परभणीत आज दिवसभर कडाक्याचे ऊन पडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अचानकपणे जोरदार वादळी वारे सुटले या वादळी वाऱ्यामुळे शहरातील रस्त्यांवर धुळीचे लोट आणि कचरा उडाल्याने एकच दाणादाण उडाली त्यातल्या त्यात शहरातील वीजही गुल झाली वादळी वारे गेल्यानंतर शहरांमध्ये हलक्या पावसाला सुरुवात झाली ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी सी बी आय ने पुण्यातून मनीषा हवालदार ला केली अटक
सेठ हरिलाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या हवालदार यांच्यावर निलंबनाची कारवाई
विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर हवालदार यांचे निलंबन
हवालदार यांनी केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनाकडून निषेध
दोन दिवस येरवडा जेलमध्ये रवानगी
विकास लवांडे यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली
सोमवारी विकास लवांडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार
वारकरी संप्रदायाच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी वाघोली पोलीस स्टेशनला पुन्हा दाखल आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हवामानात अचानक बदल झाला असून मुंबई हवामान विभागाने इशारा दिला आहे. त्यानुसार राज्यातील तीन प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने आज संध्याकाळी ६:४५ वाजता जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पुढील ३ तासांसाठी यलो अलर्ट' देण्यात आला आहे. या काळात संबंधित जिल्ह्यांमध्ये खालीलप्रमाणे हवामान राहण्याची शक्यता आहे:
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
रायगडच्या माणगाव आणि इंदापुरमध्ये वाहनांच्या रांगा
कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतुक संथ गतीने
माणगाव येथे ढालघर फाटा ते खरवली फाट्यापर्यंत तर इंदापुर येथे कशेणे गावा दरम्यान वाहनांच्या रांगा
उन्हाळी सुट्टी करिता आलेल्या मुंबईकर कोकणवासीयांचा मुंबईच्या दिशेकडे परतीचा प्रवास सुरू झाल्याने होत आहे वाहतूक कोंडी
पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्याचे प्रयत्न सुरू
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयची कारवाई
अखेर भौतिकशास्त्राचा पेपर फोडणाऱ्याचे नाव आले समोर
भौतिकशास्त्राचे पेपर फुटी प्रकरणात सी बी आय ने घेतले ताब्यात
मनिषा संजय हवालदार असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे
भौतिकशास्त्राचे पेपर फोडायला केली मदत
सोशल मीडियावरील कॉकरोच जनता पार्टीच्या वाढत्या प्रभावावरून आमदार सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे.
'गरजनेवाले बादल,कभी बरसते नही, पराचा कावळा करण्यात आला आहे' कारण यातून नैवेद्य शिवता येईल का, असा प्रकार आहे.काही लोकांना नरेंद्र मोदी नावाची कावीळ झालेली आहे. यातून बुडत्याला काडीचा आधार म्हणून काही राजकीय पक्ष कॉकरोच जनता पार्टीच्या बाजूने बोलत आहेत.तसेंच 130 कोटींच्या देशात पाच लाख कोटी लोकांच्या भावना व्यक्त झाल्या म्हणून देशात उद्रेक आहे, असं होत नाही.
न्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेले विधानाचा गैर अर्थ लावला असल्याचे आरोप आमदार खोत यांनी केला आहे
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीचे तापमान 47.2 तर वर्धा जिल्हात उष्णतेचा कहर सुरूच, आज वर्धेचे तापमान 47 अंशावर
नागपूरच्या तापमानात 0.3 अंशाच्या किंचित घट
विदर्भातील दोन जिल्ह्याचे तापमान 47 च्या पार तर तीन जिल्हाचे तापमान 46 च्या पुढें नोंदवण्यात आले आहे
तापमानात पुढील 5 ते 7 दिवस आणखी वाढ होण्याची शक्यता- हवामान विभाग
● अकोला - 44.8
● अमरावती - 46.4
● भंडारा - 42.0
● बुलढाणा- 41.0
● ब्रम्हपुरी- 47.2
● चंद्रपूर - 46.4
● गडचिरोली - 46.0
● गोंदिया - 44.9
● नागपूर - 45.7
● वर्धा - 47.0
● वाशीम- 42.6
● यवतमाळ - 45.4
पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण मुख्य चौकात पावसामुळे पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं. साईड गटार तुंबल्याने पाणी थेट महामार्गावर आल्यानं वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.
कर्जतमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे महावितरण ची एक विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपी मध्ये मोठा ब्लास्ट झाला आहे. वाल्हेकर वाडी येथील महावितरणच्या डीपी मध्ये आज साडेचार पाच वाजता दरम्यान मोठा ब्लास्ट झाला आहे त्यामुळे वाल्हेकरवाडी परिसरातील काही भागातील विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला आहे. महावितरण कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपतळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत
रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी
० संपूर्ण रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या
० रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, म्हसळा श्रीवर्धन, कर्जत, खोपोली परिसरात जोरदार पाऊस
० हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला अंदाज खरा
० अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ
नवी मुबंईतील सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्ट या अनाथालयातील लहान मुलींसोबत आज मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी वाढदिवसानिमित्त वात्सल्य ट्रस्ट येथील लहान मुलींनी अमित ठाकरे यांना गुलाबाचे फुल, ग्रिटिंग कार्ड, पुस्तक व अमितसाहेबांची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली.
अमित ठाकरे यांच्या हस्ते या लहान मुलींना शालेय दप्तर व खाऊचे वाटप करण्यात आले.
वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी आज ठाण्यात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर लाटणे मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील तलावपाळी येथून सुरुवात झालेल्या मोर्चाची टेंभी नाका मार्गे मोर्चाची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथे झाली.
गेल्या आठ दिवसांपासून मावळ तालुक्यात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. तापमान तब्बल 41 अंशांच्या पुढे गेले होते. मात्र आज दुपारनंतर अचानक झालेल्या अवकाळी मुसळधार पावसाने मावळकरांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या अवकाळी पण दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधान व्यक्त होत आहे.कारण पावसाची चाहूल लागताच अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली होती.त्यामुळे हा पाऊस खरीप हंगामासाठी उपयुक्त ठरणार असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.
यवतमाळच्या दारव्हा पंचायत समिती मध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे आणि प्रभारी अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सर्वसामान्य जनता कमालीची त्रस्त झाली आहे.अशा भ्रष्ट आणि ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध करण्यासाठी दारव्हा तालुक्यातील त्रस्त नागरिकांच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर अर्धनग्न भंडारा आंदोलन काढण्यात आले.
नांदेडच्या बिलोली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना जेवण मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंत्राटदाराच्या अडमुठ्या धोरणामुळे रुग्णालयातील रुग्ण मागील आठ दिवसापासून उपाशी आहेत. या रुग्णालयात सध्या जवळपास 50 ते 60 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. परंतु या रुग्णांना सकाळचा नाश्ता चहा आणि दुपारचे आणि रात्रीचे जेवण मागील आठ दिवसापासून मिळाले नसल्याची प्रतिक्रिया रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णांनी दिली आहे. या सोबतच रुग्णालयात डॉक्टर्स कर्मचारी देखील गैरहजर राहत असल्याचा देखील धक्कादायक प्रकार समोर आला आहे.गॅस संपल्याच्या नावाखाली मागील आठ दिवसापासून कंत्राटदार रुग्णालयातील किचन बंद करून फरार झाला आहे.
बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी शिवारात रात्रीच्या सुमारास एका गटातील व्यक्तीने गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले यानंतर दुसऱ्या गटातील लोकांनी शिवीगाळ केली. यानंतर दोन्ही गटातील लोक आमनेसामने आले. लोखंडी गज, दगड, लाठ्याकाठ्या आणि कोयत्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये 10 ते 11 जण जखमी झाले तर जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश असून गेवराई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आज दुपारनंतर वातावरणात अचानक बदल झाला आणि सणसवाडी परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला.
अवघ्या काही वेळासाठी झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय
आज सकाळपासून भोर मध्ये ढगाळ वातावरण
पुढील २ दिवस पुणे जिल्ह्यात पावसाचे, हवामान विभागाचा इशारा
एकीकडे संपूर्ण नंदुरबार जिल्हा उन्हाने होरपळत असताना, राज्याला दिलासा देणारी एक बातमी समोर येत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तापमान सध्या 43 ते 45 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. मात्र, राज्याचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ मध्ये ऐन उन्हाळ्यात गारवा पाहायला मिळत आहे. इतर ठिकाणच्या तुलनेत तोरणमाळचा पारा थेट 39अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून, या भागात नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांपासून मोठा दिलासा मिळाला आहे..
अकोला शहरातील गुडधी भागात महापालिकेच्या बेपर्वाईमुळे नागरिकांना दोन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय.
बुलढाणा जिल्ह्यात डिझेल-पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आमदार गायकवाड यांनी केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याने महिलांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात धडक देत आंदोलन केले. शेगाव, चिखली, खामगावसह विविध तालुक्यांतील असंख्य महिला कार्यालयात दाखल झाल्या.. महिलांनी “आमच्याकडे वाहन नाही, जमीन नाही, तरीही योजनेचे पैसे खात्यात आले नाहीत” अशी तक्रार केली. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पैसे न मिळाल्याचा आरोप महिलांनी केला. यावेळी कार्यालयाकडून “साईट बंद आहे” असे सांगण्यात आले, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले....
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 28 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय.. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केलीेये.. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.. जरांगे यांच्या मागण्या घेऊन लाड मुंबई ला येऊन उपसमितीशी चर्चा करणार आहेत तर मुख्यमंत्र्यांनाही या विषयीची माहिती देणार असल्याचं प्रसाद लाड यांनी सांगितलंय.. मात्र 28 तारखेपर्यंत मागण्या मंजूर झाल्या नाही तर आमरण उपोषण करणारच असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.
पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून 12 जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीची विधानपरिषदेची बैठक संपली आहे. विधान परिषदेसाठी कुणाला संधी द्यायची, याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. अनुभवी चेहऱ्यांना संधी देणार की नवीन चेहरा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धाराशिवच्या तुळजापूर येथे सीएनजी पंपावर चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असुन ही तुळजापूर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची (N.C.) नोंद केल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मारहान करणारे हे तुळजापूरातीलच असल्याची माहिती आहे.दरम्यान सदरील घटनेचा सिसिटिव्ही व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणात चौकशीच्या अनुषंगाने सीबीआयचे पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे, काल दोन डॉक्टरांची लातूरमध्ये चौकशी करण्यात आले, तर आज एका नवीन तिसऱ्या डॉक्टरची सीबीआयच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे, लातूरच्या जुना औसा रोड भागात डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये सीबीआयच्या पथकाकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मागील आठ दिवसांपासून शेतकरी ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल हे कॅन मध्ये घेऊन जात असल्यामुळ आता त्याचं कॅनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर या कॅनचा तुटवडा निर्माण झाला आहे. आणि या कॅनचे दर सुद्धा वाढले आहेत.
रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ काढला मोर्चा
गेल्या दीड वर्षापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक
ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या तयारीत
योजनेच्या मंजुरीवरून गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना झापले
अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची
२०४७ पर्यंत विकसित भारत आणि महाराष्ट्र होणार
पेट्रोल डिझेलची साठेबाजी साठेबाजी करू नका
फुरसुंगी-उरूळी कचरा डेपोविरोधात आंदोलन तापले
पुण्यातील फुरसुंगी-उरूळी येथील कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा पेटला आहे स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवून आंदोलन सुरू केले आहे ...
जोपर्यंत ओपन डंपिंग बंद होत नाही तो पर्यंत कचऱ्याच्या गाड्या जाऊन देणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे
पालिका अधिकारी आणि पोलिसांकडून आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला जातोय
ट घोटाळ्यातील आरोपी मोटेगावकर व कुलकर्णी यांच्या फोटो समोर नोटा उधळत त्याचे दहन करण्यात आले.. बीड मधील विद्यार्थ्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले... मोटेगावकर आणि कुलकर्णी सारख्या आरोपींनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत कोट्यावधी रुपयांची माया जमवली आहे.. या सर्व प्रकरणाचे चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथे दहावीच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थ्याच्या नऊपैकी तब्बल सात पेपरच्या पुरवण्या अन्य व्यक्तीकडून लिहून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडल्याचे उघड झाले. परीक्षा संपल्यानंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिक्षकाकडे गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणी उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षरात स्पष्ट फरक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
- नागपूर विद्यापीठात आज पुन्हा भाजप युवा मोर्चाचे आंदोलन
- मंगळवारी भाजप युवा मोर्चाने जोरदार आंदोलन करत राडा केला होता,त्यात साहित्याची तोडफोड करण्यात आली होती
- ज्यांनतर भाजप युवा मोर्चाच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- आज पुन्हा कुलगुरूंना स्मरण पत्र देण्यात येणार आहे
- विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या परीक्षा,त्यामुळे निकालाला होणारे विलंब,उन्हाळ्यातील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची गैरसोय इत्यादी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कुलगुरूंना दोन दिवसांची मुदत भाजप युवा मोर्चाने दिली होती
उल्हासनगर शहरात जुन्या वादातून गोळीबार प्रकरणात दोन जणांना घेतलं पोलिसांनी ताब्यात
चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव असं ताब्यात घेतल्यांची नाव
या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी
अमन चव्हाण आणि अनिल चव्हाण यांची नावं असून भाऊ आहेत
जळगाव जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून डिझेल टंचाईमुळे वाहतूक व्यवस्थेवर देखील मोठा परिणाम झाला असून वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः कंबरड मोडला आहे. डिझेल मिळत नसल्याने जिल्ह्यात एक हजार पेक्षा अधिक ट्रॅक चार ते पाच दिवसापासून अडकून पडले असून विविध राज्यातून आलेल्या ट्रक चालकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे .
मराठा समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आमदार प्रसाद लाड आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटीत भेट घेऊन चर्चा करणार आहे. तर प्रसाद लाड मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं असं आम्हाला वाटतंय त्यामुळे आम्ही त्यांना मुख्यमंत्री शिष्टमंडळ म्हणालो असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
उन्हाचा पारा वाढला असताना रस्त्यावरील अज्ञात व्यक्तींच्या मृत्यूचे धक्कादायक आकडे समोर आले आहेत.
13 मे पासून नागपूर शहरात 26 अज्ञात व्यक्तींचे मिळून आले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे हे मृत्यू झाल्याची शंका आहे.
रस्त्यांच्या कडेला, उड्डाणपुलाखाली इत्यादी सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही.
नवी मुंबईत पुन्हा एकदा चालत्या कारवर स्टंटबाजी
पनवेल सायन मार्गावर चालत्या कारवर व्हिडिओ काढतानाचा तरुणाचा व्हिडिओ समोर
थेट सायन पनवेल हायवेवर तरुण कारच्या खिडकीतून बाहेर येऊन गाड्यांचे व्हिडिओ काढत आसल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण
सायन पनवेल महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असताना जीवघेणा स्टंट करणाऱ्या तरुणावर पोलिस करणार का कारवाई
धमकीनंतर प्रसाद लाड यांची सुरक्षा वाढवली
कडक बंदोबस्तात प्रसाद लाड अंतरवाली सराटीकडे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत.
गाडीच्या पुढे तीन पोलिसांच्या गाड्या आणि गाडीच्या मागे तीन अशा सहा पोलिसांच्या गाड्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव हॉटेल रामा पासून ते चिकलठाणा पर्यंत रस्ता सर्वसामान्यांसाठी रस्ता रोखून ठेवला
डिझेलसाठी ट्रॅक्टरच्या रांगा; खरीप तोंडावर शेतकरी संकटात !
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी अडचणीत
शेती मशागतीचे कामे खोलांबलीत
- सोलापुर शहरातील अनेक भागात आज सकाळी हलक्या पावसाची हजेरी
- कालच्या 40.9° से. तापमानानंतर सोलापूरकरांना काहीसा दिलासा
- हवामान विभागाचा आज आणि उद्या हलक्या पावसाचा अंदाज
- एकाच आठवड्यापूर्वी तापमानाचा पारा 44 अंशांवर गेल्यानंतर आजच्या पावसाने सोलापूरकरांना मोठा दिलासा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पुणे दौऱ्यावर
पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक
विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत पुणे जिल्ह्यातील नेत्यांसोबत सुनेत्रा पवार यांची बैठक
पुणे जिल्ह्यातील विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढण्याच्या तयारीत
कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे देखील बैठकीला उपस्थित
पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये जिल्ह्यातील नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करणार चर्चा
मिशन परिवर्तन अंतर्गत गोवंश तस्करांविरुद्ध पोलिसांची कारवाई..
जळगाव जामोद शहराच्या कुरेशी मोहल्यातून १७ जनावरांची सुटका
सात दिवसांपासून डिझेल टंचाई कायम, शेतकऱ्यांचे हाल
पेट्रोल पंपावर वाहनाच्या लांबच लांब रांगा
अनेक पेट्रोल पंपावर डिझेल नसल्याचे फलक
शेतकऱ्याचे संतप्त प्रतिक्रिया
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे चोरट्यांनी थेट गावाच्या देवाच्या देवळालाच लक्ष्य करत शनी मंदिर आणि दत्त मंदिराच्या दानपेट्या फोडून रोख रक्कम लंपास केली.
कोल्हापुरात संमोहन करून तब्बल ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाऊसिंगजी रोडवरील गजबजलेल्या परिसरात दोन भामट्यांनी १८ वर्षीय कारागिराला बोलण्यात गुंतवत संमोहित केलं आणि काही मिनिटांत सोन्याची बॅग घेऊन पोबारा केला. जुना राजवाडा पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.
नागपूरहून कोल्हापूर कडे जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला, लातूरमध्ये पहाटे भीषण आग लागली,
लातूर सोलापूर महामार्गावरच्या तुलसी हॉटेल समोर पहाटे साडेतीन वाजता एका खाजगी ट्रॅव्हल्स ला शॉटसर्किट मुळे आग लागली,
ट्रॅव्हल्स मधील 35 प्रवाशांना चालकाच्या प्रसंगावधानामुळे बाहेर काढण्यात यश आल आहे.
तर सुदैवाने कुठली जीवितहानी नाही ,मात्र या भीषण आगीत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे
- इंधन धरवाढीचा फटका, नागपुरहून उडणारी अनेक विमानं एक जूनपासून बंद
- विमानाचा संचालन खर्च ५५ ते ६० टक्क्यांवर पोहोचल्याने नागपुरहून उडणारी अनेक विमानं बंद होणार
- अनेक विमानं बंद होणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका
- बंगरुळुला जाणाऱ्या चार फ्लाईट अनिश्चित काळासाठी होणार बंद
- एअर इंडियाची नागपूर बंगरुळु रात्रीची फ्लाईट बंद
- तर इंडिगोची बंगरुळु रात्रीची फ्लाईट १६ जूनपासून होणार बंद
भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून युवकांच्या कथित अपमानाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलय.
"होय,आम्ही झुरळ..!" असे उपरोधिक लिखाण असलेली जॅकेट परिधान करून आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
देशातील युवक शिक्षण,बेरोजगारी,महागाई, कंत्राटीकरण,पेपरफुटी आणि असुरक्षित भविष्याशी झुंज देत असताना युवकांची तुलना "झुरळांशी" करणे अपमानास्पद असल्याची भावना या युवाकांनी फालकाच्या माध्यमातून व्यक्त केलीय.
* नाशिक शहरातील काही भागात उद्या शनिवारी पुन्हा पाणीपुरवठा राहणार बंद
* सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा उद्या रहाणार बंद
* मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने महापालिकेकडून तातडीची दुरुस्ती होणार
* शनिवारी नाशिक पश्चिम विभागात अनेक भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार
वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या तुटवड्यामुळे शेतकरी आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सकाळपासून अनेक पेट्रोल पंपांवर कॅनच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या असताना मध्यरात्री सुद्धा डिझेलसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी कायम आहे
अकोला नाका परिसरातील छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलचा टँकर दाखल होताच शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं.
मात्र तांत्रिक कारणामुळे डिझेल वितरणाला उशीर झाल्याने अनेकांना पहाटेपर्यंत पेट्रोल पंपावर थांबण्याची वेळ येणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.