Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

Marathi Breaking Live Headlines Updates : नीट पेपरफुटीवरून संसदेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता, जंतर मंतरवर CJP चं आंदोलन, महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, आषाढी वारी अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

साईबाबांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले...

शिर्डीच्या साई संस्थानबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता...

शिर्डीत सुरू आहे साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शूटिंग...

मात्र अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसण्याची परवानगी दिल्याने शिर्डी ग्रामस्थांसह साई भक्तांमध्ये नाराजी...

शिर्डीसह साई समाधी मंदिरात सुरू असलेली चित्रपटाची शूटिंग वादात सापडण्याची शक्यता...

माझे जीवाचे आवडी, पंढरपुरी नेईन गुढी....! कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात पिंपरी चिंचवडकर तल्लीन

सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ भक्ती शक्ती व्यासपीठ या उपक्रमांतर्गत नाचू कीर्तनाचे रंगी...... या कीर्तन महोत्सवात आज सुप्रसिद्ध ह भ प रोहिणीताई माने - परांजपे यांनी कीर्तन करत विठुराय आणि वारकऱ्यांची सेवा केली आहे.

नाशिकच्या कळवणमध्ये मुसळधार पाऊस; धरणाचा विसर्ग 8484 क्यूसेसवर

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे कळवण तालुक्यातील चणकापूर धरणात येत असलेली पाण्याची आवक पाहता धरणातून सकाळी 7630 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग गिरणा नदी पत्रात सोडण्यात आला,मात्र धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणातून संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास 8484 क्यूसेस ने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असल्याने गिरणा नदीला मोठा पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे बंधूंचा 26 जुलैला संयुक्त मोर्चा

कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा देण्यासाठी आता राज आणि उद्धव ठाकरे मुंबईत संयुक्त मोर्चा काढणार आहे.

सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पालघरमध्ये पावसाची दमदार बॅटिंग

सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पालघर मध्ये पावसाची दमदार बॅटिंग . काल मध्यरात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाची मुसळधार अशी सुरुवात . पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांचा देखील तडाखा . वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू . अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीसाठी असलेले प्रमुख रस्ते पाण्याखाली . आज जिल्ह्यात पावसाचा रेड तर उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

जालना ते अमरावती मार्गावर एसटी बसचा अपघात, चालकासह बारा प्रवासी जखमी

जालना ते अमरावती एस टी बसला अपघात ..

एस टी बस रस्त्याच्या कडेला घसरल्याने पलटी ..

नागपूर ते पुणे महामार्गावरील करणखेड फाट्यावरील घटना ..

अपघातात बसमधील चालकासह दहा ते बारा प्रवाशी किरकोळ जखमी ..

सुदैवाने जीवितहानी टळली .

विद्यार्थ्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे करणार मौन आंदोलन

दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अहिल्यानगरच्या वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे मौन आंदोलन करणार आहेत...सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न सोडवावेत अशी अण्णा हजारे यांची भूमिका आहे...लोकशाहीत संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्विकारल्याने अण्णा हजारे यांनी चिंता व्यक्त केली आहे...या आंदोलनस्थळाला प्रतिकात्मक स्वरूपात "नगरचे जंतर मंतर" असे नाव देण्यात येणार आहे...या आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

भाजपचे पदाधिकाऱ्यांनी तोडले बॅरिकेट्स, काँग्रेसच्या देवडीया भवनासमोर जोरदार घोषणाबाजी

काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सुद्धा इमारतीच्या वरच्या भागात राहून धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणा दिल्या. त्यामुळे एकमेकांसमोर आलेल्या भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यात आला.

रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जमीन अर्जावर आज कोर्टात 3 तास सुनावणी

रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात एकही पुरावा नसल्याचा धंगेकर यांच्या वकिलाचा दावा

तर धंगेकरांची पत्नी म्हणजे धंगेकर असा अर्थ होतो असा सरकारी वकिलांचे म्हणणं..

कोर्टात जळपास 3 तास युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने निर्णय राखून ठेवला.

Dipak Kesarkar: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रीपदाच्या चर्चेवर आता शिवसेना नेते आमदार दीपक केसरकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

मंत्रीपदापासून वंचित राहावं लागल्याच्या प्रश्नावर भाष्य करताना केसरकर म्हणाले की, पक्षात अनेक लोक मंत्रीपदासाठी इच्छुक असतात आणि प्रत्येकालाच न्याय देता येतो असं नाही.

भविष्यात पुन्हा संधी मिळाली, तर आपण नक्कीच चांगला परफॉर्मन्स करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ​

Solapur: मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांकडून खड्ड्यांचा केक कापून अनोखे आंदोलन

सोलापूर -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन

सोन्या मारुती चौकात मनसे कार्यकर्त्यांकडून "खड्ड्यांचा केक" कापून अनोखे आंदोलन

शहरातील विविध भागांतील खड्ड्यांचे फोटो पोस्टरद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

भाजपच्या "५६ खड्डे दाखवा, आम्ही बुजवू" आवाहनावर मनसेचा टोला

सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणी

वाढदिवस साजरा करण्यापेक्षा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मनसेची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त किमान ५६ खड्डे बुजवावेत

खड्डेमुक्त रस्त्यांचेच प्रशासनाने "लोकार्पण" करावे, मनसेची उपरोधिक मागणी

Chandrapur: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदावरून वाद अखेर निकाली

चंद्रपूर -

- चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनेतेपदावरून वाद अखेर निकाली

- वडेट्टीवार गटाचे राजेश अडुर यांची गटनेतेपदाची नोंद रद्द...सुरेंद्र अडबाले यांची गटनेते म्हणून नोंद घेण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

- १६ नगरसेवकांच्या बहुमताने गटनेते बदलाचा ठराव वैध

Nashik: नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

नाशिक -

- नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

- काँग्रेस कार्यालयावर भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी धडक मारणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराजवळ काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केल्याच्या निषेधार्थ करणार भाजप युवा मोर्चाचे आंदोलन

- काँग्रेस नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Solapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन

सोलापूर -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मनसेचे उपरोधिक आंदोलन

सोन्या मारुती चौकात मनसे कार्यकर्त्यांकडून "खड्ड्यांचा केक" कापून अनोखे आंदोलन

शहरातील विविध भागांतील खड्ड्यांचे फोटो पोस्टरद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

भाजपच्या "५६ खड्डे दाखवा, आम्ही बुजवू" आवाहनावर मनसेचा टोला

सोलापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था; नागरिकांना वाहतुकीत मोठ्या अडचणी

Bhandara: दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडणं ही अत्यंत भिकारचोट प्रवृत्ती- यशोमती ठाकूर

भंडारा -

दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडणं ही अत्यंत भिकारचोट प्रवृत्ती

यशोमती ठाकूर यांचा सरकारवर घणाघाती हल्ला

सध्या जे सत्ताधारी आहेत, त्यांना कसली एवढी गुरमी आणि अहंकार आहे?

एवढी दडपशाही करूनही त्यांना दुसऱ्या पक्षाचे खासदार फोडावं लागतात आणि आपल्या बाजूनं वळवून घ्यावं लागतात.

Dhule: दिल्लीतील आंदोलनाचे धुळ्यात पडसाद

दिल्लीतील आंदोलनाचे धुळ्यात पडसाद

चाळीसगाव रोड परिसरात चिमुकल्यांची लक्षवेधी 'जागरूकता फेरी'

Delhi: सरकार नेहमी राजकीय खेळ करते - प्रियंका गांधी 

व्यवस्थिच चर्चा व्हावी ही आमची मागण

तुम्ही ८ तास वंदे मातरमवर चर्चा करू शकता

तर नीट पेपरफुटीवर देखील चर्चा झाली पाहिजे

सरकार नेहमी राजकीय खेळ करते

Amravati: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन 

अमरावती -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत अमरावतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.

समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यावर भर.

आज गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित.

तपासणीनंतर पात्र रुग्णांवर 1,000 डोळ्यांच्या शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन.

गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना उपचारांचा लाभ.

आरोग्य सेवेवर विशेष भर देत नेत्ररोग निवारणाचा उपक्रम.

केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे हिंगोलीत जोरदार निदर्शने 

केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली मध्ये जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज हिंगोली मध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने केली आहेत. हिंगोली शहरातील इंदिरा चौक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

विधानसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब

नीट पेपरफुटी, जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाई, आणि राम मंदिर देणगी अपहाराच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या आक्रमक निदर्शनांमुळे राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब करण्यात आले。 गदारोळ शांत न झाल्याने अखेर उपसभापती हरिवंश सिंह यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. तर

लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीट पेपर फुटीबद्दल गदारोळ

शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे - मल्लिकार्जुन खरगे

महाड शहर आणि जवळील परिसरामध्ये ढगफुटी

महाड शहर आणि परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य

जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

करंजखोल परिसरात रस्त्यावरून वाहिले नदी नाल्यांप्रमाणे पावसाचे पाणी

करंजखोल गावचा अंतर्गत रस्ता आणि महाड रायगड रोडवरील नातेखिंड रस्त्यावर वाहतंय 7, 8 इंच पाणी

स्मार्ट मीटरमुळे  महाराष्ट्रातल्या जनतेला नुकसान   - मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव 

अख्या महाराष्ट्रात शेतकरी, व्यापारी असतील माझं स्वतःचं देखील मत आहे की मला देखील लाईटचा बिल डबल आलेला आहे

ज्याला 2000 दिले तर आता चार हजार येत आहे

स्मार्ट मीटर म्हणजे काय आमचा फायदा झाला पाहिजे ना काहीतरी नवीन घेऊन येत आहे

सरकारच्या नावावर व्यापाऱ्यांना उपयोग होतो अडाणी उपयोग होतोय वीज कंपन्यांना उपयोग होतो

परंतु महाराष्ट्रातल्या जनतेला नुकसान होत आहे

चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मनसेचं आंदोलन

चेंबर दुर्घटनेप्रकरणी मनसेच्या कार्यकरत्यांंनी आंदोलन सुरू केलं आहे.

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आमदार बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांच आक्रमक आंदोलन.. 

भर पावसात लोटांगण आंदोलन करत पोहचले जिल्हाधिकारी कार्यालयावर..दिल्ली पोलिसांचा निषेध करत आक्रमक आंदोलन..

केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत लोटांगण घेत घेत बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन

दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा निषेध..

देशभरातील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बच्चू कडू यांचे कार्यकर्ते रस्त्यावर...

विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या दिल्ली पोलिसांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींची फोनवर चर्चा 

उध्दव ठाकरे सध्या दिल्लीमध्ये असून राहुल गांधींशी नुकतीच फोनवर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काल राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत २५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या हनुमानगढी परिसरात आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून २५ हजार वृक्षलागवड करण्यात आली.या वृक्षलागवड मोहिमेत अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू तसेच विविध शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सप्ताहभर ही वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे.

“महाराष्ट्र प्रदूषणमुक्त आणि हरित झाला पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.

जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार

जे.पी नड्डा, जितेंद्र सिंद आंदोलकांची भेट घेणार अशी माहिती समोर आली आहे. जंतर -मंतर आंदोलकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट घेतली जाणार आहे.

ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारीतील तिसरे गोल रिंगण आज ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी भक्तिमय वातावरणात पार पडले. माऊलींच्या अश्वाच्या दौडीने आणि ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ मेहेकर शहरात उबाठाच्या वतीने मुख्य चौकात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सोनम वांगचुक व सीजेपीचे अभिजित दीपके यांचे पोस्टर हातात घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन

- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच आंदोलन

- दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मनसे रस्त्यावर

- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन

मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला

मनोज जरांगे जंतरमंतरवर दाखल

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जरांगे-पाटील यांचा पाठिंबा

सरकारचा माज उतरवाला पाहिजे- जरांगे

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार

वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी

- तब्बल पंधरा दिवसांच्या खंडानंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण.

- कधी जोरदार तर कधी रिमझिम पावसामुळे जिल्हाभर आल्हाददायक वातावरण निर्माण.

- पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा; कापूस, सोयाबीन व तूर पिकांना होणार फायदा.

- शेतकऱ्यांनी आंतरमशागत, खत टाकणे व इतर शेतीकामांना पुन्हा होणार सुरुवात

कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

* कडवा, भावली आणि पालखेड धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

* कडवा धरणातून 374 क्युसेक, भावली धरणातून 1,218 क्युसेक, तर पालखेड धरणातून 1,392 क्युसेक पाण्याचा विसर्ग

* नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

* कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक भागांत संततधार पाऊस कायम

* धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस, धरणांतील पाणीसाठ्यात सातत्याने वाढ

* परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष, नदीकाठच्या भागांवर विशेष नजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर मध्ये विठ्ठलाची महापूजा करू दिली जाणार नाही, प्रहार संघटनेच्या इशारा

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. याच साधू संतांच्या महाराष्ट्रातून सर्व दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. शनिवारी आषाढी वारी आहे महापूजा राज्याचे मुख्यमंत्री करणार आहेत. जर आमच्या मुलाबाळांच्या लाठीचार्ज होत असेल तर या मुख्यमंत्र्यांना महापूजा करण्याचा कुठलाही अधिकार नाही.

पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी आंदोलन

पुण्यातील राजभवन बाहेर काँग्रेस चे आंदोलन

केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झालेला नाही - उद्धव ठाकरे

कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे आणि चर्चा करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. जर आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असेल, तर त्यांची समजूत काढणे हेदेखील प्रशासनाचे काम असते. मात्र, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झाला नाही. सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली असती, तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती," असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेना पहिल्यापासूनच विद्यार्थ्यांच्या सोबत; सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली - उद्धव ठाकरे

शिवसेना पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. काल राहुल गांधी यांनीही याविरोधात आंदोलन केले. या सरकारची विद्यार्थ्यांशी असणारी वागणूक अत्यंत वाईट आणि संतापजनक आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता आणि अहंकाराची हवा गेली आहे, पण जनताच त्यांना योग्य वेळी जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जलद एसी लोकलमध्ये चाकरमान्यांची जीवघेणी कसरत; एकाच दरवाजातून चढण्याच्या गोंधळामुळे लोकलला विलंब

कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सकाळच्या जलद वातानुकूलित (एसी) लोकलमध्ये प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. सर्व दरवाजे बंद झाल्यानंतरही प्रवाशांनी एकाच उघड्या दरवाजातून आत जाण्यासाठी मोठी धडपड केली. या गोंधळामुळे लोकल बराच वेळ स्थानकातच खोळंबली. अखेर रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करून संबंधित दरवाजा बंद केला आणि त्यानंतरच लोकल पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट

पुढील 3 तासांत जिल्ह्यामधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता

नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे प्रशासनाचे आवाहन

शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला पाच वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू

शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे मध्यरात्री बिबट्याने साखरझोपेत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला फरफटत नेऊन ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नागपूर काँग्रेसकडून काल दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांना अटक केल्यानंतर आज निषेध आंदोलन

आज नागपुरात काँग्रेसच्या वतीने राज्यपाल यांच्या लोक भवन समोर सदर परिसरात आंदोलन

काँग्रेसचे पदाधिकारी यांनी आज दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाण विरोधात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या मागणीला घेऊन नागपूर ग्रामीण काँग्रेसकडून करणार आंदोलन

थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होईल पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे.

नांदेड जिल्ह्यात अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या झाल्या जीर्ण

नांदेड जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोल्या जीर्ण झालेले आहेत.सध्या पावसाळा सुरू असल्याने शाळेच्या. खोल्यांचा स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत आहेत. नांदेडच्या किनवट तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या खोलीचा स्लॅब कोसळला आहे.सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.ही शाळा अतिशय जीर्ण झाली आहे. वर्गखोल्या संपूर्ण गळत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने जीर्ण झालेली शाळा पडून नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी गावाकऱ्यांनी केली आहे.

nashik-surgana-गळक्या एसटीमधून प्रवास,बसमध्ये छत्री धरून प्रवास करण्याची वेळ

नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या एसटी बसची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्ये छत्री धरून प्रवास करावा लागत आहे.बसमधील ही धक्कादायक परिस्थिती समोर आली

पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासांत जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.  

पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने

- पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्यांच्या गाड्या उशिराने . उपनगरीय लोकल सेवा मात्र सुरळीत . गुजरात हुन मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या हमसफर एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने मुंबईकडे येणारी फ्लाईंग राणी एक्सप्रेस देखील अडकून पडली . घोलवड जवळ इंजिनमध्ये बिघाड झाल्याने लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम . गुजरातच्या वापी उदवाडा भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आधीच उशिराने . उदवाडा जवळ एकाच ट्रॅकवरून वाहतूक सुरू असल्याची माहिती .

नागपुरात वेगवेगळ्या भागात सामाजिक कार्यक्रम

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरात वेगवेगळ्या भागात सामाजिक कार्यक्रम

- देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी नृसिह महायज्ञाचं आयोजन, *महायज्ञात ५६ समाजाची जोडपी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे हे सुद्धा पुजेत सहभागी * सामाजिक एकोप्याचे दिला संदेश

साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या?

साडी दिली नाही म्हणून पत्नीने केली पतीची हत्या?

बदलापूरच्या शिरगावातील धक्कादायक घटना

आधी पतीच्या डोक्यात कुकर मारला नंतर गळा घोटला

भर पावसात अजितदादांना अनोखी मानवंदना!

मार्केट यार्डमध्ये ३० फुटी प्रतिमेवर क्रेनमधून दुग्धाभिषेक

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात मध्यरात्री १२ वाजता दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांची भव्य ३० फूट उंच प्रतिमा उभारण्यात आली.

मुसळधार पावसातही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी क्रेनवर चढून अजितदादांच्या ३० फुटी प्रतिमेवर दुग्धाभिषेक करत विनम्र अभिवादन केले.

चासकमान धरण ९४ टक्के भरले आज भीमा नदीत पाण्याचा विसर्ग

सह्याद्रीच्या कुशीत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील चासकमान धरण ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे आज दुपारपासून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आरोपी दत्तगिरी महाराजांना अटक; कारागृहात रवानगी

अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील आनंद मठातील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तगिरी गुरु जयरामजी महाराज यांना चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीला अमरावती येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.दरम्यान, आरोपीला अटक झाल्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडी (पीसीआर) मागितली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपीकडून इतर महिलांचेही शोषण झाले आहे का, तसेच त्यासंदर्भातील पुरावे, माहिती आणि इतर बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी उपयुक्त ठरू शकली असती असे मत व्यक्त होत आहे.

पश्चिम विदर्भात बोगस बियाणे प्रकरणात तब्बल ७५ एफआयआर

पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यातील सोयाबीनची उगवण न होणाऱ्या बोगस बियाणांची व्याप्ती वाढली आहे, आतापर्यंत १३ विविध बियाणे कंपनी विरुद्ध पश्चिम विदर्भात ७५ एफआयआर विविध पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाल्या आहेत.. बियाणे कंपनीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून चार जिल्ह्यात तब्बल 12 हजार तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत.शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली होती.

भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या पाणी पातळीत वाढ

भंडारा जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. परिणामी भंडारा ते गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाला जोडणाऱ्या खमारी येथील पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम पडला आहे. सोबतचं वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं भंडारा ते कारधा जुना पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या मागणीसाठी काँग्रेस मैदानात

राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचा निषेधार्थ काँग्रेस करणार केंद्र सरकार विरोधात आंदोलन

सकाळी १० वाजता राजभवन येथे आंदोलन

पुण्यात वेश्या व्यवसायातून ९ मुलींची सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने खातरजमा करून त्या दोन्ही ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत देहव्यापारासाठी आणलेल्या ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली.

सीजेपी आंदोलनाच्या समर्थनार्थ बुलढाण्यात लागले ‘इन्कलाब जिंदाबाद’चे नारे...

नीट पेपर फुटी प्रकरणावरून सुरू झालेल्या सीजेपी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यातही इन्कलाब जिंदाबाद चे नारे लागलेत.. शहरातील जयस्तंभ चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ॲड. प्रवीण सुरडकर यांनी डोक्याला काळ्याफिती बांधून केंद्र सरकारचा जोरदार निषेध नोंदवला आहे..

नवी मुंबई DP प्लॅनवरून प्रशासकांवर टीका; नगरविकास विभागाच्या कारभारावर उठवले प्रश्नचिन्ह

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात (DP) आरक्षणात फेरबदल करून बिल्डरांचा फायदा साधल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. डीपी प्लॅन तयार करताना सार्वजनिक सोयी-सुविधांचे भूखंड राखण्याऐवजी बिल्डरांच्या हिताला प्राधान्य दिले गेले, असा हल्लाबोल करत नगरविकास विभाग आणि पालिका प्रशासकांचा कार्यकाळ नवी मुंबईसाठी 'शाप' ठरल्याची घणाघाती टीका करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savings Account : बचत खात्यावर किती पैसे ठेवता येतात? तुमच्या व्यवहारांवर असेल आयकर विभागाची नजर, जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update: विजय थलापतीचा जबरा फॅन, थलापतीला भेटण्यासाठी निघाला देगलूरहून पायी यात्रेवर

गुडघ्यापर्यंत लांब होतील तुमचे केस! रोज नक्की लावा 'हे' एक जादुई तेल

Shiv Sena Case Live Update : ठाकरे की शिंदे, शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी

Kangana Ranaut: '...आता का चर्चेपासून पळता?'; कंगना रणौत यांची राहुल गांधींवर सडकून टीका

SCROLL FOR NEXT