Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: महाराष्ट्र बंदला मनमाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळ पासून शहरात कडकडीत बंद

Marathi Breaking Live Headlines Updates : महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, नीट पेपरफुटीवरून संसदेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, जंतर मंतरवर CJP चं आंदोलन, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Alisha Khedekar

महाराष्ट्र बंदला मनमाड मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, सकाळ पासून शहरात कडकडीत बंद

दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी चार्ज च्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.

नाशिकच्या मनमाड मध्ये या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

Ratnagiri : खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर गेला नदीत

खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरून कंटेनर गेला नदीत

चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जाताना दोन पुलांच्या गॅपमधून कंटेनर गेला खाली

ड्रायव्हरचा शोध सुरू

नगर पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल

Thane Accident : मानपाडा उड्डाण पुलावर कंटेनरचा अपघात

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने घोडबंदर रोड वरुण जाणार्‍या मानपाडा उड्डाण पुलावर एका कंटेनर चा अपघात झाला आहे.

चालक किरकोळ जखमी झाला आहे. कंटेनर बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

Washim : सुंदर वाटीका मार्गे कोंडाळा झामरेकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था ;दुचाकी घसरून अपघात

वाशिम शहरातून सुंदर वाटीका मार्गे कोंडाळा झामरेकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. थोडासा पाऊस झाला तरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून तो चिखलमय होतोय. परिणामी या मार्गावरील वाहतूक अनेकदा ठप्प होते. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नसल्याने दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पहाटे बारामतीमध्ये विकासकामांच्या पाहणीसाठी जात असताना मार्गात एका तरुणीचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

प्रसंगाचे गांभीर्य ओळखत त्यांनी तत्काळ आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्त तरुणीची प्रत्यक्ष जाऊन विचारपूस केली.

Sangali : सांगलीत चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी

- सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा चांदोली खोऱ्यात व पाथरपुंज येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली

वारणा धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

- नागपूरसह विदर्भातील इतर ४ जिल्ह्यांसाठी आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट

- नागपुरात मुसळधार पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता आहे.

- हवामान विभागाने गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला असून वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

डेंगूच्या रुग्णांकडून जास्त शुल्क आकारू नका महापालिकेचे खाजगी रुग्णालयांना पत्र

पावसाळ्यामुळे डेंगू च्या रुग्णात वाढ होऊ शकते त्यामुळे उपचार यावेळी आर्थिक पिळवणूक नको

तसेच रुग्णांची निदान एनएस 1 एलाएझा मॅक एलएझा या मान्यता प्राप्त चाचण्यांचा वापर करण्याचे आदेश

Mumbai Rain : वसई विरार शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस

वसई विरार शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत

विरार पूर्वेला जोडणारा विवा मार्ग पूर्णता पाण्याखाली गेला आहे. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह चाकरमान्यांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत ये - जा करावी लागत आहे.

पालिकेच्या कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्या देखील साचलेल्या पाण्याचा फटका बसला आहे.

नागपुरात मागील सात महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २५ रुग्ण आढळले,1 रुग्णाचा मृत्यू

- नागपुरात मागील सात महिन्यात स्वाईन फ्ल्यूचे २५ रुग्ण आढळले त्यापैकी 1 रुग्णाचा मृत्यू झालाय.

- जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत २५ रुग्ण आढळले.२५ रुग्णांपैकी १५ रुग्ण केवळ जुलै महिन्यात आढळले त्यापैकी १३ रुग्ण महापालिका हद्दीतील..

- स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभातील सर्व जिल्ह्यांना आरोग्य विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आमदारांची स्पर्धा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आमदारांची स्पर्धा

धाराशिवमध्ये दोन स्वतंत्र आरोग्य शिबिराच आयोजन

विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटलांचं उमरग्यात आरोग्य शिबिर, तर तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटलांच धाराशिवमध्ये

वंचित बहुजन आघाडी कडून आज महाराष्ट्र बंदची हाक

वंचित बहुजन आघाडी कडून आज महाराष्ट्र बंदची हाक

पुण्यात देखील वंचित कडून पाळण्यात येणार बंद

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आणि दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठीचार्ज विरोधात वंचित कडून आज महाराष्ट्र बंदची हाक

पुण्यात दुपारी १२ वाजता वंचितकडून पायी रॅलीचे आयोजन

पुण्यातील लाल महाल परिसरातून काढण्यात येणार पायी रॅली

Yavtamal : संततधार पावसाने पिकांना जीवनदान, शेतकरीवर्ग सुखावला

दीर्घ प्रतीक्षेनंतर बरसलेल्या पावसामुळे पेरण्यांना पुन्हा गती मिळाली असून यवतमाळ जिल्ह्यात सात लाख हेक्टरवरील खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत.

पुढील आठ दिवसात जिल्ह्यातील संपूर्ण पेरण्या आटोपण्याची चिन्हे आहेत.

गत 24 तासात जिल्ह्यात सरासरी 38 मिमी पावसाची नोंद झाली हा पाऊस पिकांना जीवनदान देणारा ठरला आहे.

चासकमान धरणाखालील भीमा नदीवरील पुलाला मोठे भगदाड अपघाताचा धोका

चासकमान धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर भीमा नदीत दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अशातच धरणाखालील भीमा नदीवरील पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने या पुलावरून प्रवास करणारे नागरिक आणि चासकमान परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंढरपुरात मोठा अवैध‌ दारू साठा जप्त

ऐन आषाढी वारीत पंढरपुरात मोठा अवैध‌ देशीदारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान 10 लाख 55 हजार रुपये किंमतीचा 155 बाॅक्स देशी दारू जप्त करण्यात आली आहे.

पालखी मार्गावरून एका टेम्पो मधून बेकायदेशीर दारूसाठ्याची वाहतूक केली‌ जात होती.

नकाबंदीच्या ठिकाणी तपासणी केली असता अवैध‌देशी दारूचा साठा मिळून आला

पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत, सध्या कोणतीही पाणीकपात नाही,

पुणे शहराचा पाणीपुरवठा सुरळीत, सध्या कोणतीही पाणीकपात नाही, महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती

सध्या शहरात कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही

शहरातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था आणि वितरण यंत्रणेचा नियमित आढावा महानगरपालिकेकडून घेतला जात आहे

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा डीपीआर तयार करण्याचे आदे

विमानतळासाठी निविदा प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश

राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल यांनी एसपीव्हीला दिले आदेश

येत्या डिसेंबरपर्यंत काम सुरू करण्याचा सरकारचा विचार

विमानतळासाठी 91% क्षेत्राच्या संपादनास शेतकऱ्यांची मान्यता

Pune : पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम सुरूच

१२ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बेकरींचे परवाने निलंबित

३.४८ लाख रुपयांचा प्रतिबंधित अन्नसाठा जप्त

Rain Update : पालघरमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना मुसळधार पावसामुळे सुट्टी

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वारासह मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालय तसेच अंगणवाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak : पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय, पीएम मोदींची घोषणा

Maharashtra Bandh: आज 'महाराष्ट्र बंद'; काय सुरू अन् काय बंद? जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात प्या हेल्दी आणि टेस्टी 4 घरगुती सूप, झटक्यात वजन होईल कमी

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्याचा धोका कोणाला जास्त? शरीर आधी देत असलेल्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Akola Fort : अकोल्याच्या इतिहासाची साक्ष देतोय 'हा' किल्ला, सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलंय सुंदर ठिकाण

SCROLL FOR NEXT