Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२५, महाराष्ट्रात पाऊस विश्रांती घेणार, सोलापूर-बीड-धाराशिवमध्ये पूरस्थितीनंतर भयान अवस्था, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

निलेश घायवळ याला बनावट पासपोर्ट तयार कोणी करून दिला?

पासपोर्ट बनविण्यासाठी मदत करणाऱ्यांची तपासली जातेय कुंडली

घायवळ याने स्वतःच्या आडनावात फेरफार करून पारपत्र मिळविल्याचा संशय पोलिसांना आहे

"घायवळ" ऐवजी "गायवळ" असे नाव त्याने पारपत्रासाठी वापरले आहे

त्याला पारपत्र बनविण्यासाठी मदत करणाऱ्या प्रत्येकाची कुंडली पुणे पोलिसांकडून तपासली जात आहे

दरम्यान दुचाकीची बनावट वाहन क्रमांकाची पाटी वापरल्याप्रकरणी घायवळवर कोथरूड पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला

गोळीबार प्रकरणात स्वित्झर्लंडला फरार झालेला गुंड नीलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची १० बँक खाती गोठवण्यात आली आहेत

राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, एक ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात पीक पाहणी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

राज्य आपत्कालीन परिस्थितीतून जात असल्याने 100 टक्के पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी हिताची काळजी घेऊन पाहणी करावी,असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

खरीप हंगाम 2025 साठी ही पीक पाणी महत्त्वाची.

पंढरपूरच्या विठ्ठल साखर कारखान्याचा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊस दर

पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक तीन हजार तीन रुपये इतका ऊस दर दिला आहे. आणखी पाचशे रुपये शेतकऱ्यांना लवकरच दिले जातील असे आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष व आमदार अभिजीत पाटील यांनी दिली.

विठ्ठल साखर कारखान्याची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेमध्ये आमदार अभिजीत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ ही संपन्न झाला. यावर्षी किमान 20 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गाळप हंगाम एक नोव्हेंबर पासून सुरू होणार असून प्रतिदिनी 14000 टन ऊस गाळप केले जाणार आहे असेही आमदार अभिजीत पाटील यांनी सभेत सांगितले.

लक्ष्मण हाकेच्या वायप्लस सुरक्षेवरून वाद ; मराठा क्रांती मोर्चाचा वाय प्लस सुरक्षेला विरोध

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा व्यवस्थेवरून नवा वाद सुरू झाला आहे. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लक्ष्मण हाके यांना सरकारने दिलेली वाय प्लस सुरक्षा तत्काळ काढून घ्यावी अन्यथा राज्यभर आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना वाय प्लस सुरक्षा व्यवस्था दिली आहे. त्यावरून आता मराठा क्रांती मोर्चा ने आक्षेप घेत त्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी केली आहे.

लक्ष्मण हाके हे वाचाळ वीर आहेत समाजामध्ये तेढ निर्माण करून जातीयवाद निर्माण करत आहेत अशा लोकांना सरकार सुरक्षा सुरक्षा देऊन समाजाविरोधात बोलण्याची लायसन देणार असेल तर मराठा क्रांती मोर्चा ती खपवून घेणार नाही याबाबत लवकरच राज्यव्यापी बैठक घेऊन तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही श्री डोंगरे यांनी दिला आहे.

नाशिक शहरात आजपासून शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी

- नाशिक शहरात आजपासून शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी

- आजपासून १५ ऑक्टोबरपर्यंत १५ दिवस शस्त्र आणि जमावबंदी आदेश लागू

- सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय

- या कालावधीत सभा, मिरवणुका काढण्यास पोलिसांची रीतसर परवानगी आवश्यक

- शस्त्र आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला

महानगरपालिकेच्या अग्निशामन विभागाच्या नूतन इमारतीचं बांधकाम सुरू होते

साडेनऊ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा स्लॅब कोसळला

स्लॅबखाली काही जण अडकल्याची भीती

घटनास्थळी मदतकार्य सुरू, इमारतीचा स्लॅब नवीनच सुरू असल्याने घडली दुर्घटना

घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार, माजी आमदार ऋतुराज पाटील दाखल

अतिवृष्टीने राज्यात ३२ लाख हेक्टर बाधित,सर्वाधिक या जिल्ह्याना फटका

राज्यात झालेल्या अतिवृष्टीने एकूण २६ जिल्हे बाधित झाले असून यात यवतमाळ, अमरावती, वाशिम, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, सातारा, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छ. संभाजीनगर, जळगाव, रायगड, रत्नागिरी, सांगली, नाशिक, ठाणे, पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे तर एकूण बाधित तालुके 178 असून सर्वाधिक बाधित जिल्हे अहिल्यानगर, बीड, सोलापूर, जालना, नाशिक परभणी, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आहे.या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजानुसार 32 लाख 34 हजार 238 हेक्टर एवढं नुकसान झालं असून तर सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, भुईमुग, ऊस, कांदा, भात, नाचणी, आजीपाला, फळपिके ही पिके बाधित झाले आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार सर्वाधिक अहिल्यानगर जिल्ह्यात ५ लाख ७८ हजार ७९८ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे,बीड जिल्ह्यात ५लाख ७१ हजार १०० हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे तर जालन्यात ३ लाख ७५ हजार ९७३ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे.तसेच सोलापूर जिल्ह्यात ३लाख ८६ हजार ९३१ हेक्टर क्षेत्र,यवतमाळ जिल्ह्यात १३७५६८ हेक्टर क्षेत्र,नाशिक जिल्ह्यात २७९२२० हेक्टर क्षेत्र,संभाजीनगर येथे १६६२२६ हेक्टर क्षेत्र,परभणी जिल्ह्यात २१०३१४ हेक्टर क्षेत्र,धाराशिव जिल्ह्यात १८१२०० हेक्टर क्षेत्र असे एकूण २७ जिल्हे बाधित झाले असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

वाशिम जिल्ह्यातील झेंडू शेतीचं अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पाण्यामुळे सोयाबीन,कापूस,तूर,उडीद, मूग या पिकासह झेंडू शेतीचं सुद्धा होत्याचं नव्हतं केलय...झेंडू फुलांना दसरा आणि दिवाळीला मोठ्या शहरात प्रचंड मागणी असते. मात्र या वर्षी झेंडूच्या शेतीमधून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही. अतिवृष्टीच्या पाण्यामुळे झेंडूची झाडं पूर्णपणे आडवी झाली आहेत. तर अतिपावसामुळे फुल सुद्धा सडली आहेत. त्यामळे ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडू फुले निघणार नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

आम्ही पारंपारिक पीकाला फाटा देऊन झेंडू ची शेती केली मात्र सततच्या पावसानं आमच्या झेंडू च्या शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे.या झेंडू शेतीवर केलेला उत्पादन खर्च ही वसूल होणार नाही.या साठी राज्य सरकारनं आमच्या झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.

NAVI MUMBAI | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'डीजीसीए'चा परवाना

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला (एनएमआयए) नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) कडून 'एरोड्रोम' परवाना मंजूर झाला आहे. हा परवाना विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. विमान वाहतूक प्राधिकरणाच्या सर्व सुरक्षा आणि नियामक अटी पूर्ण केल्यानंतर हा परवाना देण्यात आला आहे.

MUMBAI | बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा उघड!

बोरिवली स्टेशनवर झालेल्या तब्बल ४.५ लाख रुपयांच्या फिल्मी स्टाईल दरोड्याचा बोरिवली जीआरपीने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय सूत्रांचा वापर करून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून जीआरपी ने त्यांच्याकडून.२.८५ लाख रुपये जप्त केले आहेत.अहमद शेख (३२), मंगलराज राय (२८), तानाजी माने (३०), राजू शेख (२६), कृष्णा कानजोडकर (४०) आणि सुरेश कुलकर्णी (५६)अशी अटक केलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. हे सर्व आरोपी मुंबई आणि ठाणे परिसरातील असून, त्यांच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

उल्हासनगर कॅप नंबर पाच परिसरातील महादेव सेल्स या दुकानाच्या गोडाऊनला रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली , या आगीत गोडाऊन मधील चादरी, टॉवेल आणि कपडे जळून खाक झाले , अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या , अखेर अग्निशमन दलाच्या जवांनाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं, गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात कपडे असल्याने आगीचा मोठा भडका उडाला होता, गोडाऊनच्या पहिल्या मजल्यावरील सर्व साहित्य जळून खाक झालं , मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने आजूबाजूच्या दुकानांना झळ पोहचली नाही, मात्र ही आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकता नाही

ताडोबाच्या प्रवेशाला खासदारांची आडकाठी

पावसाळ्याच्या तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला. मात्र वाढलेल्या तिकिटांचा मुद्दा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने आजचा प्रारंभ वादग्रस्त ठरला. खासदार धानोरकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार त्या आज पहाटेच मोहर्ली प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांसह दाखल झाल्या असून, एकही पर्यटक जिप्सी प्रकल्पात जाण्यास त्यांनी विरोध सुरू केलाय. त्यामुळे आताची पहिली सफारी खोळंबली आहे. पर्यटक गेटवर सफरीसाठी थांबून आहेत. जोपर्यंत दर मागे घेतले जात नाहीत आणि समाधानकारक तोडगा निघत नाही, तोवर एकही जिप्सी आतमध्ये जाऊ देणार नाही, अशी भूमिका खासदार धानोरकर यांनी घेतल्याने पहिल्याच दिवशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या अधिकारी आणि खासदार यांच्यात चर्चा सुरू आहे. दरम्यान, खासदार आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने ताडोबा व्यवस्थापनाने आधीच प्रवेशाचा मुहूर्त साधत पूजा आटोपून घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arattai App UPI: अरत्ताई अ‍ॅपवर लवकरच UPI सपोर्टसह होणार, जाणून घ्या खास फीचर्स

भूकंपामुळे मध्यरात्री जमीन हादरली, २६ जणांचा मृत्यू, लोकांचा आक्रोश अन् घर पडतानाचा व्हिडिओ

Rule Change: दिवाळी-दसऱ्याआधी महत्त्वाचे १५ बदल, तुमच्या आयुष्यावर होणार थेट परिणाम, वाचा सविस्तर

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT