Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: - महागडा मोबाईल नदीपात्रात पडला, थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री राबवली शोधमोहीम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

महागडा मोबाईल नदीपात्रात पडला.. थेट गोताखोरांना बोलावून मध्यरात्री संगमनेरमध्ये राबवली शोधमोहीम 

मनुष्य किंवा प्राणी नदीपात्रात बुडाले तर गोताखोरांना पाचारण करून शोध मोहिमेच्या अनेक घटना आपण बघितल्या असतील.. मात्र सध्या संगमनेर तालुक्यातील एका वेगळ्याच शोध मोहिमेची चर्चा सर्वत्र होताना दिसतीये.. गोताखोरांना पाचारण करून मध्यरात्री नदीपात्रात राबवण्यात आलेली ही शोधमोहीम होती एका महागड्या मोबाईलची..

सांगलीत भिंत कोसळून सहा भाविक ठार 

वादळी वाऱ्याने चिरावीटाची भिंत कोसळून सहा भाविक जागेचा ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. तर दहा भाविक जखमी देखील झाले आहेत. सांगलीच्या जत तालुक्यातील मोटेवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे.. मोटेवाडी येथे मुरगुबाई देवीच्या कार्यक्रमानिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते.. दरम्यान सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास प्रचंड वादळी वारा व पाऊस सुरू झाला..

Nashik: CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल

नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा CBI घेणार ताबा

दुपारी नाशिक क्राईम ब्रँच युनिट २ ने संशयित आरोपीला घेतलं होत ताब्यात

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

० भरधाव कारची उभा असलेल्या कंटेनरला धडक

० कार कंटेनरच्या मागे घुसली

० कारचे मोठे नुकसान

० कारमधील सर्व प्रवासी गंभिर जखमी

० कोकणातुन मुंबईला निघालेल्या चाकरमान्यांच्या कारला महाड तालुक्यात चांडवे गाव हद्दीत भिषण अपघात

अमरावती जिल्ह्यात चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनची अवैध गुटखा वाहतुकीवर मोठी कारवाई

एकूण 1 कोटी 1 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाई 12 मे रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.

MH 01 CV 4962 क्रमांकाचा ट्रक मालखेड मावाच्या हद्दीत पकडण्यात आला.

ट्रकमधून अंदाजे 10 टन अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली.

ट्रक चालक शेख इमरान शेख मुस्कान याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

जप्त मुद्देमालात 75.75 लाखांचा गुटखा, 25 लाखांचा ट्रक आणि दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.

निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली असून 3 ते 4 आरोपी फरार आहेत.

नीट 2026 परीक्षा अचानक रद्द , विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम

3 मे 2026 रोजी झालेली नीट युजी परीक्षा आज रद्द झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, नीट पेपर फुटीचं कारण समोर आल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे, तर लातूर मध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नीट exam ची तयारी करण्यासाठी येत असतात , तर याच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे, वर्षभर मेहनत करून, गुणवंत विद्यार्थ्यांचे अशा अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मोठे नुकसान होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे

TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा होणार सुनावणी

- आज सरकारी वकील अजय मिसार यांच्याकडून कोर्टात करण्यात आला युक्तिवाद

- आरोपींच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून करण्यात आला विरोध

- उद्या पुन्हा आरोपींच्या वकिलांकडून कोर्टात मांडली जाणार बाजू

- आरोपींची बाजू ऐकून घेतल्यानंतर उद्या कोर्टाकडून TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता

महाराष्ट्रात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट

पुढील 3 दिवसात राज्यात उष्माघाताचा धोका,रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता

महाराष्ट्र उन्हाने तापला, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा.

कल्याण-डोंबिवलीत २२५ अतिधोकादायक इमारती घोषित

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत अतिधोकादायक इमारतींची संख्या तब्बल २२५ इतकी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शहरात ४९१ धोकादायक इमारती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या धोकादायक इमारतींपैकी ज्या इमारतींना स्ट्रक्चरल अभियंत्यांनी दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे, त्या इमारतींना पालिकेकडून दुरुस्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कल्याणमध्ये नाव नंबर लिहायला सांगितले म्हणून डिलिव्हरी बॉय करून इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण

कल्याणमध्ये एका इमारतीतील सुरक्षारक्षकाला डिलिव्हरी बॉय करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे कल्याण मधील संतोषी माता रोड परिसरात शुभम अपार्टमेंट आहे या अपार्टमेंट मध्ये एक डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला होता इमारतीतील सुरक्षारक्षक संदीप जाधव यांनी त्याला हटकले त्याला नाव आणि नंबर डायरीवर लिहून जा असं सांगितलं त्यावरून या डिलिव्हरी बॉयला राग आला आणि त्याने संदीप जाधव यांना मारहाण केली या प्रकरणात महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.

भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा

भाजपचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.'डॉ. नितीन धांडे हे लवकरच आमदार झाले पाहिजेत,अशी मी देवाकडे प्रार्थना करत आहे.' असे वक्तव्य करत नवनीत राणा यांनी धांडे यांच्या उमेदवारीसाठी जोरदार पाठिंबा दर्शवला.कार्यक्रमात बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की, 'आम्ही आमची इच्छा जाहीर केली असून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे.' त्यांच्या या विधानामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील राजकीय समीकरणांची चर्चा अधिक रंगू लागली आहे.

इंदापुरात नीरा नदीचे पात्र कोरड ठाक, पशुधनाच्या चाऱ्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात दक्षिण पट्ट्यात नीरा नदीचे पात्र कोरडे ठाक पडल आहे.यामुळे पशुधनाच्या चाऱ्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नदीचे पात्र कोरडं असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील ग्रामस्थांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे.

धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे झाली होती दोन गटात हाणामारी

-नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील माष्टी येथे दोन गटात हाणामारी झाली होती.दिनांक आठ मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती.या हाणामारीचे व्हिडियो समाज माध्यमावर व्हायरल देखील झाले. दरम्यान दोन्ही गटाच्या परस्परविरोधी तक्रारीवरून कुंडलवाडी पोलीसांनी दोन्ही गटाच्या 25 हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला.मात्र ही कारवाई करताना जे घटना स्थळी नव्हते अशा विद्यार्थ्यावर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.माष्टी गावातील 25 वर्षीय बालाजी सोनकांबळे हा विद्यार्थी नांदेड. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय. घटनेच्या दिवशी तो नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका अभ्यासिकेत अभ्यास करत होता.

नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कडक कारवाईची शिक्षणतज्ञांची मागणी

नीट परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परभणीतील शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे. परीक्षेदरम्यान झालेल्या गैरप्रकारांचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मालवण बाजारपेठेत आग लावून सलूनचे दुकान जाळले.

मालवण बाजारपेठेतील सलूनच्या दुकानाला अज्ञात व्यक्तीने डिझेल आणि पेट्रोल ओतून आग लावल्याने दुकान जळून खाक झाले. या घटनेमुळे मालवण शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दुकान मालक निलेश चव्हाण यांनी मालवण पोलिसांत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. चव्हाण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह सलून व्यवसायावर अवलंबून होता. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. घटनेचा अधीक तपास मालवण पोलिसांनी सुरू केला आहे.

washim : गावठी दारू अड्ड्यावर धाड; 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त...

वाशीमच्या मोहगव्हान परिसरात गावठी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 4 लाख 73 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केलाय .या प्रकरणी सलीम भवानीवाले आणि आरिफ नंदावाले यांच्याविरुद्ध अनसिंग पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

nashik : नीट पेपर फूट प्रकरण,  १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

- नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातून १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

- तर राज्यातून २ आरोपी ताब्यात, यापैकी नाशिकमधून एका आरोपी ताब्यात

- इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात एका आरोपीला नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रँचने घेतलं ताब्यात

- आरोपी मूळचा नांदगावचा ३० वर्षांचा BAMS चा विद्यार्थी, education counciling देखील करत माहिती

Bhiwandi : भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल

भिवंडी शहरात एका तरुणाने गळ्यात जिवंत साप गुंडाळून दुचाकीवरून भर रस्त्यात फिरत स्टंट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील तरुणाचे नाव साकिब अन्सारी असून तो निजामपूर परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

pune :  वाढत्या तापमानाचा फटका; अन्न-पाण्याच्या शोधात शेतशिवारात मोरांची भटकंती

उन्हाचा तडाखा वाढल्याने वनक्षेत्रातील पाणवठे आटू लागले आहेत. त्यामुळे अन्न-पाण्याच्या शोधात मोर आता शेतशिवारात भटकंती करताना दिसत आहेत. शिरूर तालुक्यातील शिंदोडी परिसरात असेच दृश्य पाहायला मिळत असुन शेतशिवारात मोरांचा थवा फिरताना स्थानिकांना दिसून आला. वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक अधिवासातील पाण्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे मोर अन्न आणि पाण्यासाठी मानवी वस्तीजवळील शेतांकडे वळत आहेत.

raigad : रायगडच्या माणगावमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा

रायगडच्या माणगावमध्ये पेट्रोल पंपांवर रांगा पहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणात निघाले आहेत, इंधनाची मागणी वाढली आहे, त्या प्रमाणात पेट्रोल मिळत नसल्याने टंचाई सदृष्य परिस्थिती निर्माण झाल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणने आहे. परिणामी रायगडमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा पहायला मिळत आहेत. हिच परिस्थिती CNG पंपांवर देखील पहायला मिळत आहे.

nanded : नांदेड जिल्ह्यातील तापमानात पुन्हा वाढ, तापमान पोहोचले 42 अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत

नांदेड जिल्ह्यात ऊन्ह पावसाचा खेळ सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस बरसला होता. आज पुन्हा नांदेड जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळत आहे. नांदेड जिल्ह्याचे आजचा तापमान 42° डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा होणार राज भाषा मराठीत प्रकाशित

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा विकास आराखडा हा राज भाषा मराठीत प्रकाशित करण्यात यावा.......! अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील शेकडो नागरिकांनी तसेच विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी केली होती. या मागणीला अखेर यश आलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचा विकास आराखडा आता मराठी भाषेत तयार करून प्रकाशित करण्यासाठी स्थायी समितीने अखेर मंजुरी दिली आहे.

मालेगावच्या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात

नाशिकच्या मालेगाव शहरातील मोसम नदी काठी सरदार नारोशंकर राजेबहद्दर यांनी स्थापन केलेल्या भुईकोट किल्याची अत्यंत दुरवस्था झाली होती,मालेगावच्या ऐतिहासिक वारशाची ओळख असलेल्या या भुईकोट किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून किल्ल्याची पडझड होत असल्याने इतिहासप्रेमी आणि मालेगावकरांच्या वतीने दुरुस्तीची मागणी सातत्याने केली जात होती.

पुणे-सोलापूर महामार्गावर जीवाशी खेळ; कारचालकांची बेफाम स्टंटबाजी

पुणे-सोलापूर महामार्गावरील इंदापूर बायपास येथे भरधाव कारचालकांनी धोकादायक स्टंटबाजी करत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

व्हिडिओमध्ये काही कारचालक महामार्गावर वेगाने गाड्या चालवत धोकादायक कसरती करताना दिसत आहेत. या बेफाम प्रकारामुळे इतर वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जातेय.

कल्पना खरात अटकपूर्व जामीन प्रकरण तहकूब

  • कल्पना खरात यांना न्यायालयात दिलासा नाही

  • अटकपूर्व जमिनीवर पुढील सुनावणी मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात

  • पुढील सुनावणी 25 ते 30 मे दरम्यान

बीडमधील मकोकातील फरार आरोपी आशिष आठवलेकडून जालना रोडवरील हॉटेल समोर गोळीबार

बीडमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराने खळबळ उडाली आहे. जालना रोड परिसरात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलसमोर आशिष आठवले याने गावठी बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची तीन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली होती.

अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष आठवलेला ताब्यात घेत मोठी कारवाई केली.

यवतमाळच्या अपार्टमेंटमधून मारूती स्विफ्ट गाडीची चोरी, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

यवतमाळच्या वाघापूर रोडवरील संभाजी नगर भागातील सह्याद्री अपार्टमेंटच्या JSK पार्क परिसरातून एक मारोती स्विफ्ट चारचाकी गाडी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालीये आहे.

सदर मारोती स्विफ्ट गाडी गुजर नावाच्या व्यक्तीच्या मालकीची आहे. काल रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी गाडी चोरून नेल्याचे परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे.

हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला तापमानाचा येलो अलर्ट

येल्लो अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर

गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडत तापमानाचा पारा चक्क 45 अंश सेल्सिअस वर

जिल्हा प्रशासनाकडून हीट वेव्ह चा हाय अलर्ट

​दुपारी 11 ते 3 घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकारी डॉ मनिषा खत्रींचं जनतेला आवाहन....

​उन्हाच्या झळांनी नवजात बालकांचे वजन घटत असल्याच्या प्रमाणात वाढ

Maharashtra: राज्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ

राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ,नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राज्यात एकूण 175 उष्माघाताचे रुग्ण तर आत्तापर्यंत 6 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण नंदुरबार 22, छत्रपती संभाजीनगर 20, नाशिक 19 अमरावती 15 आणि बुलढाणा 14

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील उष्माघाताचे रुग्ण

राज्यभरात आत्तापर्यंत उष्माघाताने सहा रुग्णांचा मृत्यू

Kalyan: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पूजापाठ करण्याच्या बहाण्याने घरी येऊन १५वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे या प्रकरणी उल्हासनगर मध्ये राहत असलेल्या भोंदूबाबा साहिद शेखविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत. भोंदू बाबा शाहिद शेख ला अटक करण्यात आली आहे.

Raigad: रायगड मधील CNG पंपावर वाहनांच्या रांगा

सध्या उन्हाळी सुट्टयांचा हंगाम असल्याने कोकणात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल होत आहेत. कोकणात जाताना गाडीच्या CNG च्या टाक्या फुल्ल करण्यासाठी या पर्यटक प्रवाशांना रायगडमध्ये CNG च्या रांगेत तासंतास उभ रहाव लगत आहे. CNG च्या रांगांमध्ये तासंतास उभे राहिल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तीन दिवसांपुर्वीच्या CNG टँकर चालकांच्या संपामुळे CNG चा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे पुढे CNG मिळेल की नाही या भितीने CNG गाडीवाले मिळेल तिथे CNG भरून घेत आहेत त्यामुळे रांगा लागल्याचे CNG पंप चालकांच म्हणन आहे. रायगड मधील इंदापुर, माणगाव, महाड मधील CNG पंपांवर वाहनांच्या या रांगा पहायला मिळत आहेत.

Nashik: लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू महेश गिरीचा जामीन फेटाळला

लैंगिक शोषण प्रकरणातील भोंदू महेश गिरीचा जामीन फेटाळला

निफाड जिल्हा व सत्र न्यायालयाचा गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

धारणगाव खडकचा महेश गिरी उर्फ महेश काकडे याला दिलासा नाही

स्वतःला महाराज म्हणवत महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप

जादूटोण्याच्या नावाखाली फसवणुकीचाही गुन्हा लासलगाव पोलिसांत दाखल

तक्रारदारांची संख्या वाढण्याची शक्यता न्यायालयाने गांभीर्याने घेतली

गुन्ह्याचे स्वरूप गंभीर मानत न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केला

Sharad Pawar: पीएम मोदींच्या आव्हानानंतर शरद पवारांची पोस्ट; म्हणाले ही बातमी चिंताजनक...

मध्यपूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या. त्यांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. या घोषणा अचानक करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्र तसेच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी आहे.

Nandurbar: नंदुरबारचा पारा 45 पार

नंदुरबारचा पारा 45 पार,जिल्हा प्रशासनाकडून हीट वेव्ह चा हाय अलर्ट...

दुपारी 11 ते 3 घराबाहेर पडू नका, जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी चे जनतेला आवाहन....

उन्हाच्या झळांनी नवजात बालकांचे वजन घटले,

पालकांसाठी प्रशासनाकडून महत्त्वाची नियमावली जारी.

जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सज्ज; डिझास्टर मॅनेजमेंट हेल्पलाईन कार्यान्वित...

Washim: वाशिम बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक; मोजणीसाठी आणखी एक दिवस...

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत काल 15 हजार क्विंटलपेक्षा अधिकची हळदीची विक्रमी आवक झाल्याने हळद विक्रेत्याची मोठी गर्दी पाहवयास मिळाली. काल मोठ्या प्रमाणात हळद विक्रीसाठी आल्याने मोजणीसाठी आणखी आजचा दिवस लागणार आहे.आवक प्रचंड वाढल्याने काल दिवसभरात ६० टक्के हर्रासी पूर्ण होऊ शकली.आज उर्वरित ४० टक्के हराशी आज होणार आहे..

आसाममध्ये भाजपची ‘हिस्टोरिक व्हिक्टरी ’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुक

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाममधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल जनतेचे आभार मानत हिमंता बिस्व सरमा यांचे विशेष अभिनंदन केले. हिमंता बिस्व सरमा दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून, त्या शपथविधी सोहळ्यासाठी शिंदे उपस्थित राहण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.

आसाममध्ये भाजपने १०२ जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, “आसामच्या जनतेने विकासावर विश्वास ठेवत भाजपला भरघोस समर्थन दिले. हिमंता बिस्व सरमा हे डायनामिक आणि व्हिजनरी नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि जनकल्याणाच्या योजनांनी मोठे यश मिळवले.”

Pune: पुणेकरांना दिलासा! शहरात पाणी कपात नाही

३१ मे पर्यंत पुणे शहरात कुठल्याही प्रकारची पाणी कपात नसल्याची प्रशासनाची माहिती

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रात पुरेसे पाणी असल्याने महापालिका प्रशासनाने घेतला निर्णय

जलसंपदा विभागाकडून याआधी पुणे शहरात १५ टक्के पाणी कपात करा अशा सूचना पुणे महापालिकेला देण्यात आल्या होत्या

मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने ३१ मे पर्यंत शहरात पाणी कपात होणार नसल्याची महापौरांची माहिती

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात ५६.०० टक्के इतका पाणीसाठा

Rupali Chakankar: रूपाली चाकणकर यांना ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनाही ईडीचे समन्स बजावल्याची सूत्रांची माहिती

दोन दिवसांपूर्वी एसआयटीकडून साडेपाच तास चाकणकर यांची चौकशी झाल्यानंतर आता ईडीची एन्ट्री

चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

पदाचा गैरवापर करून काही आर्थिक व्यवहार झाले का? याचा तपास करणार

शिवनिका संस्थेतील सहभागाचीही चौकशी होणार

आर्थिक व्यवहारांशी संबंधित बाबींची पडताळणी

चाकणकर यांची चौकशी अहवाल ईडीला पुढील काही दिवसांत सादर होण्याची शक्यता

चाकणकरांच्या ईडी चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

खरातने खंडणी रॅकेट चालवून ‘बेनामी’ बँक खात्यांच्या नेटवर्कमधून ७० कोटींपेक्षा अधिक रक्कम वळवल्याचा आरोप

इस्रायलचे महावाणिज्यदूत घृष्णेश्वरासमोर नतमस्तक

इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी सोमवारी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात नतमस्तक होत पारंपरिक पद्धतीने पूजा केली. सध्या अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाने जगभरात तणावाचे वातावरण असतानाच, इस्रायलचे महावाणिज्यदूत यानिव रेवाच यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक वारशाचा आनंद घेतला. जागतिक प्रसिद्ध वेरूळ लेणी, देवगिरी किल्ला आणि बीबी का मकबरा पाहण्यासाठी ते शहरात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात नतमस्तक होत पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा केली.

पुणे सातारा महामार्गावर अपघात

पुणे सातारा महामार्गावर चेलाडी फाट्याजवळ मध्यरात्री बस आणि कार मध्ये जोरदार धडक झाल्याने अपघात झाल्याची घटना

साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची, डिव्हायडर ओलांडून थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला समोरून धडक.. चालकाचे कार वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती..

आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि खासदार पार्थ अजित पवार सध्या आसाम दौऱ्यावर असून आज ते नव्याने निवडून आलेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

जळगावजामोद येथे महिलेच्या निर्घृण हत्येचा उलगडा

जळगावजामोद तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या महिलेच्या मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 12 दिवसांत छडा लावला आहे. प्रेमसंबंधाला विरोध असल्याने वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचे तपासात समोर आले. आरोपींनी मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून शीर व धड वेगळे करून मृतदेह रानात फेकला होता. या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचे वडील आणि भाऊ अशा दोघांना अटक केली असून पुढील तपास जळगावजामोद पोलीस करत आहेत....

विना सोन्याचं लग्न करायचं का? उद्या म्हणतील पाणी बंद करा, मग विना पाण्याची अंघोळ करू का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसमोर अनेक आवाहने ठेवल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय. नेमकं काय चाललं आहे कळत नाही एक तर मोदींनी स्पष्टपणे जाहीर करून टाकावं. आम्हाला इलेक्ट्रिक गाड्या परवडत नाहीत आम्ही घ्यायच्या कशा आणि जर सोनं घेऊ नका म्हणतात तर विना सोन्याचा कोणी लग्न करेल का. आज म्हणतात हे बंद करू ते बंद करू उद्या पाणी बंद केलं तर विनाअंघोळीचं बाहेर पडायचं का अशा खोचक आणि पुणेरी टोमणे पुणेकरांच्या भावनेतून उमटत असल्याचे दिसत आहे.

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार

नियमित शुल्कासह 21 मे पर्यंत तर विलंब शुल्कासह 25 मे पर्यंत अर्ज करता येणार

माध्यमिक शाळांनी आरटीजीएस किंवा एनईएफटी द्वारे 26 मे पर्यंत विभागीय मंडळाकडे रक्कम भरणे गरजेचे

विद्यार्थ्यांच्या याद्या आणि फ्री लिस्ट विभागीय मंडळाकडे 29 मे पर्यंत जमा करणे आवश्यक आहे

शेतकरी कुटुंबीयांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषण

धाराशिव जिल्ह्यातील विठ्ठलवाडी येथील शेतकरी गेले अडीच वर्षापासून शेत रस्त्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवतोय मात्र प्रशासनाकडुन शेत रस्त्याचा प्रश्न अद्यापही मार्गी न लावल्याने वैतागलेल्या महेश्वर माळी या शेतकऱ्याने आपल्या पत्नी आणि लहान लहान मुलांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केल आहे.पावसाळ्यापूर्वी शेत रस्ता खुला करावा अशी मागणी शेतकरी कुटुंबाने केली आहे.

पुणे शहराचा पारा चढला, शहर झालं "हॉट सिटी"

गेल्या तीन दिवसांपासून पुणेकरांना करावा लागत आहे कडक उन्हाचा सामना

पुणे शहरात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअस डिग्रीच्या वर

पुणे शहरातील लोहगाव परिसरात सर्वाधिक ४३.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

शिवाजीनगरमध्ये पारा ४१.४ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला

आसामचे नवविर्वाचित मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत. या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कालच गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी सरमा यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

- पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वापराबाबत केलेल्या आवाहनानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याच्या शक्यतेने नागरिक पेट्रोल पंपांवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT