Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे दाखल

आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल झाले आहे. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे.

Nilesh Ghayawal: गुंड निलेश गायवळवर चौथा मोक्का दाखल

कोथरूड पोलिसांकडून गायवळ वर चौथा मोक्का दाखल

बांधकाम व्यावसायिकाला धमकावून १० फ्लॅट बळकावल्याप्रकरणी मोक्का दाखल

गायवळ यासह त्याचा भाऊ सचिन गायवळ वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गायवळ टोळीच्या सदस्यांनी बांधकाम व्यावसायिकाला धमकावून त्याच्याकडून घेतला होता १० फ्लॅट्स चा ताबा

भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का; शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये दाखल

भाजपचे भद्रावती शहराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनाच काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. सुनील नामोजवार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. यावेळीही त्यांना उमेदवारीची अपेक्षा होती. मात्र मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या अनिल धानोरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने नमोजवार हे नाराज होऊन काँग्रेसमध्ये दाखल झाले. अनिल धानोरकर हे काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भासरे असून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे मोठे बंधू आहेत. भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला असून त्यांनी नामोजवार यांना उमेदवारी देऊन भाजपला मोठा धक्का दिलाय.

Yugendra Pawar Marriage: युगेंद्र पवार यांचा 30 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा

बारामती नगरपरिषदेची निवडणूक युगेंद्र पवार लढणार नाहीत

युगेंद्र पवार यांचे 30 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा

मुंबईतील बी के सी या भागात योगेंद्र पवार यांचा पार पडणार विवाह सोहळा

युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा विवाह सोहळा

Local Bodies Election: नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस..

आज दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार.

पुण्यातील अनेक नगरपरिषदा आणि नगरपंचायत चुरशीच्या होण्याची शक्यता

पुणे जिल्ह्यात १४ नगरपरिषद ३ नगरपंचायतीसाठी काल सायंकाळपर्यंत नगरसेवक पदासाठी १०७८ अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी ६५ अर्ज दाखल...

५८५ पुरुष उमेदवार तर ४९३ महिला उमेदवारांनी भरला अर्ज..

पुण्याजवळील फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेसह,मंचर,माळेगाव या नगरपंचायतची प्रथमच निवडणूक..

काल अनेक जणांनी भरला फॉर्म, फॉर्म भरण्यासाठी अनेक जणांनी शक्ती प्रदर्शन केले.

उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार

जळगाव मार्गे धावणारी उधना-ब्रह्मपूर अमृत भारत एक्स्प्रेस सेवा आठवड्याऐवजी आठवड्यातून तीन वेळा करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे. या रेल्वेत आधुनिक एलएचबी कोच, आरामदायी आसने, पेंट्री कार, ई-केटरिंग सेवा आहे. रेल्वे क्रमांक १९०२१ आता रविवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ७:१० वाजता उधना येथून सुटेल आणि दुपारी १२.४५ वाजता जळगाव येथे पोहोचेल. त्यानंतर ब्रह्मपूरसाठी रवाना होईल. तसेच रेल्वे क्रमांक १९०२२ ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ब्रह्मपूरहून रात्री ११:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री २.३८ वाजता जळगाव पोहोचेल आणि उधनासाठी रवाना होईल. या गाडीला उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, नागपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, महासमुंद, रायगडा आणि ब्रह्मपूर येथे प्रमुख थांबे असतील. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

आरोपीकडून गावठी पिस्टल व एक खंजर पोलिसांनी केली जप्त

जबरी चोरी, खंडणी, विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणे, अपहरण अशा गंभीर गुन्ह्यातील कुख्यात गुंड आरोपी रबज्योतसिंघ तिवाणा उर्फ गब्या गेल्या काही दिवसापासून फरार होता, या वांटेड गब्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. अखेर कुख्यात गुंड रबज्योतसिंघ तिवाणा हा घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली, कारवाईदरम्यान आरोपीने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी आरोपीवर गोळीबार केला, पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर आरोपी स्वतःचा बचाव करण्यासाठी खाली वाकल्याने आरोपीच्या पायावर मारलेली गोळी आरोपीच्या कमरेवर लागली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आता गब्यावर नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. वजीराबाद पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

अहिल्यानगर मधील खारेकर्जुन येथे बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात अडकला...

खारे कर्जुने येथे पाच दिवसांपूर्वी एका पाच वर्षीय बालिकेवर हल्ला करून बिबट्याने घेतला होता तिचा जीव...

तर दोन दिवसांपूर्वी इसळक गावात एका बालकावर बिबट्याने हल्ला करून केले होते जखमी...

या घटने नंतर खारेकर्जुन,निंबळक, इसळक गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको करून केली होती बिबट्याला ठार मारण्याची मागणी...

वन विभागाला बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली असली तरी रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने आता तो नरभक्षक बिबट्या आहे की दुसराच बिबट्या अडकला या बाबत वनविभाग करणार तपासणी...

ठाण्यात CNG बंद पंपावर रिक्षांची प्रचंड गर्दी!

मुंबई या ठिकाणी महानगर गॅस चा दुरुस्तीचा फटका ठाण्यातील CNG पंप ला देखील बसला आहे. ठाण्यातील पंप वर देखील आज पहाटे पासून रिक्षा चालकांनी रांगा लावल्या आहेत. आज शाळेतील विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे. विकास काटे यांनी

धुळ्यात थंडीचा कहर तापमान 8°cवर घसरलं

धुळ्यात आज थंडीचा कहर चांगलाच वाढल्याचे बघावयास मिळत आहे, धुळ्यात संध्याकाळ होताच जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसून येत आहे, त्याचबरोबर नागरिकांनी वाढत्या थंडीपासून आपल्या शरीराचा बचाव करण्यासाठी गरम व उबदार कपडे घेण्यास दुकानांमध्ये गर्दी देखील केल्याचे दिसून येत आहे, गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे, आज धुळ्यामध्ये 8°c सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, राज्यातील सर्वात नीचांकी तापमान हे आज धुळ्यात नोंदविले गेले आहे, त्यामुळे धुळेकर नागरिक वाढत्या थंडीमुळे चांगलेच गारठले असून यापुढे देखील थंडीचा जोर अशाच प्रकारे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे.

nashik-nandgaon-मनमाड मध्ये अखेर सेना-बीजेपी युती ठरली

मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत सेना-भाजप युती होणार की नाही हे अखेर पर्यंत ठरत नव्हते मात्र काल रात्री उशिरा मनमाड-नांदगाव भाजपा निवडणूक प्रमुख यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांनी एकमेकांना युतीचे पत्र दिल्याने मनमाड मध्ये झाल्याचे जाहीर केले,मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला होता,ते मात्र या युतीतून बाहेर पडले असून आज ते कुठल्या पक्षा कडून उमेदवारी अर्ज दाखल करणार याकडे लक्ष लागले आहे

बारामती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची आज होणार घोषणा

बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची आज घोषणा होणार आहे. उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे आज या दोन्ही गटांकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे. अजित पवार नगराध्यक्षपदी कोणाला संधी देतात आणि अजित पवारांच्या उमेदवाराच्या विरोधात शरद पवार गट कोणाला मैदानात उतरवतो याची उत्सुकता लागली आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रदीप गारटकर नगराध्यक्ष पदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज करणार दाखल करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदीप गारटकर पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत या अध्यक्षपदाचा आज गारटकर राजीनामा देणार आहेत

पुण्यात गॅस सिलेंडरच्या चोरीचे रॅकेट! तब्बल २३ सिलेंडर आले मिळून

घरगुती सिलेंडरमधून कमी क्षमतेच्या सिलेंडरमध्ये गॅस काढून तो काळ्या बाजारात विकला जात असतानाचे अनेक प्रकार होत असतानाच आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गॅस सिलेंडर वितरण करायला गेलेल्या कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सिलेंडर चोरी करणाऱ्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून तब्बल २३ सिलेंडर मिळून आले असून तो एक रॅकेट चालवत होता अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातील खडकी परिसरात कर्मचारी सिलेंडर चे वितरण करण्यासाठी गेल्यावर टेम्पच्या मागील बाजूस येऊन हा तरुण सिलेंडर काढून स्वतः च्या खांद्यावर घेऊन पसार होत असे. वारंवार तक्रारी आल्याने पोलिसांनी सी सी टिव्ही च्या माध्यमातून त्याला पकडले आहे. त्याच्याकडून तब्बल २३ सिलेंडर मिळून आले आहेत.

DHARASHIV : धाराशिव नगरपरिषदेत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आणि त्यापूर्वीच धाराशिव मध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने स्वतंत्र लढण्याची घोषणा दिली आहे. चर्चेच्या तीन ते चार फेऱ्या होऊनही समाधानकारक जागा मिळत नसल्याने राष्ट्रवादीने हा निर्णय घेतला. धाराशिव मध्ये राष्ट्रवादीकडून दहा जागांची मागणी केली जात होती मात्र त्यांना सहाच जागा दिल्या गेल्या. त्यामुळे नाराज असणाऱ्या राष्ट्रवादीकडून स्वतंत्र लढण्याचं जाहीर करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पाटील यांच्याकडून स्वतंत्र लढण्याची घोषणा 

nashik-malegaon-तीन वर्षाच्या लहानग्या मुलीवर अत्याचार करुन ठार केले

नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील डोंगराळे येथे खळबळ उडवणारी घटना घडली आहे.गावातील एका तीन वर्षीय लहानग्या मुलीवर विजय संजय खेरनार या २४ वर्षीय युवकाने अत्याचार करुन नंतर तिला ठार मारले,या घटने मुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालूका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले रात्री उशिरा तिचा मृतदेह मालेगाव मेडिकल कॉलेज मध्ये श्वविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.रात्री उशिरा पर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते.तालूका पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

NANDURBAR | ऐन निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला नंदुरबार मध्ये झटका...

गेल्या अनेक वर्षात पासून शिवसेनेसोबत एकनिष्ठपणे काम करणारे हिरालाल चौधरी यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते, आखर त्यांनी शिवसेना सोडत भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढणार असून हा शिवसेनेला ऐन निवडणुकीत मोठा झटका मानला जातोय...

YAVTMAL-नामांकनासाठी आज शेवटचा दिवस, रॅलीसह शक्ती प्रदर्शनाची तयारी

यवतमाळ जिल्ह्यात दहा नगरपरिषद व एका नगरपंचायतीमध्ये 637 नामांकन अर्ज दाखल झाले तर नगराध्यक्ष पदासाठी 40 जणांनी नामांकन दाखल केली आहे. आज नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने याहीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे तसेच पक्षाच्या उमेदवारांना एबी फॉर्म ही जोडवायचा आहे त्यामुळे शेवटच्या दिवशी मोठी गर्दी उसळणार आहे.

DELHI | भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार

संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून आखलेल्या व प्रत्यक्षात अमलात आणलेल्या अंतराळ मोहिमांमुळे जगावर छाप सोडल्यानंतर आता यंदा वर्षभरात सात प्रक्षेपण मोहिमांचे नियोजन भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केले असून २०२८ पर्यंत 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे 

संभाजीनगर ४०९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी रविवार संध्याकाळपर्यंत ४०९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात अध्यक्ष पदासाठी २० आणि सदस्य पदासाठी ३८९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 

YAVATMAL-यवतमाळ जिल्ह्यात 20% टक्के कापसाची नोंदणी

यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख हेक्टर वर कापसाची लागवड करण्यात आली यानंतरही नोव्हेंबर मध्ये एक लाख शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंद केली आहे यातील मोजक्यात शेतकऱ्यांना स्टॉल बुकिंग करता आली यातून केवळ सात हजार क्विंटल कापसाची सीसीआयला विक्री करता आली तर शेतकरी वेटिंग वर आहे जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असून एकूण कापूस उत्पादक शेतकऱ्यांपैकी केवळ 20% टक्के शेतकऱ्यांनाच कापसाची ऑनलाइन नोंदणी करता आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! १ कोटी महिलांना मिळणार नाही ₹१५००? कारण आलं समोर

भाजपाला मोठा धक्का! बड्या नेत्याकडून ऐन निवडणुकीत रामराम, काँग्रेसच्या 'हाता'ला दिली साथ

Box Office Collection : रविवारी अजय देवगण झाला मालामाल; 'दे दे प्यार दे 2' ची बक्कळ कमाई, 'द गर्लफ्रेंड' अन् 'हक'नं किती कमावले?

मुंबईतील नामांकित शाळेत भयंकर घडलं; ३ विद्यार्थिनींसोबत स्कूल व्हॅन चालकाचे अश्लील वर्तन, नेमकं घडलं काय?

Heart Failure: हार्ट फेल्युअरपूर्वी शरीर देत असतं हे संकेत; सामान्य समजून दुर्लक्ष करणं पडेल महागात

SCROLL FOR NEXT