शहरातील पाणीकपात २२ जुलैपर्यंत रद्द - महापौरांची घोषणा.
उद्यापासून होणारी पाणी कपात महापौरांकडून रद्द, उद्यापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा होता पालिकेचा विचार
मात्र गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे
22 जुलै पर्यंत पाणी कपात करू नका असे महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आदेश
22 जुलै नंतर पावसाचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार..
उल्हासनगरच्या आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या धर्तीवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यात येणार असून, सुमारे ५०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्यमंत्री आबिटकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मध्यवर्ती रुग्णालयाची पाहणी करत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
वर्तक नगर प्रभाग समिती क्षेत्रातील ओसवाल पार्क, सुभाष नगर परिसरात दि. 06 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास रस्ता दुभाजकामध्ये उभारण्यात आलेला कॅन्टिलिव्हर प्रकारचा अधिकृत जाहिरात फलक कोसळल्याची घटना घडली. या घटनेची ठाणे महानगरपालिकेने गंभीर दखल घेत संबंधित जाहिरात फलकाची परवानगी तात्काळ रद्द केली असून जाहिरात संस्था आणि संबंधित स्ट्रक्चरल इंजिनिअरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी दापचरी दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर आर. जमीन देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. फ्रान्समधील रुंगिस येथे असलेल्या बाजाराच्या धर्तीवर दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्यात येणार आहे.
डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला झालेल्या मारहाण प्रकरणात अडकलेले आरोपी रमेश म्हात्रे यांना कल्याण न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाकडून म्हात्रे यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर (PR Bond) जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणातील सुनावणी दरम्यान रमेश म्हात्रे यांच्या वकिलांनी त्यांच्या बिघडलेल्या आरोग्याचा हवाला दिला होता. न्यायालयाने म्हात्रे यांची वैद्यकीय स्थिती (Medical Condition) आणि इतर कायदेशीर बाबींचा सकारात्मक विचार करत हा जामीन आदेश दिला.
अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेटीत झालेल्या चोरी प्रकरणी संबंधित ट्रस्टचे माजी महामंत्री चंपत राय यांना अटक व्हावी तसेच इतर दोशींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी यवतमाळच्या दत्त चौकात काँग्रेसने रघुपती राघव राजाराम हे सत्याग्रह आंदोलन केले. आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.
यावेळी श्रीराम मंदिरासह देशातील सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा अधिक बळकट करावी, मंदिरांमध्ये अशा घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी करतानाच केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार व भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
- उबाठाचे नेते संजय राऊत थोड्याच वेळात नागपूर विमानतळावर दाखल होईल....
- उद्धव ठाकरे यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या रामरक्षा पठणाचा पार्श्वभूमीवर नागपूर दौरा....
- नागपूर विमानतळावर दाखल झाल्यावर बाईट होण्याची शक्यता... त्यानंतर रामनगर येथील राम मंदिरात जागेची पाहणी करणार असल्याची माहिती....
स्मार्ट मीटर विरोधात बदलापूरमधील ग्राहक चांगलेच आक्रमक झालेत. अवाजवी बिलांमुळे त्यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढलाय. या ग्राहकांनी पुन्हा एकदा सोनिवली येथील महावितरणचं कार्यालय गाठून स्मार्ट मीटरविरोधात संताप व्यक्त केलाय. आम्हाला स्मार्ट मीटर नको, जुने मीटर परत लावून द्या अशी मागणी त्यांनी केलीय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्मार्ट मीटर नको असल्याचा निर्णय घेऊ शकतात मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्मार्ट मीटर लावण्यासाठी आग्रही का आहेत? असा सवालही ग्राहकांनी उपस्थित केलाय. गेल्या काही दिवसांपासून बदलापुरात स्मार्ट मीटरविरोधात सातत्याने जनआंदोलन सुरू आहे. लोक थेट महावितरण कार्यालय गाठून आपला रोष व्यक्त करतायेत.
कोल्हापूर
राजू शेट्टी बाईट
ऑन सद्बुद्धी दिंडी
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्र्यांना यावी यासाठी 18 जुलैला सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत
वाखरी ते पंढरपूर दरम्यान ही सद्बुद्धी दिंडी असेल
वेगवेगळ्या मार्गाने शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न सरकार करतय
मात्र 13 ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे
वसमत येथे कर यांचे बेकायदेशीर त्या भरून घेतलेले फॉर्म शेतकऱ्यांनी पेटवून दिले आहेत, द्रोण सर्वे शेतकऱ्यांनी थांबवले आहेत
महिलांनी विट्याजवळ पहाटेच्या सुमारास भूसंपादनासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना महिलांनी पळवून लावला आहे
18 तारखेला शक्तिपीठ विरोधात सर्वपक्षीय मेळावा होईल, मेळावा संपल्यानंतर वाखरी ते पंढरपुरातील विठ्ठल मंदिर पर्यंत सद्बुद्धी दिंडी काढणार आहोत
त्या नंतर पंढरपूर मधील नामदेव पायरीला अभिषेक घालणार आहोत
नांदेडच्या किनवट तालुक्यातील जवरला आणि निराळा गावातील आदिवासी महिलांनी अवैध दारू विक्रीविरोधात आक्रमक पवित्रा घेत थेट मांडवी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला.जवरला गावच्या सरपंच नमीता गेडाम आणि निराळाचे सरपंच दिलीप कनाके यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी देशी-विदेशी दारू व सिंधी विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली.8 जुलै 2026 रोजी जवरला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला असून गावातील अवैध दारू बंद करण्याची मागणी या महिलांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या धुळे विभागामार्फत 20 ते 29 जुलै दरम्यान तब्बल 215 विशेष बसेस सोडण्यात येणार आहेत, थेट आपल्या गावातून विठुरायाच्या पंढरीपर्यंत भाविकांना एसटी परिवहन विभागातर्फे सेवा पुरवली जात असल्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी धुळे आगारातून पहाटे 5 वाजेपासून दर एका तासाला बस उपलब्ध करण्यात आली असून, प्रवासात बस नादुरुस्त झाल्यास मदतीसाठी 24 तास पर्यवेक्षकीय अधिकारी व स्वतंत्र यांत्रिक पथक तैनात ठेवण्यात आले आहे,
"बुडाला जळतंय आणि डोंगराची आग विझवायला पळतंय, अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था झाली आहे. स्वतः आंदोलनात उतरण्याचे धाडस नाही, पण 'तुम लढो, हम कपडे संभालते हैं' या भूमिकेतून घरबसल्या आंदोलनांना पाठिंबा देत राजकीय पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे," अशा अत्यंत बोचऱ्या शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तिरडीसह प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत अनोखे आंदोलन करण्यात आले.
शहरातील अतिवृष्टीमुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेने महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत तीव्र निषेध व्यक्त केला.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दिंडी क्रमांक १९ मधील वसंतराव गवते हे नगर–सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी शिवारात रस्ता ओलांडत असताना भरधाव पिकअपने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये गवते यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने उपचारासाठी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
7 जुलै रोजी करण्यात आलेल्या पहिल्या कारवाईत 61 गोण्या दुध पावडरच्या आढळून आल्या होत्या
पोलीस तपासात धक्कादायक आकडेवारी समोर, तब्बल 4 कोटी 63 लाखाहून अधिक किमतीची पावडर विक्री
तीन वर्षात दोन हजाराहून अधिक दूध संकलकांना पावडरची विक्री , फक्त बेकरी साठी विक्रीची परवानगी असलेली पावडर नियमबाह्य पद्धतीने दूध संकलन करणाऱ्यांना विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर
२१ तोळे सोने,९४ किलो चांदी लंपास रोख रक्कम ५० हजार लंपास
२ कोटी ५५ लाख ७४ हजार ४५५ रूपयाचा मुद्देमाल केला लंपास..
सराफी पेढीच्या शेजारच्या खोलीतून भिंतीला भगदाड पाडून चोरट्यांनी २१ तोळे सोन्याचे दागिने आणि ९४ किलो चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना हडपसर परिसरातील मांजरी येथे घडली.
परभणीच्या जिंतूर मध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन सुरू असतानाच काही आंदोलक उभ्या असलेल्या पाण्याच्या हौदाचा जीर्ण झालेला छत कोसळला आणि जवळपास ५ फूट खोल असलेल्या हौदात ४ आंदोलक पडले अचानक झालेल्या या घटनेने धावाधाव उडाली आणि इतर आंदोलकांनी या ४ ही जणांना बाहेर काढले यातील २ जण किरकोळ जखमी झाले आहेत..
देशात अराजकता पसरवण्याचा काम ठाकरे गटाकडून सुरु आहे
अराजकता पसरवण्यात यश मिळणार नाही
रामरक्षा आंदोलन हा विनोद
मोदींनी केलेल्या विकासामुळे ठाकरेंना पोटदुखी होतेय
राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान यांना पत्र लिहिले आहे
मुलासाठी केली न्यायाची मागणी
वाढत्या गुन्हेगारी घटना आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येमुळे श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून, गेल्या तीन दिवसांपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात येतोय.. पोलिसांनी आता गुन्हेगारांविरीशात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.. सरस्वती कॉलनी परिसरात टाकलेल्या धाडीत पोलिसांना एका बंद फ्लॅटमधून गावठी कट्टा, काडतुसे आणि मेडिकल संबंधी काही कागदपत्रे मिळून आली आहेत..
हिंगोली जिल्ह्यात कोरड्या हवामानामुळे खरीप हंगामातील पिके संकटात आली असताना आता शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांच मोठं संकट ओढवलं आहे, सोयाबीन, कापूस ,तूर, उडीद ,मूग ,अशी शेतकऱ्यांच्या शेतातील कोवळी पिके खाण्यासाठी जंगलातील नीलगाय, रोही, हरीण, रानडुक्कर, यासारख्या प्राण्यांचे कळप सायंकाळी व मध्यरात्री शेतकऱ्याच्या शेतात दाखल होत आहेत ,रानडुक्कर तर पिकांची रांगेने नासाडी करत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे सेनगाव तालुक्यातील सापटगाव शिवारात रामराव अवचार या शेतकऱ्याच्या शेतातील पीक वन्य प्राण्यांनी उध्वस्त केल्याने शेतकरी अवचार यांनी सरकारकडे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांतील पिके पूर्णतः संपून जात असल्याचं सांगत हा शेतकरी उद्दीग्न झाला होता.
कोरेगाव भीमा येथील आठवडा बाजारात गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या दोन सराईत चोरट्यांना शिक्रापूर पोलिसांनी रंगेहात पकडले. पायी पेट्रोलिंगदरम्यान ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याला आषाढी पालखी सोहळ्याचे वेध लागले आहेत. येत्या 19 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरीत आगमन होणार आहे.
सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत केले जाते. यावर्षी ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाच्या वतीने भव्य अशी स्वागत कमान उभारले आहे या कमानीवर विठ्ठल रुक्मिणी सह वीणा, टाळ पखवाज या संत साहित्यांच्या प्रतिकृती लावण्यात आलेल्या आहेत.
पिंपरी चिंचवडमधील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदार कंपनीच्या एका अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्यात. ऍंथोनी लारा रिन्यूयेबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता अटकेत आहे, तर सुरक्षा अधिकारी विजय सपकाळचा शोध सुरुये. मोशी इमारत दुर्घटनेत 9 निष्पाप कामगारांचा जीव गेलाय. याला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार कंपनीने नियमांचा भंग केलाय. सुरक्षेच्या दृष्टीने हलगर्जीपणा केलाय.
पुण्यात नारायपेठमध्ये अपघात
नारायणी पेठ पोलिसी चौकी जवळ अपघात
गजबजलेला परिसरात अपघात
स्वीफट डिझायरने काही गाड्या धडकल्याची माहिती
३ जण किरकोळ जखमी
अधिक तपास पोलिस करत आहेत
शेतकऱ्यांकडुन आलेल्या दुधाला ३.२ फॅट आणि ८.३ SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध खरेदी न करण्याच्या निर्णयामुळे विशेषतः गाईचे दूध उत्पादक अडचणीत येतील. “शेतकरी असा दर्जाचा दूध घालू शकतो का?” असा थेट सवाल वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.नव्या नियमांनुसार निश्चित फॅट आणि SNF पेक्षा कमी दर्जाचे दूध डेअरींना स्वीकारता येणार नाही.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) राज्यव्यापी धडक कारवाईचे पडसाद आता थेट कोकणात
चिपळूणपर्यंत पोहोचले ATS चे धागेदोरे
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणात संशयित एटीएसच्या ताब्यात; रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ!
कुडाळ तालुक्यातील किनळोस गावात जबरदस्तीने लावण्यात आलेले घरगुती स्मार्ट मीटर व त्यानंतर आलेल्या भरमसाठ वीज बिलाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
महावितरणच्या ओरोस येथील कार्यालयावर येथील ग्रामस्थांनी धडक देत ठिय्या आंदोलन करून उपकार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला
अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचा खंड पडून पाऊस लांबला त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली, तर दुसरी कडे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला
सततच्या रिमझिम पडणाऱ्या पावसावर शेतकऱ्यांनी मका,मूग,बाजरी पिकाची लागवड केली
पीक जमिनीतून काही प्रमाणात उगवले मात्र आता त्याला पावसाची खरी गरज असताना पाऊस लांबल्याने पिके हातची जाऊन दुबार पेरणीची वेळ येणार आहे
अमरावती महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी एल्गार पुकारत सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
अमरावती शहरातील कचरा, नाले साफसफाई आणि घंटा गाड्या सर्व बंद आहे.
सर्व सफाई कामगारांनी महानगरपालिकेवर धडक देत निदर्शने केली..
करंजी घाटात पाण्याच्या बाटल्यांनी भरलेला ट्रक उलटला
अपघातानंतर अवघ्या अडीच तासांत २०-२२ टन माल लुटला धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
शाळेत शिक्षक उशिरा येत असल्याने पालक,ग्रामस्थ संतप्त.
संतप्त झालेल्या पालक आणि ग्रामस्थांनी शाळेच्या गेटवरच शिक्षकांना घातला घेराव.
नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी येथील प्रकार
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ए टी एसची छापेमारी
देशविघातक कृत्यात सहभागी असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाची पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात ठिकठिकाणी छापेमारी
तर पुणे,पिंपरी चिंचवड दोन्ही शहरात मिळून २३ ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती..
राज्यात ६५ ठिकाणी छापेमारी
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात पोहोचणार
दौंड तालुक्यातील वरवंडचा मुक्काम आटोपून बारामतीच्या गवळ्याची उंडवडी मध्ये होणार दाखल
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्याचा वरवंडचा मुक्काम आटोपून बारामती तालुक्याच्या दिशेने रवाना
नंदुरबारमध्ये 9 कोटींचा निधी हडपल्याचा आरोप
माजी मंत्री अनिल पाटील यांचा माजी आमदार शिरीष चौधरींवर गंभीर आरोप
सखोल चौकशीच्या मागणीसाठी मुख्यमंत्री दरबारी जाणार
पंढरपूर -
पंढरपुरात वाळू फामियांचा तरूणावर जीवघेणा हल्ला
धारधार शस्त्र, काठीने जबर मारहाण
मारहाणीत बालाजी नागटिळक या तरूणाच्या दोन पाय एक हातावर केले वार
अवैध वाळू उपशा विरोधात तक्रार केली म्हणून केला हल्ला
पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जखमी बालाजी नागटिळक वर मिरज येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू
नाशिक -
- भावली धबधबा पर्यटक मारहाण प्रकरण
- 2 संशयितांना चौकशीसाठी इगतपुरी पोलिसांनी घेतले ताब्यात
- मोबाईल फुटेजच्या आधारे चौकशी सुरू
आमदार विवेक कोल्हे यांच्याकडून वारकऱ्यांची चरणसेवा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा-तुकाराम या जयघोषात अनेक पालख्या मार्गक्रमण करत आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे विधानपरिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांनी, वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलाने मालिश करत चरणसेवा केली..
बीड-
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी पार पडणार आहे.
न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरण जी एकत्रित चार्ज शीट दाखल करण्यात आली ती नामंजूर करण्यात यावी असा अर्ज आरोपी पक्षाच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आला.
तसेच तीन गुन्ह्यांच्या वेगवेगळ्या चार्ज शीट करावे असा देखील अर्ज यासोबत करण्यात आला होता.
नाशिक -
- बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आणखी धक्कादायक खुलासे
- बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचं पुणे कनेक्शन समोर
- अटकेत असलेल्या प्रशांत वाडीलेच्या चौकशीतून पुणे कनेक्शन समोर
- शिक्षण विभागाचं बहुतांश महत्त्वाचं कामकाज पुण्यातूनचं होत असल्याने घोटाळ्याची सूत्र पुण्यातूनच हलल्याचा संशय
- शालार्थ आयडी घोटाळ्यात पुण्यातील बडा मासा गळाला लागल्याची माहिती
पुणे -
संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामती तालुक्यात पोहोचणार
दौंड तालुक्यातील वरवंडचा मुक्काम आटोपून बारामतीच्या गवळ्याची उंडवडी मध्ये होणार दाखल
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्याचा वरवंडचा मुक्काम आटोपून बारामती तालुक्याच्या दिशेने रवाना
तुकोबांची पालखी आज दौंड तालुक्यातील वासुंदे येथील अवघड असलेला रोटी घाट बैल सर करणार
परभणी -
परभणी जिल्ह्यात 14 जुलै उजाडला तरी पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत
पाऊस नसल्यामुळे पीक मान टाकायला सुरुवात शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट
धाराशिव -
बोगस बियाणांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
बोगस बियांची तात्काळ चौकशी करून दोशींवर कठोर कारवाईची मागणी
पीकविमा योजनेतील जाचक अटी रद्द करुन 1 रुपयात पिक विमा योजना सुरू करण्याची मागणी
नाशिक
- नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा, ठाकरेंच्या सेनेकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू
- ठाकरेंच्या सेनेच्या १५ नगरसेवकांना मातोश्रीवरून थेट बोलावणं
- उद्धव ठाकरेंनी नाशिकमधील १५ नगरसेवकांना मातोश्रीवर बैठकीसाठी बोलावलं
- उद्या बुधवारी मुंबईत मातोश्रीवर होणार ठाकरे सेनेच्या नगरसेवकांची महत्त्वाची बैठक
- नाशिकमध्ये ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे घेणार नगरसेवकांची बैठक
- ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचे दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या सुरू आहेत चर्चा
पुणे -
जेजुरी अपघातातील वारकरी महिलेवर ससूनमध्ये उपचार
जेजुरी अपघातातील वारकरी महिलेवर ससूनमध्ये उपचार करण्यात येत असून तिची प्रकृती स्थिर
जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या अपघातामध्ये जखमी महिला वारकरी शांता शिरप्पा (वय ७०) यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल
त्यांच्या छातीच्या डाव्या बाजूच्या सात बरगड्यांची हाडे मोडली असून खांद्याचे हाड देखील फ्रॅक्चर
फुप्फुसाला इजा झाली असल्याने त्यांना श्वास घ्यायला त्रास होता. मात्र, ससूनमध्ये अतिदक्षता विभागात योग्य ते उपचार सुरू केल्याने रुग्णाची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती
दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही रुग्णालयात या वारकरी महिलेची भेट घेत केली चौकशी
नागपूर -
- ‘इथेनॉल’बाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी चार सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरविरोधात गुन्हा
- नागपूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल,बिहारसह देशातील चार इन्फ्लुएन्सर गुन्हा नोंद
- मनिश कश्यप (रा.बिहार), देसी बॉयसर, हर्षित राठी आणि अंकलेश इन्वाटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेय.
- इथेनॉल आणि ई 20 विरोधात यूट्यूब-इन्स्टाग्रामवर दिशाभूल करणारे आणि बेकायदेशीर कृत्यांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ अपलोड केल्याचा आरोप
नागपूर
- एमएनएलयू नागपूर येथील कथित रॅगिंग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी रॅगिंगविरोधी समितीकडून करण्याचा निर्णय
- चौकशीपूर्वी पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर कारवाई केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी.
- समर्थकांनी प्रशासनावर एकतर्फी आणि द्वेषपूर्ण कारवाईचा आरोप केला.
- मुख्य प्रॉक्टर प्रा. विजय तिवारी यांच्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतले, मात्र त्यांनी आरोप फेटाळले.
- अटक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
- कुलसचिवांनी निष्पक्ष चौकशी, आवश्यक मदत आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देण्याचे आश्वासन दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
- एफआयआरमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
अकोला -
संपूर्ण राज्यभरात सध्या सोयाबीन बियाणं उगवत नसल्याचा मुद्दा चांगलाच तापतोय.
याच मुद्द्यावरून आता अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरचे भाजपा आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या सरकारला थेट आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा दिलाय.
आपण भाजपाचे आमदार जरी असलो तरी त्या पदावर शेतकऱ्यांमुळेच गेल्याचं आमदार हरीश पिंपळे यांनी स्पष्ट केलंय.
नंदुरबार -
नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष मेघा पाटकर यांचा संताप
सरकारकडे केली बैठकीची मागणी
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेघा पाटकर यांनी महाराष्ट्र आणि गुजरात सीमाभागातील प्रकल्पग्रस्तांच्या दुरवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरदार सरोवर प्रकल्पाच्या लाभधारक राज्यांकडून प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करण्यात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.