळगाव: पिंप्राळा येथे आषाढी एकादशीनिमित्त आयोजित रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने सादर केलेला देखावा सध्या मोठ्या चर्चेत आहे. देशपातळीवर गाजलेल्या नीट (NEET) पेपर फुटी प्रकरणावर बोट ठेवत मंडळाने अत्यंत संवेदनशील विषयाला वाचा फोडली आहे. पेपर फुटीमुळे निर्माण झालेल्या मानसिक दडपणातून देशात २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे या देखाव्यातून मांडण्यातआले.शिक्षण पद्धतीत बदल: सद्यस्थितीतील त्रुटी दूर करून संपूर्ण शिक्षण पद्धती बदलण्यात यावी, अशी मागणी मंडळाने केली विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला आहे
नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगली काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे.फटाक्यांची आतीशबाजी करत काँग्रेसच्यावतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा स्वागत करण्यात आले.काँग्रेस कमिटी समोर माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्या बद्दल जोरदार घोषणाबाजी करत देशातल्या युवकांचा हा विजय असल्याचा प्रतिक्रिया दिली आहे.
राज आणि उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टीला पाठींबा देण्यासाठी आंदोलन केले. पहिली मागणी मान्य झाल्यानंतर आता राज आणि उद्धव ठाकरेंचा रविवारी अभिनंदन मोर्चा असेल. २६ जुलै २०२६, रविवारी सकाळी १०.०० वाजताछत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी पार्क ते श्री सिद्धिविनायक मंदिर येथे मोर्चा असेल.
प्रधानांचा राजीनांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत रवाना झाले आहे. तसेच महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.
नीट पेपर लीक प्रकरणी कॉकरोच जनता पार्टी आणि विरोधकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती. अखेर त्यांना राजीनामा दिला आहे.
मारहाण करणाऱ्या पोलिसांना कोर्टात खेचणार
पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना देखील राजीनामा द्यावा लागणार अभिजित दिपके यांचा सरकारला इशारा
पंढरपूरला जाणं शक्य नसलं तरी विठ्ठलाची ओढ अफाट आहे.याच श्रद्धेने नाशिकच्या येवल्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटमगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त हजारो भाविकांनी हजेरी लावली आहे.विठू नामाच्या जयघोषाने आणि तुळशीच्या सुगंधाने संपूर्ण कोटमगाव परिसर दुमदुमून गेला आहे.कोटमगावच्या विठ्ठलाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा असल्याने, सकाळपासूनच येवला तालुक्यासह पंचक्रोशीतून शेकडो पायी दिंड्या कोटमगावाकडे प्रस्थान करत होत्या.
- मध्यप्रदेशातील रवी सीड्स अँड रिसर्च कंपनीविरोधात वर्ध्यात गुन्हा दाखल
- पेरलेले सोयाबीन उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ.
- निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.
कल्याण येथील फडके मैदानात विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन सुरू असून, दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
- नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई.
- संघर्षनगर परिसरातून गांजाची विक्री करणाऱ्या पती-पत्नीला अटक.
- आरोपींकडून ७ किलो गांजा जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख ७६ हजार रुपये.
पंढरपुरात आषाढी यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या एसारपी पोलिस जवानाची आत्महत्या....
कामाच्या तणावातून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज...
रामेश्वर साबणे ( गंगाखेड जि.परभणी ) असे पोलिस जवानाचे नाव...
आज पहाटेच्या सुमारास डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या
ठाकरे बंधूंकडून उद्या संयुक्त तिरंगा मोर्चा काढण्यात येणार
या मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर नितीन सरदेसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांना राज ठाकरेंचा फोन, उद्याच्या मोर्चामध्ये येण्याचं दिल निमंत्रण
तरुणांच्या ३ महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या मंजूर करा - राहुल गांधी
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तडजोड होणार नाही - राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागणार -राहुल गांधी
दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा घडवण्यासाठी आहे. मात्र, विरोधी पक्षातील काही नेते या आंदोलनात घुसून स्वतःचा राजकीय फायदा लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला
नाशिक -
- सततच्या पावसामुळे डोंगराचा भाग कोसळला
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील घटना
- दावलेश्वर घोडमानी भागात डोंगराचा भाग कोसळला
- मातीच्या ढिगाऱ्याखाली एक घर दाबले गेल्याची माहिती
- मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना सुरूच
पालघर -
पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
कासा , धुंदलवाडी परिसरात भूकंपाचा हादरा जाणवला
१० वाजून ५८ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा हादरा
पालघरमध्ये भूकंपाच्या लहान मोठ्या धक्क्यांच सत्र सुरूच
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने नागपूर जिल्ह्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण
- नागपूरमधील निर्मल नगरीतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही आकर्षक फुलांची सजावट
- आज पहाटेपासून आरती, महापूजा आणि प्रसादाचं आयोजन
- विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय...
- “ज्ञानोबा-माऊली ज्ञानबा तुकाराम”च्या जयघोष
टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी भिवंडी येथील उपआयुक्त कार्यालय दाखल
टीईटी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत एकूण १४ आरोपींना अटक केली असून
टीईटी पेपरफुटी प्रकरणात इंद्रजीत सिंग ऊर्फ पिकूला बिहारमधून अटक
बीजेंद्रकुमारसह साथीदार इंद्रजीत सिंगला बिहारमधून अटक केली असून त्यांना भिवंडी येथील उप आयुक्त कार्यालय आणले आहे. थोड्याच वेळात यांना कोर्टात हजर करण्यात येईल
मावळात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती
सोमाटणे फाटा ते परंदवडी दरम्यानचा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.
वाहन चालकांना करावी लागते वाहन चालवताना कसरत
परभणी -
आषाढी एकादशीनिमित्त संत जनाबाई यांच्या जन्मस्थानी भाविकांची मोठी गर्दी
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संत जनाबाई यांच्या जन्मस्थळ असलेल्या गंगाखेड येथे आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.
विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करणाऱ्या संत जनाबाई तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी विविध भागांतून भाविक दाखल झाले आहेत.
पुणे -
शरद पवार यांची आज संध्याकाळी पुण्यात पत्रकार परिषद
संध्याकाळी ४ वाजता साधणार माध्यमांशी संवाद
माळशेज घाटात रस्ता खचला आहिल्यानगर मार्गावरील वाहतूक एकेरी
मुसळधार पावसामुळे कल्याण आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे.
आहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रस्ता खचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
रत्नागिरी -
आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरीमध्ये निघाली दिंडी
विठुरायाचा नामघोष करत रत्नागिरीकर दिंडीत सहभागी
भगवा झेंडे घेऊन दिंडीत रत्नागिरीकर झाले तल्लीन
मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर असा दिंडीचा असणार प्रवास
पारंपारिक पोशाखामध्ये महिला आणि पुरुष सहभागी
आषाढी वारीला पायी दिंडी जाण्याची परंपरा कायम
जळगाव, जिल्ह्यात काही भागांत, गिरणा प्रकल्पाच्या वर असलेल्या अवलंबून आहे प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणात पाण्याची दमदार आवक होत असून, गिरणा प्रकल्प ६८.७५ टक्के भरला. परिणामी, एरंडोल, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या चार तालुक्यांतील पाणीटंचाई काहीअंशी मिटली आहे.
* जिल्ह्यातील 12 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरूच
* गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी, सध्या 12,680 क्युसेक वेगानं सोडलं जातंय पाणी
* दारणा धरणातून 19,312 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग, तर नांदूर मध्यमेश्वर धरणातून 71 हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
* गंगापूर धरणातील विसर्ग कमी केल्याने गोदावरी नदीची पाणीपातळी काहीशी घटली
राज्यात यंदा सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढला असून, २१ जुलै पर्यंत डेंग्यूचे ३७६२, तर हिवतापाचे २०३६ रुग्ण आढळून आले आहेत
ही वाढती रुग्णसंख्या आणि साथ आजारांचा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्क होत तातडीने पावले उचलली आहेत
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील जवळा निजाम गावात भरदिवसा अत्यंत शिताफीने सराफा दुकानातून ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले चोरीला गेल्याची घटना घडली आहे.चोरीस गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे ४ लाख ९७ हजार रुपये असल्याची माहिती दुकानाचे मालक प्रदीप दीक्षित यांनी दिली.
१३ किलोमीटर मार्गावरील सर्व वैधानिक चाचण्या यशस्वी, प्रत्यक्ष प्रवासी सेवेच्या शुभारंभाच्या दिशेने निर्णायक पाऊल
हिंजवडी आयटी पार्कला शहराशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका-३च्या प्रवासी सेवेचा मार्ग आता अधिकृतरीत्या मोकळा
नागरी विमान वाहतूक मंत्रालयांतर्गत कार्यरत मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी) या १२ स्थानकांदरम्यानच्या टप्प्यावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण (Provisional Authorization) प्रदान केले आहे
खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ, लोहियानगर परिसरात पूर्ववैमनस्यातून शुक्रवारी एकाच दिवसात गोळीबाराच्या दोन घटना घडल्या
घोरपडे पेठेतील घटनेत पाठीत गोळी लागल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून, दुसऱ्या घटनेत सुदैवाने तरुण बचावला.
- या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि पीडित विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी नागपुरातील वकिल मंडळींनी पुढाकार घेतला
- महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष एड. अनिल गोवारदीपे, जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष कमल सतुजा यांच्यासह इतर वकिलांनी जिल्हा वकील संघटनेला निवेदन दिले
- जिल्हा वकील संघटनेला लेखी निवेदन सादर करून या घटनेचा अधिकृत निषेध करावा आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
- रात्री बारा वाजल्यापासूनच लागल्या लांबच लांब विठ्ठल भक्तांच्या रांगा.
- मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात
अकोल्यात आषाढी एकादशीनिमित्त 322 वर्षे पुरातन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक संपन्न. अकोला शहरातील 322 वर्षे असलेलं पुरातन 'श्री विठ्ठल-रुक्मिणी' मंदिरात आज पहाटे भक्तिमय वातावरणात श्री विठ्ठल-रुक्मिणींचा महाअभिषेक संपन्न झालाये. तर विदर्भातील 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केलीये. मंडळाचे सर्वसर्वाधिकारी श्रीकृष्ण गोवर्धनजी शर्मा आणि अर्चना शर्मा यांच्या हस्ते महाअभिषेक पूजा पार पडली.
पंढरपूर -
आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर नगरी सजली
एंकर - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरी नगरी सजली आहे.
लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत
सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.
ड्रोनमधू पंढरपूरचे टिपलेले विहंगम दृष्य
नागपूरातील संविधान चौकामध्ये कॉकरोच जनता पार्टीकडून पोलीस परवानगीने आंदोलन केलं
त्यांनी मैदान रिकामे केल्यावर काही तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतांना त्याना मैदानात परवानगी न घेतली असतांना आंदोलन करू दिले.
त्यानंतर कायदा सुव्यवस्था राखून अनुचित प्रकार न घडू देतात शांततेने तरुणांनानांम बाहेर करत मैदान रिकामे केले आहे..
छत्रपती संभाजीनगर -
- छत्रपती संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा.
- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे पूजा व महाभिषक.
- खासदार संदिपान भुमरे व उपमहाप राजेंद्र जंजाळ यांची ही उपस्थित
- छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
- रात्री बारा वाजल्यापासूनच लागल्या लांबच लांब विठ्ठल भक्तांच्या रांगा.
- मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.