Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५, राजधानी दिल्लीमध्ये कार ब्लास्ट अपडेट, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

हिंगोलीत शिवसेनाविरुद्ध भाजप वाद शिगेला

शिवसेना आमदाराचं बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये कनेक्शन

संतोष बांगर यांनी भाजप आमदारासह नगराध्यक्षांवर जुगाराच्या अड्ड्यावरून केलेल्या आरोपानंतर आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला धक्कादायक आरोप

सीएसएमटी ते खोपोली जाणाऱ्या लोकलच्या पंख्यामधून अचानक निघू लागला धूर

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सीएसएमटी ते खोपोली 8.41 च्या गाडीमध्ये पंख्यामधून अचानक धूर निघू लागला. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत,चऱ्होली चौकात गोळीबार

दोंडाईचामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

जयकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे,

उदगीर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी

लातूरच्या उदगीर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याची अरेरावी समोर आली आहे, अधिकाऱ्याकडे काम घेऊन गेलेल्या व्यक्तीचं काम होत नसल्याने अधिकाऱ्याने जाब विचारला यावेळी, विस्ताराधिकारी व्यंकटेश दंडे यांनी काम घेऊन आलेला नागरिकाला अरेरावी केली, तर संबंधित व्यक्तीने तुम्ही वेळेवर काम करत नाहीत , तर इथे का बसलात असं विचारलं असता अधिकाऱ्यांनी अरेरावी केली.

प्रॉपर्टीच्या वादातून भावकीत फ्री स्टाईल हाणामारी

प्रॉपर्टीच्या वादातून भावकीत तुडुंब फ्री स्टाइल हाणामारी झाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी परिसरात राहणाऱ्या पठारे कुटुंबीयांत ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या फ्री स्टाईल हाणामारीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. या प्रकरणात तक्रारदार सचिन नारायण पठारे त्यांच्या तक्रारीवरून कृष्णा नारायण पठारे, बाळू नारायण पठारे आणि पठारे कुटुंबीयांतील काही महिलांविरोधात अदाखलपात्र गुन्हा काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील जांभूळवाडी तलावात बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

जांभूळवाडी मध्ये तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात उतरत सदर मुलास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले

बादल शेख असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

रेल्वे युनियनच्या 2 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी परवानगी नसताना आंदोलन केले

एस के दुबे, विवेक शिसोदिया, असे सी आर एम एस या रेल्वे संघटनेचे पदाधिकारी आहेत

या आंदोलनामुळे 2 जण मृत पावले होते तर तिघे गंभीर जखमी होते

पुणे महापालिका आणि चिंतामणी ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने दत्तक रस्ता योजनेचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार योजनेचा शुभारंभ

पुण्यातील धनकवडी परिसरात दत्तक रस्ता योजना राबवली जाणार

विक्रोळीत आमदार सुनील राऊतांचा पुतळा जाळल्या प्रकरणी शिवसेना शिंदे पक्षाच्या ८ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

विक्रोळी पूर्व येथील असलेल्या पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा जोतिबा रुग्णालय पुनर्विकासाचे काम सुरू आहे मात्र आता या वरून श्रेय वादाची लढाई सुरू झाली असल्याचे चित्र विक्रोळी नगरात दिसत आहे काही दिवसांपूर्वी आमदार सुनील राऊत यांनी रुग्णालयाच्या कामाची पाहणी करून सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. याविरोधात शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळीत आंदोलन केले होते व आमदार सुनील राऊत यांचा पुतळा जाळला होता.

मुंबईच्या मालाडमध्ये डबेवाल्याची सायकल चोरी

मुंबईच्या मालाडमध्ये डबेवाल्याची सायकल चोरी

अकरा डब्यांसोबत सायकल देखील चोरी

ग्राहकांवर जेवण बाहेरून मागवण्याची आली वेळ

मालाड (पूर्व) खांडवाला लेन परिसरातील घटना

नेमिनाथ इमारतीत डबे देण्यासाठी गेलेल्या डबेवाल्याची सायकल चोरी

सायकलवर अकरा डबे लटकवलेले होते

डबे देऊन खाली आल्यावर सायकल गायब

Ajit pawar : अजित पवार गटाकडून आज, उद्या ए बी फॉर्मच वाटप होणार

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून पुणे जिल्ह्यातील नगर पालिका आणि नगरपरिषदेसाठी आज, उद्या ए बी फॉर्मच वाटप होणार

उद्या सगळीकडे ए बी फॉर्म पोहच होण्याची शक्यता

अर्ज भरल्यानंतरच्या वेळात माघारी घेईपर्यंत होणार युतीची चर्चा

आज दिवसभरात अजित पवारांनी घेतला आढावा

आज सगळीकडे ए बी फॉर्म होणार पोहोच

पुणे जिल्ह्यात 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतीसाठी होत आहे निवडणूक..

jalna : जालन्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का

जालन्यात शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का..

जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश..

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठाला मोठा धक्का..

एकनाथ शिंदेंच्या उपस्थिती पक्ष प्रवेश..

मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बैठका सुरू

बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून बीड शहरात आज बैठका सुरू आहेत. यामध्ये गेवराई, धारूर, बीड नगरपालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतल्या जात आहेत. लवकरच उमेदवार घोषित केले जाणार आहेत. बीडमध्ये युती होते की भाजपा स्वबळावर निवडणूक लढवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल.

Kurla : कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील हॉटेलला आग 

कुर्ला एलबीएस मार्गावरील सन लाईट हॉटेलला आग

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल

सन लाईट हॉटेलच्या ग्राउंड फ्लोअरला आग

कोणतेही जीवितहानी नाही, मात्र हॉटेलचे नुकसान मोठ्या प्रमाणात

दिल्ली स्फोट करणारे भारत देशाच्या बाहेरचे होते की भारत देशाच्या आत मधील होते - सुजात आंबेडकर 

दिल्ली येथे काल बॉम्बस्फोट झाला हा बॉम्बस्फोट कोणी केला..? कोणती एजन्सी होती..? तो बॉम्ब ब्लास्ट होता का गाडीचा ब्लास्ट होता..? तो आतल्या लोकांनी केलाय का बाहेरच्या लोकांनी केलाय..? 24 तास उलटूनही हा खुलासा आपल्यापर्यंत आला नाही केंद्रीय यंत्रणा याबाबत कुठलीही माहिती समोर आणत नाही....

अजितदादांनी राजीनाम द्ययला हरकत नाही-बच्चू कडू

जमिन विक्री प्रकरणी बच्चु कडू यांची प्रतिक्रिया

० अंजली दमानिया यांनी अजितदादांचा राजिनामा मागितला आहे मुद्दयावर बोलताना बच्चु कडू यांनी केले मत प्रदर्शन

० आरोप आहे तर नैतिकता म्हणून राजिनामा देऊन समोर येणे गरजेचे आहे

दिल्ली स्फोटातील जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.

बोपोडी भूखंड अपहार प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचा शितल तेजवानी यांचा दावा

एफआयआर रद्द करण्याची याचिकेद्वारे उच्च न्यायालयात विनंती

बोपोडीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराशी माझा काहीच संबंध नसताना मला त्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे माझ्याविरोधातील तो एफआयआर रद्द करावा’, तेजवानी यांची न्यायालयाला विनंती

‘मुंढवा येथील जमिनीच्या मेसर्स अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपीसोबत झालेल्या व्यवहाराबाबत मी तत्कालीन कुलमुखत्याधारक होते. तो व्यवहार निव्वळ दिवाणी स्वरुपाचा आहे. त्यात फसवणूक अथवा गुन्हेगारी स्वरुपाचे काही नाही, तेजवानी यांचे याचिकेत म्हणणे

Solapur: सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भीमशक्ती सामाजिक संघटना आक्रमक

- छत्रपती संभाजी महाराज चौक येथे रास्ता रोको आंदोलन करत अजित पवार यांच्या विरोधात केले निदर्शन

- मुंढवा येथील पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरण संदर्भात भिम शक्ती सामाजिक संघटने आक्रमक भूमिकेत

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याची करण्यात आली मागणी..

- भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

- छत्रपती संभाजी महाराज चौक येथे भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या आंदोलनामुळे वाहतुकीचा झाला होता खोळंबा..

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटेवर

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये राजकीय उलथापालत होऊ लागली बीड जिल्ह्यातील बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे मात्र याच मतदारसंघातील माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली असून आठवडाभरामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती समोर आली आहे मात्र पुतण्या संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटात असल्यामुळे आणि दुसरी पुतणे योगेश क्षीरसागर हे राष्ट्रवादी अजित पवार गटांमध्ये आहेत तर तिसरे पुतणे हेमंत क्षीरसागर हे भाजपाच्या वाटेवरती आहेत म्हणून आता क्षीरसागरांची विन विस्कळताना पाहायला मिळत आहे.

Akola: अकोल्यात वंचितचे नगराध्यक्ष पदाचे ४ उमेदवार जाहीर

अकोला जिल्ह्यात वंचितने नगराध्यक्ष पदाचे 4 उमेदवार जाहीर केले.. यात एका नगर पंचायत आणि 3 नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेत.. या उमेदवारांची यादी आज वंचितने जाहीर केलीय.. यामध्ये बार्शीटाकळी नगरपंचायत आणि मूर्तिजापूर, आकोट आणि तेल्हारा नगरपालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केले आहे..तर उर्वरित बाळापुर आणि हिरवखेड या ठिकाणी सायंकाळपर्यत वंचितकडून नगराध्यक्ष उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोतर्ब होणारे

नेमकं कुठले आहेये उमेदवार पाहूया..

नगरपालिका : उमेदवार नावे.

1) बार्शीटाकळी नगरपंचायत - अख्तर खातून अलिमोद्दीन.

2) मूर्तिजापूर नगरपरिषद - शेख इम्रान शेख खलील.

3) अकोट नगरपरिषद - स्वाती मंगेश चिखले

4) तेल्हारा नगरपरिषद - विद्या सिद्धार्थ शामस्कार.

BJP सोडून एकत्र येण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय - जयंत पाटील

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती आणि आघाडी सोडून पक्ष एकत्र येत आहेत. स्थानिक पातळीवर आघाड्या आणि युती बनत असताना BJP सोडून एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेत्यांकडून घेण्यात आल्याचे शेकाप नेते जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. रायगडमध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतो आहोत आणि आम्हाला चांगल यश मिळेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Nashik Kumbh Mela: मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच नाशिक मध्ये कुंभमेळ्यातील काही कामांना नागरिकांचा विरोध

- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन मलनिस्सारण केंद्रविरोधात नाशकात आंदोलन

- नंदिनी आणि गोदावरी नदीच्या किनारी धरणे आंदोलन सुरू

- स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक आक्रमक

- मलनिस्सारण केंद्र उभारणाऱ्या मनपाचा केला जातोय निषेध

- मलनिस्सारण केंद्र उभारतांना प्रदूषण होणार असल्याचा आरोप

- मनपा प्रशासनाच्या विरोधात स्थानिक आक्रमक

Pune: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

पुण्यातील कोंढवा भागात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

दहशतवाद विरोधी पथकाकडून पुण्यातील एका व्यक्तीची कसून चौकशी

दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी

अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेले नसलं तरी त्याच्या घराची झडती देखील घेण्यात आली

पुण्यातील कोंढवा परिसरात एटीएसची छापेमारी

Vangani: वांगणीत लवकरच रेल्वे क्रॉसिंगवर उभारला जाणार उड्डाणपूल

रेल्वेचा लेटलतिफ कारभार सुधारण्यासाठी मध्य रेल्वेनं कल्याण ते कर्जत दरम्यानचे 10 रेल्वे क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्याठिकाणी लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारले जाणार आहे. त्यानुसार वांगणी आणि लगतच्या गावांमधील रेल्वे फाटक बंद होणार असून सोयीसाठी रेल्वे उड्डाणपुलांची निर्मिती केली जाईल अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलीय.

रेल्वे फाटक उघडल्यानंतर ते बंद होण्यासाठी 3 ते 7 मिनिटांचा वेळ लागतो. त्यामुळे लोकल तसेच एक्स्प्रेसचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेने कल्याण ते कर्जत दरम्यान असलेले 10 रेल्वे फाटक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या 10 फाटकांपैकीच एक असलेलं वांगणी रेल्वे फाटकही बंद होईल. नागरिकांच्या सोयीसाठी नवीन आरओबी बांधण्यात येईल. त्यासाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलीय.

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.कांचन साळवी असं पोलिसांनी अटक केलेल्या तिसऱ्या आरोपीच नाव असून त्याला बिड मधून अटक करण्यात आली आहे.दादा गरुड, अमोल खुणे नंतर आता कांचन साळवीला जालना पोलिसांकडून अटक करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.दादा गरुड आणि अमोल खुणे यांच्याशी कांचन साळवी नावाच्या व्यक्तीचा सबंध असल्याचा आणि तो धनंजय मुंडे यांचा PA असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला होता .दरम्यान साळवी याला अटक केल्यानं आता या प्रकरणात साळवी पोलिसांकडे काय खुलासे करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे...

Nagpur: नागपूर नगरपालिका नगरपंचायत बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक

- नगरपालिका नगरपंचायत बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक सुरु आहे...

- काँग्रेस ग्रामीण कार्यालय येथे ही बैठक होत आहे. यापूर्वीही केदार गटाने उमेदवारांच्या मुलाखती बैठक घेतली होती...

- मात्र त्यानंतर प्रदेश काँग्रेसने याबाबत प्रक्रिया रद्द करत बैठक अवैध ठरत आज पुन्हा नव्याने बैठक लावली आहे...

- त्यामुळे एकीकडे केदार गटाला मनमानीला चाप बसला आहे. दरम्यान आज निरीक्षक वीरेंद्र जगताप हे यांच्या मार्गदर्शनात ही बैठक होत आहे....

Buldhana: बुलढाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांत हाणामारी,एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर येथे शेतीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहे .. या प्रकरणात डोणगाव पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे . महत्वाचे म्हणजे या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या असून या प्रकरणात पहिली तक्रार विकार खां जाबीर खां पठाण यांनी डोणगाव पोलिसात केल्याने दुसऱ्या गटातील 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि दुसऱ्या गटातील सय्यद इमरान सय्यद रहीम यांनी सुद्धा तक्रार दिल्याने 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे .. मात्र या घटनेते सय्यद अय्याज सय्यद वाहेद यांचा मृत्यू झाला आहे . . ही घटना शेतीच्या वादातून झाली असून पोलिस या घटनेचा तपासा करत आहेत..

कार्तिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावर वाहतुकीत बदल

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक यात्रेनिमित्त संत नामदेव महाराज यांच्यासह इतर पालख्यांचे शहरात आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेकडून पालखी मार्गावर वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

संत नामदेव महाराज पालखीमध्ये वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. पालखी प्रस्थानावेळी आणि मार्गक्रमणादरम्यान मोठ्या संख्येने वारकरी, भाविक आणि नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतुकीचा वेग कमी राहील. काही ठिकाणी कोंडी होण्याची शक्यता वाहतूक विभागाने व्यक्त केली आहे.

नागरिकांनी पालखी मार्गावरील वाहतूक टाळावी. पर्यायी मार्गांचा वापर करावा. वाहतूक पोलिस आणि स्वयंसेवकांना आवश्यक सहकार्य करावे. पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.

Mumbra: मुंब्रा मध्ये एटीएसची कारवाई, शिक्षकाच्या घरावर धाड

महाराष्ट्र एटीएसकडून ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसने केलेल्या कारवाईत काही संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींच्या चौकशीत मुंब्रा येथे राहणाऱ्या एका शिक्षकाचा संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर काल दुपारी एटीएसने ही धाड टाकली. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या पथकाने मुंब्रा येथील कौसा विभागात या शिक्षकाच्या निवासस्थानी तपास मोहीम राबवली. या वेळी अधिकाऱ्यांनी घराची तपासणी करून मोबाईल फोन, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर संबंधित शिक्षकाला अधिक चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले असून, तिथे एटीएसची तपास मोहीम सुरू आहे.

LODHA: लोढा कन्स्ट्रक्शनचे माजी संचालक राजेंद्र लोढा अडचणीत

ईडीकडून मुंबईत राजेंद्र लोढा आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या ठिकाणी छापेमारी सुरू.

लोढा कन्स्ट्रक्शन्सचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप.

जमिनींचे व्यवहार, खरेदी-विक्री आणि TDR विक्रीतून १०० कोटींहून अधिक फसवणूक केल्याचा आरोप.

मुंबई क्राइम ब्रांचने आधीच अटक केली होती; आता ईडीकडून पुढील कारवाई सुरू.

आर्थिक कागदपत्रे आणि मालमत्ता व्यवहारांची तपासणी सुरू असल्याची माहिती.

प्रकरणात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता.

आमदार संदिप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांचा शिंदेसेनेत प्रवेश

आमदार संदिप क्षीरसागर यांच्या जवळचे सतीश शेळके यांच्यासह अनेकांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश.

- नगरपरिषद निवडणुकीच्या आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश.

- आमदार संदिप क्षीरसागर यांच्या गोटातील अनेक सरपंच शिवसेनेत दाखल.

- एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मुक्तागिरी येथे पक्षप्रवेश.

Beed: बीड शहरातील शंतनु हॉटेलला आग, आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक...

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल शंतनू सुखसागर बियर ॲण्ड रेड वाईन शॉपला आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नागरिकांनी प्रसंगाधावून अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली असून या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

Kolhapur: माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतले करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे दर्शन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका विशेष कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहरात दाखल झाले आहेत. या निमित्ताने त्यांनी कोल्हापूरच्या आराध्य दैवत करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

मंदिरात पोहोचल्यानंतर माजी राष्ट्रपतींनी परंपरागत कुंकूमार्चन विधीनुसार पूजन केले. मंदिरातील पुजारी आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून पूजेची व्यवस्था केली. कोविंद यांनी देवीसमोर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आणि मंदिराबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. यांच्यासह इतर अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटींची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आरोप आहे.

उमंग व्हाईट गोल्ड प्रा. लि. कंपनीच्या कर्जावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँकेकडे गहाण मशिनरी विकल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे.

कुठल्याही क्षणी उन्मेष पाटील यांच्या सह दोघांना अटक देखील होण्याची शक्यता आहे

गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Nashik-Pune: नाशिक पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी...

आळेफाटा ते संगमनेर तालुक्यातील घारगाव दरम्यान ट्राफीक जाम...

सकाळपासून वाहनांच्या लागल्या रांगा...

महामार्गाच्या कामामुळे सातत्याने ट्राफीक जाम...

एकेरी वाहतूकीमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप...

आज सकाळपासूनच ट्राफीक जाम...

Nifad: निफाडच्या देवगाव येथे धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगाव परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या लावलेल्या पिंजऱ्यात आज जेरबंद झाला,बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती समजताच गावकऱ्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती,धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने अनेक जनावरे फस्त केली होती त्यामुळे ग्रामस्थां मध्ये भीतीचे वातावरण होते,रात्री शेताला पाणी देताना अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्याने पिंजरा लावण्याची मागणी होती,बिबट्या जेरबंद झाल्यावर वनविभागाचे अधिकारी तेथे बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी पोहचले असता ग्रामस्थ व वनविभागाच्या अधिकारी यांना संतप्त ग्रामस्थांनी जाब विचारला यामुळे काही काळ वातावरण तणाव पूर्ण झाले होते

Jalgaon: महानगरी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याचा संदेश

महानगरी एक्सप्रेस मधील एका कोच मधील शौचालयात हा संदेश लिहिलेला आढळला आहे. पाकिस्तान जिंदाबाद व आयएसआय यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली असून भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी येताच या गाडीची रेल्वे सुरक्षा बल लोहमार्ग पोलीस व स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसून तपासणी करण्यात आली तसेच श्वानपथकाच्या माध्यमातून देखील संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली. मात्र गाडीमध्ये काही आढळून आले नसल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाने दिली असून संपूर्ण गाडीच्या तपासणीनंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.

Nandurbar: नंदुरबार नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर...

नवापूर पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उमेदवार नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नवापूर पालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर करून खुप दिवसांच्या विविध चर्चेना पूर्णविराम दिला आहे.

इच्छुक नागराध्यक्ष व नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती नवापूर तालुका कॉंग्रेस भवन येथे पार पडल्या. नगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेद्वारांपैकी प्राचार्य डॉ दीपक जयस्वाल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. लवकरच काँग्रेस पक्ष आपली यादी जाहीर करेल.

Dattatray Bharne: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अजित पवार यांच्या भेटीला

अजित पवार पुण्यातील पक्ष कार्यालय येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर बैठका घेत आहेत

दत्तात्रय भरणे बैठकीला पोहचले आहेत

विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता

Bhosari: भोसरी विधानसभा क्षेत्रात प्रदूषित पाण्याचा पुरवठा

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना प्रदूषित पिण्याच पाणी पुरवठा करण्यात आला आहे. भोसरी विधानसभा क्षेत्रातील महादेव नगर परिसरामध्ये हा प्रदूषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नळातून अक्षरशः पाण्यासोबत अळ्या देखील बाहेर पडू लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या महापालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून नागरिकांना स्वच्छ सुरक्षित पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

Akola: अकोला नगरपालिका निवडणुकीसाठी वंचितकडून इच्छुकांची गर्दी

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी पक्षाकडं इच्छुकांची मोठी गर्दी. अकोला जिल्ह्यात 5 नगरपालिका आणि एका नगर पंचायतची निवडणूक लढवण्यासाठी वंचितकड इच्छुकांची गर्दी. वंचित यंदा 50 टक्के मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार असल्याची शक्यता. दरम्यान, आज सायंकाळ किंवा उद्यापर्यत वंचितच्या उमेदवारांची यादी जाहीर होणारेये.. अकोला जिल्ह्यातील बाळापुर नगरपालिका वगळता इतर ठिकाणी वंचित स्वबळावर लढणार असल्याची शक्यता आहे. या ठिकाणी स्थानिक संघटना वंचित सोबत असण्याची शक्यता आहे.. दरम्यान, अकोट, तेल्हारा, बाळापुर, मुर्तीजापुर आणि हिवरखेड नगरपरिषद आणि बार्शीटाकळी नगर पंचायतसाठी मतदान होणारे आहे. अकोट, मूर्तिजापूर नगरपालिका आणि बार्शीटाकळी नगर पंचायत निवडणूक वंचित स्वबळावर लढणार.. तर तेल्हारा नगरपालिका निवडणुकीत शेतकरी पॅनलला सोबत वंचित निवडणुकीला समोर जाणार असल्याची शक्यता..

Dhule Temperature: धुळ्यात 8.0°c तापमानाची नोंद

धुळ्यात तापमानाचा पारा मागील काही दिवसांच्या तुलनेत आणखीनच घसरला आहे, आज धुळ्यात 8.0°c तापमानाची नोंद करण्यात आली आहे, या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात नीचांकी तापमान मानले जात आहे,

हाड गोठविणाऱ्या थंडीमुळे धुळेकर नागरिक चांगलेच गारठले आहेत, सकाळी घराबाहेर पडणाऱ्यांना गरम ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे, हवामान विभागातर्फे धुळ्याच्या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बाटलीतून पेट्रोल विक्री केल्यास कायदेशीर कारवाई

कोल्हापूरात पेट्रोल पंपावरून जर बाटलीतून इंधन दिले गेल्याचे निदर्शनास आले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहेत. अशा पद्धतीने इंधन हाताळणे धोकादायक असून, असे करणे बेकायदेशीर आहे. बाटल्या, कॅन (जे विशेषतः इंधन साठवण्या साठी प्रमाणित केलेले नाहीत) किंवा तत्सम कोणत्याही असुरक्षित आणि अप्रमाणित कंटेनरमधून इंधनाची विक्री आणि वितरण करणे हे अत्यंत धोकादायक आणि पूर्णपणे निषिद्ध आहे. सर्व पेट्रोल, डिझेल पंपांवर बाटलीतून किंवा इतर असुरक्षित कंटेनरमधून इंधन विक्री पूर्णपणे थांबवावी. विक्री अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर भेट देऊन, या नियमाचे उल्लंघन होत नाही ना याची खात्री करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही पेट्रोल पंपचालकास तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावावी आणि आवश्यकतेनुसार त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी. यात परवाना रद्द करण्याची शिफारस देखील समाविष्ट असेल, पेट्रोल पंपचालकांनी पंप परिसरात याबाबत स्पष्ट सूचना प्रदर्शित कराव्यात, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर, नागरिकांनी काळजी घेण्याच जिल्हाधिकाऱ्यांच आवाहन..

जालन्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी मंडळात बिबट्याचा वावर असल्याचं वनविभागाच्या पाहणीनंतर समोर आल आहे. सुखापुरी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आणि ऊसतोड मजुरांनी कामे करताना सावधगिरी बाळगावी अस आवाहन जालन्याच्या जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केल आहे. पिठोरी सिरसगाव शिवारात मंगळवारी सकाळी बिबट दिसला असल्याची माहितीवरून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान बिबट्याचा या परिसरात वावर असल्याच दिसून आल आहे. दरम्यान सुखापुरी केव्हा परिसरात बिबट्या आढळ्यास नागरिकांनी तात्काळ वन विभागाची संपर्क साधावा अस आवाहन वन विभागाकडून करण्यात आल.

येवता येथे गोठ्याला आग...आगीत वासराचा मृत्यू...दोन बैल आगीत भाजले...

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवता इथ रात्रीला शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. या आगीत गोठ्यातील जनावरांचा चारा, स्प्रिंकलर पाइप,मोटर पंप,केबल,टिनपत्रे जळून खाक झाले. या आगीत गोठ्यात बांधून असलेल्या वासराचा होरपळून मृत्यू झाला तर दोन बैल 60 टक्के भाजलेत.

वाशिममध्ये थंडीचा जोर वाढला,पारा 11.8 अंशांखाली.

वाशिम जिल्ह्यातील हवामानात बदल होत असून, मागील चार ते पाच दिवसांपासून अचानक थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाशिममध्ये किमान तापमान ११.८ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी शेकोट्यांचा आधार घेतल्याचं बघायला मिळाल. तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, तर या थंडीचा फायदा मात्र रब्बी पिकांसह तुरीच्या पिकाला होत असल्याने उत्पादन वाढ होण्याची शक्यता आहे.

लोणिकंद-थेऊर फाटा येथे भीषण अपघात

पुणे–अहिल्यानगर महामार्गालगत लोणिकंद–थेऊर फाटा परिसरात सायंकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. अवजड कंटेनर मागे सरकल्याने मागे उभी असलेल्या कार गाडीला जोरदार धडक बसली. धडकेत गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, अपघातानंतर परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून पुढील तपास सुरू आहे.

nashik-surgana-काळ्या बाजारात जाणारा रेशनचा धान्यसाठा महसूल विभागाने केला जप्त

नाशिकच्या सुरगाणा तालूक्यात काळ्या बाजारात जाणारा सुमारे नऊ लाख रुपये किमतीचा रेशनचा धान्य साठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे.सुरगाणा तहसिलदारांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार सुरगाणा ते उंबरठाण रोडलगत मोतीबाग या ठिकाणी एका आयशर गाडीत रेशनचे काळ्या बाजारात जाणारे धान्य असल्याची माहिती मिळताच तहसिलदारांनी पुरवठा अधिका-यांना पाठवून तपासणी केली असता त्यात धान्य साठलेले असल्याच उघड झाले या जप्त केलेल्या धान्याची किमंत सुमारे नऊ लाख रुपये असल्याच सांगण्यात आले असून या प्रकरणी एका संशयिता विरोधात जीवनावश्यक कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात वाढली हुडहुडी,पारा 11 अंशावर

गेल्या चार दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अचानक थंडीत वाढ झाल्याने शहरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पारा 11 अंश सेल्सिअस वर आला आहे आणखी काही दिवस थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अभियांत्रिकीसह तीन अभ्यासक्रमांसाठी दोनदा 'सीईटी' परीक्षा होणार

पीसीएम,पीसीबी आणि एमबीए या तीन अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोनदा होणार आहेत. पहिली 'सीईटी' परीक्षा एप्रिल-२०२६मध्ये, तर दुसरी परीक्षा मे-२०२६ मध्ये घेण्यात येणार आहे.

'जेईई मेन' ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात येत त्या धर्तीवर राज्यातही अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि व्यवस्थापन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या सीईटी परीक्षा दोनदा घेण्यात येणार आहे.

लोणावळा नगरपालिकेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

स्वराज्य संस्थेच्या आगामी लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त इच्छुक 13 प्रभाग 27 उमेदवारांच्या आणि नगराध्यक्षच्या मुलाखती भाजपच्या वतीने पार पडल्या. तर राष्ट्रवादीने लोणावळ्याचा राजेंद्र सोनवणे यांना नगराध्यक्ष पदाची घोषणाही केली आहे...

नंदुरबार शहरात पोलिसांकडून नाकाबंदीने वाहनांची तपासणी

नंदुरबार नगरपरिषद निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी वाहनांची कागदपत्रे तपासणी केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहे. त्यात नंदुरबार नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर नंदुरबार शहरात पोलिसांनी शहराच्या प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. यावेळी ये-जा करणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचारी हे त्याठिकाणी उपस्थित राहून वाहनांची तपासणी करीत आहेत. निवडणूकांच्या पार्श्‍वभूमीवर ही नाकाबंदी करीत खबरदारी घेतली जात आहे. शहरातील धुळे चौफुली, करण चौफुली, तळोदा चौफुली आदी भागांमध्ये पोलिसांनी नाकाबंदी पॉईंट लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Mistakes: वजन कमी करण्यासाठी रोज चालायला जाताय? मग या चुका होणार नाहीत याची घ्या काळजी

Maharashtra Live News Update: अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्ब प्रकरणात शेकापची उडी

Tejaswini Lonari Honeymoon Photos: अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची हनिमून ट्रिप, रोमॅन्टिक पहिला फोटो आला समोर

खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

SCROLL FOR NEXT