बदलापूर पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदार यादीत शहराबाहेरील 17 हजार मतदारांची नावं असून हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल.. कर्डिले कुटुंबीयांची सांत्वन पर घेतली भेट.. आमदार संग्राम जगताप, यांचीही उपस्थिती..
पुण्यासह राज्यात सध्या दिवाळी पहाट चे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यंदा बहुतांश दिवाळी पहाट कार्यक्रमात "द फोक आख्यान" या मराठी लोकसंगीताचा वारसा जपणाऱ्या एका संगीत रजनी ने अक्षरशः धूम माजवली आहे. या कार्यक्रमातील तरुणांनी त्यांच्या संगीताने तसेच लोकसंगीतावर प्रेम करणाऱ्या रसिकांना घायाळ केलं आहे. आज पुण्यातील कोथरूड भागात नगरसेविका हर्षाली माथवड यांनी आयोजित केलेल्या "कोथरूड सुरोत्सव" ला याच "फोक आख्यान" कार्यक्रमाला कोथरूडकरांनी मोठी गर्दी केली होती.
धुळ्याच्या साक्रीत काँग्रेसला खिंडार
माजी सभापतींसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का
पश्चिम पट्ट्यातील काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत केला प्रवेश...
या पक्षप्रदेशानंतर साक्री तालुक्यात शिंदे सेनेची ताकद आणखीन वाढली...
मंत्री छगन भुजबळ- आणि वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं असा सवाल ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.वडेट्टीवार यांचा व्हिडीओ बीडच्या सभेत भुजबळांनी दाखवायला नको हवा होता.मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका असा सल्ला नवनाथ वाघमारे यांनी भुजबळांसह वडेट्टीवार यांना दिला आहे.भुजबळांच्या मनात काय आहे आम्हाला काही कळेना असं म्हणतसर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा अस वाघमारे म्हणालेत.मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वडेट्टीवार यांच्यावर टिका करायला लावली का असा सवाल वाघमारे यांनी भुजबळांना केला आहे.तुम्हीच तुमच्यात भांडण करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया वाघमारे यांनी भुजबळ -वडेट्टीवार वादावर दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सेक्टर 12 स्वराज्य नगरी या ठिकाणी पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात एक चिमुकला मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जर्मन शेफर्ड श्वाना चिमुकल्या मुला हल्ला करत असतानाचा विडियो सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.
राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली स्व.शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट..
आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी... कर्डिले कुटुंबियांच्या सदैव पाठीशी राहणार असल्याची दिली ग्वाही...
कित्येक वर्षे मतदार यादीमध्ये गोंधळ सुरू
महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत
या निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग
मत द्या किंवा देऊ नका मॅच फिक्सिंग झालंय
निवडून आलेले आमदारही आवाक झाले होते.
ही कोणती लोकशाही?
आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधाऱ्यांना राग येतो.
गल्लीबोळातल्यांना माहिती आहे की सत्ता कशी आली
सत्ताधाऱ्यांना राग येतो कारण त्यांनी शेण खाल्लं
जर निवडणूक शांततेत आणि व्यवस्थित पार पाडायची असेल तर आधा मतदार यादी स्वच्छ करा. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
दिवाळी च्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री मा.श्री.प्रवीण पोटे पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही निराधारांसोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.या सामाजिक उपक्रमांतर्गत आधार केंद्रातील निराधार व्यक्तींसोबत स्नेहमेळावा आणि त्यांना दिवाळीचे साहित्य वाटप करण्यात आले समाजातील निराधारांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी, तसेच त्यांना या सणात आपुलकी आणि आधार देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात निराधारांना दिवाळीसाठी आवश्यक असलेले साहित्य वाटप केले केले असून, त्यांच्यासोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे..
आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळेत वर्ग तीन आणि वर्ग चार च्या कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा सध्या मुंबई च्या दिशेने जात असताना ठाणे व नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत च्या सिमेवर बिऱ्हाड मोर्चाने मुंबई नाशिक नवीन महामार्गावर कसारा घाटाच्या माथ्यावर आपला मोर्चा हा रात्रीपासून महामार्गावर सुरू केल्याने नाशिक हून मुंबई च्या दिशेने जाणारा नवीन मार्ग रात्री पासून पुर्णपणे बंद करण्यात आले आहे.
आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनाने माण्या कराव्या असी भूमिका या बिऱ्हाड मोर्चाने घेतली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात तब्बल ३ ते ४ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणगावाकडे जाणाऱ्या लेनवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुणे मेट्रो संध्याकाळी ६ वाजेपर्यंत धावणार
येत्या मंगळवारी लक्ष्मी पूजन निमित्त पुणे मेट्रो सेवा सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत उपलब्ध राहणार
मंगळवारी संध्याकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत मेट्रो सेवा राहणार बंद
बुधवार पासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सुरू राहील
राजू शेट्टी यांनी एवढा मोठा आरोप करत असताना त्यांनी एकदा माझ्याशी बोलले पाहिजे होत
मी सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवली असती
जैन बोर्डिंग चे खरेदी खत झालं हे सगळं करत असताना गोखले बिल्डर ने केलं आणि माझ्यावर आरोप झाला की मी त्याचा पार्टनर आहे
मी निवडणुकीत घोषित केलं होतं की लोकसभेच्या प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात मी शेती व्यवसाय करतो आणि बांधकाम करतो हे मी लिहिलं आहे
मी पुण्यात अनेक ठिकाणी विविध कंपनी मध्ये काम केलं
मी स्वच्छ व्यवसाय केला कागदपत्र दाखवले
गोखले यांच्यासोबत २ एल एल पी होत्या या दोन्ही भागीदारी संस्था
अंबरनाथच्या हेरंब मंदिर परिसरात मनसेच्या वतीने दीपसंध्या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेने हजेरी लावली होती यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी सूचक वक्तव्य केलं की आपली युती सुद्धा होऊ शकते सगळे खेळ रात्री चालतात असं विधान केलं आहे. सुनील चौधरी यांनी आपल्या भाषणातून धनंजय गुरव यांच कौतुक करत म्हणाले की
मी आज स्टेजवर जरी शिवसेनेचा असलो आणि तुम्ही मनसेचा बोर्ड लावला आहे कधी काय होऊ शकते आपली युती सुद्धा होऊ शकते सगळे खेळ रात्री चालतात रात्री काय होत सकाळी काय होत कोणालाच कळतं नाही आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलतो आणि सकाळी गळ्यात गळे घालून एकत्र जातो राजकारण आहे त्या त्या गोष्टीवर आणि काही बोलण्याच्या बाबतीत एकत्र यावं लागतं या सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्हाला मराठी भाषेचा अभिमान आहे राज साहेब ठाकरे अभिजात मराठीचा दर्जा दिला असल्याचा चौधरी यांनी म्हटलं आहे एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अंबरनाथ मध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का असा प्रश्न अंबरनाथकरांना पडला आहे.
समीर पाटलांवरती सातत्याने आरोप करणाऱ्या रवींद्र धंगेकारानविरोधात समीर पाटलाकडून कोर्टात केस दाखल
गेले काही दिवस रवींद्र धंगेकर वक्तव्य करीत आहे. त्या विरोधात समीर पाटील कोर्टात
ज्याचा कोणताही संदर्भ अथवा पुरावा न देता त्याच्या राजकीय स्वार्थापोटी व माझ्या व्यवसायीक व व्यक्तिगत नुकसान व मानहानी संदर्भात न्यायालयामध्ये दाखल केलेले क्रिमिनल केस व दिवाणी दावा
यापूर्वी समीर पाटील यांनी पाठवली होती रवींद्र धंगेकर यांना 50 कोटीची नोटीस
काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपत प्रवेश निश्चित
दिवाळीनंतर मुंबई येथे होणार भाजपमध्ये प्रवेश, प्रवेशनंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा
कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दिलीप माने यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन भाजपत जायचा घेतला निर्णय - ही आधी करते
स्वातंत्र्य चौकातील मोहिते कॉम्प्लेक्समधील गायत्री इलेक्ट्रिकल्स व स्टेशनरी या दुकानाला लागली मध्यरात्री आग अचानक आग लागली
दोन झेरॉक्स मशीन, लॅपटॉप, आणि दिवाळी सणाच्या विक्रीसाठी ठेवलेले संपूर्ण साहित्य जळून खाक !
आगीचं नेमकं कारण समोर आलेलं नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे!
ऐन दिवाळीत व्यवसायाची राख रांगोळी झाल्यामुळे चौधरी परिवाराला अश्रू अनावर !
शरद पवारांच्या हस्ते रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल नूतनीमारतीचं उद्घाटन..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.शिवाजी कर्डिले यांना वाहिली श्रद्धांजली..
खासदार निलेश लंके,आमदार आशुतोष काळे,माजी आमदार राहुल जगताप यांची उपस्थिती
साध्या घशाच्या त्रासासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या 79 वर्षीय वृद्धाला करोना पॉझिटिव्ह नसतानाही खोटे रिपोर्ट बनवून चुकीचे उपचार दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शरिरातील अवयवांची तस्करी करण्यासाठी व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशावरून शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित डॉक्टरांसह अनोळखी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण APMC मार्केटमध्ये दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात फुल विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापारी येत असतात. विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनासाठी ५२० रुपये प्रवेश शुल्क आकारले जात असल्याची माहिती मिळत आहे. मात्र इतक्या मोठ्या शुल्कानंतरही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतोय. मार्केट परिसरात लाईटची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतेची कोणतीही सुविधा नाही — यामुळे शेतकरी प्रचंड नाराज झाले आहेत. “आमच्याकडून पैसे घेताय… मग सुविधा कुठं आहेत?” असा संतप्त सवाल फुल विक्रेत्यांनी उपस्थित केला. रात्री विक्रीदरम्यान याच मुद्द्यावरून मार्केटमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. दिवाळीच्या काळात फुल विक्रेत्यांना मोठी बाजारपेठ असते, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे. APMC कडून तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली आहे.
विचित्र अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाले. नांदेडच्या नांदेड ते नागपूर महामार्गावरील हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ ही घटना घडली. जेसीबी, आयचर आणि एक कार, असा विचित्र अपघात या महामार्गावर झाला. लातूर येथून देवगुरे परिवार चंद्रपूर येथे मुलगी पाहण्यासाठी जात होते. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील भानेगाव फाट्याजवळ येतात या ठिकाणी तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. अपघातात मुलगी पाहण्यासाठी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आठ जण या अपघातात जखमी झाले.
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मुळे शेतकऱ्यांसह अनेकांचे नुकसान झाले होते.याचाच परिणाम धाराशिवमधील नेहरू चौकातील दिवाळी सणा निमित्त सजलेल्या बाजारपेठेत पाहायला मिळाला आहे.दिवाळी सणासाठी लागणारे आकाश दिवे,पणत्या, लक्ष्मीच्या मूर्ती आणि इतर साहित्यासह किराणा मालाच्या दुकानातही खरेदीसाठी येणारा ग्राहक म्हणजे शेतकरी,मजूर,भागातील लोक, पावसामुळे शेतकऱ्यांसह अनेक लोकांचे नुकसान झाल्याने ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह कमी दिसतोय,व्यवसायिकांनी मोठ्या अपेक्षांने दुकानात माल भरला मात्र खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी असल्याने व्यापारी व्यवसायिकामध्ये नाराजीचा सूर आहे. तर आर्थिक अडचणीमुळे खरेदी करण्याचा उत्साह कमी असल्याचा ग्राहक सांगत आहेत.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टीत अनेक शेतक-यांच्या पिकांचे मोठ नुकसान झाले होते,त्याचे पंचनामे करत आल्या नंतर मालेगाव तालूक्यातील ५४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित होऊन ८६ हजार लाभार्थ्यांसाठी ४७ कोटी रुपयांचे अनुदान महसुल विभागास प्राप्त झाले असून तीन दिवसात ते शेतक-यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्द्श शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महसुल प्रशासनाला दिले आहे.
पंढरपुरात ऐन दिवाळीत पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिम सुरू केली आहे. या दरम्यान मोठी कारवाई केली आहे. तब्बल 14 लाख रूपये किंमतीची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे.
एका टेम्पो मधून 30 पोती सुगंधी तंबाखू नेली जात होती. पोलिसांना याची माहिती मिळताच छापा टाकून कारवाई केली. अन्न व औषध नियमाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव विमानतळाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून झालेली नाही. या समितीच्या अध्यक्षपदी खासदार स्मिता वाघ असून, बैठक झालेली नसल्यामुळे विमानतळाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय प्रलंबितच राहिले आहेत. परिणामी, प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, विमानतळ विस्तारीकरण, टर्मिनल इमारत आणि ॲप्रानसारख्या तांत्रिक बाबी मार्गी लागण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. विमानतळाच्या व्यवस्थापनासाठी ही समिती महत्त्वाची असून, तिच्या बैठकीतूनच धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र गेल्या आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून बैठक न झाल्यामुळे विमानतळाच्या विकास कामाचा प्रस्तावाचा पाठपुरावा तसेच अन्य सुविधा चर्चा यामुळे झालेली नाही
शासनाने दिवाळीपूर्वी अस्थिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल अशी हमी दिली होती. परंतु अमरावती जिल्ह्यात दिवाळी तोंडावर आली तरी आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांपैकी 35 टक्के शेतकरी अजूनही मदती पासून वंचित आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनातर्फे सर्व शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पाठविण्यात आल्या परंतु संचालित केल्या जाणाऱ्या थेट वितरण प्रणालीवर ताण आल्याने शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित राहिले आहे. जून ते सप्टेंबर या काळात अमरावती जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झाले. यापैकी जून ते ऑगस्ट दरम्यान नुकसान झालेल्या 1 लाख 70 हजार 773 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यामध्ये शासनाने त्यांच्यासाठी 111 कोटी 47 लाख 22 हजार रुपयाची तरतूद केली, परंतु अद्याप ती सर्वांपर्यंत पोहोचली नाही आता पर्यंत 1 लाख 13 हजार 131 शेतकऱ्यांनाच 72 कोटी 62 लाख 72 हजार रुपयांचे मिळाली तर इतर शेतकऱ्यांचे 38 कोटी 84 लाख 56 हजार रुपये अद्यापही वितरित व्हायचे आहे.
पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल
प्रोटेक्शन मनी च्या नावाखाली खंडणी मागितल्याचे आणि स्वीकारल्याचे गुन्हे
या १० पैकी ८ गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात तर वारजे आणि सिंहगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल
कोथरूड मध्ये १७ सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारात गायवळ वर मोक्का दाखल
निलेश घायवळ याच्यावर दाखल असलेले एकूण १० गुन्हे
१. १७ सप्टेंबर रोजी रात्री कोथरूड परिसरात गायवळ टोळीकडून गोळीबार
२. त्याच दिवशी टोळीतील सदस्यांकडून एका तरुणावर कोयत्याने हल्ला
३. निलेश गायवळ याच्या घरी आढळून आले जिवंत काडतुसे
४. गायवळ च्या वाहनांना बनावट नंबर प्लेट
५. पासपोर्ट बनवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर करणे
६. निलेश घायवळ आणि सचिन घायवळ यांनी १० फ्लॅट नावावर करून घेतली खंडणी
७. सिम कार्ड दुसऱ्याच्या नावाने वापरणे
८. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील्स बनवल्या प्रकरणी गुन्हा
९. मुसा शेख नावाच्या गांजा तस्करी प्रकरण गायवळ टोळीप्रमुख दाखवत गुन्हा
१०. एका कंपनी कडून ४५ लाख रुपयांची खंडणी वसूली प्रकरण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळमार्फत २०२६ मध्ये होणाऱ्या बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे
नियमित विद्यार्थ्यांना २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबरदरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत
तसेच शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्क भरण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे
पुनर्परीक्षार्थी आणि खासगी विद्यार्थ्यांनाही या कालावधीत अर्ज करता येणार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चक्क रिक्षा चालवली.एका ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेलेले असताना तिथे रिक्षा मालकाने मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना रिक्षा चालवण्याचा आग्रह केला मग काय शिवेंद्रसिंहराजेंनी देखील रिक्षाचा ड्रायव्हिंग सीटवर बसून रिक्षा चालवली. या रिक्षा मालकाने रिक्षा चांगल्या पद्धतीने मॉडीफाय केली होती त्यामुळे त्याने शिवेंद्रसिंहराजे यांना रिक्षा चालवण्याचा आग्रह केला होता.
वाशिम जिल्ह्यात अति पावसामुळे खरिपाच्या पिकांसह फुलशेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र यातून वाचलेली फुलशेती दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. झेंडूच्या फुलांना ठोक मध्ये 25 ते 30 रुपये किलो भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात 35 ते 40 रुपये प्रति किलोला झेंडूच्या फुलाला भाव मिळत असल्याने उरलेल्या फुलशेतीतून शेतकऱ्याला थोडासा दिलासा मिळाल्याच बघायला मिळालं.
आज दीपावलीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी.... धनत्रयोदशी निमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही पुजा आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर ,श्रीनिवास जोशी यांनी बांधली ... धन्वंतरी रूपातील अंबाबाई देवीची ही पूजा पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवली शहरातील फडके रोड परिसर रोषणाईने उजळला आहे. मराठी एकतेचा संदेश देणाऱ्या या उजळत्या सोहळ्यात यंदा एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कारण मनसेच्या पारंपरिक ‘दिपोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे उद्घाटन यंदा शिवसेना उबाठाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पडले.
‘हम साथ साथ है’ या भावनेने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येत दिव्यांच्या प्रकाशात ऐक्याचा संदेश देत होते. या अनोख्या उपक्रमाने डोंबिवलीकरांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाची लाट पसरली आहे.
डोंबिवली पश्चिमेत देवी चौक गावदेवी मंदिराच्या आवारात जाणता राजा प्रतिष्ठान च्या वतीने भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यातर्फे जागर शिवबाच्या नावानं या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात डोंबिवलीकरांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला . दिवाळीच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मल्लखांब,लाठीकाठी प्रात्यक्षिक , ढोल ताशा पथक मानवंदना तसेच युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट भारतातील किल्ल्यांचे मिनीएचर प्रदर्शन पर आधारित महाराष्ट्रातील आगळावेगळा विद्युत रोषणाई ,ध्वनी प्रणालीचा माहितीपट सादर करण्यात आला . शेकडो डोंबिवलीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
अकोल्यात दिवाळीचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय. अकोलेकरांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत गर्दी केलीये. गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याची मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या गांधी रोडवर मोठी गर्दी पाहायला मिळतीये. अकोल्यातील दिवाळीची गर्दी, उत्साह आणि विद्युत रोषणाईच्या झगमगाटाचं विहंगम दृष्य
मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवारी सायंकाळी पाच वाजता लिहिला जाणार... तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त 761 कोटी 17 लाख रुपयांच्या भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभही अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद मध्ये दिली..
अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवाळीनिमित्त किल्ले बनवा स्पर्धा घेतलीये. खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केलंय. मिटकरी यांच्या आरोग्यनगर भागातील निवासस्थान परिसरात ही स्पर्धा घेण्यात आलीय. या स्पर्धेत 200 च्या वर मुलांनी भाग घेतलाय. या स्पर्धेत एकूण 34 किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात आल्यात. महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांच्या अनेक प्रतिकृती यावेळी विद्यार्थ्यांनी साकारल्यात. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देत त्यांचा सन्मान करण्यात आलाय.
आपण दिवाळी साजरी करतोय काही ठिकाणी आनंद आहे काही ठिकाणी पूर्व परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे परंतु शेतकऱ्याला सरकारने त्यांची दिवाळी काळी होणार नाही याची काळजी घेतली आहे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहण्याचे काम सरकारने केला आहे आणि म्हणून शेतकरी संकटातून सावरतोय शेतकऱ्यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देतोय त्यांच्या देखील आयुष्यामध्ये ही दिवाळी चांगले दिवस घेऊन येऊ दे त्यांचं दुःख संकट दूर होएकनाथ शिंदे
कोरोना काळात मर्जी विरुध्द अॅडमीट करुन घेणे त्या ठिकाणी रुग्णाच्या देविदास धोका होईल याची माहिती असताना सुधा अतिरिक्त जास्तीचा औषधाचा ढोस देऊन जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, अवाजवी अवास्तव बिल रक्क आकारणे, शरीराचे अवयवाची तस्करी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने करण्याचे उददेशश प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे. अशा प्रकारच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत....
डॉ. गोपाळ बहुरुपी, डॉ. सुधिर बोरकर, डॉ. मुकुंद तांदळे, डॉ. अक्षयदीप झावरे पाटील, डॉ. सचिन पांडुळे, आणि डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटल मधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टर अज्ञात कर्मचाऱ्यांचे गुन्ह्यामध्ये नावे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.